|
आवडीच्या पुस्तकांच्या यादीत बरीच असून, खालील पुस्तके किती वेळा वाचली आहेत, हे आता मी विसरले आहे! पु. ल. - व्यक्ति आणि वल्ली, बटाट्याची चाळ गो. नि. दांडेकर. - मोगरा फुलला व. पु. - अगदी सगळीच पुस्तके माधवी देसाई. - नाच ग घुमा! रणजित देसाई. - श्रीमान योगी, राधेय गौरी देशपांडे. - गोफ़ अजुनी बरीच आहेत. चटकन आठवली तेवढी लिस्ट मधे टाकली आहेत.
|
Ashwini
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:30 pm: |
| 
|
मला वाटतं की आपण कोणत्या वयात ती पुस्तकं वाचतो त्याचा पण एक परिणाम होत असावा. गो नि दांडेकरांचे 'मोगरा फुलला' संस्कारक्षम वयात वाचल्याने प्रचंड आवडले होते तेच त्यांचे पडघवली, कुण्या एकाची भ्रमणगाथा त्यामानाने नंतर वाचल्याने एव्हढे खिळवून ठेवल्यासारखे वाटले नाही. पडघवली वाचताना तुंबाडचे खोतचीच आठवण येत होती जे त्या काळात अतोनात आवडले होते. तिसरीत असताना पहिल्यांदा मी श्रीमान योगी वाचले आणि त्यानंतर त्याची किती पारायणे केली त्याला गणतीच नाही. शिवाजीमहाराज हे तेंव्हापासून आराध्य दैवत बनून गेलं. राधेय, मृत्यंजयनेही असेच वेड लावले होते. शांता शेळकेंचे चौघीजणी असेच झपाटल्यासारखे अनेकदा वाचले आहे. रारंगढांग, स्वातीला अनुमोदन. रात्री वाचायला घेतले ते पहाटे ३ वाजता संपल्यावरच खाली ठेवले. आणि असंख्य आहेत.
|
Shonoo
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:55 pm: |
| 
|
ट्यु सांध्यपर्वातील वैष्णवी वर एक ऑनलाईन क्लास सुरू करशील का? तू देशील तो गृहपाठ मी न कंटाळता करीन
|
शोनूला अनुमोदन. * आज माझा अनुमोदनं द्यायचाच दिवस आहे!
|
Supermom
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:27 pm: |
| 
|
आवडती पुस्तकं... यादी खरंच endless आहे. शाळेत असल्यापासून 'चौघीजणी' ची किती पारायणं केलीत याची गणनाच नाही.. विशेषतः त्यातल्या सगळ्या बहिणींचे स्वभाव आम्हा बहिणींशी जुळणारे असल्यानं एकमेकींना त्याच नावांनी हाक मारत असू. इतक्या समरस झालो होतो त्या पुस्तकाशी की धाकटी बहीण खूप आजारी पडली तेव्हा आता बेथसारखी ही जाणार की काय या कल्पनेनं रात्ररात्र झोप लागत नसे तेव्हा... आता आठवलं की हसू येतं... पण पुस्तक अजूनही तितक्याच आवडीने वाचते. शिवाजी सावंतांचं 'छावा' ,पु.लं. चं 'हसवणूक' प्रभाकर पेंढारकरांचं 'रारंग ढांग'.... कितीदातरी वाचल्या जातात. आणखी एक वेड लावणारं पुस्तक म्हणजे 'पाडस'..... ज्योडी अन त्याच्या वडिलांचे भावबंध वाचायला अजूनही खूप आवडतं. सुरेख पुस्तक... कॉलेजमधे असताना नारायण धारपांच्या समर्थकथा खूप आवडत असत.
|
Ajjuka
| |
| Friday, February 29, 2008 - 5:02 am: |
| 
|
विन्सेंट व्हॅन गॉग च्या Lust for life या चरीत्राचे मराठी भांषांतर आहे. माधुरी पुरंदर्यांनी केलेले. अशक्य आहे. व्हॅन गॉगच्या प्रेमात पडलेले असाल तर या पुस्तकाच्या प्रेमातूनही सावरण्याची शक्यता कमी!
|
अश्विनी जी,अनुमोदन्-मी पापिलोन henri cherierre या लेखकाचे आत्मकथन पर कालेजात वाचले-त्या काळी कुठ्ल्याही परिस्थितीत काही कौटुम्बिक समस्यें मुळे मला धीर सोडून चालणे म्हणजे विनाश होता-.त्या वेळी ही कादम्बरी वा आत्मचरित्र एवढे दीप स्तंभाची भूमिका बजावून गेले कि विचारू नका!! असा काही प्रसंग आला की या पुस्तकाचे पारायण करतो
|
Ladtushar
| |
| Friday, February 29, 2008 - 9:28 am: |
| 
|
हो असा अनुभव मला ही आला आहे, मझ्या नोकरीच्या शोधाच्या वेळी मला अगनिपंख ने खुप बळ दिले आहे, आणि कलाम यांचे प्रोजेक्ट management che काही अनुभव आजही उपयोगत येतात. अशी अनेक चरित्र लिखाणे नेहमीच चांगलेच motivation करतात.
|
Sheshhnag
| |
| Friday, February 29, 2008 - 12:00 pm: |
| 
|
बी, हा हा हा... छान. इथे पण विनोद सुचला तुम्हाला. १९२५ म्हणजे त्या वर्षी प्रकाशित झालेली आवृत्ती.
|
Shonoo
| |
| Friday, February 29, 2008 - 3:31 pm: |
| 
|
पुलंची, सुनिताबाइंची, अवचटांची, दोन्ही माडगूळकरांची दुर्गाबाईंची पुस्तकं अनेकदा वाचून होतात. संतांची पुस्तकं पण अशीच कधीही कुठुनही उघडावं अन त्यात बुडून जावं. लक्ष्मीबाईंचं स्मृतीचित्रे तर खिळंखिळं झालंय वाचून वाचून. मृत्युंजय इथे नाहीये माझ्याकडे पण तेही अनेकदा वाचलंय. इंग्रजी मधे खलिल जिब्रान, सिल्व्हिया प्लाथ, फ़्रॉस्ट, रिल्के, गार्सिआ मार्क्वेझ, पी जी, शॉ, मार्क ट्वेन, बाख यांची पारायणं चालू असतात. विल अन अरिएल ड्युरांटचे खंड अजुन सलग वाचले नाहीत पण त्यांच्या काही भागांची पारायणं चालू असतात. बोकॅचिओ चं डेकॅमरॉन पण कधी सलग वाचन केलं नाही असंच अधून मधून काही भाग वाचत असते. संग्रही असलेली, नसलेली पण न वाचलेली पुस्तकं आठवली की आवडत्या पुस्तकांची पारायणं करताना फार अपराधी वाटतं!
|
Shonoo
| |
| Friday, February 29, 2008 - 3:37 pm: |
| 
|
शेषनाग त्या मराठी शब्दकोषाबद्दल प्रकाशन वर्षाशिवाय इतरही माहिती द्या ना. संपादक कोण, त्या काळी किम्मत किती होती, प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागला, प्रत्येक भाग किती पानांचा आहे, प्रस्तावना कोणाची आहे, शब्दांच्या अर्था बरोबर citation पण दिलेत का, कुठल्या कुठल्या पुस्तकातले citation आहेत असं सगळं वाचायला आवडेल.
|
Asmaani
| |
| Saturday, March 01, 2008 - 10:46 am: |
| 
|
supermom , "चौघीजणी" ची मी देखिल जबरदस्त fan आहे. कितीदा वाचलं तरी कंटाळा म्हणून येत नाही. आणि शांता शेळकेंनी अनुवादही असा केलाय की ते स्वतंत्र पुस्तक वाटावं. अख्ख पुस्तक म्हणजेच एक सुंदर कविता झालिये.
|
Dakshina
| |
| Monday, March 03, 2008 - 5:43 am: |
| 
|
बी, गौरी देश्पांड्यांनी 'आहे हे असं आहे' या नावाचं पुस्तक लिहीलंय हे ऐकीवात होतं, तुम्ही लेखक म्हणालात त्यामूळे झाला असेल घोळ. पण मोस्ट ऑफ़ द टाईम्स, त्यांचं लिखाण माझ्या डोक्यावरून जातं. तरिही वाचून पाहीन.
|
Hkumar
| |
| Saturday, March 29, 2008 - 11:11 am: |
| 
|
कुठलेच पुस्तक पूर्णपणे दुसर्यांदा वाचावे असे मला वाटलेले नाही. परंतु, पुस्तकांमधील निवडक उतारे मी पुन्हापुन्हा वाचतो. 'एका कोळीयाने' ( the old man & the sea चे भाषांतर) हे एक उदा. तसेच खूप पुस्तकांच्या प्रस्तावना ( अगदी अभ्यसाच्या सुद्धा) व काहींचे शेवट मी परत वाचत असतो.
|
Yashwant
| |
| Monday, March 31, 2008 - 8:29 am: |
| 
|
मजेत कस जगाव केव्हाही वाचाव. काही प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा हे पुस्तक मिळाले. वाचुन मी बराच सावरलो. व पु काळेन्चे पार्टनर खुप आवडले. सुहास शिरवळकरान्चे दुनियादारी कॉलेज लाइफ़ मध्ये खुप वेळा वाचले.
|
Ladtushar
| |
| Thursday, April 03, 2008 - 11:10 am: |
| 
|
दुनियादारी तर अप्रतिमच....मी अजुन ही हातात घेतले की ठेवत नाही, वपुंचे प्रेममयी हे देखील सुरेख आहे नेहमी वाचले की काही तरी नविन विचार देतात.बाउल समाजाच्या विचारांन बद्दल खुप छान लिहिले आहे. अगदी आत्मपरीक्षण होते...
|
Anaghavn
| |
| Monday, May 26, 2008 - 9:27 am: |
| 
|
सध्या हातात "हरम" हे पुस्तक आल आहे. सुरुवात केली नाही. पन थोडक्यात सांगायच झालं तर, मुघलांच्या काळात कुठल्याही बाईला पळवुन जनानखान्यात टाकायचे प्रकार होते,त्यावर हे पुस्तक आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 27, 2008 - 3:03 am: |
| 
|
अनघा, शहाजी, या पुस्तकात पण, प्रत्यक्ष जिजाऊना असा पळवण्याचा घाट घातल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या जागी दुसर्याच स्त्रीला पळवण्यात आले. हि घटना एकाचवेळी दुर्दैवी आणि सुदैवी पण म्हणायला हवी.
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 5:37 am: |
| 
|
कुणाचे आहे हे 'हरम' ...
|
अनघा व इतर लोक्स, हा बीबी ' पुस्तक पारायणा ' चा आहे ना? सध्या वाचत असलेल्या पुस्तकांसाठी ' मी वाचलेले पुस्तक ' हा बीबी वापरणे योग्य राहील. नाही का? 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|