|
Dakshina
| |
| Friday, April 04, 2008 - 6:59 am: |
| 
|
आणि अशा ओढलेल्या सिगरेटची पाकिटं टाकून देऊ नका... ती साठवून ठेवा, आणि त्याचा वॉलपिस करा... (उगाच इन्टेरियर वर खर्च नको) असा हा वॉलपिस बनावायचा असेल, आणि जर का तुम्ही सिगारेटी फ़ुंकत नसाल तर सुरू करा... 
|
Prachee
| |
| Friday, April 04, 2008 - 7:24 am: |
| 
|
१. सिल्कचे कपडे, पुस्तके यांना कसर लागु नये म्हणुन कलौंजी(कांद्याचे बी) आणि लाल मिरची यांच्या छोट्या पुरचुंड्या कपाटात ठेवाव्यात. २. सिल्कच्या साड्यांमध्ये लवंगाची पुड भुरभुरल्यास त्यांना कसर लगत नाही.
|
Dakshina
| |
| Friday, April 04, 2008 - 7:52 am: |
| 
|
भरिताचं वांग गॅसवर भाजलं की ओट्यावर ठेवून त्यावर एखादं भांडं उपडं ठेवा, थोड्या वेळाने सालं सहजगत्या निघतील.
|
"""""""""""""आणि अशा ओढलेल्या सिगरेटची पाकिटं टाकून देऊ नका... ती साठवून ठेवा, आणि त्याचा वॉलपिस करा... (उगाच इन्टेरियर वर खर्च नको) """""""""""" कुणाला हवी आहेत का?? मी कुरिअरने पाठवतो.. घरभरून इंटेरिअर करा.. (च्यायला इथे आजकाल सावध राहायला पाहिजे.. आमच्या मातोश्री नवीनच इंटरनेटशी दोस्ती करुन सध्या मायबोलीमय झालेल्या आहेत)..
|
Yashwant
| |
| Friday, April 04, 2008 - 8:47 am: |
| 
|
म्युच्युअल फ़न्डात गुन्तवनुक करनार्यान्नी इथुन पुढे डायरेक्ट फ़न्ड हौस मध्ये जावुन गुन्तवनुक केल्यास २.२५% वाचतील. एन एफ़ ओ व्यतिरिक्त गुन्तवनुक CAMS centre मध्ये स्विकारलि जाते. एन एफ़ ओ साठी मात्र त्या फ़न्ड हौस चे local office शोधावे लागेल.
|
Dakshina
| |
| Friday, April 04, 2008 - 9:37 am: |
| 
|
खास काजळ घालणार्या मुलिंसाठी - तुम्ही काज़ळ लावल्यावर जर ओघळून खाली येत असेल तर, डोळ्याच्या खालच्या बाजुला पावडर लावा, काजळ फ़िसकटणार नाही. तसंच जर केस धुतले नसतील आणि तेलकट वाटत असतील, तर तात्पुरता तेलकटपणा घालवण्यासाठी, जुना मोजा घ्या, त्यात टाल्कम पावडर भरा, आणि एक कंगवा घाला. कंगव्याचे दात मोजाच्या बाहेर येतील असे ठेवा आणि त्याने केस विंचरा, थोडी पावडर केसात पडेल, पण ती झटकून टाका, केस बरे होतील.
|
Tonaga
| |
| Friday, April 04, 2008 - 5:29 pm: |
| 
|
सिल्कच्या साड्यांमध्ये लवंगाची पुड भुरभुरल्यास त्यांना कसर लगत नाही....बोम्बला, म्हणजे आता प्रथम त्या लवंगाची पूड करणं आलं..... .
|
Tonaga
| |
| Friday, April 04, 2008 - 5:31 pm: |
| 
|
(च्यायला इथे आजकाल सावध राहायला पाहिजे.. आमच्या मातोश्री नवीनच इंटरनेटशी दोस्ती करुन सध्या मायबोलीमय झालेल्या आहेत).. >>>>(हे करून पहा..)त्यासाठी डुप्लिकेट आय डी घे....
|
Rajya
| |
| Saturday, April 05, 2008 - 5:43 am: |
| 
|
शिजवलेले नॉन्व्हेज पदार्थ जर एका ठीकाणाहुन दुसर्या ठीकाणी न्यायचे असतील तर बरोबर थोडे कोळसे न्या म्हणजे भुत लागत नाही असं माझी आजी सांगायची
|
Prachee
| |
| Saturday, April 05, 2008 - 6:03 am: |
| 
|
टोणगा, उद्या एका सिल्कच्या साडीला कसर लागली म्हणुन टोणगी जेव्हा ३-४ हजाराची दुसरी सिल्क साडी घ्यायला लावेल, तेव्हा 'लवंगाची पुड परवडली असती' असंच वाटेल तुला......
|
Lajo
| |
| Saturday, April 05, 2008 - 12:45 pm: |
| 
|
भाजीआमटी करताना कधी कधी भाड्यात खाली लागते (जळते). अश्यावेळी त्या भांड्यात गरम पाणी आणि थोडा डिटर्जंट घालून भांडे परत गॅस वर ठेवा. पाणी चांगले ऊकळू द्या. हळूहळू खाली करपलेला पदार्थ मोकळा व्हायला लागतो. नंतर नेहमी सारखे भांडे धुवा..भंडे खरवडायला लागत नाही आणि खराब होत नही.
|
Dakshina
| |
| Monday, April 07, 2008 - 5:17 am: |
| 
|
लाजो, हे सगळं आमटी संपल्यावर करायचं हे पण लिही... नाहीतर कित्येक नवर्यांना डिटर्जेंट युक्त आमटी खावी लागेल.... (समस्त भगिनी दिवे घेतीलच.(माझ्यासकट)
|
Lajo
| |
| Monday, April 07, 2008 - 6:21 am: |
| 
|
हे करून पहा... डिटर्जंट युक्त आमटी.... हा हा हा... दक्षिणा...तू पण.....
|
Ashbaby
| |
| Monday, April 07, 2008 - 8:06 am: |
| 
|
टोणगा, उद्या एका सिल्कच्या साडीला कसर लागली म्हणुन टोणगी जेव्हा ३-४ हजाराची दुसरी सिल्क साडी घ्यायला लावेल, तेव्हा 'लवंगाची पुड परवडली असती' असंच वाटेल तुला...... >>>>>>>>>>>>>

|
Dakshina
| |
| Monday, April 07, 2008 - 8:37 am: |
| 
|
अगं लाजो, खरंच आहे हे, काही बायका तंद्रीत असल्या आणि 'लागली का आमटी? चला घाला डिटेर्जेंट असं म्हटल्या... (आणि केल्या) म्हणजे झालंच...... ...असो.... * आजकाल, बहुतेक सर्वं दुचाकी गाड्या ऑटो स्टार्ट असतात. पण ते एक ते दिड वर्षातच खराब होते. ते होऊ नये म्हणून, रोज दिवसातून पहील्यांदा गाडी सुरू करताना कधीही कीक मारूनच सुरू करा.... मी माझी स्कूटी २००२ ला घेतली आणि हा नियम पाळला, माझ्या गाडीचे ऑटो स्टार्ट अजूनही चांगले काम करतेय. असं करण्याचा बॅटरीवर काही चांगला परिणाम होतो का ते माहीती नाही, पण माझ्या गाडीची बॅटरी बरोब्बर साडेचार वर्षं गेली. मेकॅनिक अवाक झाला होता ते पाहून.
|
दक्षिणा थॅंक्स गं. मोलाची टीप दिलीस तू.
|
खास काजळ घालणार्या मुलिंसाठी - तुम्ही काज़ळ लावल्यावर जर ओघळून खाली येत असेल तर, डोळ्याच्या खालच्या बाजुला पावडर लावा, काजळ फ़िसकटणार नाही. <<<< M.A.C. चे waterproof, smug proof eye make up kit वापरा , जास्तं सोपं . 
|
Dakshina
| |
| Wednesday, April 09, 2008 - 5:16 am: |
| 
|
दीपांजली, पण काही म्हण, काजळाची ब्युटी काही वेगळीच.... agree???? असो, कपड्यांना स्टार्च करणे हे एक अत्यंत डोकेदुखीचे काम आहे. घरात तर करणं मुश्किल आहे, पण तयर स्टार्च (उदा. रिवाइव्ह वगैरे) मनसारखा कडकपणा नाही आणत कपड्यांना. एक काम करा, पोस्टरला लावायची जी खळ मिळते, ति आण, ती पाण्यात (आपल्याला हव्या असलेल्या कडकपणानुसार) डायल्युट करा, त्यात कपडे भिजवा, आणि कडक उन्हात वाळवा.... उत्तम स्टार्च होतो. मी पूण्यात असल्याने शनिपाराला बॉस्कोच्या शेजरच्या मुद्रण साहीत्य भांडारातून ही खळ आणत असे. ते पाकीट त्यावेळी ६ रुपयांना मिळत असे. त्यात बरोब्बर ६ कपडे अगदी कडक स्टार्च होतात. तुम्हाला जर alergy चि वगैरे भिती वाटत असेल तर पहील्यांदा रुमाल किंवा ओढणीला करून पहा.. दुसरी गोष्टं, कपडे डार्क असतील तर असा कडक स्टार्च कधी कधी कपड्यांवर उठतो (पांढरे पॅचेस) तर, कपडे स्टार्च मध्ये बुचकळण्याआधी, त्यात निळीचे ४/५ थेंब टाका किंवा कार्बन पेपर भिजवा... स्टार्च निळा होतो, अणि कपड्यांवर डाग सोडत नाही.
|
>>>थोडे कोळसे न्या म्हणजे भुत लागत नाही <<<< राज्ज्या म्हनजे नक्की काय????? भुत म्हनजे त्या भुत्-खेत मधल भूत??? मग ते जेवणाला कस लागे??? ते तर माणसाला लागत ना???? जरा थोड स्पष्ट करशील???
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 09, 2008 - 2:46 pm: |
| 
|
कांदा कापताना डोळ्यातुन पाणी येतच. त्यातच कांदा जर नवीन असेल (म्हणजे ओला) तर त्यावेळी जरा जास्तच पाणी निघत. हा डोळे चुरचुरण्याचा त्रास कमी होण्यासाठी एक उपाय गावी पाहिला होता. कांदा चिरताना कांद्याची साल डोक्यावर ठेवा आणि कांदा कापा. त्रास कमी होतो. फ़क्त जी साल घ्याल ती वार्याने उडुन जावु नये इतपत जाड असावी. थोडी आतल्या थरातील असेल तर बर.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|