Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 16, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through April 16, 2008 « Previous Next »

Uday123
Wednesday, March 12, 2008 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर ज्या पहिल्या ४-५ बस फोडल्या त्या सन्तप्त जमावाने फोडल्या उरलेल्या अशा जमावाने फोडल्या ज्याना फ्क्त एक असुरि आनन्द मिळवायचा होता.
--- सुश तुमचे मत अगदी बरोबर आहे. काही लोकांना दुसर्‍याचे नुकसान झालेले पाहुन असुरी आनंद मिळतो. शेवटी आपणही (कर्-रुपाने) पैसे देतोच त्या बस साठी. सार्वजनीक मालमत्ता आपली आहे, ही भावनाच नाही.




Uday123
Wednesday, March 12, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलिस किती आणि कुठे पुरे पडणार..
- उपास, एक छोटी घटना, एका कडे क्लिप होती कुठल्यातरी वेग़ळ्या (सामाजीक प्रश्न) संबंधात. "'मला बघायला वेळ नाही आहे' किंवा 'असे प्रत्येकजण म्हणायला लागला तर माझ्या कडे 'फ़ालतु' गोष्टी साठी वेळ नाही आहे" - असेच काही तरी उत्तर मिळाले.

प्रयत्न जरुर करा, पण चिवट देखील हवा.


Sas
Wednesday, March 12, 2008 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HI Dakshina

मी कुठला विशीष्ट Font नाही वापरत, आमच्या संगणकावर जो Font आमच्या ह्यांनी Set केलाय, बरेच काळा पुर्वी तोच Font आहे. मी try केल पण मला Font Setting सापडल नाही, ह्यांना ईचारुन तुम्हाला कळवते :-)

But...is there somethign wrong with this Font, Pls. let me know :-)

Please call मी 'तु'...तुम्ही म्हणजे जरा मोठ (वयाने) वाटत ना :-)

Uday123
Wednesday, March 12, 2008 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

But...is there somethign wrong with this Font, Pls. let me know

--- अक्षर वळनदार आणि सुवाच्य आहे हे म्हणायचे आहे तिला.

Shendenaxatra
Thursday, March 13, 2008 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असला आसुरी आनंद घेणारे ह्याचा विचार करत नाहीत की त्या बसांच्या दुरुस्तीचा खर्च सरकार म्हणजे करदाते म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच भरणार.
अर्थात हे हलकट लोक कर भरत असतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांची काहीच लुसकानी नाही.


Sush
Thursday, March 13, 2008 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, तुमचे म्हणने पटले, पण माझ्या मोबाईल मधे क्यामेरा नाहिये. असो, पण मनापासुन खरं सांगु camera असता तरी त्या वेळि ती गोष्ट सुचली असती? आणि सुचलि जरि असति तरि हिम्मत झाली असति का? हे सांगणं कठिण. (क्रुपया मला तुम्हि वगैरे म्हणु नका. म्हातारं असल्यासारख वाटत.)

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास, मी कितिही ट्राय केलं तरी हा बारका फ़ॉन्ट येतोय, म्हणून विचारलं,
मला तुम्ही वापरता तो मोठा फ़ॉन्ट आवडतो... म्हणून विचारलं...


Manjud
Thursday, March 13, 2008 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, तो 'बरहा' फॉंट आहे माझ्या मते...... तु baraha.com वरून डाऊनलोड करून घेऊ शकतेस. आपण देवनागरी खिडकीत जाऊन \dev2 टॅग वापरून टाईप करतो तसं न करता ह्या फॉंटने डायरेक्ट लिहिता येतं.

Ladtushar
Thursday, March 13, 2008 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,
खालील लिंक पहा, ही गूगल ची सेवा आहे देवनागरी टाइपिंग साठी, याचा फॉण्ट मोठा आहे, जसा तुला हवे तसा, बघ आवडतो का ? हे लिखाण ही त्या मधेच केले आहे.
http://www.google.com/transliterate/indic/#

अधिक माहिती साठी /hitguj/messages/1797/3446.html

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, धन्यवाद, मला हाच फ़ॉन्ट हवा होता.. पण इथे लिखाण करताना तो कसा वापरायचा?

मंजू - तू पण डिस्क्रिपशन दे..


Gajanandesai
Thursday, March 13, 2008 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, तुला अगदी तोच फॉन्ट वापरायचा असेल तर, साधा सरळ उपाय! कोणताही फॉन्ट न आणता -

तू लिहिलेला मजकूर preview मध्ये बघतेस, तेव्हा त्या देवनागरीत दिसत असलेल्या मजकूराची नक्कल कर (कॉपी) आणि मजकूर लिहायच्या खिडकीत डकव (पेस्ट). पुन्हा preview मध्ये पाहशील तेव्हा तुला तो फॉन्ट दिसेल.


Dakshina
Thursday, March 13, 2008 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, तुम्ही दिलेल्या साईटवर गेले, तिकडे एक खिडकी दिसली, त्यात टाईप केले, पण देवनागरीत त्याचं रुपांतर काही झालं नाही.. (मी अगदी 'ढ' आहे, असाच विचार करत असशिल) कर... आहेच मी..

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, जी. जमलं बहुतेक...


Ladtushar
Thursday, March 13, 2008 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Toggle between English and Hindi using Ctrl + g
अरे वा जमाल तर !!! सुरवातीला थोड़ा वेळ लागेल, नंतर सोपे होईल backspade वापरून पहा.
मला वाटते ही चर्चा इथे नको! टेस्टिंग चा BB वर चला.


Dakshina
Thursday, March 13, 2008 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हा सोपस्कार प्रत्येकवेळी करायचा?

Ladtushar
Thursday, March 13, 2008 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फॉण्ट या विषया वरील पुढील चर्चा:
/hitguj/messages/1/41.html
/hitguj/messages/1797/3446.html

Mandarnk
Thursday, March 13, 2008 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> पण हा सोपस्कार प्रत्येकवेळी करायचा?

म्हणून तर हा बोचणारा किस्सा आहे!

Dakshina
Wednesday, April 16, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या घराच्या मागे एक हॉटेल आहे. हॉटेलचा भटारखाना आणि त्याच्याबाहेरची गॅलरी आमच्या बेडरूमच्या खिडकीतून स्पष्टं दिसते. कधी कधी मी रात्री उशिरा पर्यंत पूस्तक वाचत पडते, हॉटेलचे काम ही रात्री उशिरापर्यंत चालते.
खूप वेळा मी पाहीले आहे, तिथे काम करणारी छोटी मुलं रात्री खूप म्हणजे १२ / १२.१५ च्या पुढे जेवतात. त्यांना जेवणात मिळते ते काय? तर लिटरली एक छोटी वाटी भरून सांबार... (म्हणजे खरंतर निव्वळ लाल फ़ोडणीचं पाणी) आणी ताट भारून भात. कित्येक वेळेला तो भात बकाबक खाताना सांबार कमी पडलं तर पुन्हा त्यांना मिळत नाही. एकदा, असाच एक छोटा मुलगा जेवताना दुसरा पण ताट घेऊन तिथे (गॅलरीत) आला, त्याच्या ताटात लोणचं होतं.... आणि दोघांची त्या लोणच्याच्या एका फ़ोडीसाठी भांडाभांडी झाली.
एक तर जेवण ते हे असं आणि इतक्या उशिरा? ते पाहून माझ्या पोटात कालवलं खूप वेळेला. पण आपण काय करू शकतो? हॉटेल मधे काम करणारे बहूतेक सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, तिथल्या कामाशिवाय त्यांना काही विरंगुळा नाही. एकदा, एक थोडा वयाने मोठा कामगार दारू पिऊन आला होता, आणि त्याला बहूतेक घरची आठवण येत होती.. इतर कामगारांनी त्याला खूप समजावलं पण तो खूपच भावूक झाला होता... त्यांनी मग त्याला कोंडून घातलं तर आतमध्ये त्याने डोक्याला खोक पाडून घेतली... तमाशा हाताबाहेर जाऊ लागला तसा, कुणितरी हॉटेल मालकाला फोन केला. त्याने येऊन त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्याऐवजी बेदम मारले.

क्रमश:



Dakshina
Wednesday, April 16, 2008 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवस हे सगळं लिहावं असा विचार करत होते, पण यात बोचण्यासारखं काय आहे? असं काही लोकांना वाटू शकतं. असो....

काल त्या छोट्या मुलाला मी गॅलरीत घुटमळताना पाहीले. त्याला कल्पना ही नव्हती... की त्याला कुणितरी पहात होतं ते... त्याने काचेचे २ रिकामे Glass आणले, २ मिनिटांनी आणखिन आणले. असे एकूण बहूतेक ६ आणले. आणि गॅलरीतल्या सिमेंटच्या कप्प्यात लपवले. त्यावर बाहेरून खुर्ची लावली, आणि त्यावर मोठ्या कष्टाने बटाट्याचं पोतं उचलून ठेवलं, का? तर ते glaases सहज कुणाला दिसू नयेत म्हणून. मला कुतूहल वाटलं की हा असं काय करतोय? कुणि येत नाहीए याची खात्री करून घेत तो सारखा ते glaas तिथे असल्याची खात्री करत होता. हा प्रकार मी आणि माझी मैत्रिण दोघीही पहात होतो. शेवटी त्याने एक काळी कॅरीबॅग आणली, आवाज न करता ते सगळे ग्लासेस त्यात बांधून त्याने त्या कप्प्याच्या कडेला ठेवले. [अर्थात तो कप्पा म्हणजे, सिमेंटची गॅलरी डिव्हाईड करणारी भिंत आहे, म्हणजे या साईडने हात घातला तर पलिकडच्या बाजूची विशिष्ट अंतरावर ठेवलेली वस्तू सहज हातात येईल.] थोड्यावेळाने तो मुलगा, गॅलरीच्या दुसर्‍या दरवाज्याने बाहेर पडला, इकडे तिकडे पाहीलं आणि हळूच हात लांब करून या बाजूला ठेवलेली ग्लास ची ती काळी कॅरीबॅग उचलून निघून गेला. आम्ही दोघी विचार करत बसलो. कि मध्येच रस्त्यात याल हॉटेलातलं कुणी भेटलं आणि विचारलं की यात काय आहे तर तो काय उत्तर देईल? किंवा चुकून मालकाच्या लक्षात आलं तर तो काय करेल?
मूळात हे स्पष्टं होतं की, ते ग्लास त्याने चोरले होते, ही वेळ का आली असेल त्याच्यावर? फ़क्त विचार करूनच वाईट वाटतंय.


Tonaga
Wednesday, April 16, 2008 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बरहा विस्टात चालत नाही याला काय कारण असावे बरे?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators