Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 08, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » रेस » Archive through May 08, 2008 « Previous Next »

Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहीला अर्धा तास जमिनिवरून ढगाकडे क्यामेरा.... खूप घोडे (म्हणजे खरे आणि काही मानवरूपी) उदा. म्हणून कोण? असं आत्ता विचारू नका. छान छान चारचाक्या... लई भारी घर... म्हणजे रेस. मग बाकी सगळं आहेच हो, म्हणजे गाणं, डॅन्स.... इत्यादी. या सिनेमाचं खरं नाव, शामिल, धक्के पे धक्का, प्लॅन असं हवं होत. पण शामिल आणि धक्के पे धक्का ही दोन नावं ठेवल्यावर कदाचित प्रेक्षक सिनेमाला नावं ठेवतील, आणि प्लॅन नावाचा सिनेमा आधीच येऊन गेल्याने (आणि साफ़ आपटल्याने उगिच मागून घेतलेल्या संकटासारखं व्हायला नको) म्हणून प्लॅन हे नाव ठेवण्याचा प्लॅन चेंज केला असावा...
आता जरा कथेकडे वळू... असं म्हणणार होते, पण कथा? म्हणजे काय बुवा? ती कशाशी खातात? असाच प्रश्न मला पडला... दोन सावत्र भाऊ, लई जायदाद, लई मोठं घर, खूप गाड्या, छोटे छोटे कपडे घातलेल्या हिरॉईनी, एकमेकांना मारून १०० मिलियन डॉलरची इन्श्युरन्सची रक्कम हडपण्याची कल्पना... झालं. रेस ची कथा इथेच संपते... (ideally)

हिंदी पिच्चर मधे २ भाऊ असले की एक हमखास बिघडलेला असलाच पाहीजे. मग चांगल्या भावाचे जिच्यावर प्रेम असते तिच्यावरच धाकट्या कार्ट्याचे मन जडले पाहीजे, मग मोठ्याने प्रेमाचे बलिदान देणे ओघाने आलेच. पण ती पण आगावू आणि चालू निघते की हो, सैफ़ प्रेमाचा इजहार करत नाही त्यामूळे प्रेमात भलताच फ़ाश्ट असलेला त्याचाच भाऊ अक्षय खन्ना बरोबर लग्न करून रिकामी होते.
अक्षय खन्ना निव्वळ बेवडा, सैफ़ खूप सज्जन फ़क्त पाणी पिणारा.... अक्षय खन्ना सैफ़ ला वचन देतो की जर त्याचं लग्न बिपाशा बरोबर झालं तर तो दारू सोडेल, पण लग्न होऊनही तो दारू पितो, म्हणून सैफ़ त्याला वादा तोडल्याबद्दल थोबाडीत मारतो. (एकदा सुरू केलेली दारू कधीच सुटत नाही हे सैफ़ला माहीत नसावे कदाचित.) मग बिपाशा तमाशा करते तुमने मुझसे झूठ बोला, और अपने बेवडे भाई की शादी मुझसे लगा दी... इथे factually ती सैफ़ वर 'जबरदस्ती' करते. अक्षय खन्ना हे सगळं छुप्या क्यामेर्‍यात पहात असतो. (कारण सैफ़ला मारून १०० मिलियन डॉलरची संपत्ती वाटून घ्यायची असते.)

सैफ़ची सगळी संपत्ती बँकेत गहाण असते, तरिही तो आपल्या घोड्यांचा तबेला विकत नाही. सैफ़च्या घोड्याला हरवणारा (दलिप ताहीलचा) जॉकी असतो. सैफ़चा तबेला विकत घ्यायला तो एके दिवशी न सांगता येतो तरिही सैफ़ कडे मायक्रोफ़ोन असलेला पेन तयार असतो. सैफ़ मग सगळी बेट ऐकून आपला घोडा स्लो करवतो आणि खूप पैशे जिंकतो. त्यानंतर दलिप अख्ख्या सिनेमात कुठे दिसत नाही.

सिनेमातली सगळी पात्रं बोलतात काहीतरी आणि करतात वेगळंच.
म्हणजे कसं बिपाशा बासू, अक्षयची बायको असून सैफ़ला सामिल, कटरिना सैफ़ची सेक्रेटरी पण अक्षय ला सामील... अक्षय चा सैफ़ला मारायचा प्लॅन आणि सैफ़चा त्यातून वाचायचा प्लॅन. मध्येच थेटरातून पळून जाण्याचा माझा प्लॅन. (फ़सलेला)


Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्येच काम आलं म्हणून झालेलं लिख़ाण पोस्ट करून टाकलं.....

तर.... खरंतर रेस न लावता, नुसता बघून आणि दृश्यांची जुळवाजुळव करूनच माझी दमछक झाली.
सैफ़च्या मृत्यू नंतर अचानक कटरिना सांगते की अम्ही कोर्ट म्यारेज केले म्हणून. तिथे अनिल कपूर हा एक (अत्यंत पाचकळ माणूस) स्क्रीनवर येऊन आपल्याला जगातील समस्त फ़ळांची ओळख (आणि कुठे कुठे उपयोगही) करून देतो. त्याने केलेले विनोद हे निव्वळ टूकार नसून अत्यंत खालच्या दर्जाचे आहेत. आता बहूधा त्याला फ़िल्म इंडश्ट्रीतून कामाच्या ऑफ़र्स येणे बंद झाले असावे, म्हणून ही असली 'ग्रेट' भुमिका त्याने पत्करली असेल.

रेस मध्ये सर्व पुरूषांनी अंगभर तर बायकांनी गुढघ्याच्यावर आणि गळ्याच्या खाली ( आता विचारू नका म्हणजे काय? आम्ही सुद्धा गळ्याच्या खालीच घालतो कपडे, पण आपापली पातळी, खोली (गळ्याची) वेगळी, हिरॉईनची पातळी आणि खोली वेगळी... (गळ्याची) कसं? रेसला बहुतेक कोणी कपड्यांचा स्पॉन्सरर मिळाला नसावा..म्हणून ही गत झाली असावी...
पडद्यावर सैफ़ मरतो पण आपल्याला शेवटी कळतं की तो मेलेला नसतो. (असं होईलच कस म्हणा, हिरो मेला तर काय पिच्चरच खतम) मध्येच बिपाशा ला मारण्यासाठी धाडलेल्या मारेकर्‍याला मारायला हा कुठुनतरी उगवतो. पण तोपर्यन्त तो कुठे असतो म्हणे? रहातो कुठे? खातो कुठे? आणि त्याला कसं कळतं? की बिपाषाला कोणितरी मारायला येणार आहे ते?
शेवटी बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो, म्हणजे अनिल कपूर सैफ़ला सामिल असतो, पण त्याच्या मदतीने शवागारात झोपताना त्याला कोणिच बघत नाही? आणि पोस्ट्मार्टेम केल्याचा मेकप कुठून करून घेतो म्हणे? सैफ़ आपला ज्याला त्याला बॉम्ब ने उडवतो... पहिल्यांदा आपल्या जॉकीला... आणि मग अनिल कपूरला शेअर देताना बॅगेत ठेवलेला असतो, पण उडवत नाही.

पहिल्यांदा सैफ़ मरतो त्याचे १०० मिलियन डॉलर्स मिळतात, मग अक्षय खन्नाला कळते की आपला भाऊ जिवंत आहे, मग एक फ़ालतू रेस लावून ते ठरवतात की जो जिंकेल त्याचे पैसे.... असला मार्ग? हो ती १०० मिलियन डॉलर्स साठी? सिनेमातले लोक येव्हढे येडे असतात असं नव्हतं वाटलं. आणि ज्या भावाने आपल्याला आधी एकदा मारायचा प्रयत्न केलेला असतो, तो कारचे ब्रेक्स नादुरुस्त करू शकतो, शकतो काय? करणारच ही साधी गोष्टं सैफ़ला कळू नये? आणि शेवटची रेस खेळताना यांना पोरी बरोबर कशाला लागतात म्हणे?


Tonaga
Wednesday, May 07, 2008 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जशी मागणी तसा पुरवठा... हे बघा रेसच्या निर्मात्याला अत्यन्त क्लासिक पिक्चर काढायचा होता. पन तुमच्या सारख्या पांचट प्रेक्षकानी उचलून धरलेले सिल्व्हर, गोल्डन ज्युबिल्या झालेले बिनडोक पिक्चर पाहून त्याच्या लक्षात आले की याना क्लासिक पिक्चर पचत नाहीत, कळत नाहीत,मग त्याने प्रेक्षकांच्या पचनशक्ती प्रमाणे पिक्चर बनवला.तरी बोम्बलावे?
why do Indian people mix water in milk?
because Indian people cannot digest pure milk हा हा हा हा....


Tanyabedekar
Wednesday, May 07, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेस आणि टशन हा एकच सिनेमा आहे का? कारण दोन्हीमध्ये अनिल कपूर आणि सैफ अलि खान दिसत आहेत. श्टोरी पण शेम टू शेम वाटतीये.

Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीयुत टोणगा....
तुम्ही मला ओळखत नाही त्यामूळे माझी आवड पांचट आहे की कसली आहे हे तुम्हाला ठावूक असणं कठिण आहे त्यामूळे तुम्ही माझ्या आवडीवर भाष्य करू नये हे बरे.
दुसरी गोष्टं, रेस हा चित्रपट बर्‍याच लोकांनी निव्वळ करमणून म्हणून पाहीला असेल, मी ही विरंगूळा म्हणूनच पाहीला... आणि इथे ही विरंगूळा म्हणून लिहीलेय. त्यामूळे रेस च्या दिग्दर्शकाने असला सिनेमा काढला म्हणून मी 'बोंबलत' वगैरे नाहीए, तर ज्या उद्देशाने हे लिहीलय त्याच उद्देशाने ते घेतलंत आणि वाचलंत तर बरं होईल. (शिवाय सोडूनही द्या.)
इथे सर्वांना लिहायचा अधिकार आहे, तुम्हाला ही आहे, पण भाषा सांभाळून वापरलीत तर घेणार्‍याला ही तुम्ही देऊ केलेला संदेश योग्य पद्धतीने घेता येईल. नाही का?


Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 11:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेडेकर, रेस आणि टशन हे दोन्ही सिनेमे वेगळे आहेत.
दोन्हीत सैफ़ आहे ते माहीती आहे. पण अनिल कपूरही आहे हे तुमच्याकडूनच कळले. मी टशनचं क्रिटीक वाचलं होतं, पण आता लक्षात नाही. आय मीन लक्षात रहाण्याइतकं काही जबरदस्त वगैरे नाहिए.


Kedar123
Wednesday, May 07, 2008 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षीणा
मस्त धमाल लिवलय
टशन आणि रेस च एकत्र शूटींग करून मग दोन वेगळे भाग पाडल्याची अफवा आहे


Tanyabedekar
Wednesday, May 07, 2008 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण नक्की माहिती नाही.. मी दोन्ही सिनेमे बघितले नाहियेत :-) इकडे तिकडे रेडिफ वगैरेवर वाचुन मला वाटले रेस आणि टशन एकच सिनेमा आहे की काय :-)

Tonaga
Wednesday, May 07, 2008 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, अगं तुम्ही म्हनजे व्यक्तिश्: तू नव्हेस. ते एक उपरोधिक पोस्ट होते. चांगल्या चित्रपटाना आश्रय मिळाला तर असले भिकार चित्रपट कशाला तयार होतील? त्याला आपण प्रेक्षकच जबाबदार नाही का? असे चित्रपट चाललेच नाही तर निर्माते तरी कशाला ते काढून खड्ड्यात जातील....
तुला वाईट वाटले असले तर क्षमस्व...


Zakasrao
Wednesday, May 07, 2008 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा
चांगल लिहिल आहेस.
केदोबा
मला वाटत तसहन मध्ये मसाला वाढवण्यासाठी करीना आहे. त्याच्यापलिकडे वेगळ काय नसाव.


Dakshina
Wednesday, May 07, 2008 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो टोणगा,
पण इथे मी लिखाण केलेय ना? मग ती पोस्ट मी पण पर्सनलीच घेणार ना?
असो.. क्षमा वगैरे काही नका मागू...


Farend
Wednesday, May 07, 2008 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्येच थेटरातून पळून जाण्याचा माझा प्लॅन
तरिही सैफ़ कडे मायक्रोफ़ोन असलेला पेन तयार असतो. :-)
सही वर्णन आहे. सैफ़ मेला हे कसं भासवलं?
'मेला असा समज झाला' असेल तर नक्की येणार हे तुला वाटलं होतं का? अधिक माहिती साठी ते विधाता मधे लिन्क दिलेले पोटनियम वाच :-)

कोठेतरी जबरी पिक्चर आहे म्हणून वाचले होते. पण आता हे परीक्षण वाचल्यावर बघायलाच पाहिजे.

आणि १०० मिलियन कसला इन्शुरन्स असतो म्हणे? जी कंपनी एखाद्या व्यक्तीचा एवढा इन्शुरन्स करेल ती तो मेला तर त्यात काही गडबड (विशेषत: जवळच्या लोकांची) आहे का याची खात्री करणार नाही का?

असाच No Entry मधे म्हणे हिट झाला होता. कोण नक्की हिट करतं असे पिक्चर माहीत नाही.

आता मला लक्षात आलं तुझ्या बॉस ने आधीच पाहिला असेल म्हणून म्हंटला असेल तुला पाहू नको म्हणून :-)


Amitad
Thursday, May 08, 2008 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, एकदम solid लिहिलयस.. मस्तच आवडल.. चला शिणिमावाल्यान्नी हल्ली माज़े बरेच पैसे वाचवायचे ठरवलेले दिसतायत म्हणायचे.. :-)

Dakshina
Thursday, May 08, 2008 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेन्ड - मला पण हाच प्रश्न पडला होता actually. की इन्श्युरन्स कंपन्या काय भांग पिऊन काम करतात असं दाखवायचं आहे का या सिनेमावाल्यांना? कोणतीही खातरजमा न करता हे लोक सरळ असे पैसे देऊन टाकतात? अहो बेपत्ता नवर्‍याच्या मागे; कोर्ट सुद्धा तब्बल सात वर्षांनी दुसरं लग्न करण्याची परवानगी देतं. आणि हा तर १०० मिलियन डॉलरचा पसारा. आणि असल्या अवलक्षणी कार्ट्यांसाठी इतका मोठा इन्श्युरन्स काढायची गरजच काय म्हणते मी?

Bee
Thursday, May 08, 2008 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणगा, प्रेक्षकांना तुम्ही दोष देत अहात हे पटत नाही. कारण पुर्वी का चांगल्या दर्जाचे चित्रपट आले नाहीत? आणि का तेंव्हा ते चालले नाहीत? चांगले चित्रपट आले तर ते आजही तितकेच चालतील पण असे चित्रपट निर्माण करणारे आता उरले नाहीत म्हणून सटरफ़टर, आज पहा उद्या विसरा असे चित्रपट निघत आहेत. भारतातच इतकं उदंड साहित्य आहे म्हंटल्यावर त्यावर आधारीत चित्रपट काढल्या जाऊ शकतात पण दुर्दैवाने साहित्याला कोण विचारतं. ते फ़क्त वाचकांनी वाचायच असतं इतकाच त्यांचा उपयोग. जबाबदार backstate ची माणसं ज्यांना कलेचा अर्थ कळत नाही आहे. प्रेक्षक आजही आहेत. आजच्या चित्रपटातून फ़क्त पाश्चातपणा आमच्या पर्यंत पोचत आहे. चांगलं संगीत, चांगल हिन्दी, चांगला आशय आजच्या चित्रपटातून हरवला आहे. खरे तर तो हरवायला नको होता कारण जुन्या कलाकारांनी एक भरभक्कम पाया रचून दिला आहे, त्याच्या जोरावर खूप काही शिकता येऊ शकतं. पण नविन निर्मितीच्या मागे लागून ही लोक एक ना धड भारंभार चिंद्याच चिंद्या करत आहेत.

Dakshina
Thursday, May 08, 2008 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी तुमच्याशी १००% सहमत आहे. मी माझे कौतूक करत नाही. पण मी गेलेल्या जानेवारी नंतर आता रेस पाहीला... शेवटचा सिनेमा जो पाहीला तो म्हणजे 'तारे जमीन पर'. निम्म वर्ष गेलं तरिही उल्लेखनिय चित्रपट न निघणं ही एक शोकांतिका आहे. आणि असं झाल्यामूळे माझ्यासारख्या सामन्य प्रेक्षकाची उडी जर "तारे जमीन पर" वरून "रेस" वर घसरली तर त्यात नवल ते काय?

Tonaga
Thursday, May 08, 2008 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

की इन्श्युरन्स कंपन्या काय भांग पिऊन काम करतात असं दाखवायचं आहे का या सिनेमावाल्यांना? कोणतीही खातरजमा न करता हे लोक सरळ असे पैसे >>>>>हे झालं नेहमीच्या इन्शुरन्स वाल्यांच. पण चित्रपटाल्या इन्शुरन्स कम्पन्या वेगळ्या असतात. त्यांचे रुल्स वगैरे वेगळे असतात....

Asami
Thursday, May 08, 2008 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

race चे एकवेळ जाऊ दे पण चित्रपट हे फ़क्त समाज प्रबोधनाचे माध्यम नसून मनोरंजनाचे माध्यम आहे नि प्रत्येकाच्या मनोरंजनाच्या पातळ्या वेगवेगळ्या असणे साहजिक आहे. नाहि का ? मागे एकदा हितगुजवर अंदाज अपना अपना थिल्लर आहे असे कोणीतरी म्हणाले होते ह्याउलट इथे बरेच जण आहेत ज्यांना AAA अतिशय अवडतो. शेवटी ज्या गोष्टिची demand आहे ती बनवली जाणार नि ती विकली जणार हि एक साधी सरळ गोष्ट आहे.

तसेच ह्यात जुने नवे ह्याचा काडीचाही संबंध आहे असे मला तरी वाटत नाही. प्रत्येक वर्षी टाकाऊ नि चांगले दोन्ही प्रकारचे (खरे तर ह्या दोन्ही मधे पडणारे सुद्धा) movies येत असतात. त्यांचे प्रमाण कमी जास्त होत असते एव्हढेच.

चांगला विषय असेल तर त्यावर चांगला चित्रपट बनेल ह्याची अजिबात खात्री नसते ( e.g. हजार चुरासीर मा) नि अजिबात राम नसलेल्या विषयावर चांगला movie काढता येतो. चांगल्या साहित्यावर कढलेला movie हा तितकाच चांगला असेल ह्याची अजिबात खात्री नाही कारण ही दोन्ही भीन्न माध्यमे आहेत. त्यात येणारी यंत्रणा वेगळी आहे नि पद्धती भीन्न आहेत. एवढेच काय त्याचा target audience बदलता आहे. अगदी मूळ कलाक्रुतीचा निर्माता त्यात सामविष्ट असेल तरीही त्याची खात्री देता येणार नाही.

अजून एक महत्वाचा मुद्द म्हणजे बर्‍याच गोष्टी काळसापेक्ष असतात. ह्या period मधे जे भावेल ते नंतरच्या period मधे तेव्हढेच भिडेल ह्याची काहिहि खात्री नाहि तेंव्हा अमक्या काळी चांगले होते अशा ढोबळ विधानांना काही फ़ारसा अर्थ नाही.


Bee
Thursday, May 08, 2008 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या काळात दमदार चित्रपट निघालेत त्या काळातील लोक अजून जिवंत आहेत. आमच्यासारखे तरूण अजून तशा चित्रपटांची अपेक्षा करतात. फ़क्त Teenager ह्यांना माहिती नसेल की दहा वीस वर्षांपुर्वी किती सुंदर संगीत होतं, किती सुंदर चित्रपट होते, गायक होते, संगीतकार होते. आता त्यातल काहीच शिल्लक राहिलेलं नाही. ज्यांनी ह्या जुन्या चित्रपटांची चव घेतली आहे त्यांना आजची अधोगती कशी काय पसंत पडेल? गल्लीगल्लीत संगीताच्या सुरातालावर इस्त्री फ़िरवणारा माणूसही सांगू शकेल की चित्रपट बनवण्याची ती कला किती सुंदर होती. आज तिची वाट लागली आहे... या उप्पर अशा कलावंतांना काहीच वाटतं नाही की काही चांगले बदल घडवून आणावेत. तर दर्जा आणखीनच खालावत आहे. नवनिर्मितीची कळ.. गरज समजू शकतो पण त्याकरिता काही खास परिपक़्व प्रयत्न दिसत नाही आहे. साहित्य हे किती जवळच माध्यम आहे जे चित्रपट बनवायला पोषक आहे. कुठल्या तरी एका लेखात सई परांजपे म्हणाल्या होत्या की साहित्यामधे चित्र शोधण्याची कला कथादिग्ददर्शकाला असायला पाहिजे. मी पुर्णपणे सहमत आहे बाईंशी.

Shendenaxatra
Thursday, May 08, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुन्या काळात तंत्रज्ञान महाग होते. काळेपांढरे सिनेमे निघायचे. वाद्ये, ध्वनीमुद्रण यंत्रणा ह्याही महाग होत्या. त्यामुळे तशा पार्श्वभूमीवर उठून दिसायचे असेल तर उत्तम कथा, उत्तम संवाद, उत्तम अभिनय, संगीत इत्यादी आवश्यक होते. नाहीतर लोक नाटके वगैरे बघायला गेले असते.

जसजसे तंत्रज्ञान विकसित झाले तसे इलेक्ट्रॉनिक वाद्ये, क्यामेरे, कंप्युटर वापरून केलेले स्पेशल इफेक्ट वगैरे तितके महाग राहिले नाही. मग सिनेमे बनवणारे असल्या हार्डवेअरमधे जास्तीत जास्त पैसा ओतू लागले. उत्तम संगीत, अभिनय वगैरे सॉफ्टवेअरकरता पैसा कमी वापरला जाऊ लागला असे मला वाटते. असल्या कलानिर्मितीला वेळ, निवांतपणा लागतो. पण आजकल टायम किसको है?

उत्तरोत्तर हे वाढतच जाणार आहे.
नव्या पिढीला अशा चमचमाट आणि ठणठणाटाचे कौतुक जास्त त्यामुळे ज्याला बुढ्ढे लोक सिनेमाचे सुवर्णयुग मानतात त्याला ते नाके मुरडतात.

पूर्वीसारखे राहिलेले नाही ही भावना सगळ्या पिढ्यात म्हातारपणी येते पण तंत्रज्ञातली क्रांती ही वस्तुस्थितीही आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators