|
|
Thread |
Posts |
Last Post |
| Archive through June 23, 2003 | 15 | 06-23-03 4:21 pm |
| Archive through June 25, 2003 | 24 | 06-25-03 4:54 pm |
| Archive through June 30, 2003 | 19 | 06-30-03 11:40 am |
| Archive through July 08, 2003 | 22 | 07-08-03 12:33 pm |
| Archive through July 10, 2003 | 35 | 07-10-03 11:31 am |
| Archive through June 04, 2004 | 35 | 06-04-04 11:04 am |
| Archive through August 23, 2005 | 35 | 08-23-05 5:23 pm |
| Archive through August 28, 2006 | 20 | 08-28-06 2:44 pm |
| Archive through January 11, 2007 | 20 | 01-12-07 3:27 am |
| Archive through September 05, 2007 | 20 | 09-05-07 4:18 am |
| Archive through December 11, 2007 | 20 | 12-11-07 11:55 am |
| Archive through December 13, 2007 | 20 | 12-14-07 3:26 am |
| Archive through January 08, 2008 | 20 | 01-08-08 3:01 pm |
| Archive through January 09, 2008 | 20 | 01-10-08 2:59 am |
| Archive through January 11, 2008 | 20 | 01-11-08 2:13 pm |
| Archive through January 15, 2008 | 20 | 01-16-08 12:46 am |
| Archive through January 17, 2008 | 20 | 01-17-08 6:22 pm |
| Archive through January 19, 2008 | 20 | 01-19-08 1:20 pm |
| Archive through January 22, 2008 | 20 | 01-22-08 7:53 pm |
| Archive through January 24, 2008 | 20 | 01-24-08 9:06 am |
| Archive through March 12, 2008 | 20 | 03-12-08 3:23 pm |
| Archive through April 16, 2008 | 20 | 04-16-08 5:04 pm |
Tonaga
| |
| Wednesday, April 16, 2008 - 5:11 pm: |
|
|
दक्षिणा तुझ्या संवेदनाशीलतेचे मी कौतुक करतो. हल्लीच्या आत्मकेन्द्रीत जगात असे विचार मनात येऊन अस्वस्थता यावी ही गोष्टही सलाम करण्याचीच आहे. जगात फारच दु:ख आणि शोषण आहे.भाकरीसाठी केलेली चोरी अन कर चुकविण्याची चोरी यात न्याय दृष्ट्या फरक नसेल पण तारतम्याच्या दृष्टीने आहेच... गरीबच चोर्या करतात असे नाही धनाढ्यांची मुले देखील चोर्या करताना पकडली गेली आहेत.पण वरील प्रकार विवशतेतूनच आला आहे असे वाटते....
|
Tonaga
| |
| Wednesday, April 16, 2008 - 5:23 pm: |
|
|
एक किस्सा कुठे वाचलाय आठवत नाही. एका उच्चभ्रू मित्रमैत्रीणीत एक अत्यन्त कर्तबगार आणि हुशार तरुण होता. जेवायला गेले की तो अत्यन्त बकाबका व घाईने खात असे. अगदी तुटून पडल्यासारखे.बाकीच्याना ते फार खटके. पण भिडस्त पणाणे कुणी त्याला टोकायचे टाळत.एकदा एका मित्राने हा विषय काढला व त्याला विचारले की हे बरे दिसत नाही हावरटासारखे दिसते. त्यावर त्याने ओशाळून सांगितले की लहानपणी गरिबीमुळे तो बोर्डिंग शाळेत शिकला तिथे ही उशीर झाल्यास जेवण कमी मिळे.म्हणून जेवायला गेले की मिळेल न मिळेल या विचाराने बकाबका खाऊन अधिक अन्न मिळण्याचे दृष्टीने त्याला अशी सवय लागली. नन्तर सुस्थिती आल्यानन्तरही सवय तशीच राहिली. हा विषय काढल्याबद्दल बाकीच्यानाही वाईट वाटले....
|
Uday123
| |
| Wednesday, April 16, 2008 - 6:39 pm: |
|
|
दक्षिणा तुमची व्यथा ही एक सामाजीक समस्याच आहे. मी जेथे शिक्षण घेतले तेथे ४-५ लहान मुले (१०-१२ वर्ष किंवा कमी वय) कामे करायची, सकाळी ७ वाजेपासुन तर रात्री १० वाजेपर्यन्त, त्यानंतर धुणे, पुसणे आणि मग शेवटी जेवण. चहा आणुन देताना मी थोडीफ़ार विचारपुस करायचो... आमचे पाय खुप दुखतात म्हणुन सार्खी तक्रार करायही. चार्-चार पाण्याचे/ चहाचे ग्लास वाहुन नेताना जर हातातुन चुकुन पडले, फ़ुटले तर मालकाचे पाठीत धपाटे, शिव्या आणि शेवटी पगार कपात आहेच, (एका अशाच प्रसंगी, माझ्या मित्राने हॉटेल मालकास मुलाला जर मारले तर पोलिसांत जाईल म्हणुन दम दिला होता, मात्रा लागु पडते). मला दयाच यायची, आणि आपण काहीच करु शकत नाही म्हणुन चिड देखील. आपल्याकडे १.१ कोटीहुनही जास्त बाल-कामगार आहेत. शेवटी त्यांच्या हतबल परिस्थीतीचा गैरफ़ायदा हा घेतला जातोय. तुम्ही जर कायद्याचा बडगा दाखवला तर जे काही मिळत आहे ते पण त्यांना मिळणार नाही आणि दृष्टचक्र सुरु रहाते.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 17, 2008 - 3:13 am: |
|
|
दक्षिणा, बहुतेक हॉटेलमधे असेच असावे. अगदी क्वचित कुठेतरी मालक नीट संभाळ करतात. खुपदा तर क्षुल्लकश्या चुकीसाठी, ग्राहकांसमोरच त्याना ओरडा मिळतो. कामगार कल्याणाचे अनेक कायदे आहेत, पण ते सगळे इन्स्पेक्टरच्या हातात. हॉटेलसंबंधी तर आणखी कायदे आहेत. आपण जिथे काम करतो, तिथे फ़ारसे कामगार नसले तरी ई एस आय सी, वगैरेचे लोक छोट्याश्या गोष्टीचा किती बाऊ करतात ते बघतोच, पण या प्रकारांकडे त्यांचे लक्ष जात नाही का ? अगदी क्वचितच हि मुले हसरी आणि आनंदी दिसतात. आपल्याला जेवण आणून देताना, ते उपाशी असतील का, असा विचार सारखा मनात येत राहतो.
|
Chafa
| |
| Thursday, April 17, 2008 - 3:42 am: |
|
|
तुम्ही जर कायद्याचा बडगा दाखवला तर जे काही मिळत आहे ते पण त्यांना मिळणार नाही आणि दृष्टचक्र सुरु रहाते. >>> परंतु याचा अर्थ असा झाला का की कायदा उपयोगाचाच नाही? किंवा भारतीय शासनव्यवस्थेत असा कायदा निर्माण करवून आणण्यामागे कोणतीच मीमांसा, बुद्धी, व परिश्रम वापरले गेले नव्हते? "कायदा करुन काय उपयोग!" असा विचार व युक्तिवाद मागेही एकदा याच विषयावर मायबोलीवर केला गेला होता (जो उद्वेगजनक होता.) बालमजुरी आज भारतात कायद्याने गुन्हा आहे. ती चालू ठेवणारे गुन्हेगार आहेत. त्याचे समर्थन करणारे (कोणत्याही कारणासाठी का होईना) कायद्याचे उल्लंघन करत आहेत. भारतात अशा अनेक संस्था आहेत ज्या या बालमजुरांच्या पुनर्वसनाचे कार्य दिवसरात्र करत आहेत. त्यातल्या कुठल्याही संस्थेशी संपर्क साधून पुढील दिशा ठरवता येईल. शिवाय या बालकामगारांना राबवणार्यांना कायद्याच्या रक्षकांतर्फे योग्य ते शासन घडवून आणता येईल. कायदा असूनही त्याची अंमलबजावणी न करण्यासाठी कारणे दिली वा समर्थने शोधली तर या दुष्टचक्रातून कधीच सुटका नाही आणि मग त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्याचा वा निषेध नोंदवण्याचाही आपल्याला अधिकार नाही. जोपर्यंत विचार आचारात उतरत नाहीत तोपर्यंत बदल शक्य नाही. टीप: हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहिलेले नाही. कायद्याच्या अंमलबजावणीविरुद्धच प्रश्न केल्यामुळे त्यावरचे माझे विचार लिहावेसे वाटले.
|
Uday123
| |
| Thursday, April 17, 2008 - 5:56 am: |
|
|
>>> परंतु याचा अर्थ असा झाला का की कायदा उपयोगाचाच नाही? --- अस मला नाही म्हणायचं आहे, कायदा पुस्तकात केला म्हणजे सर्व समस्या नाहीशी झाली का? तसे झाले असते तर आज भारत भ्रष्टाचार मुक्त देश झाला असता. कामगारांची संख्या एव्हढी मोठी आहे (१.१+ कोटी) की तिला सामावून घेण्यासाठी लागणारे बळ कमी पडते असे मला वाटते. आज अस्तित्वात असणार्या संस्था या सर्वांना सामावुन घेण्याईतपत आहेत का मजबुत (त्या व्हायला हव्यात)? १९९४-९५ मधे युनिसेफ़ च्या सहकार्याने तामीळ सरकारने एका सर्वेक्षणात ३३,००० अधिक बाल कामगार (६-१४ वय) निव्वळ शिवकाशीत आहेत हे नमुद केले आहे. माझा data १९९५ आणि गुगलने शोधलेला आहे. फ़ार कशाला पुण्या, मुंबईतील हॉटेल मधे डोळे उघडे ठेवुन एक फ़ेरफ़टका मारा. भारतात अशा अनेक संस्था आहेत ज्या या बालमजुरांच्या पुनर्वसनाचे कार्य दिवसरात्र करत आहेत. --- तुम्हाला माहीत असतील तर इथे लिहाल का? म्हणजे इतरांना मार्गदर्शक किवा प्रसंगी उपयोगी पण ठरु शकतील, आधीच धन्यवाद. कायदा असूनही त्याची अंमलबजावणी न करण्यासाठी कारणे दिली वा समर्थने शोधली तर या दुष्टचक्रातून कधीच सुटका नाही आणि मग त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्याचा वा निषेध नोंदवण्याचाही आपल्याला अधिकार नाही. जोपर्यंत विचार आचारात उतरत नाहीत तोपर्यंत बदल शक्य नाही. --- मी समर्थन नाही करत आहे, फ़क्त एक 'भिती' होती की त्या मुलांचे नुकसान नको व्हायला...
|
Chafa
| |
| Thursday, April 17, 2008 - 12:47 pm: |
|
|
१९९४-९५ मधे युनिसेफ़ च्या सहकार्याने तामीळ सरकारने एका सर्वेक्षणात ३३,००० अधिक बाल कामगार (६-१४ वय) निव्वळ शिवकाशीत आहेत हे नमुद केले आहे. माझा data १९९५ आणि गुगलने शोधलेला आहे. फ़ार कशाला पुण्या, मुंबईतील हॉटेल मधे डोळे उघडे ठेवुन एक फ़ेरफ़टका मारा. >>>> हे सांगण्याचा उद्देश कळला नाही. बालमजुरीचा प्रश्न अस्तित्वात नाही असे कोणीच म्हटले नाही. संस्था मजबूत आहेत की नाहीत हा प्रश्न पडल्यामुळे त्या जे कार्य करत आहेत तेही उपयोगाचे नाही असे होत नाही. (मला कल्पना आहे की तुम्हाला तसे म्हणायचे नव्हते) उलट संस्था पुरेशा मजबूत नाहीतच. पण त्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने थोडे जरी काम केले तर त्या हव्या तेवढ्या मजबूत होऊ शकतात. प्रत्येक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी जोपर्यंत आपण स्वतः उभे रहात नाही तोपर्यंत काय होणार आहे? पण म्हणून कायद्याविषयी अनास्था दाखवण्याची वृत्ती चुकीची आहे. कायदा या प्रकाराला आळा बसावा म्हणूनच केला आहे; गंमत म्हणून नव्हे. तुम्हाला माहीत असतील तर इथे लिहाल का? तुम्ही गूगलवरुन बालमजुरीच्या आकडेवारीचा जो डेटा शोधलात त्याप्रमाणेच या संस्थांची माहितीही शोधता आली असती. तोपर्यंत CRY, UNICEF, Vibha, Asha सारख्या अनेक संस्थांपैकी कुठल्याही संस्थेतून माहिती मिळू शकेल. या झाल्या मोठ्या राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था. त्याशिवाय छोट्या छोट्या अनेक स्थानिक संस्था, समाजसेवक हे काम करत असतात. >>> फ़क्त एक 'भिती' होती की त्या मुलांचे नुकसान नको व्हायला... माफ करा पण बालमजुरी हा जर गुन्हा असेल आणि समाजातून ती पूर्णपणे घालवायची असेल तर तुमची भिती अनाठायी व असमर्थनीय आहे. असो.
|
Jadoo
| |
| Thursday, April 17, 2008 - 1:14 pm: |
|
|
एक जुनी बातमी मागच्या वर्षीचि आहे.. http://www.time.com/time/world/article/0,8599,1677385,00.html?xid=feed-cnn-world http://www.marketwatch.com/news/story/gap-forced-drop-clothes-made/story.aspx?guid=%7BAF182B10-4CDE-498B-9083-0F8850283AC1%7D
|
Dakshina
| |
| Tuesday, April 22, 2008 - 7:33 am: |
|
|
भारतात बालमजूरी रोखणारा कसलाही कायदा आला, तरिही बालमजूरांचे प्रमाण कमी होण्यास किंवा त्यांचे समूळ उच्चाटन होण्यास युगं लागतील. त्यासाठी, सर्व स्तरातल्या लोकांची वैचारीक पातळी बदलावी लागेल, त्यासाठी काही शतकं जातील, आणि मूळात याला परिस्थिती ही कशी कारणीभूत असते त्याचा ही मला प्रत्यय आला. हॉटेलचा किस्सा लिहीला त्याच्या दुसर्या दिवशीच आमची रेस्ट रूम साफ़ करणारी बाई तिच्या घरची परिस्थिती सांगत होती. तिला ३ मुलं आहेत. सर्वात मोठी मुलगी १४ वर्षांची आहे. नवरा दारू पिऊन वारला..... हाईट म्हणजे, नवर्याचे आईवडीलंच त्याच्या या सवयीला इतके कंटाळले होते म्हणे; की तो वारला, तर त्यांनी साधे इतके ही कष्टं घेतले नाहीत की त्याला अखेरचं डॉक्टरकडे घेऊन जावं आणि निदान त्यांचं डेथ सर्टिफ़िकेट तरी घ्यावं. त्यामूळे सद्य परिस्थितित तिच्याकडे तिच्या नवर्याचं मृत्यूपत्र नाही. तिच्या नवर्याने एकही पैसा जमवला नाहिए.... तिला कुठूनतरी कळले की तिच्या सारख्या स्त्रियांना सरकारकडून मदत मिळते. पण तिच्याकडे त्याचे डेथ सर्टिफ़िकेट नसल्याने तिला ती मदत नाकारण्यात आली. मी अगोदर admin मध्ये होते ते माहीती असल्याने तिची ड्युटी वाढवून मिळावी म्हणून मी काही प्रयत्न करू शकेन का असं ती विचारत होती. मुलगीला कसंबसं १२ वी पर्यंत शिकवलय म्हणे, पण आता खर्च झेपत नाही. तिला शिवाय, तिच्यापेक्षा धाकट्या मुलाला शाळा सोडून ती कामाला लावेन असे ही बोलता बोलता म्हणाली. परिस्थिती... अजून काय? ती तरी कुठून आणेल इतके पैसे? मुलांची, सासू सासर्यांची जबाबदारी, इतक्या कमी पगारात कशी पार पाडेल ती? त्यासाठी मूलांना कामाला लावयला भागच पडेल बिचारी..
|
Aashu29
| |
| Friday, April 25, 2008 - 6:20 am: |
|
|
इथुन माझ्या घरासमोरून एक मॉल आहे तिथुनच एक फ़्री बस निघते तिला लाइन लावण्यासाठी लोक मॉलच्या आतच लाइन लावतात. म्हणजे ac मधे थांबुन लाइन लावता येते, तर अशीच मी रांगेत असताना एक भारतिय कपल शांततेने लोक बसच्या आत जात असताना उगाच मधे घुसुन गेले. खर इथले लोक असे मुळिच करत नाही, मग इथे राहुन आपलि इमेज आपले लोक विनकारण का खराब करतात ? माझ्या मागचे लोक माझ्याकडेही तुछ्छ्तेने बघतायत असा क्षणभर मला भास झाला.
|
Zakki
| |
| Friday, April 25, 2008 - 1:29 pm: |
|
|
कदाचित् त्यांना माहित नसेल रांग आतपासून आहे. नाहीतर, रांगेत घुसणे हीच खरी आजकालची उच्च भारतीय संस्कृति आहे. अश्या उच्च संस्कृतिचे देणे अमेरिकेला देऊन आपण त्यांना उपकृत करतो. आता पान खाऊन रस्त्यावर थुंकणे, रस्त्याच्या कडेला उकीडवे बसणे अश्या आणखी गोष्टी त्यांना शिकवायच्या आहेत. पण हे मूर्ख अमेरिकन, समजतच नाही त्यांना!
|
रात्रीच्या दोनला एका मोठ्या इस्पितळात प्रसूतिकक्षाबाहेर रुग्णाचे नातेवाईक ताटकळत उभे होते. काही वेळाने आतून बातमी आली, प्रसूती सुखरूप झाली. मुलगी झाली. थोड्या वेळात नवजात अर्भक आणि आईला उपकक्षात जाऊन भेटण्याची नातेवाईकांना परवानगी मिळाली. लगबगीने नातेवाईक कक्षात जायला निघाले. पण कक्षाच्या प्रवेशद्वारावरच हिरव्या पडद्याआड घुटमळणार्या आयांनी त्यांना हळूच अडवले. 'ताई, आम्हाला काही बक्षीस द्या ना!' यावर ही नातेवाईक मंडळी थोडी अडखळली, पण एकजणाने लगेचच खिशात हात घालून शंभराची नोट आयाच्या हातावर टेकवली. यावर ती म्हणाली की 'साहेब, एवढेच काय?' थोडे तू मी करून शेवटी त्यांना कक्षात प्रवेश मिळाला. पण जाता जाता आया म्हणाली की, 'ठीक आहे, आता मुलगी झाली आहे म्हणून.. नाहीतर पाचशेच घेतले असते तुमच्याकडून!'
|
Zakasrao
| |
| Saturday, April 26, 2008 - 4:41 pm: |
|
|
पण एकजणाने लगेचच खिशात हात घालून शंभराची नोट आयाच्या हातावर टेकवली. यावर ती म्हणाली की 'साहेब, एवढेच काय?'>> पण जाता जाता आया म्हणाली की, 'ठीक आहे, आता मुलगी झाली आहे म्हणून.. नाहीतर पाचशेच घेतले असते तुमच्याकडून>>> अरे बापरे. एवढे पैसे?? पैसे काय झाडाला लागतात की काय?? आणि सगळ बिल पे करुन जाताना स्वताहुन देतातच की नातेवाइक. मग घाई का??
|
Manuswini
| |
| Saturday, April 26, 2008 - 5:15 pm: |
|
|
कधी कधी आपलेच देसी बंधू इतक्या विचित्र पद्धतीने वागतात न की पुर्ण आपल्याच देशाची ईमेज खराब होते. सगळ्यात घाणेरडी सवय देशी लोकांची, स्वता दरवाजात घूसून आत आले की मागून कोण येतोय त्याच्यावर decide करणार दरवाजा धरायचा की नाही. एकदा माझ्या आईच्या पुढेच complex मधला एक देसी चालत होता. two door entry असते इथे. मी वरून बाल्कनीतून आईला फिरून आत येताना बघून घरात आतच जायचा विचार करत होते की दरवाजाची कळ दाबायला की ज्याने एकदम outer door उघडेल. पण म्हटले हे महाशय पुढे आहेत ना नी वयाकडे बघून दरवाजा धरेल पण छे! मला त्याची सवय माहीती होती की नेहमी तो दरवाजा तोंडावर आपटणार. पण तो दरवाजा उघडताना झाले काय मध्येच दुसर्या बाजूने एक handicapped wheelechair वर गोरी बाई नी तिचा मुलगा आला(जिथे door entrance जवळ जरासे वाढलेले झाड असल्याने त्या देसीला दिसले नाही की आणखी कोण आले). अर्थात माझ्या आईने आधी wheelchair वर बसलेलेया बाईला जायला दीले. तो पर्यन्त हे महाशय दरवाजा उघडून तोंडावर आपटून मोकळे. हाच देसी जर त्याला माहीत आहे मागून गोरी / गोरा येतेय दरवाजा धरून ठेवायचा. शेवटी मीच दरवाजाची कळ दाबून दरवाजा उघडला. ह्याच माणसाचे आई वडील बाहेरून चालून आल्यावर नेहमी माझीच चूकून बेल मारायचे नी मी आपले दरवाजा उघडायचे. ते लोक thanks वगैरे पण कधीही म्हणत नाहीत. पण एकदा बर्फ़ात कीती तरी वेळ मी हातात सामान, purse ह्याच्यामध्ये माझी चावीने दरवाजा उघडत न्हवता तर ह्या महाशयाच्या बाईसाहेब खिडकीत मजा बघत होती. पण आत जावून तीला outer door ची कळ दाबावेसे वाटले नाही. काय महान लोक असतात.
|
Manuswini
| |
| Saturday, April 26, 2008 - 5:41 pm: |
|
|
असाच आणखी अनुभव होता एका देसी कपलचा. माझ्या वरतीच दोन मुले असलेली हे कपल राहयचे. बाकी बहुतेकदा weekdays मध्ये ही काय मी घरात नसायचे म्हणून मला कधी जणवले नाही पण ही दोन मुले इतका दंगा करत की सुट्टीच्या दिवशी नुसते जरा ज्यास्त वेळ झोपायचे म्हटले तरी ही कार्टी ७ लाच उठून उड्या मारत घरी. मी मनात म्हणायची मुलेच ती,जावू दे. तसे मी घरून जेव्हा जेव्हा काम करायची तेव्हा त्रास व्हायचा पन म्हटले जावू दे. एखादे दिवस घरी असेल तर दिवसभर डोक्यावर काहीतरी पडतेय का फुटतेय असे भास.पण अशी गोष्ट झाली की जावू दे म्हणणे शक्यच न्हवते. बरे देसींचा Attitude हा असतो जर दुसरा देसी असेल तर घेइल तो चालवून(किंवा घ्यावे त्याने चालवून पण मुलांना शिस्त म्हणून लावायची नाही;जर गोरा रहात असता खाली तर मग सांगीतले असते मुलांना). झाले काय जावू दे कशाला उगाच वाईटपणा अश्या भ्रमात मी नी येता जाता hi hello चालयचे. मैत्री अशी न्हवती म्हणून गप्प बसले. आणि हाच विचार नाहीतरी काय मी ज्यास्त घरी नसते. पण असे असते ना की आधीचा आपला भीडस्तपणा का चांगूलपणा नंतर महागात पडतो. किंवा लोकांना वाटते की आपले सहन करून घ्यावे इतके दिवसात नाही बोलले नी आता का सांगताहेत. नंतर प्रकरण जरा वाढलेच, त्या बाईने आपल्या कारट्यांबरोबर दुसरी दोन लहान मुले सांभाळायला घेतली. आता baby sitting in apartment is not allowed मी चांगली complaint करु शकले असते. पण तेव्हा ही गप्प बसले. पण ही मुले वरून काहीना काही गोळे,पाणी ओतत. माझी झाडे मेली एकदा त्यांची bubbles खेळ चालत नी खाली कुंडीत पाणी पडून झाडे मेली. एवढी महागडी झाडे मेली पाहून वैतागलेच मी. आता कहर झाला म्हणून सांगायला गेले तर लहान मुले आहेत, त्यांना काय समजते हा टोन. बरे कार्टी काय लहान होती,चांगली 8-9 वर्षाची कार्टी पण मुळात आधी कधीच सांगीतले नसेल मुलांना तर कुठली एक दिवसात एकणार. हे पण दुसर्याने समजून घ्यायचे. वा काय दुनिया. अरे पण आवाज होतोच तो bear करतेय पण हे काय सगळा कचरा पण खाली पडतो त्याचे काय. दोनदा सांगीतले तर शेवटी तोंडे आंबट. माझी कसली तरी परेक्षा होती नी एकदा रात्री १२ ला खूप मुलांनी धूमाकूळ घातला तर शेवटी cops नाच बोलवले. त्यानंतर इतके आंबट तोंड घेवून असायची नी दिसली की रस्ता बदलायची नी दुसर्या common ओळखीच्या लोकांना कशी माझी मुले सहन नाही केलीत ह्याच्या मसाला लावून स्टोरी. यार why do you expect that we should tolerate your non-sense तुम्ही कराल का इतरांचा ओळख पाळख नसताना 'इतका' त्रास? शेवटी काय लोक पण असतात नी त्यांच्या अपेक्षा पण काय की कीतीही झाले तरी तुम्ही गप्प बसा. बरे इतके दिवस दाखवला ना चांगूलपणा त्याचे काय. पण स्वताच्या मुलांना शिस्त नाही लावायची पण दुसर्याने त्रास सहन नाही केला म्हणून बोमंबाबोंब. काय अपेक्षा पण... जर rental office मध्ये baby sititng करते म्हणून complaint केली असती तर चांगला fine पडला असता. पण म्हटले जावू दे.
|
Sonchafa
| |
| Sunday, April 27, 2008 - 5:37 am: |
|
|
मनु, शांत हो.. ! मला कळते आहे की तुला त्रास खरोखरच खूप झाला आहे त्याशिवाय एवढं भरभरून लिहिणार नाहीस.. पण देशात काय आणि परदेशात काय.. हे असे शेजारी भेटायचेच.. आता तू देशी शेजार्यांचा त्रास सहन करते आहेस. हेच परदेशी कपल असते तर ते मूळात असे वागलेच नसते.. पण इथे आम्हीही देशी आणि शेजारीही देशी तसेच पोलिसही देशीच गं.. इथे थोडीच आपण अशा कारणांसाठी पोलीसाला बोलावतो किंवा बोलवू शकतो? जळफ़ळाट होतो जीवाचा पण इलाज नसतोच असो.. पण तू निदान उशीरा का होईना त्यांना थोडीशी अद्दल घडवलिस हे वाचून बरे वाटले. स्वत:च्या आनंदात दुसर्याची होणारी गैरसोय नजर अंदाज करणारे लोक नेहेमीच डोक्यात जातात हेच खरे.
|
अरे मी शांतच आहे रे, माझा भीडस्तपणा खूप नडला आहे मला बर्याच वेळा. पण आता मी बाळगत नाही कोणाचे तेवढे. चक्क दीड वर्षे हा त्रास काढला नी बोलताना हे कपल इतके उर्मटपणे उत्तर द्यायचे ना की जरा कमी आवाज करा सांगीतले,मुले कचरा टाकतात,कुंडीत घाण साबणाचे पाणी पडते सांगायला गेले तर तीचा नवरा तावातावाने कुंड्याची जागा बदला सांगायला लागला. मी म्हणूनच शेवटी पोलीसांना बोलवले. त्यांना वाटले देसी एकटी मुलगी काय करु शकते इतके दिवस केले नाही. जे झाले ते झाले. असो गतम न सोच्यम!
|
मने! आता झाल ते झाल पण,इथे शेजाराच्या त्रासात नेहिमी रेंटल office मधे जावुन तक्रार करावी. आणि जे व्हायचय ते कायदेशिर पणे होवु द्यावे...
|
Sonchafa
| |
| Thursday, May 01, 2008 - 4:03 am: |
|
|
मनु, अगं मला 'अरे' नको गं करू.. मी 'अगं' आहे.. मी चाफा, चाफ्फा नाही, मी सोनचाफा आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|