|
Hkumar
| |
| Wednesday, December 05, 2007 - 10:25 am: |
| 
|
मायबोलीकरांनी नाटकांकडे पाठ फिरवलेली दिसते! कोणीच लिहीना इथे.
|
Ankyno1
| |
| Monday, December 17, 2007 - 11:36 am: |
| 
|
मधे केदार शिन्दे आणि अंकुश चौधरी या नावान्ना भुलून 'गोपाळा रे गोपाळा' पाहिलं... दोघन्च्याही प्रतिभेविषयी शंका घ्यावी इतकं वाईट होतं... नवीन आलेलं 'ए भाऊ, डोकं नको खाउ' हे 'भेजा फ्राय' वरनं 'प्रेरित' होउन बनवलं आहे.... बघायचं की नाही ते ठरवा... अतुल परचुरे असल्यामुळे रिस्क घ्यावी असं वाटतय....
|
Hkumar
| |
| Wednesday, December 19, 2007 - 8:05 am: |
| 
|
खरंय, सध्या नाटकाला जाताना धोका पत्करूनच जावे लागते. आणि नाटक पाहिल्यावर पैसे वसूल झालेत असे तर वाटतच नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, December 31, 2007 - 3:08 am: |
| 
|
कालच, दिवसा तू आणि रात्री मी, नावाचे नाटक बघितले. नाटक संतोष पवारचे आहे, बाकि कलाकारात कुणीच नाव असलेला वगैरे नाही. पण या नाटकाचे रिव्ह्यु चांगले होते, म्हणुन बघितले. बर्याच दिवसानी निखळ हसवणारा फ़ार्स बघितला. अगदी पोटभर हसलो. नाटकाच्या नावात थोडा वाह्यातपणा असला तरी नाटकात अजिबात नाही. एका अपघातात एका कुटुंबातील आई जाते आणि बाकिच्या जणाना काहितरी व्यंग निर्माण होते. बाबा विसराळु होतात, मोठ्या भावाला ऐकु येत नाही. मधल्या भावाला दोन शब्दाच्या वर बोलता येत नाही, धाकट्या बहिणीला दिवसाचे दिसत नाही. मोठ्या भावाची बायको मात्र नॉर्मल आहे, पण तिला म्हणी उलट्या सुलट्या म्हणायची सवय आहे. घरातलाच असणारा नोकर, मात्र या सगळ्याना संभाळुन घेणारा, पण त्यालाहि खोड आहेच. यातल्या धाकट्या बहिणीला बघायला पाहुणे येतात, एवढाच प्रसंग. पण नाटाकाच्या प्रचंड वेगामूळे, दोन तास कसे गेले ते कळतच नाहीत. यात तणावाचे प्रसंग आहेत. किंचीत कारुण्यही आहे, पण क्षणभरातच सगळा ताण निघुन जातो व परत नाटक गति घेते. सगळेच विनोद उत्तम आहेत. रिपिटेशन होत असले तरी ते खटकत नाही. बाजाची आणि वहिनीची सवय दुसर्या अंकात विसरली गेलीय, तरी बाकिची पात्रे आपल्या व्यंगाला घट्ट चिकटुन आहेत. सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. निखळ करमणुकीसाठी अवश्य बघावे.
|
Ajjuka
| |
| Saturday, January 26, 2008 - 4:57 am: |
| 
|
'ते पुढे गेले' ह्या समन्वयच्या नाटकाबद्दल लिहिलंय माझ्या ब्लॉगवर http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/ जरूर वाचा. आणि संधी मिळेल तेव्हा नाटक बघा.
|
Aashu29
| |
| Friday, May 02, 2008 - 4:41 am: |
| 
|
काल कुसूम मनोहर लेले पाहिले. अगदीच चटका लाउन गेले, आणि धडधड इतकी वाढत होती अंतिम टप्प्याला की काय सांगू? शेवटची टीप ऐकुन तर सुन्नच झाले.
|
Arc
| |
| Monday, May 05, 2008 - 8:44 am: |
| 
|
किरण यज्ञोपवितचे "मळभ". २ वर्षान्पुर्वी प्रयोग पाहिला होता. प्रदुषणावर सर्व बाजुनी भाष्य करणारे हे नाटक छान आहे. नाटक बघताना सगळ्याचीच बाजु योग्य वाटते. प्रदुषणच काय पण औद्योगिकरणामुळे निर्माण होणार्या सगळ्याच प्रश्नाची गत धरले तर चावतय आणि सोडले तर पळतय अशी होणार की काय असे वाटुन,शेवटी थोडेसे सुन्न व्हायला होते.
|
Dakshina
| |
| Monday, May 05, 2008 - 11:02 am: |
| 
|
केव्हातरी २ आठवड्यांपुर्वी "सारखं छातीत दुखतंय" पाहीलं आणि डोकं दुखायला लागलं. मी ऐकलं होतं की खूप विनोदी आहे, पण तसा काही प्रत्यय आला नाही. कथेत मूळातच दम नाही. काम कोणी चांगलं केलं आणि कोणी वाईट असं नक्की सांगता नाही येणार... पण अशोक सराफ़, निवेदिता, संजय मोने आणि राजन भिसे ही फ़क्त नावं पुरे आहेत गर्दी खेचायला... शिवाय अशोक सराफ़ आणि विनोद यांच समिकरण जुनं आहे आणि नाटकाचं नावही तसं विनोदीच आहे. पण दुर्दैवाने नाटकात मात्रं अपेक्षित विनोद निर्मिती नाही करता आली. नाटकाच्या शेवटी अशोक सराफ़ने दिलेली तोंडी समिक्षा जास्ती खटकते. कारण बहूधा त्याला ही हे कळले असावे... की नाटकात (म्हणावा तितका) दम नाही. म्हणजे कसं विनोद सांगितला, आणि तो समोरच्याला नाही कळला... की कशी अवस्था होते, तसं काहीसं या "सारखं छातीत दुखतंय" चं झालंय..... 
|
Chinoox
| |
| Monday, May 05, 2008 - 12:31 pm: |
| 
|
सारखं छातीत दुखतंय हे नाटक 'वाजे पाऊल आपले' या नाटकावर आधारीत आहे..यावरूनच 'मेरे बीवी की शादी' हा चित्रपट निघाला होता.. अमोल पालेकर, रंजीता, अशोक सराफ़, निळू फ़ुले, दिलीप कुलकर्णी यांचा मस्त अभिनय आणि छान संवाद.. सारखं छातीत दुखतंयमध्ये सार्या पात्रांच्या तोंडून संजय मोनेच बोलताहेत असं वाटत राहतं...
|
Dakshina
| |
| Tuesday, May 06, 2008 - 4:46 am: |
| 
|
आणि अलिकडेच एक हिंदी चित्रपटही निघाला होता अशाच धर्तीवर... 'शादी से पहले' नाव होतं वाटतं त्याचं. अक्षय खन्ना, आणि आयेशा टाकिया.... होती.... त्यातही अक्षय खन्नाला असं वाटत असतं की त्याला कसला तरी महाभयानक रोग झालाय आणि तो मरणार आहे...
|
Swa_26
| |
| Friday, May 16, 2008 - 10:15 am: |
| 
|
२ महिन्यांपुर्वी आम्ही काही मायबोलीकर 'बुढा होगा तेरा बाप' हे नाटक पाहायला गेलो नि त्या शिवाजी मंदिरामधे झोपा काढुन घरी परतलो. मोहन जोशींचा तोच तोच अभिनय बघुन आता कंटाळा यायला लागलाय. तरुण दिसण्याचा प्रयत्न करणारा एक प्रौढ इसम ही concept अजुन किती दिवस वापरणार आहेत हे लोक? नि तेच फालतु विनोद!! निव्वळ कंटाळा आला
|
Dineshvs
| |
| Sunday, May 18, 2008 - 4:56 pm: |
| 
|
मिलिंद बोकिलांची. शाळा कादंबरी आपल्या सर्वांची आवडती आहेच. या कादंबरीवर आधारित, नाटक, गमभन, आजच बघितले. हे नाटक येऊन बरेच दिवस झालेत, पण बघायला जरा भिती वाटत होती. कादंबरीचा प्रभाव पुसला तर जाणार नाही, अशी शंका येत होती. पण नाटक मात्र खरेच खूप छान आहे. या कादंबरीत नाट्य नाही असे नाही, पण ते सगळे घडते ते नायकाच्या, म्हणजे जोश्याच्या मनात. ते रंगमंचावर सादर करणे हे आव्हान होते. आणि ते उत्तम रित्या पेलले आहे. या कादंबरीत, अगणित स्थळं, प्रसंग आणि व्यक्तिरेखा आहेत. त्यातल्या महत्वाच्या बहुतेक सर्व व्यक्तिरेखा नाटकात आहेत, शिक्षकांच्या व्यक्तिरेखा कादंबरीत आहेत तेवढ्या ठळकपणे नाहीत पण, जोश्या, चित्र्या, सुर्या आणि फावड्या हि चौकडी मात्र नाटकभर समोर आहे. या चौघांसकट सगळ्याच भुमिकांसाठी, त्या त्या वयातले कलाकार लाभल्याने, खुपच मजा येते. आई, बाबा, ताई उर्फ़ अंबाबाई, या भुमिकेतील कलाकारही चपखल. सुकडी आणि केवडा अगदी योग्य आणि शिरोडकर च्या भुमिकेतील कलाकार तर इतकी गोड आहे, कि कुणीही तिच्या प्रेमात पडेल. नाटकाला नेपथ्य नाही. पण तरिही शाळेतले प्रसंग, ( हजेरी, मधली सुट्टी, कवायत, प्रार्थना, तास, वार्षिक परिक्षा, निकाल, मुख्याध्यापकासमोरची कान उघाडणी, ) झक्क जमले आहेत. शाळेबाहेरची स्थळे, म्हणजे या चौकडीची खोली, जोश्याचे घर, स्काऊटचा कॅंप, आदी स्थळावरचे प्रसंग तसेच देवळातील शिरोडकरला प्रपोज करण्याचा प्रसंग. नरुमामाबरोबरचा सिनेमाला जायचा प्रसंग, आणि क्लासच्या वाटेवरचे शिरोडकर आणि जोश्याचे प्रसंग, सगळेच नेपथ्याशिवाय मस्तच वठले आहेत. या कादंबरीचा काळ, म्हणजे आणीबाणी, शोले वगैरेचा काळ, त्या काळात मीदेखील त्याच वयाचा होतो, त्यामुळे ते सगळे प्रसंग मला जास्तच ओळखीचे वाटले. हे संदर्भ नाटकात आहेतच. एकच खटकलेली गोष्ट म्हणजे, गणवेश आणि आईबाबांचे कपडे सोडले तर मुलांचे इतर वेळचे कपडे आणि शिक्षक, ताई वगैरे पात्रांचे कपडे त्या काळाशी सुसंगत वाटत नाहीत. त्याकाळात भल्या मोठ्या घेराचे बेलबॉटम, जीन्सची जाकिटे, मुलींच्या स्कर्ट्समधे, अंब्रेला कट, बॉबीसारखा ड्रेस, कफ़्तान, वगैरे वापरात होते. शबनम झोळ्या होत्या. त्या इथे दिसत नाहीत. मामाची बॅग तर चक्क, लॅपटॉपची वाटते. प्रकाशयोजना, यथायोग्य, संगीत मस्त आणि नृत्य तर अप्रतिम आहेत. यात नाव असलेला एकही कलाकार नाही. पण प्रत्येकचा अभिनय अव्वल आहे. वरच्या खोलीतले प्रसंग असोत कि शाळेतले प्रसंग असोत, पात्रांचा हालचाली इतक्या सुबक आहेत, कि नेपथ्य नसल्याचे कुठे लक्षातच येत नाही. शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचेही तोंड प्रेक्षकांकडे, वक्तृत्व स्पर्धेत, श्रोते समोर आणि वक्ते अदृष्य असे काहि रचनेचे प्रयोग तर दाद देण्याजोगे. कादंबरी वाचली असेल तर नाटक जास्त आवडेल पण नसेल तरिही स्वतंत्र कलाकृति म्हणुन कुठेच ती कमी पडत नाही. संवादलेखनातील संयम वाखाणण्याजोगा. ( संवादातील गाळलेल्या जागा, जाणकार प्रेक्षकाना बरोबर समजतात ) नावाजलेले कलाकार, सुमार नाटके, आपल्या लोकप्रियतेच्या बळावर रेटत आहेत, त्यापेक्षा अश्या नाटकाना उचलून धरणे, केव्हाही योग्यच. नाटक सुरु व्हायच्या आधी केवळ पाच मिनिटे तिकिट काढले तरी बुकिंग फ़ारसे नव्हते. मला ए रांगेतले तिकिट मिळाले. हे नाटक बघुन, एकदम मॅडसारखे वाटून गेले, कि आपला लंपन देखील, असा एखाद्या कलाकृतिमधून अजरामर व्ह्यायला हवा.
|
Dakshina
| |
| Monday, May 19, 2008 - 6:33 am: |
| 
|
वा! दिनेश, अगदी डोळ्यासमोर चित्रं उभं केलंत... आता 'गमभन' पाहीलंच पाहीजे.
|
Dineshvs
| |
| Monday, May 19, 2008 - 7:57 am: |
| 
|
दक्षिणा, मला वाटते, पहिल्यांदा या पुस्तकाबद्दल तूच लिहिले होतेस. त्यानंतरच मी वाचले. अगदी रजा काढून बघण्यासारखे नाटक आहे हे. बॉस ला सांगायचे, शाळेला जायचच.
|
Arc
| |
| Thursday, May 29, 2008 - 9:49 am: |
| 
|
हिन्दी नाटक "बेड के नीचे रहनेवाली.." मोहित टाकळकरचे direction . सुदर्शनला प्रयोग होत आहेत.जमले तर नक्कि बघा.जाहिरात जरी लहान मुलान्साठी अशी केले असली तरी परी,चेटकीण,असे काही नाही आहे. ९ or १०+ (ह्यात मोठेही आले) वयोगटासठी जास्त योग्य आहे,अर्थात त्याहुन लहान मुलेही enjoy करू शकतील, कारण अधुनमधुन गाणी नाच सगळे आहे. पुर्ण कथा सान्गणे टाळते (कारण मला नीट सान्गता येइल की नाही ह्याबद्दल शन्का आहे), बघण्यात मजा आहे. अगदीच वरवर सान्गायचे झाले तर teenage मधे entry करणार्या मुलीचे भावविश्व असेच कहीतरी सान्गता येइल
|
Ajjuka
| |
| Thursday, May 29, 2008 - 1:05 pm: |
| 
|
अजिबात काही सांगू नकोस.. पहाणंच मस्ट आहे. मस्त नाटक आहे.
|
Tonaga
| |
| Thursday, May 29, 2008 - 1:54 pm: |
| 
|
कुणी मन्नो मरजानी हे हिमानीचे नाटक पाहिले आहे का?
|
Bsk
| |
| Thursday, May 29, 2008 - 5:15 pm: |
| 
|
अरे वा, बेड के नीचे रहने वाली ची चर्चा चालूय! सही! त्यात माझ्या मैत्रीणीचा भाऊ काम करतो.. आलोक राजवाडे..
|
हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. /node/2212
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|