Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 23, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through March 23, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Wednesday, March 21, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


*** शब्दातीत***
हे असं स्वःतामध्ये
गुरफटून गेलेलं धुकं
उतरु देत ह्या कागदांवर…

चांदण्यांची भाषा बोलणा-या ओठांनी
तू स्पर्शून घे
माझ्या ओठांवरची शब्दांची धूळ.

'का आणि कशाला?’ हे विचारु नकोस!
वेडया कविते…
हे सारं तुझ्याइतकंच आहे शब्दातीत!!
----मयूर----


Paragkan
Wednesday, March 21, 2007 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gargi: kya baat hai !!!

Good one Mayur!

Gargi
Wednesday, March 21, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, माणिक, जयश्री, पराग...... आभार :-)

Gargi
Wednesday, March 21, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकांत

स्मृतीकोशातील एखादा पाउलपक्षी
अचानक शीळ घालतो
भर उन्हात बहरलेल्या गुलमोहरची
गोष्ट सांगून जातो
तेव्हा कळत्;
तापलेल्या रस्त्यावरुन एकटच चालण्याची
अनुभूती फारशी जुनी नाही
हे शहर परक नाही
रस्ते नेहमीचेच,चिरपरिचीत
हा एकांत नव्याने चालून आलेला नाही
.......फक्त मध्ये काही काळ लोटलाय येवढंच्


Mankya
Wednesday, March 21, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरा ... सुंदरच !
गार्गी .. भिडलंच मनाला हे सगळं !
शानचं " तनहा दिल तनहा सफर " गाणं दिसलं समोर !
फक्त " ह " एवजी " हा " लिही बघू म्हणजे कामगिरी फत्ते !

माणिक !


Gargi
Wednesday, March 21, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks manik..देवनगागरीत टाईप करायची अजून सवय नाही झालीय्

Meenu
Thursday, March 22, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह छान जमलीये मैफल ...!! मस्त लिहीताय सगळेच ..

Rujutak
Thursday, March 22, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नम्स्ते, मे इथे नविन आहे. सगळेच छान लिहित आहेत

ऋजुता


Rujutak
Thursday, March 22, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



नकळत...

कळतच नाही आता
थांबायचं कुठे
वेड्या मनाला
गुंतावायचं कुठे?

नाही नाही म्हणत
रोजच भेटते तुला
मोरपिशी स्वप्नाला
अडवायचं कुठे?

जाणुन सारे काही
अजाण तुझे भाव
आता इन्द्रधनुला
सावरायचं कुठे?

तु आहेस कुठेतरी
एवढच पुरे आता
नाहीतर मनाला
जडवायचं कुठे?


ऋजुता






Jagu
Thursday, March 22, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजरा

तू दिलेला मोग-याचा गजरा
खुप काही मला देउन गेला

त्याने स्वप्नांचा ताटवा पसरुन
प्रितीचा फ़ुलोरा फ़ुलवीला

त्याच्या मद मस्त गंधाने
माझा रोम रोम खुलवीला

तुझा हा गजरा माझ्या भावनेला
हळुच स्पर्शून गेला.


Ganesh_kulkarni
Thursday, March 22, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गार्गी ,
"एकांत " खुपच छान!
ऋजुता तुमचे मायबोलीवर स्वागत आहे!


Jagu
Thursday, March 22, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजरा ही कवीता माझा कवीता करण्याचा पहिला प्रयत्न आहे. प्लिज मला प्रतिसाद द्या.

Mayurlankeshwar
Thursday, March 22, 2007 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता ...'गजरा'..वाटत नाही पहिलाच प्रयत्न असेल म्हणून.. चांगला आहे.
आता शुद्ध प्रतिसाद म्हणून बोलायचे झाले तर्-
'गजरा' इत्यादी typical विषय काव्य-क्षेत्रात लिहून लिहून सुकलेले आहेत. तरी सुद्धा ह्या भावना वेगळ्या तरल शब्दांत मांडता येऊ शकतात.पण त्यासाठी काव्य-वाचनाची गोडी आवश्यक. तूम्हाला वाचनाची आवड असेलच :-)
तरीही ही 'पहिलीच कविता' असेल तर तुम्ही नजिकच्या भविष्यात अजुन सुंदर कविता करू शकाल असे वाटते.
काही चूकीचे बोललो असल्यास क्षमस्व.
शुभेच्छा :-)


Gargi
Thursday, March 22, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनाकलनीय

मी माझीच कधी कोसळ्ते
कीती उध्वस्त वाटत तेव्हा
मी अगदी सुटी सुटी.....
स्वताःच पाकळ्या खुडून टाकलेल्या
दुर हेलकावत दिशाहिन पसरते.....
अन् बहर ओसरला की
पुन्हा उत्साहाने वेचून स्वताःला
रचन्यात मग्न होते
अस का व्हाव?.......
सारच अनाकलनीय


Mankya
Thursday, March 22, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋजुता ( पहिल्यांदा ऋतुजा वाचलं मी ! )... नकळत छान जमून गेलीये !

Jagu... अगं असं का लिहिलस प्रतिसाद द्या म्हणून, ईथं कविता आवडली तर प्रतिसाद देतातच गं, थोडं काही चुकलंच तर मार्गदर्शनही करतात मंडळी, माझा अनुभव आहे हो ( वाटलच तर जुने अर्काव्हीज्- ' गुलमोहर,बखर ' काढून वाच म्हणजे कळेल आणि तुला अंदाजही येईल कि किती सुंदर, सहज, विविधतेनं नटलेल्या काव्याचा गाव ईथेच जागतो, थोडंस मार्गदर्शनही मिळेल त्यातून नक्किच ! ) !! अखंड विविध विषय वाचत रहा आणि लिहित रहा, म्हणजे सरावशील लिहायला !
गजरा .. पहिला प्रयत्न तर छानच आहे वादच नाही !
पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा !

गार्गी .. खूपच सुंदर गं !

माणिक !


Ganesh_kulkarni
Friday, March 23, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिक...
तू जेव्हा जेव्हा...
अगदिच गप्प असतेस तेव्हा...
ते नसतच तुझं...
नुसतेच गप्प राहणे... आणी...
ती नसतेच मौनाची भाषा!...
कारण...
तुझ्या अंतरगांत...
काही तरी अनामिक...
खळबळत असते!...
तुझ्या गप्प राहण्यात...
त्या मौनात!
गणेश(समीप)


Mrunatul
Friday, March 23, 2007 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वयच असं असतं
मन कोणावरतरी जडतं
स्वप्न रंगवत रंगवत
उंच भरारी घेऊ लागतं

सभोताली हे जग
अधिकच सुंदर होतं
तुझं,माझं न राहता
आपलं होऊ लागतं

एकांत आवडू लागतो
गलबल दूर सारतो
आठवणीत दंग होऊन,
स्वत:च स्वत:शी हसतो

तरल सूर ऐकू येतात
मनाला स्पर्शुन जातात
ती इथेच आहे की काय
असे भास ही होऊ लागतात

हे प्रेम असंच असतं का?
इत्कच सुंदर फुलतं का?


Jagu
Friday, March 23, 2007 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर आणि माणिक तुमच्या मार्गदर्शना बद्द्ल धन्यवाद. तुमच्या सुचना मी आमलात आणेन.

गार्गी तुमची कविता फ़ारच सुंदर आहे.
पुन्हा उत्साहाने वेचून स्वताःला
रचन्यात मग्न होते
खुप छान आहे.


Meenu
Friday, March 23, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्न ..

अक्षरांवरुन नजर
फिरत राहते निर्विकारपणे ..
काही काही भावना,
वेशीबाहेरच उरतात हल्ली ..
जाणीवांची वेस ओलांडुन,
आल्याच कधी चुकुन तरी,
नुसतीच बघत रहाते मी निर्विकारपणे ..
माझी नजर हल्ली,
ओळख देत नाही त्यांना ...


Mayurlankeshwar
Friday, March 23, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिकामेपण

भरगच्च गर्दीच्या पाठीवर
वाहून चाललेलं
भरगच्च काळोखाचं ओझं.
भरगच्च नसांतून सळसळणारं
‘माणूस’पणाचं रक्त…
रक्तातून ठिबकत ठिबकत
विस्तारणारं एकटेपण…
आणि भरुन आलेली
आपल्यातल्या रिकामेपणाची जाणीव…
तीही भरगच्च!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators