|
Nyati
| |
| Tuesday, April 01, 2008 - 8:08 pm: |
| 
|
शाहरुख करिष्माची मैत्री,डान्स शो, एकाचे दुसर्यावर प्रेम, दुसर्याचे तिसर्यावर,वगैरे वगैरे...
|
लिही कि पुढे ! मला आवडला होता सगळ्या अचाट घटना असून SRK अधुन मधुन चांगला वाटला होता , करीष्मा पहिल्यांदाच आवडली , माधुरी चा face सुंदर दिसतो , चक्क यात चांगले dresses पण घातलेत पण as always भयानक over weight दिसते , प्रौढ ही दिसते पण अता स्वप्नांचा राज कुमार येइल अशी वाट पहात बसणारी घोड नवरी म्हणून समजु शकतो ! अक्षय कुमार तिला सारखी ' मोटी ' म्हणतो म्हणूनच 
|
Dakshina
| |
| Wednesday, April 02, 2008 - 11:18 am: |
| 
|
माधुरी जेव्हा तिच्या दिदीला भेटायला जाणार असते तेव्हा भोचक शाहरूख पण लगेच लोणावळ्याला मित्राकडे जाण्याचा प्लॅन करतो. अरुणा इराणी ला जणू काही दूरदृष्टी असते. एखाद्या मुलाबरोबर कुठेतरी गेलं (ते ही सोबत म्हणून) तर ही सगळी असली 'दिदी मंडळी' मै सब जानती हूँ असंच का म्हणतात? नवल म्हणजे, दोघांना पण गणपतीची मुर्ती देते निघताना.... घरात काय गणपती तयार करायचा कारखाना असतो की काय? 
|
Itgirl
| |
| Wednesday, April 02, 2008 - 11:23 am: |
| 
|
नाही, तिने होलसेलमधे विकत घेतलेल्या असतात त्या मूर्त्या!! आलं असच कोणी माधूरी, शाहरूख सारखं की म्हणायचं, मैं सब जानती हूँ अन द्यायची एकेक मूर्ती हातात!! हाय काय अन नाय काय!!
|
Dakshina
| |
| Wednesday, April 02, 2008 - 11:30 am: |
| 
|
दिल तो पागल है मधली डोक्यात गेलेली सगळ्यात मोठी गोष्टं म्हणजे करिष्मा आणि शाहरूखची चिकटा-चिकटी.... वास्तवात खरे(खुरे?) मित्र-मैत्रिण अस्स्से अंथरुणात लोळतात का?
|
Maitreyee
| |
| Wednesday, April 02, 2008 - 1:14 pm: |
| 
|
दक्षिणा अग प्रत्यक्षात कधी 'मानलेले भाऊ बहीण' प्रकरणे पाहिली नाहियेस की काय तू मी तर पाहिलीयत बाबा
|
हा पिक्चर बघितल्यानंतर माझा बेस्ट फ़्रेंड सारखा मला विचारत होता. की एकमेकावर लपवून प्रेम करतात कसे?? एक दिवस तुझा मूड ऑफ़ असेल तर मी १० मिनिटात ओळखतो आणि अख्खं प्रेम असताना या गाढवाना (मी शब्द फ़ारच सौम्य केलाय) समजत नाही. प्रेक्षकाना मूर्ख (अतिसौम्य शब्द) समजतात की काय???
|
Ashbaby
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:48 am: |
| 
|
हिंदी सिनेमात असंच असतं. कॉलेजात असताना चवळिची शेंग असलेली माझी मैत्रीण पंधरा वर्षानी गरगरीत लाल भोपळा बनुन समोर आली तरी मी तिला क्षणात ओळखले, पण हिंदी सिनेमात फ़क्त मिशी लावली की झाले, बायकोही ओळखणार नाही नव-याला.... मग हे मनातल्या भावना वगैरे ओळखणे म्हणजे खुपच इंटेलीजंट प्रकरण झाले.... साधना.
|
Bee
| |
| Thursday, April 03, 2008 - 6:47 am: |
| 
|
कितीवेळा सांगायचे की मुर्तीचे अनेकवचन मुर्त्या होत नसून मुर्ती च च च राहते.
|
Ajjuka
| |
| Thursday, April 03, 2008 - 7:21 am: |
| 
|
बी, अरे ते खर्या आयुष्यात. इथे आपण हिंदी सिनेमाबद्दल बोलतोय. खर्या ठिकाणी असणार नाही ते अ आणि अ इथे घडतं. हे बरोबर आहे. :P सगळ्यांनीच दिवे घ्या!
|
Giriraj
| |
| Thursday, April 03, 2008 - 11:14 am: |
| 
|
कोणत्या तरी एका चित्रपटात या न ओळखण्याची खूपच टर उडवली होती.. केवळ एक मोस लावून त्याला कुणी ओळखत नाही.. बहुदा अं. अ. अ. असावा
|
Nyati
| |
| Thursday, April 03, 2008 - 9:26 pm: |
| 
|
आणि ते प्यारासा दोस्त...कुत्रे अन्गावर आले कि शाहरुख पार तिच्या गळ्यात पडणार म्हणे प्यारासा दोस्त
|
Nyati
| |
| Thursday, April 03, 2008 - 9:31 pm: |
| 
|
माधरी त्याची नक्कल करते तेव्हा शाहरुख तिथेच ज़ोपलेला असतो...तो काय तिथेच राहतो का? एवढा भारी डान्स शो करतो आणि घर नाही??? ;)
|
मला एक कळत नाही, शाहरुख शर्टांची शाॅपिंग करायला जातो आणि पँट कशी काढतो? आणि विसरतोही?
|
Dakshina
| |
| Thursday, April 10, 2008 - 7:50 am: |
| 
|
मैत्रेयी, अगं एकदम आठवलं एका मानलेल्या भाऊ बहीणीचं प्रकरण. मी एके ठिकाणी नोकरी करत होते, तिथे माझा एक कलिग होता, ५/६ महिन्यांनी आमची चांगली मैत्री झाली, मी त्याला भाऊ मानले (ए बाई हा किस्सा माझा नाही) मी माझे बहीणपण अजूनही निभावते आहे त्याच्याबरोबर... तर... तो एका लिटरली "छोटी" म्हणता येईल अशा मुलीबरोबर कायम फ़िरायचा... आणी सगळ्यांना सांगताना सांगायचा की मानलेली बहीण आहे. पुढे त्याने नोकरी सोडली मी ही सोडली. तो बहुतेक बदलून पूण्याबाहेर गेला.... मग मला हळू हळू त्याचे फोन येऊ लागले, तिच्यावर लक्ष ठेव म्हणून सांगणारे.... मी मनात म्हटले, भावाच्या नात्याने सत्कृत्य करतोय... काय गोऽऽऽऽड मुलगा आहे. पण मग त्याचे फोन वाढायला लागले, पूण्याबाहेर असूनही त्याल तिच्या विविध बातम्या कानावर जाऊ लागल्या.. (दुसर्या मुलाच्या नादाला लागल्याच्या) (तरिही मी तो हे सगळं भावाच्या नात्याने करतोय असंच समजत होते... कित्त्त्त्ती बाई मी भोळी... एके दिवशी मी वैतागून त्याला सांगितलं अरे सोड ना मानलेल्या बहीणीसाठी इतके कष्ट का घेतोस.... तो काहीच बोलला नाही. पुढे एका वीकेंड ला तो इथे आला, आम्ही तिघे भेटलो.... माझ्यासमोर दोघांची चांगलीच जुंपली... मी ऐकले ऐकले... शेवटी ४०/४५ मिनिटांनी तो जोरात ओरडला .... Palloo, why dont you understand, I Love you! मी खाडकन जागी...... आखिर क्या करे.. "दिल तो पागल है"
|
Shraddhak
| |
| Thursday, April 10, 2008 - 9:07 am: |
| 
|
पुढे एका वीकेंड ला तो इथे आला, आम्ही तिघे भेटलो.... माझ्यासमोर दोघांची चांगलीच जुंपली <<<<<< दोघांत तिसरी कशाला म्हणे? ( आजकाल भांडणालाही साक्षीदार लागतात की काय?) अजबच असतात एकेक लोक. आणि एखादा ' मानलेले बहीण भाऊ ' नावाचा बीबी काढून तिथे हे किस्से वगैरे हलवा बघू.... 
|
Dakshina
| |
| Friday, April 11, 2008 - 5:20 am: |
| 
|
जाऊ दे हो श्रद्धा, इतकं मनावर नका घेऊ.
|
Itgirl
| |
| Friday, April 11, 2008 - 5:56 am: |
| 
|
ए दक्षिणा, ४० - ४५ मिनिटं तू त्यांच भांडण ऐकत होतीस??? हापिसात काम अगदीच कमी होतं की काय??? अर्थात,
|
Dakshina
| |
| Friday, April 11, 2008 - 7:47 am: |
| 
|
आयटे, वीकेंडला तू तरी हापिसात जातेस का? तू पण दिवा घे.. (अर्थात आयटे म्हटल्याबद्दल....)
|
Itgirl
| |
| Monday, April 14, 2008 - 4:37 pm: |
| 
|
म्हणजे विकेंडला इतरांची भांडणं ऐकण हा तुझा विरंगुळा की काय?? दिवे साभार परत दक्षिणा, आणि आवश्यकता असेल तर वीकांतच काय पण सलग २४ तास ऑफिसमधे थांबून काम केलय गं मी. संगणक क्षेत्रात अस वेळे बाबत काटेकोर राहून चालत नाही
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|