|
Nkashi
| |
| Tuesday, March 25, 2008 - 12:24 pm: |
|
|
मला सगळ्या मायबोलीकरांच GTG arrange करावसं वाटताय... आता एका क्षणात मुंबईला आईकडे जावसं वाटताय... आईSSSSSSSSSSSSSSSSSS
|
Zakki
| |
| Tuesday, March 25, 2008 - 7:57 pm: |
|
|
बोला कुठे करताय्? अमेरिकेतच करा. म्हणजे जरा मराठीत बोलू, मराठी गाणी म्हणू, वगैरे. भारतातले मराठी आम्हाला समजत नाही! त्यात हिंदी काय, इंग्रजी काय, पंजाबी काय, वाट्टेल ते शब्द असतात! नि हवा हवाइ आली तर मिंग्लिश पण!!
|
Nkashi
| |
| Wednesday, March 26, 2008 - 10:34 am: |
|
|
अहो झक्कीकाका, मी भारताच्या पुण्यनगरीची रहिवासी म्हणजे GTG इथेच असणार कि..... तुम्ही सांगा येणार का GTG ला?
|
Zakki
| |
| Wednesday, March 26, 2008 - 1:55 pm: |
|
|
अहो पण पुण्यात मराठी बोललेले चालत नाही! दोन वर्षापूर्वीच चांगला सहा महिने राहून आलो होतो. 'फाड फाड' इंग्रजी नि हिंदीसमोर माझी बिचारी मराठी भाषा कुणिच ऐके ना. आजकालचीच गोष्ट. मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना इथल्या मराठी विश्व मधे बोलावले होते. सगळेजण मराठी बोलत होते, मराठीत प्रश्न विचारत होते, नि त्या 'फाड फाड' इंग्रजीतून!!
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 26, 2008 - 6:00 pm: |
|
|
'फाड फाड' इंग्रजी नि हिंदीसमोर माझी बिचारी मराठी भाषा कुणिच ऐके ना>>>>>.. झक्की काका तुम्ही गेले असाल हाय फ़ाय "हिन्जेवाडी" मध्ये म्हणुन तसा अनुभव असेल. एकदा या आणि मी तुम्हाला घेवुन जाइन भोसरी MIDC मध्ये (ज्यामुळे PCMC ही कधीकाळी आशियातली नं वन महानगरपालिका होती) मग सांगा तुमचा अनुभव त्या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या "कदाचित" अमेरिकेतच राहिलेल्या असतील
|
Nkashi
| |
| Thursday, March 27, 2008 - 11:46 am: |
|
|
त्या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या "कदाचित" अमेरिकेतच राहिलेल्या असतील झकासा, good one
|
ह्या खालच्या site वरील प्रत्येक मेनु आणि त्या ठीकाणाला भेट द्यावीशी वाटतेय. दिवसभर हादडत रहावेसे वाटतेय. http://harekrishnaji.blogspot.com/2007_03_01_archive.html पण हाय रे रामा, ते सर्व मेनु पाहून वाटते आपले जीवन व्यर्थ आहे ह्या 'डायट'चा विचार करून खावु शकत नाही 'उचल... घाल पोटात स्टाइलने'. ह्या वयातच हे कष्ट.. पुढे काय वाढून ठेवलेय रे पांडूरंगा (काश पुढे मोतिचूर लाडवाचे ताट नी गरम जलेबीचे असेल) त.टी. : वरील साईटवर मुंबईत मिळण्यार्या मस्त पदार्थांची माहीती आहे, बर्याच जणांना माहीती असेलच.
|
मला फुलांची शेती करावीशी वाटतेय. आणि शेतात छानपैकी ग्रीन हाऊस असावं. पुस्तकं मात्र तिथंही हवीत बरोबर.
|
Meenu
| |
| Monday, March 31, 2008 - 9:52 am: |
|
|
मला प्रचंड आणि महत्वाचं काम असावं अस वाटतय. इतकं सुंदर की जे करताना दुसरं काही काही आठवू नये.
|
संघमित्रा, माझं हरितगृह (ग्रीनहाउस) होतं.. एका मोकळ्या प्लॉट वर पायलट प्रोजेक्ट म्हणुन केलं होतं. पण पुढे मीच निघालो घराबाहेर आणि शेतावर मोठ्या प्रमाणावर काही ते केलं नाही. मला पण आता असं कुठेतरी भलत्याच देशात एकटं प्रोजेक्टवर काम करण्यापेक्षा गावी परत जाउन शेती करावीशी वाटतीये..
|
Zakki
| |
| Monday, March 31, 2008 - 7:09 pm: |
|
|
मला फुलांची शेती करावीशी वाटतेय. आणि शेतात छानपैकी ग्रीन हाऊस असावं. पुस्तकं मात्र तिथंही हवीत बरोबर. आमच्याकडे या. सर्व काहि मिळेल. खर्च मी देईन, काम तुम्ही करा. अवजारेपण आहेत. लवकर या, हीच वेळ आहे, साफसफाई करून झाडे लावायची!
|
झक्की ही मणातली भावणा स्वतःची फुलांची शेती असावी अशी होती. तुमची ऑफरही छान आहे खरंतर पण तेवढ्यासाठी मुंबईहून तिकडं तुमच्या देशात येणं जरा महाग पडेल नाही का? टण्या, कसं झालं होतं रे तुझं ग्रीन हाऊस? म्हणजे व्यवस्थीत वर्क होत होतं ना अपेक्षेप्रमाणं? खरंच हे पैसे मिळवायचं सॉफ्टवेअरमधलं अवतारकार्य लौकर संपवून गावी जाऊन शेती करावी वाटतेय. हो फुलांबरोबर जमलं तर एक छोटी स्पाईस गार्डन पण असावी एका भागात. गौरी देशपांडे आठवली एकदम.
|
Tonaga
| |
| Wednesday, April 02, 2008 - 1:42 am: |
|
|
मणातली भावणा >>>>>>>अरेरे!, आई गं!!, काय हे?, शिव शिव!,कमाल आहे!,म्हणजे काय? मा.शु.पो.कुठे आहात तुम्ही?
|
Ajjuka
| |
| Wednesday, April 02, 2008 - 6:41 am: |
|
|
सन्मे कसलं मस्त गं! विंचुर्णीचे धडे लक्षात आहेत ना पण!
|
Uday123
| |
| Friday, April 04, 2008 - 5:19 am: |
|
|
माझ्या मनातील भावना...मला असे वाटते की मी थोडी हात सफ़ाई/ चलाखी शिकावी आणि मग अध्यात्मीक गुरु बनावे. म्हणजे काम कमी, बोलणे कमी, कष्ट कमी, खुप आराम आणि पैसाच पैसा... जस-जसा व्यावसायात माझा जम बसेल तशी भोळी- भाबडी जनता मला *** स्वामी किंवा बाबा म्हणतील. हळु-हळु माझी किर्ती वाढेल, अगदीच चांगला जम बसला तर लोकं मला देवात पण नेऊन बसवतील... रोज सकाळपासुनच माझ्या कडुन आशीर्वाद घेण्यासाठी भक्त गण मोठी रांग लावतील. बाहेरच एक फ़ळा असेल, 'खास मायबोलीकरांसाठी वेग़ळी रांग'. बरेच सर्व पक्षीय खासदार माझे भक्त/ दास, माझ्या शब्दा बाहेर नाही म्हणुन मग देशाचे प्रधान मला सल्ला विचारायला येतील, आता थांबतो. माझ्या मनातील भावनेचा कोणत्याही जिवित किवा मृत बाबा शी बादरायण संबंध नाही आहे. कुणी भोळे मायबोलीकर कुठल्या बाबांचे खरोखरच भक्त असतील तर माझ्या तुमच्या भावना दुखावणे हा उद्देष नाही आहे, विनोदानेच घेणे.
|
Chchotu
| |
| Friday, April 04, 2008 - 8:58 am: |
|
|
उदय १२३, एक शिष्य (कलेक्शन साठी) तयारच आहे, अर्थातच मी.
|
Zakki
| |
| Friday, April 04, 2008 - 10:58 am: |
|
|
'खास मायबोलीकरांसाठी वेग़ळी रांग'. कल्पना चांगली आहे. पण मायबोलीकरांची रांग फारशी मोठी असेल असे वाटत नाही. शिवाय ते पैसे देणाऽर नाहीत. कदाचित् तुमच्या नवीन नावाने (स्वामी, साधू, बाबा) एक बातमीफलक उघडतील, नि त्यात विषयांतर करून परत भाजप कॉंग्रेस वाद सुरु होईल! असे आपले माझ्या मनात आलेले विचार
|
Uday123
| |
| Friday, April 04, 2008 - 1:42 pm: |
|
|
अहो झक्की महाषय तुम्ही फ़ारच संकुचीत विचार करीत आहात, बघा 'जास्त पैसे' देणार्यांची रांग वेगळी अशा वेळेला लोकं काय करतात(?), तर घरी जाऊन पैसे आणतात. स्वामी खुष, भक्त पण भार हलके झाले म्हणुन खुष. मग हा फ़ळा बघुन भक्त गण मायबोली सभासद बनण्यासाठी धावत येतील, हजारात (लाखत) सभासद असतील तर लाखा (कोटी) मधे जातील, बघा पटते कां.
|
Dakshina
| |
| Friday, April 04, 2008 - 1:52 pm: |
|
|
मी अजुनही ऑफ़िसात बसलेय, कारण माझा बॉस उद्या USA ला जातोय ... मला ही जावंसं वाटतय...पण कोण नेईल?
|
Dakshina
| |
| Wednesday, April 09, 2008 - 6:55 am: |
|
|
लोकांच्या मनात भावना यायच्या बंद झाल्या की काय? आत्तl मला भेळ खाविशी वाटतेय, आणि एखाद्या धरणाला भेट देऊन तिथे मनसोक्त डूंबावेसे वाटतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|