|
Dakshina
| |
| Tuesday, May 27, 2008 - 4:31 am: |
| 
|
नंदिनी... त्यात नवल वाटण्याजोगं काय आहे? आज्जुका, दिनेश, तुम्ही सांगितलेलं जरूर करून पाहीन.
|
Itsme
| |
| Tuesday, May 27, 2008 - 5:19 am: |
| 
|
मला पण आश्चर्य वाटले, अज्जुकाने सांगीतल्या प्रमाणे मी पण बिया काढून टाकते, पणा हातानेच. कधी जळजळ झाल्याचे आठवत नाही.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 27, 2008 - 5:28 am: |
| 
|
अगं मी पण पूर्वी हातानेच काढायचे काहीही व्हायचं नाही पण गेल्या चारपाच वर्षात हाताने काढल्यावर थयथय नाचण्याइतकी वेळ येते. प्रत्येकाच्या Skin Sensitivity वर असतं ग ते.
|
Dakshina
| |
| Tuesday, May 27, 2008 - 8:32 am: |
| 
|
..........आणि मिरच्यांच्या जातीवर पण.... मी ही पूर्वी ढब्बू मिरची आनंदाने चिरत असे, कधी जळजळ झाली नाही, अलिकडेच १ / २ वर्षांपुर्वीपासून असं होऊ लागलंय.
|
मलाही हा अनुभव (ढ. मि. चिरल्यावर हाताची आग होणे) आला मागच्या १-२ वेळेपासुन....वय झालंय बहुतेक...मिरच्यांचं.....माझं नाही कै...
|
Dakshina
| |
| Wednesday, May 28, 2008 - 4:34 am: |
| 
|
सिंड्रेला, इतक्या वयस्क मिरच्या नका हो चिरत (खात) जाऊ... बाजारात कमी वयाच्या मिरच्या पण मिळतात.. त्या घेत चला...
|
Itsme
| |
| Wednesday, May 28, 2008 - 11:34 am: |
| 
|
मिरचीचा आता कांदा होणार असे दिसते आहे .... 
|
राज्या, लवकर टोमॅटो सुप करा 
|
Dineshvs
| |
| Thursday, May 29, 2008 - 4:15 am: |
| 
|
छे सिंड्रेल, टोमॅटो कुठे आला मधेच ? आता मूळा घ्यायचा. कारण सवता माळ्याने म्हंटले आहेच. कांदा, मूळा भाजी, अवघी विठाई माझी.
|
Manjud
| |
| Thursday, May 29, 2008 - 6:42 am: |
| 
|
मी पण आधी सुरीने भोपळी मिरची पोखरुन घेत असे. परवाच्या दिवशी काय अवदसा आठवली देव जाणे, पण हाताने बिया काढल्या भोपळी मिरचीच्या आणि नंतर मरणाची आग झाली हातांची..... ते कमी की काय म्हणून आग थांबल्यावर लेन्स लावल्या...... मग घरभर थयथयाट. हं, आता सुरू करा मुळा पुराण...
|
Itsme
| |
| Thursday, May 29, 2008 - 7:22 am: |
| 
|
मुळ्याची भाजी करण्या आधी मुळा पाण्याने 'स्वच्छ' धुवुन घ्यावा म्हणाजे भाजीला मुळ्याचीच चव येते 
|
Dineshvs
| |
| Thursday, May 29, 2008 - 8:52 am: |
| 
|
झाले का मुळा पुराण सुरु. या मालिकेतले माझे पहिले पुष्प. म्हणजे मुळ्याचे फ़ूल.

|
ठीक आहे, मुळा तर मुळा (तसेही आम्हाला मुळे फ़ार प्रिय आहेत..आईचे माहेर मुळ्यांचे)...तर राज्या, मुळ्याचे सुप करा . फुले भारीच आहेत मुळ्याची !!!!
|
Dineshvs
| |
| Friday, May 30, 2008 - 10:43 am: |
| 
|
लाल मुळा, राजेळी केळी आणि शेंगदाणे याची एकत्र भाजी खुप छान लागते. मुळा आणि केळ्याच्या अर्धगोल चकत्या करायच्या. जिरे आणि हिरवी मिरचीच्या वाटणावर त्या परतायच्या. आणि शक्यतो ओल्या वा भिजवलेल्या दाण्यांचे भरड घालायचे. आणि मीठ घालुन शिजवायचे. भाजी दिसतेही छान आणि लागतेही छान. ज्याना मुळ्याचा वास आवडत नाही, त्याना पण हि भाजी आवडेल.
|
Dakshina
| |
| Monday, June 02, 2008 - 10:25 am: |
| 
|
दिनेश, आम्ही मुळ्याच्या चकत्या घालून तुरीच्या डाळीची आमटी करतो. शिवाय मुळ्याच्या पाल्याची कांदा घालून केलेली भाजी पण भाकरीशी मस्त लागते.
|
Itsme
| |
| Monday, June 02, 2008 - 2:04 pm: |
| 
|
ज्यांना मुळ्याचा वास आवडत नाही, त्यांच्या साठी मुळ्याचे थालीपीठ हा एक पर्याय आहे. मला मुळ्याची मुगाची डाळ घालुन केलेली भाजी फार आवडते. सालीची डाळ घातली तर दिनेश म्हणतात तशी ती देखणी पण होते
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 03, 2008 - 4:45 am: |
| 
|
मुळ्याची आमटी हा एक खास आवडता प्रकार आहे. खास करुन सी के पी लोक करतात ते आंबटवरण. याची मी कृति दिली होती, ते खाऊन उसगावातली एक मायबोलीकरीण, आणि तिचा नवरा, बराच वेळ बोटे चाटत होते म्हणे. या प्रकारात मुळ्याची नेहमीची चव लुप्त होवुन वेगळाच गोडवा येतो. मुळ्याच्या वरचा भाग कापुन जमिनीत लावला तर त्याला फ़ुले येतात आणि शेंगाही ( म्हणजे डिंगर्या लागतात ) एरवीहि मुळा अगदी सहज वाढतो. मोहरीच्या कुळातील असल्याने, त्याच्या बिया मोहरीसारख्याच असतात. मिनरल वॉटरच्या बाटलीतही सहज वाढतो. पाने थोडी थोडी काढून कोशिंबीरीत घालायची, मुळा तयार झाला कि मातीच्या वर डोकावू लागतो. तो उपटुन घ्यायचा आणि परत तो भाग खोचला कि, काहि दिवसानी कोवळ्या डिंगर्या मिळतात. त्या तश्याच खायलाही छान लागतात. शिवाय फ़ुलांची शोभा वेगळीच.
|
Dakshina
| |
| Wednesday, June 04, 2008 - 11:37 am: |
| 
|
मुळ्याच्या शेंगांचीही भाजी छान लागते. थोडी उग्र असते, पण गवारीची भाजी करतो तशी केली की मस्त लागते. शेंगदाण्याचं कूट जरा भरपूर ( ) घालून केली की काय बोलायलाच नको. शिवाय या शेंगा मीठ लावून उन्हात वाळवून, तळतात (बहुतेक खारवलेल्या मिरच्यांसारखं नक्की लक्षात नाही) आणि खातात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|