|
Asami
| |
| Thursday, May 08, 2008 - 6:07 pm: |
| 
|
तर दर्जा आणखीनच खालावत आहे. >>हे असे सरसकट विधान चुकीचे नाहि वाटत का तुला ? पूर्वीसारखे राहिले नाहि आता हि प्रत्येक पिढीची तक्रार असते.
|
Chinoox
| |
| Thursday, May 08, 2008 - 7:03 pm: |
| 
|
बी, मला आपलं मत फ़ारसं पटलेलं नाही. आज आपण ज्यांची उत्तम चित्रपट म्हणून गणना करतो, असे बरेच चित्रपट त्याकाळी सपशेल आपटले होते..श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सई परांजपे यांच्या चित्रपटांना ठराविकच प्रेक्षकवर्ग होता. 'पार', 'वो छोकरी', 'सुरज का सातवा घोडा' हे चित्रपट किती जणांनी पाहिले आहेत?'कागज के फ़ुल', 'तिसरी कसम' पडल्यावर अनुक्रमे गुरुदत्त व शैलेंद्र यांनी हाय खाल्ली होती.. त्याकाळी गाजलेल्या बर्याचशा चित्रपटांत उत्तम संगीत हा महत्त्वाचा घटक होता.. त्या जोरावरच विश्वजीत, जॉय मुखर्जी, राजेंद्रकुमार, साधना, आशा पारेख वगैरे मंडळी सुपरस्टारपदाला पोहोचली. बिमल रॉय, गुलजार, ह्रुशिकेष मुखर्जी यांचा अपवाद वगळता बहुतेक चित्रपट तद्दन मसालापट होते. उत्तम संगीत, थोडा रोमान्स, दुश्मनी, एक म्हातारा बाप, एक निरुपा रॉय/सुलोचना, जोडीला मेहमूद, हेलन, बिंदू, इफ़्तेखार..की झाला शिणमा तयार..त्यामुळे चांगलं संगीत म्हणजे चांगला सिनेमा हे चुकीचं आहे. आशा, किशोर यांची बहुतेक गाजलेली गाणी ही बी-ग्रेड सिनेमांतली आहेत. आणि सिनेमातलं चांगलं संगीत संपूनही २ दशकं झाली. ही काही आजची गोष्ट नाही. आपण ज्या दमदार चित्रपटांचा उल्लेख केलात, त्या चित्रपटांना उलट आज बरे दिवस आले आहेत. विशाल भारद्वाज, रजत कपूर, अनुराग कश्यप वेगवेगळे प्रयोग करू शकतात. 'लॉईन्स ऑफ़ पंजाब प्रेझेंट', 'मनोरमा सिक्स फ़ीट अंडर' , 'रघू रोमिओ', 'मिथ्या' बर्यापैकी गल्ला जमवतात. 'नितळ', 'वास्तुपुरुष','बाधा' निदान चार टाळकी तरी बघतात. त्यांची अवस्था अगदी 'लिमिटेड माणुसकी' किंवा 'निवडुंग'सारखी होत नाही. आपण कलावंतांच्या जबाबदारीचा उल्लेख केलात, पण सिनेमा हाही एक धंदाच आहे. बांधिलकी, माध्यमाबद्दलचं प्रेम फ़ारच अपवादात्मक. आणि दिवसभराच्या कटकटी, वैताग विसरायला न परवडणारं तिकीट काढून सिनेमा बघायला जाणार्या ग्राहकाचं समाधान करण्याची जबाबदारी निर्माता व दिग्दर्शकाच्या शिरी असते. देखणे, प्रमाणबद्ध नायक-नायिका, महागड्या गाड्या, फ़ॉरीन इ. सगळं असलं की प्रेक्षक खुष आणि निर्माता पण खुष. हे सगळं पूर्वीही असंच होतं. फरक फक्त (वैयक्तिक) आवडीनिवडींचा . मंगेशकरांनी पैसा मिळवला तसा आज हिमेसभाई मिळवतोय. जरा हटके संगीत दिलं म्हणून आरडी बर्मननी शिव्या खाल्ल्या, आणि रेहमाननीही खाल्ल्या..
|
Deepurza
| |
| Friday, May 09, 2008 - 8:57 am: |
| 
|
"रेस" वर बोला रे विषय सोडुन भलतीकडेच जातोय आपण
|
अचाट आणि अतर्क्य असला तरी tp आहे रेस , मला तरी बघायला आवडला , गाण्यां सकट . यातलं मला चूकिचे ऐकू आलेलं गाण : ख्वाब देखे झूठे मूठे बत्तीया बुझाये कैसे सजना अनाडी बेइमान खरं आहे ' बतिया बनये कैसी सजना अनाडी बेइमान ' रेस मधे कत्रिना आणि अनिल कपुर अतिशय माठ दिसतात . सैफ़ बेस्ट !
|
Slarti
| |
| Friday, May 09, 2008 - 1:13 pm: |
| 
|
कत्रीना इतरत्रही माठच दिसते... एकाच वेळी हाट आणि माठ.
|
Aashu29
| |
| Saturday, May 10, 2008 - 6:17 am: |
| 
|
अर्रे कतरिनाहुनही माठोंबा ती समिरा दिसते ना, की तिची consider करायची पण लेवल नाहि 
|
समीरा निदान ' साजिश ' करताना दाखवली तरी नाहीये , कत्रिनाच्या डोक्या वर इतक ताण देणारं काम कसं टाकलं director नी ! सैफ़ चा असे role म्हणजे हातखंडाच , जबरी करतो तो असे सणकि role. अनिल कपुर नुसताच भुरटा बंबैय्या चोर वाटेल फ़ार तर , अक्षय कुमार ला का नाही घेतलं त्याच्या ऐवजी ?? चांगले करतो तसले role तो
|
Sunidhee
| |
| Saturday, May 10, 2008 - 3:52 pm: |
| 
|
अगं दीपाजली, तो अक्कि केवढाले पैसे घेतो.. परवडेगा नही प्रोड्युसरको पण अब्बास-मस्तान ची ही तर खासीयत आहे. ते शिणुमा खूप वेगवान बनवतात आणि दर १५-२० मिनिटाला एक धक्कावळण देतात त्यामुळे टीपी होतो आपला.. जसा रेस नी केलाय. बाकी वास्तवीकता आणि असे शिनुमे ह्याचा संबंध बहुधा कधीच नसतो. मला अक्षय खन्ना चे काम सर्वात आवडले. सैफ़ पण नेहमीसारखा गेंगाणा बोलला नाहिये म्हणुन तो पण बरा वाटला. 'ती' समीरा आहे का? मला समीर च वाटतो नेहमी.
|
Ankyno1
| |
| Monday, May 12, 2008 - 7:19 am: |
| 
|
अक्षय ला घेतलं नाही कारण मग इंटरव्हल नंतर एंट्री मारूनही आख्खा सिनेमा यानी खाल्ला असता... किंवा सैफ चा रोल कमी झाला असता... अक्षय खन्ना ला तर फक्त टायटल्स मधेच जागा मिळाली असती... तीन्ही हीरॉइन्स शेवटी अक्षयकुमार बरोबर जातात... त्यात बिपाशा सैफ ला टपकवून सगळे पैसे घेऊन जाते... कतरीना ला स्फोटातून दस्तूरखुद्द अक्षय वाचवतो... असे थोडे आणखी अ. नि अ. सीन्स वाढवायला लागले असते... शेवटचं गाणं फक्त अक्षय आणि ३ हिरविणी यांचं असतं...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|