Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 22, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » चैत्र » कथा कादंबरी » प्रथम तुज पाहता.. » Archive through March 22, 2007 « Previous Next »

Psg
Wednesday, March 21, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथम तुज पाहता..


पौर्णिमेची सुंदर रात्र होती.. टीपूर चांदणं पडलं होतं.. चंद्र दिसत नव्हता.. पण थोडं वर गेल्यावर दिसला असता.. अजिंक्य वर जायला उतावीळ झाला होता.. अश्या चंद्राचे फोटो कसले अप्रतीम आले असते! निरभ्र आकाश आणि पूर्ण चंद्र.. वा.. अजून काय हवं होतं??

ही शेवटची बॅच एकदाची वर पोचवली की तो मनसोक्त भटकणार होता.. त्या आधी अर्थातच पक्याचा रस्सा होताच.. मस्त वास यायला लागले होते.. यांनी सुरु केलेला दिसतो स्वयंपाक.. चला कामाला लागू.. मार्तंडगडाच्या** शेवटच्या चढाईमार्गावर होते ते.. हाच टप्पा जरासा कठीण होता.. कठीण म्हणजे काय, तर पाय firmly ठेवायला जागा नव्हती, दगड नव्हते आणि धरायलाही काही नव्हते.. दोराच्या सहाय्यानी चढायचे होते.. सर्वात आधी पक्या आणि आशू चढले होते.. त्यांनी दोर सोडले होते. एकूण २० जण होते ते.. ते नेहेमीचे ५-६ जण, बाकी असेच एकेकाच्या ओळखीचे, भाऊ, बहिणी, मित्र, मैत्रीणी असे.. मार्तंडगडाला आधीही आला होता तो.. एकदा धोधो पाऊस होता. तेव्हा हा टप्पा चढताना काय तंतरली होती त्यांची.. शेवटी वळसा घालून safe वाटेनी चढावे लागले होते. मग पुन्हा ईर्षेनी दूसर्या वेळी दोराच्या सहाय्यानी चढले होते आणि आज हा ग्रूप घेऊन आले होते. नाही म्हणले तरी सगळे वर धड पोचेपर्यंत टेंशन होतेच.
साधारण १५ फ़ूटांची खडी चडण होती.. लक्ष देऊन चढलं तर सोपं होतं.. खाली पहायचं नाही आणि भिती बाळगायची नाही ही दोन पथ्य पाळायला लागणार होती..

त्याने त्याच्याबरोबरच्या ५ जणांना कल्पना दिली कसे चढायचे ते आणि तो दोराला धरून वर चढला आणि तिथे उभा राहून एकेकाला वर यायला मदत करायला लागला..
"चल, अमित ये तू.. घट्ट धर आणि ये.. हं.. बरोबर.. शाबास.. जमतय की.. या.. पोचलात की.. पळा वर आता.. पल्लवी ये तू आता.. घाबरतेस काय.. अमित कसा गेला बघ टणाटणा उड्या मारत.. चल. "
असं करत करत अमित, पल्लवी, प्रसाद, नितेश चढले.. आता उरली ऋजुता.. ती मगाचपासून आढेवेढे घेत होती.. घाबरली होती हे चेहेर्‍यावरूनच दिसत होते!
अजिंक्य तिला बघतच राहिला काही वेळ.. हे तिला पाहिल्यापासूनच होत होतं त्याला.. पण सगळे विचार झटकले त्याने.. आत्ता नीट वर पोचणं महत्त्वाचं होतं..
"ऋजुता, अगं चल ना.. धर तो दोर हातात.. मी आहे ना इथे.."
"मला भिती वाटत्ये.." एक छोटा आवाज, थोडा रडकाही..
"अगं घाबरायचे काय त्यात.. हा इतका मोठ गड चढलीस ना.. आता हे १० फ़ूट तर अंतर आहे.. चल, उचल पाय.."
"मी पडले तर.."
"अगं पडशील कशी? मी आहे ना.."
"तू वर आहेस.. मी खाली पडीन ना पडले तर.." ऋजुता चिडलीच.. आणि अजिंक्यला हसूच आलं एकदम! पॉईंट valid होता तिचा..
"हसतोस काय.. इथे वाट लागली माझी.. मनूच्या नादाला लागून आले मी.. मला आवडत नाहीत हे ट्रेकबिक.. उगाच धाकधुक सारखी.. हिला येता येणार नव्हतं ना या ट्रेकला म्हणून मला आणलं हिने, मगच आई हो म्हणली तिची.. ही गेली शहाणी पुढे आणि मला ठेवलन मागे.."
मनू म्हणजे ग्रेटच होती.. एकदम टॉमबॉय.. यांच्या ट्रेकची कायमची मैत्रिण.. पण तिच ठरलं होतं लग्न आणि साखरपुडा होता १०च दिवसांनी. मॅडम नंतर उडणार होत्या अमेरिकेला, त्यामुळे तिला हा ट्रेक करायचाच होता.. त्यासाठी तिने ऋजुताला हाताशी धरले होते वाटते..
"मी हे असले ट्रेक कधीच केले नाहियेत रे.. कसला चढ आहे हा.. आयुष्यात पर्वतीखेरीज काही चढले नाहिये मी.. मला नाही येणार चढता.. मी थांबते इथेच.."
पर्वती!! अजिंक्यनी डोक्याला हात लावला!! त्याला आवडायलाच लागलं तिचं बोलणं.. काय सीन होता.. एका चढावर, एकमेकांपासून १० फ़ूट अंतरावर अवघडलेल्या स्थितीत उभे होते ते.. तरिही असच तिच्याशी बोलत रहायला आवडलं असतं त्याला.. पण म्हणून पर्वती!!!!
"तू पर्वतीच्या एकमेव अनुभवावर मार्तंडगडाला आलीयेस! काय मॅड आहेस! का महान म्हणू! मनूसाठी इतके कष्ट घेतल्याबद्दल.. या मनूलाही काही कळत नाही आणि.. लग्न करायला निघालीये बावळट.."
"तिला बोलू हं नकोस काही.. आता लांब जाणार ती किती.."
"ए प्लीज.. त्या शहाणीनी तुला इथे आणलं म्हणून हे सगळं झालं असं तूच म्हणालीस.. वर तिला बोलायचं पण नाही काही.. अजबच आहेस! बर आता रडूबिडू नकोस.. वर ये आधी.."
"पण मी कशी.. नको.."
अजिंक्यचं मन वेगळच काही सांगत होतं, पण डोक्यानी पुढाकार घेतला..
"हे बघ तू आणि मी सोडून सगळे वर पोचलेत. आपल्याला भूक लागली आहे, आपण दमलो आहोत.. आपण तिथे पोचलो नाही तर काळजीनी हैराण होतील सगळे, हो की नाही? आणि बाकी सगळे चढलेच ना? थांब मी येतो खाली, आपण दोघेही चढू, ओके?"
असं म्हणत अजिंक्य दोरीनी खाली उतरला. त्याने तिला आधी पुढे व्हायला सांगीतले.. हो, पडली बिडली तर या वेळी होता तो तिच्यामागे! हा पण इतका आपल्यासाठी करतोय म्हणल्यावर ऋजुतानीही मनाची तयारी केली आणि ते हळुहळू नीट वर पोचले.
"शाब्बास.. बघ, सोप्पं होतं ना?"
"सोप्पं!" नुस्तेच डोळे मोठे करून ऋजुता चालायला लागली..
अजिंक्यला मनापासून हसायला आलं. कसली सही होती ही ऋजु.. पण तो चंद्र तिकडे out of focus जायला लागला होता ना.. पक्याला सांगून तो निघालाच कॅमेरा घेऊन.. पक्यानी तेवढ्यात चोंबडेपणा करत "उशीर का झाला", "हंऽऽऽ", "चालूदे" असे रीमार्क टाकलेच, पण अजिंक्यनी दुर्लक्ष केल्यासारखे केले आणि तो सटकला..

वॉव.. काय सही वाटत होतं.. पूर्ण चंद्रबिंब समोरच होत.. चंद्राचं भयंकर attraction होतं त्याला लहानपणापासूनच.. आत्ता ढग नव्हते, निरभ्र आकाश, सुखद गारवा, लांबचे आवाज सोडले तर एक मस्त शांतता.. आणि टिपूर चांदणं! आहा! अजिंक्य फोटो काढायचे विसरलाच.. चंद्राकडे पहात बसला.. अचानक मगाचचे ऋजुता बरोबरचे क्षण त्याला आठवायला लागले पुन्हा आणि तो त्यात पाऽऽऽऽर हरवून गेला.. 'प्रथम तुज पाहता.. जीव वेडावला..' गुणगुणायला लागला.. आयला.. हे गाणं आत्ता आठवावं? पुन्हा एकदा सगळे विचार झटकून त्याने फोटो काढायला सुरुवात केली.. मस्त स्नॅप्स मिळाले काही.. camera च्या night mode मधे काही experiments केले त्यानी आणि त्याचा लाडका चंद्र capture केला..

"या फोटोग्राफेर.. आज तुम्हाला बरीच प्रेक्षणीय स्थळं मिळाली".. पक्याच, अजून कोण!
"गप की साल्या.. फोटोंच्या मागे नंतर कशाला लागतोस मग?" अजिंक्यला कळले पक्या कशाला रेफ़र करतोय ते, पण त्यानी विषय वळवला..
"सगळं खाल्लत का? माझ्यासाठी काही ठेवलत की नाही? अश्या वेळी माझी आठवण येणार नाही तुम्हाला.."
"ओ थांबा थांबा.. भरपूर रस्सा ठेवलाय.. गीळ पाहिजे तितका.. आणि काही लोक पण थांबलेत म्हणे.. बरय बाबा काही लोकांचं...."
अं? अजिंक्यला समजले नाही.. पक्यानी मानेनीच निर्देश केला.. ऋजुता आणि मनू थांबले होते.. आयला.. अजि खुश एकदम.. पण मनू कशाला थांबली? एक नंबर गधडी आहे.. श्या.. पण बरी भेटली.. जरा तासायला हवे होतेच तिला.. पण ऋजुला आवडले नसते.. (अं? ऋजुला आवडले नसते म्हणून आपण मनूला बोलत नाहियोत काही? हे काय आहे काय यार?)
"अरे, थांबलात कशाला तुम्ही?"
"म्हणजे काय, तू माझ्या मैत्रिणीला नीट वर आणलेस.. thanks अजि.."
"आता काय करणार.. तू तिला 'वर पोचवायलाच' निघाली होतीस ना.."
"सॉरी रे.. माझ्या लक्षातच नाही आलं, की हिला जड जाईल ही शेवटची चढण.. मी आले पटकन वर पक्याला मदत करायला.. मग लक्षात आलं, पण म्हणलं तू आहेसच ना.."
"हे बरय.. लावा मस्का.. ही रडायलाच आली होती तिकडे.. मला टेंशन!"
"रडत नव्हते हं.. उगाच काय!"
"तेच ते, रडायच्या बेतात होतीसच की.. मी नसतो तर.."
"हो खरच.. तू नसतास तर.."
अरे! अजिला हे expected नव्हते.. त्याला वाटले ऋजु पुन्हा चिडेल, मग अजून मस्करी करू.. पण ही emotional च होते एकदम!
"बरं बरं ते जाऊदे.. ते सोड आता सगळं, उतरताना माझ्याबरोबरच उतर.. मनूचं काही खरं नाही ते कळलंच.." (खुंटा बळकट!) "आणि campfire आहे की नाही? चला पटपट.."

गडावर झाडी आणि मोकळी जागा दोन्ही होते, पाण्याचे कुंड होते. बाकी काही वस्ती नव्हती.. मोकळ्या जागेत मस्त campfire केली.. सगळे गोल करून बसले.. ऋजुता अर्थातच मनूशेजारी आणि अजिंक्य अर्थातच तिच्या समोर! मग काय campfire ची टीपीकल गाणी सुरू झाली.. हिल हिल पोरी हिला, वल्हव रे नाखवा, गल्यान साखली सोन्याची, गोमु संगतीनं.. मग गाण्याच्या भेंड्या.. अजिच सगळं लक्ष ऋजुकडेच.. मस्त हसत होती ती, गाणीही म्हणत होती.. बरीचशी पाठच होती तिला.. मगाचच्या भितीचा मागमूस नव्हता.. एकदम नॉर्मल दिसत होती.. मस्त वाटत होतं तिला पाहताना.. तिला कॅमेराबध्द करायची इच्छा कशीबशी दाबून ठेवली होती त्यानी.. तिला आवडले नाही तर.. मग सुरु झाले 'विविध गुणदर्शन'! अजिला नेहेमीप्रमाणेच गाण्याचा आग्रह झाला.. तो एरवी आढेवेढे घेत नसे, पण आज त्याचा काही सुचेचना.. शेवटी संदीप खरेनी हात दिला.. 'आयुष्यावर बोलू काही' सुरु केल्यावर सगळ्यांनीच सुरात सुर मिळवले.. मग अमितनी mouth organ वाजवला.. पल्लवी आणि नितेशनी नकला केल्या.. विनोदी होते ते फ़ार.. मजा आली.. इथे मनू ऋजुताला कसलातरी आग्रह करत होती, पण ती ऐकत नव्हती.. अजिनी लगेच chance घेतला..
"मनू काय गं, काय चालू आहे तुमचं?"
"ए ऐका रे, ऋजुताचं गाणं.. काय मस्त गाते ती.."
"हो का? झालच पाहिजे मग.."
सगळ्यांनीच आग्रह केला.. ऋजु लाजत लाजत तयार झाली..


"पान जागे फूल जागे, भाव नयनी दाटला
चंद्र आहे साक्षीला..
चांदण्यांचा गंध आला, पौर्णीमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला.. चंद्र आहे साक्षीला.."

अजिंक्य अवाक! कसलं गात होती! काय आवाज आहे हिचा.. तलम, मुलायम अगदी तिच्या नावासारखाच.. वॉव.. आणि नेमकं हेच गाणं हिने गावं.. चंद्राचं! अरे! तिला पण काही वाटत आहे का माझ्यासारखंच? अजि पहात राहिला ऋजुताकडे.. शब्द पण कसले होते गाण्याचे..

"कोण तू, कोण मी, जाण ही नाही कुणा
कौतुकाने पाहतो हा क्षणांचा पाहुणा,
स्वप्नरूपी हा फ़ुलोरा, पापण्यांनी वेचिला
चंद्र आहे साक्षीला.. चंद्र आहे साक्षीला.."

अप्रतिम!! सगळेच तल्लीन होऊन ऐकत होते.. गाणं संपल्यावर एक मिनिट शांतच झालं सगळं.. ऋजुताच भानावर आली.. तिने अभिप्रायार्थ सगळ्यांकडे पाहिलं.. आणि त्यानंतर 'आयला', 'सही', 'पॉश', 'अफ़लातून' असे आवाज आले. अजि गप्पच होता.. जसं की mesmerised होता.. ऋजुता सगळ्यांचे feedback ऐकून हसली.. अजून एका गाण्याची फ़र्माईश अपरिहार्य होती..

"ये दिल कह रहा है
तेरे दिलकी जुबाँ
ए मेरे हमनशी
मैं जहाँ तू वहाँ"

आईगं! ही असली गाणी का गातेय? आणि काय गातेय.. मस्त मस्त एकदम.. आता अजिला नाहीच राहवलं.. त्याने ती गात असताना तिचे फोटो काढलेच.. शेकोटीचा उजेड तिच्या चेहेर्‍यावर पडला होता.. डोळे मिटून तल्लीन होऊन गात होती ती.. beautiful shot !!

यानंतर मात्र पक्यानी सगळ्यांना उठवलं.. शेकोटीसाठी अजून थोड्या काटक्या जमवून बाजूनी sleeping bags टाकून लोक झोपले. अजिंक्यनी पहिला watch ठेवायचं काम आपणहोऊन अंगावर घेतलं.. आज लगेच झोप येणं शक्यच नव्हतं..


क्रमश:

---------------------

**मार्तंडगड हे नाव काल्पनिक आहे. मुळात असा गड आहे का आणि असला तर त्यावर चढायला अवघड वाट आहे का याबद्दल मला काहीच माहिती नाही. गडाबद्दल अनवधानानी काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमस्व!




Badbadi
Wednesday, March 21, 2007 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सही सुरूवात केली आहेस. आता लवकर पूर्ण कर गं

Kmayuresh2002
Wednesday, March 21, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला वहिनी,पुढे चला... पुढे काहितरी लवकर घडु देत:-)

Meenu
Wednesday, March 21, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पूनम मस्त जमलाय गं हा भाग ..

Rupali_rahul
Wednesday, March 21, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, सुरुवात खुपच छान आहे. पटपट लिहि पुढे, वाट पहाय्तेय

Sakhi_d
Wednesday, March 21, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम सही...!!! आता पटपट लिही ग... :-)


Manogat
Wednesday, March 21, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम
सहि, पटपट post कर पुढचा भाग.


Psg
Wednesday, March 21, 2007 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.२.

दोन दिवस हरवल्यासारखे गेले अजिंक्यचे.. म्हणजे रोजची कामं सुरू होती, ऑफिसमधेही रूटीन चालू होते. पण हरेक रिकामा क्षण ऋजुताच्या आठवणी येत होत्या.. ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी ती त्याच्या ग्रूपबरोबबरच उतरली होती.. गप्पच होती, सगळं लक्ष नीट उतरण्याकडे होतं.. अजिचे विनोद चालू होते, बरोबर नितेशही होता.. तेव्हाच मोबाईल नं exchange झाले होते. परत पुण्याला आल्यावर ऋजुनी त्याला पुन्हा एकदा thanks दिले होते. आता सगळेच पुन्हा मनूच्या साखरपुड्याला भेटणार होते. दहा दिवस होते त्याला.. तब्बल दहाऽऽऽऽ दिवस! कसे जाणार होते इतके दिवस? कित्येक वेळा अजिचा हात मोबाईलकडे गेला होता.. पण तिचा नंबर दिसला की धीर व्हायचा नाही.. काय बोलायचे तिच्याशी? की मला तुझी फ़ार आठवण येतीये.. मल दुसरं काहीच सुचत नाहिये.. माझ्या डोळ्यासमोर सतत तूच आहेस.. मी प्रेमात पडलोय का तुझ्या? ई! हेही तिलाच विचारायचे? अजिला हसू आलं! त्याने आज ट्रेकचे फोटो develop करायला टाकले होते.. कसे आले असतील फोटो? चंद्राचे? आणि ऋजुचे? ऋजुचे मस्तच आले असणार.. दिसतेच कसली सुरेख ती! मनूच्या साखरपुड्याचा तो official photographer होता.. त्यासाठी रोल घ्यायचे होते त्याला तेव्हाच.. चला, कामं आहेत फ़ार!

इतक्यात मोबाईलवर नवीन मेसेज आल्याचे कळले.. अजिनी पाहिले तर.. New Message Rujuta ! ऋजु!! चक्क ऋजुचा मेसेज! अजिची धडधड वाढली! काय असेल? काय म्हणत असेल? काही कारणानी रागावली नसेल ना? तिचा फोटो काढला मी हे समजलं का तिला? कसाबसा त्याने मेसेज ओपन केला.. "तुझ्याशी जरा बोलायचे होते.. भेटू शकशील का आज संध्याकाळी थोडा वेळ please ?" आयला! हा काय मेसेज आहे? काय बोलायचे आहे नक्की? भेटू शकशील? हा काय प्रश्न आहे? आत्ताही भेटू शकेन मी! पण का? का भेटायचे आहे? काय बोलायचे आहे? ऋजु.. तुलाही तसेच होतंय का जसं मला होतंय? काय confusion आहे! अजिंक्यानी रीप्लाय दिला.. "हो, भेटू आज.. ६.३० वैशाली" मेसेज पाठवल्यानंतर त्याला आठवले की फोटो आणायचे होते! मरुदे! ऋजु भेटतीये आपणहोऊन.. तिच्यापेक्षा काय फोटो महत्त्वाचे आहेत? बावळट! कसाबसा कामाला लागला तो पुन्हा..

झाली एकदाची संध्याकाळ! ऑफिसमधून लवकरच बाहेर पडला तो थोडा.. ऋजुतासाठी काही घ्यावं का असा विचार आला होता मनात, पण झटकला त्याने तो! मुळात भेटायला कशाला बोलावले आहे माहित नाही.. कदाचित पत्ता कटही असेल! उगाच अजून घोळ नको!

काय गर्दी वैशालीपाशी! parking ला जागा पण लांब मिळाली.. चालत चालत आला तर दारातच ती उभी.. अजिच्या हृदयाचा एक ठोका चुकला! काय सुंदर दिसते ही.. साधासा पिस्ता कलरचा ड्रेस होता.. केस बांधलेले होते.. पण गोड दिसत होती.. त्याला पाहिल्यावर ती हलकेच हसली.. अजिचा जीव भांड्यात! चला, म्हणजे रागवली नाहिये तर! हुश्श्श! वैशाली भरलं होतं नेहेमीसारखच! पण अजिला काही कळत नव्हतं.. त्यांना luckily कोपर्‍यातलं टेबल मिळालं! अजिच्या चेहरावर एक हरवलेला, पण हिनी कशासाठी बोलावलं असेल याची उत्सुकता असलेला असा संमिश्र लूक होता!! ऋजुताचा चेहरा पण विचारमग्न होता.. वैशालीच्या वेटरला नेहेमीप्रमाणे घाई होती.. पाण्याचे ग्लास आपटून गेला तो..
"अरे तुला एक विचारायचं होतं"
अगं विचार ना मग! जीव घेऊनच विचारणार का आता!
"काय?"
"तुझा आवाज छान आहे, परवा ऐकला ना.. शिकला आहेस?"
ई! फ़ुस्स! पण हुश्शही.. सेफ़ टॉपिक आहे!
"नाही नाही.. शिकलोबिकलो नाहिये.. असंच गातो.. बरा गातो असं म्हणतात लोक" अजि हसला.. तीही.. "पण तू जबरदस्त गातेस.. मस्तच.. किती वर्षं शिकत आहेस?"
" thanks .. झाली खूप वर्षं! सातवीपासून.. परिक्षाही दिल्यात.. बरं मला काय विचारायचं होतं.. बघ हा.. प्लीज हसू नकोस, आवडलं नाही तर सांग तसं हं"
ही विचारणार तरी काय आहे? आणि विचारूनच का नाही टाकत पटकन? किती ताणायचे याला काही लिमिट???
शेवटी ऋजुतानी विचारलच.. "मनूचा साखरपुडा आहे ना.. तर समारंभ झाला की माझी अशी idea आहे की गाण्याचा program करायचा.. म्हणजे अगदी program असा नाही, पण थोडी गंमत.. घरचे लोक, आपण friends असू तेव्हा.. थोडी चिडवाचिडवी, थोडी मजा.."
"ए, छान idea आहे.."
"त्यांच्या लग्नात खूप गडबड होईल.. चालली ना US ला.. तेव्हा जमणार नाही, तर आत्तातरी.. तू गाशील का माझ्याबरोबर?"
"मी??? काहीही काय?"
"का? तुझा आवाज चांगला आहे.. थोडी तयारी केली, रियाझ केला तर छान लागेल तुझा आवाज.. आणि आपल्याला कुठे स्पर्धेत गायचय? सगळे घरचेच असतील.."
"तरीपण काय.. कुठे तू, कुठे मी.. ह्यॅऽऽ!"
"तसं कॉलेजमधला प्रीतम आहे.. तो मस्त गातो, तयारीचा आहे.. पण तो मनूला ओळखत नाही.. उगाच तेवढ्यासाठी त्याला बोलवायचं engagement ला म्हणजे नको वाटतं ना.. "
"असं आहे होय? गाईन मी मग. प्रीतम वगैरे नको.."
ऋजुता अजिंक्यकडे पाहून हसली..
"नाही म्हणजे तसं नाही.. बाहेरची लोक कशाला family function मधे असं वाटलं मला.."
"बरं, ठरलं मग.. पण आपल्याकडे जेमतेम ५-६ दिवस आहेत. गाणी मी काढते.. पण रोज प्रॅक्टिस करायला लागेल. माझ्या घरी येऊ शकशील? एक्-दिड तास पुरेल.."
"घरी? हो, येईन की.. माझं ऑफिस संपल्यानंतर.. से, ७ ला?"
"चालेल की.. कसलं काम करतोस तू?"
"अगं मी CS करतोय.. Inter झालंय.. सध्या articleship करतोय एका फ़र्म मधे.. जूनमधे final देणार.. तू MCom ना?"
"हो, पण मला गाण्यात जास्त रस आहे.."
"मग त्या सारेगमप मधे नाही का घेतलास भाग तू?"
"शी, ते किती commercialised आहे.. गाण्यावर कमी आणि ड्रेसवर जास्त भर त्यांचा.. मला नाही आवडत.."
हे संभाषण कितीही चाललं असतं, पण ऋजुला घरी जायचं होतं आणि ते फोटो! अजि विसरलाच होता जवळजवळ..
"कशी आली आहेस तू? घरी सोडू का तुला? कुठे राहतेस? उद्यापासून यायचय ना?"
"माझी activa आहे, पण बरोबर जाऊ आपण.. घर दाखवते तुला.."
"पण मला मधे एक काम आहे.. परवाचे ट्रेकचे फोटो पिकप करायचे आहेत.."
"हो? वॉव.. म्हणजे मला लग्गेच पहायला मिळतील.."
अं? नको! त्यात तिचे तिला न विचारता काढलेले फोटो पण होते ना! आता?? अजिनी डोक्याला हात लावला..
"ए, मला एक अजून काम आठवलं अचानक.. आज नाही येत मी तुझ्याबरोबर.. तू हो पुढे.. मी उद्या तुला फोन करतो ऑफिसनंतर आणि तिथूनच येईन.. चालेल?"
ऋजुताला विचित्र वाटलं, पण म्हणली ठिके आणि गेली पुढे. अजिनी हुश्श केले आणि तो फोटो आणायला गेला..

फोटो मिळाले, पण excitement, nervousness मुळे अजिला तिथे ते पाहवलेच नाहित. तो थेट घरी आला.. जेवून मग खोलीत आला आणि हळूच त्याने envelope उघडलं.. अधीरतेनी चंद्राच्या फोटोंच्या आधीही त्याने ऋजुचे फोटो पाहिले! वॉव.. सुंदर आले होते.. जसे त्याला हवे होते तसेच.. त्या गाण्यात ओतलेले सगळे भाव तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.. काय सुंदर होती ती.. उद्यापासून तिच्याबरोबर रोज संध्याकाळ घालवायची.. रोज! रोज ८ दिवस.. सही! भगवान जब देता है, छप्पर फ़ाड के!! पण गाणी गावी लागतील नीट, नाहितर येईल तो प्रीतम! काय पण नाव आहे प्रीतम!! .. man, time to brush up your singing!! btw, चंद्राचे फोटो इतके खास नव्हते आले, clarity कमी होती, जरा धूसरच आले होते.. का ऋजुपुढे चंद्रही पसंत पडत नाहिये? ह्यॅ काहीही काय!

अजिनी झोपायचा प्रयत्न केला.. पण आजही ती पळाली होती!!



क्रमश:


Sakhi_d
Wednesday, March 21, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम

असेच पटपट येवुदेत :-)


Kmayuresh2002
Wednesday, March 21, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, हळुहळु काहितरी घडायला लागले आहे तर.. अब आयेगा मजा:-)

R_joshi
Wednesday, March 21, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम काय जबरदस्त लिहितेस तु. अजि आणि ऋजुताचे भाव इतके सुंदर रेखाटले आहेस, अस वाटतय हि कथा डोळ्यांसमोरच घडतेय. पुढचा भाग लवकर टाक.:-)

Rupali_rahul
Wednesday, March 21, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, पटपट पोस्ट करत आहेस म्हणुन कथा जास्त प्रभावशाली वाटत आहे, आणि लेखनाची शैली एकदम जबरदस्त Keep Going ...
प्रितिला अनुमोदन


Manutai
Wednesday, March 21, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीते आहेस. डोळ्यापुढे पात्रे उभी रहातात. पुढे काय झाले?

Ek_mulagi
Wednesday, March 21, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान चाललिये गोष्ट, Keep it up पूनम.......

Madhurag
Wednesday, March 21, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच लिहिते आहेस पूनम. लवकर लिही पुढे

Swaatee_ambole
Wednesday, March 21, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त. पुढचे भाग लवकर लिही गं. आमची झोप उडवू नकोस. :-)

Anupama
Wednesday, March 21, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, खुपच cute लिहिले आहेस. आता लवकर कथा पुर्ण कर.

Disha013
Wednesday, March 21, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shoooooo sweeeeett !!
पूनम,तुझ्या कथांमधील नायक्-नायिकेमधील chemistry जबरी असते बघ!
मस्त लिहितेयस.


Meenu
Thursday, March 22, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या कथांमधील नायक्-नायिकेमधील chemistry जबरी असते बघ!>>> पूर्ण अनुमोदक हं ...
सही जा रही है स्टोरी ..!! आन दो ..


Himscool
Thursday, March 22, 2007 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम वहिनी लैयच झकास! पुढचा भाग कधी




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators