|
Shraddhak
| |
| Thursday, March 13, 2008 - 11:10 am: |
| 
|
एवढ्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच दिलं असतं तर एवढा सिनेमा सहन करावा लागलाच नसता. तर आलोकनाथ लग्न वगैरे न करता सगळे जीवन आपल्या दोन अनाथ पुतण्यांना सांभाळण्यात घालवत असतो. ( सिनेमाचा विषय थोडा बदलला की हाच काका व्हिलन बनून पुतण्या किंवा पुतणीला संपवायचे प्लॅन्स आखतो. उदा. सत्ते पे सत्ता, खिलाडी, इ.) बडजात्याचा सिनेमा असल्याने व्हिलनही घरातलेच आणि निरुपद्रवी ( म्हणजे फ़क्त टोमणे मारणारे, खून बीन वगैरे भानगडीत न पडणारे)! तर आता बडा बेटा राजेश हा लग्नायोग्य वयाचा झाल्याने त्याच्यासाठी मुलगी शोधणे येते. लगेच रेणुका शहाणेचे स्थळ समोर येते. आता रेणुका शहाणेचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे असल्याने रामटेकडी नावाच्या मंदिरात राहायला गेलेले असते. तसेही त्या कुटुंबाला बाकी काहीही उद्योग दिसत नाहीत. अनुपम खेर ' कॉलेजात प्रोफ़ेसर ' नि माधुरी ' कंप्यूटर मध्ये काहीतरी शिकत असल्याचे ' त्यांनी सिनेमात सांगून ठेवले आहे. माधुरीचे नेमके बहिणीच्या लग्नाआधी Year Down झाले असावे नि अनुपम खेरला निलंबित केले असावे, म्हणून त्या काळात त्यांनी रेणुका शहाणेचे लग्न व इतर फंक्शन्स ( वि. सू. हा फंक्शन्स सिनेमातलाच शब्द आहे. आठवा ' हमे बहू का फंक्शन शुरु करना है... ' वगैरे ड्वायलाक.) उरकून घेतले असावे. मग तिथे अतिशय विनोदी पद्धतीचा कोट का टॉप घातलेल्या माधुरीची एंट्री. मुलगी पाहून पसंत केल्यावर लगेचच साखरपुडा. आणि लग्नाची तयारी सुरू होते; ती त्या शर्मा ( शर्माच ना?) कुटुंबातल्या दोन्ही मुली ( पक्षी: पूजा आणि निशा) उजवेपर्यंत चालू असते. धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभाव वातावरण दाखवायचेच म्हणून एक अतिशय जवळचे मुस्लिम कुटुंब. डॉक्टर चाचा आणि डॉक्टर चाची. कुठल्याही समारंभाला हे हवेतच. ( डॉक्टरकी कधी करतात देव जाणे!) अख्ख्या सिनेमात ती हिमानी शिवपुरी फ़क्त रेणुका शहाणेचे बाळंतपण करताना दिसते. भारतासारख्या देशात असंख्य बाळं रोज जन्माला येत असतानाही या दंपतीपैकी एकालाही इमर्जन्सीसाठी ' बहू के फ़ंक्शन्स ' अर्धवट टाकून जावे लागत नाही. सुरुवातीचा शॉट. क्रिकेट खेळायला एवढी मुले कुठून जमतात? कुत्र्याला एवढी चांगली पंचगिरी कशी जमत असावी? बाकी अगदी खर्याखुर्या पंचांसारखी पार्श्यालिटी तो ' बहू ' च्या बाबतीत करतो. इतकी सद्वर्तनी बहू पहिल्यांदाच भैयाजी के साथ क्रिकेट खेळायला आलीये म्हटल्यावर तिला का पहिल्या बॉलला आऊट करायचे? त्यात त्या रेणुका शहाणेचे साडी नेसून क्रिकेट खेळणे केवळ अतर्क्य. दुसरे ते अजित वाच्छानी आणि बिंदू हे दांपत्यही अखंड यांच्या घरी पडीक! बिंदूची भाची का कोण असलेली ती स्वीटी नामक कन्या. तीही सदासर्वकाळ तिथेच! भरीस भर म्हणजे रेणुका शहाणेच्या माहेरकडचा तो भोलाभैयाही ज्या त्या ' फंक्शनला ' रेणुकाच्या सासरीच पडीक! मान्य आहे हवेली मोठी आहे पण या लोकांना आपापली घरंच नाहीत? आणि शिक्षण, नोकरी, कामधंदे? यावरून आठवलं: त्या ' हम साथ साथ है ' मध्येदेखील ती नीलम आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जी येते ती भावाच्या हनीमूनपर्यंत तिथेच! आणि हनीमूनलादेखील सगळे मिळून खेड्याला भेट द्यायला जातात. अरे देवा! ती काय पूरग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त खेड्यांची पाहणी आहे का हनीमून म्हणजे? सुरुवतीच्या एका फ़ंक्शनमध्ये आलोकनाथने लग्न का केले नाही?, याचा उलगडा करण्यात येतो. त्याची अनुपम खेर व रीमा लागूसोबत कॉलेजात शिकत असताना रीमा लागूवर लाईन असते म्हणे! पण मग अनुपम खेर आधी नंबर लावतो नि हा संन्यस्त वृत्तीने जीवन जगू लागतो. :-P त्या फ़ंक्शनमधले अनुपम खेरचे माकडचाळे पाहून ( माणसाला काही पाचपोचच नाही. आपण मुलीच्या सासरी लग्नासंबंधीचे विधी पार पाडायला आलोय, अजून धाकटीलाही उजवायचीये, कश्शाचा म्हणून विचार नाही. :-P ) ती रीमा लागू ' देखो जी, तुम ऐसे बिहेव करोगे ना तो मै इससे शादी कर लूंगी.. अभी भी वेळ गई नही है.... ' अशी धमकी देईल असे वाटते. ( पण ती बडजात्यापटातली आर्यनारी असल्याने असे कशाला म्हणेल म्हणा!) त्यातून आलोकनाथने गाणे गायला आढेवेढे घेणे नि रीमा लागूने गोडमिट्ट टोनमध्ये ' गा दीजिये ना ' म्हटल्यावर गाणे सुरू करणे आणि इतरांनी एकदम ' भई व्वा... ' चा गजर करणे म्हणजे निव्वळ हहपुवा. सबंध सिनेमाभर जाणवतात ते माधुरी नि सलमानचे अतिशय हास्यास्पद, भडक रंगसंगती असलेले कपडे. तिचा तो बहिणीच्या लग्नातला पांढरा घागरा नि हिरवा टॉप.... हिरवी ओढणी. सलमानच्या सर्वच कपड्यांवरची एंब्रॉयडरी... ईईईईईईईई.... तिचे ते लाल नि गुलाबी रंगाचे फ़्रॉक्स, तो एक भीषण पिवळा गाऊन सदृश्य काहीतरी ( आठवा... चॉकलेट लाईम ज्यूस गाणे....) बाकी त्या गाण्याआधी रीमा लागू तिला बहिणीच्या घरी पाठवण्याआधी तू मोठी झालीस वगैरे उपदेश करते, तेव्हा ती म्हणते, ' अब तू जीजीके घर जायेगी, कल तेरी भी तो शादी होगी... अभी से सब तौरतरीके सीख लो... ' वगैरे. इथे आमच्या ग्रुपमधली एकजण तिसर्यांदा सिनेमा बघता उत्स्फूर्तपणे ' क्या पता जीजाजीसेही शादी हो! ' असं म्हटली होती. आणि सलमान खानला रात्री उशिरा फोन करताना पेन्सिल सिगरेट आहे असे समजून, ती पेटवल्यासारखे करणे, वगैरे भानगड कळली नाही. खरीखुरी सिगरेट दाखवली असती तर? पण मग तो महेश भट्टचा सिनेमा झाला असता. शेवटी कृष्णाच्या मूर्तीच्या डोळ्यातून किरण निघून कुत्र्याला सुपर अक्कल येते नि तो सलमान माधुरीचे लग्न लावून देतो. ' देव म्हणजे काय? ' वर भांडणार्यांनी कृष्णाच्या डोळ्यांतून किरण निघतानाचा शॉट अवश्य पहावा. देवाबद्दलच्या सगळ्या शंका दूर होतील. :-P शेवटी ' हम आपके है कौन? ' अशी अक्षरे दाखवून त्यातले प्रश्नचिन्ह आणि कौन खोडून ' हम आपके है... ' असा संदेश देऊन सिनेमा सुफळ संपूर्ण होतो नि प्रेक्षक सुटकेचा निश्वास टाकतो. काही अति इरिटेटिन्ग डायलॉग्स: १. ( टॉप रेटिंग) भई व्वा... २. निशाजी, कॉलिंग निशाजी... ३. तुम्हारे लिये हलवा हमसे नही बनेगा तो और किससे बनेगा? ( आणि यानंतर अति अति प्रेडिक्टेबल असा माधुरीचा प्रवेश) ४. ओहो मेहंदी प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. फ़ॉर यू.. टी विथ स्ट्रॉ. ५. हम आपके है कौन? ६. ( तो नाटकी खोकण्याचा आवाज.) ७. बिलकुल नही बिलकुल नही... यादी वाढत जाते......
|
Madhurag
| |
| Thursday, March 13, 2008 - 11:29 am: |
| 
|
सही लिहिलं आहेस श्र अजुन एक म्हणजे रेणुका शहाणेच्या लग्नाच्या वेळी ते मैने प्यार किया वाल्या प्रेम आणि सुमनचे dialogs ...केवळ अशक्य
|
ह्या पिक्चर नंतर तो सलमान खानसारखा २ पिस सुटची (???) फॅशन आली होती, विशेशत लहान मुलांसाठी.. लग्न समारंभात तो तपकिरी + हिरवा + पांढरा कॉंबिनेशन असलेला ड्रेस घालुन मुलं कार्यालयात दिसायची तेव्हा डोक्यात कळ यायची!!
|
lol. shra एकदम perfect!! काय भयानक शिणेमा काढलाय बडजात्यानी आणि त्यातली ती भडक कमळी दिसणारी आणि अल्लड पणाचा आव आणणारी माधुरी म्हणे लोकांना आवडली !!!! काय म्हणाव लोकांच्या टेस्ट ला ! पांढरा हिरवा घागरा काय किंवा वाह वाह रामजी मधला अतिशय डंगरी असा आमसुली चकचकीत घागरा , त्यात माधुरीचं सुटलेलं पोट दाखवणारा टॉप काय ! त्या आमसुली घगर्यात तिची पैंजण घालतानाची कृत्रिम pose आणि चपट आंबाडा .. कसला भयनक आहे तो गेट अप !! भरीस भर म्हणून लीला लेस चे अनेक फ़्रॉक ही दिलेत बडजात्यानी तिला ! तसेही बडजात्याला लीला लेस हे फ़्रॉक फ़ार आवडतात , MPK मधे भागा बाईंना दिलेला गुलाबी लीला लेस चा फ़्रॉक ही तसाच !! तोच गुलाबी फ़्रॉक जो घातला असताना MPK मधला व्हिलन मोहनीश प्रसिध्द डॉयलॉग मारतो ' ये तो सिर्फ़ पर्दा है पर्दा , कपकपाते हुई रातोमे धडकते हुए दिलोंकी भडकती हुई आग बुझानेका , उसे मिटानेका " तर back to हम आपके ... माधुरीला बडजात्याने इतक्य विचित्र angles मधे दाखवलय !! वर तिची double chin आणि बेढब figure नीट दाखवणारे close ups फ़ार भारी आहेत ! तसेही सल्लु आणि माधुरीचे कपडे हे जत्रेत च जास्त शोभून दिसले त्यांच्या पेक्षा !! मोहनीश बहल ला तर कोणाशीही मुकट पणे लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नसतो .. वर दुसर्या लग्नातही भरपूर लोक , संगीत वगैरे सगळं एकदम थाटात ! ' तुमसे जुदा होकर मुझे दूर जाना है ' गाण्यात माधुरी आणि सल्लु चं रडकं over acting तर सहन होत नाही ! मेंदीच्या हातानी फोन पकडून रडणे काय , गात गात रडणे काय .... too funny!! रिमा लागू तर किती लाजते सारखी .. वेड्याचा बाजार आहे HAHK म्हणजे ! 
|
Manjud
| |
| Thursday, March 13, 2008 - 11:53 am: |
| 
|
हो आणि माधुरीच्या त्या हिरव्या आणि पांढर्या शराराचीही फॅशन आली होती. काय भयानक कॉंबिनेशन होतं ते. अजून एक प्रचंड बोकाळलेला नि अतिशय डोक्यात जाणारा तो जूते लपवण्याचा विधी. माधूरीचा एकमेव आवडलेला (फक्त पडद्यावर बघायला) कॉस्चूम म्हणजे ती निळी जरदोसी साडी.
|
Psg
| |
| Thursday, March 13, 2008 - 12:05 pm: |
| 
|
नेहेमीच्या स्टायलीत लिहिलेय श्र ते शेवटी कृष्णाच्या मूर्तीच्या डोळ्यातून ज्योति वगैरे तर अफ़लातून पण खरं सांगू.. एक बालिश, सोज्ज्वळ, बाळबोध कॉमेडी म्हणून हा सिनेमा मला आवडतो
|
आणि ते बडजात्याचे घरातले नोकर ही कसले डोक्यात जातात ! वेळो वेळी emotional speech ठोकणारा लक्ष्या भाउ आणि कायम बिंदी पासून पायल पर्यंत सगळे दागिने घालून नटून थटून फ़िरणार्या MPK मधली हुमा खान आणि HAHK मधली प्रिया अरुण स्वत : ला फ़ार शहाण्या समजतात ! आणि बडजात्याचे प्रेमवीर इतके घरगुती कि romance करायलाही घरा बाहेर जात नाहीत ! आठ्वा गच्ची वरचं , मेरे रंग मे रंगने वाली ' आणि पूल टेबल वरचं ' पहला पहला प्यार है '! आणि इतके लोक घरात असताना यांच्या प्रेमाचा कोणाला मागमुस ही लागत नाही ! आणि ते माधुरीच्या entry ला लता बाईंच्या आवाजतलं ' आह्हा ' तर कसलं तुफ़ान विनोदी आहे !
|
Zelam
| |
| Thursday, March 13, 2008 - 12:14 pm: |
| 
|
अगदी, अगदी श्र. पण यापेक्षा मला तो हम साथ साथ है भलताच अचाट वाटतो. इतकं मिट्ट गोड आहे ना सगळं त्यात. ते हनिमूनला एकत्र गावाला जाणे तर डोक्यात जातं.
|
ते लग्नात जोडे पळवणे नावाचा भयानक प्रकार ह्या चित्रपटानंतरच आला.. त्याआधी तो कोणत्या संस्कृतीमध्ये अस्तित्त्वात होता कोण जाणे..
|
तान्या , हा प्रकार कधी sss पासून आहे कि ! तुम्हाला HAHK नंतर कळला बहुतेक . 
|
Tonaga
| |
| Thursday, March 13, 2008 - 2:45 pm: |
| 
|
पण खरं सांगू.. एक बालिश, सोज्ज्वळ, बाळबोध कॉमेडी म्हणून हा सिनेमा मला आवडतो >>>>>>> काय म्हणाव लोकांच्या टेस्ट ला !>>>>>> पी एस जी, किती बाळबोध विचार तुमचे. केवढी ही तुमची जुर्रत हा डायलॉग हाणायची.... आता वाचत नाहीत तुम्ही....
|
Amruta
| |
| Thursday, March 13, 2008 - 2:45 pm: |
| 
|
आहे ग पण आपल्या मराठी लग्नांमधे तरी अस काहि नसायच ते ह्या पासुन सुरु झाल. बाकी श्र मस्तच लिहिलयस. मग तिथे अतिशय विनोदी पद्धतीचा कोट का टॉप घातलेल्या माधुरीची एंट्री. >>अग स्केट्स विसरलीस. आणि ते मागच म्युझिक. उहु उहु कसल TP होत ते. श्या. पण तेव्हा पहायला मजा आलेली. ती भरपुर गाणि, नो मारामारी, नो व्हीलनस. चांगली होती तशी लग्नाची कॅसेट.
|
hahkचे परीक्षण वाचून hhpv झाली. बाकी जाणकार महिला वर्ग कपडे, दागिने वगैरे इतके बारकाईने बघतात हे अशा बीब्यांमुळे कळले. मला माधुरीने आणि सलमानखाने कपडे घातले होते एवढेच आठवते आहे! (सलमानबद्दल तेवढीही खात्री नाही. असो.) शिसारी येईल इतका गोडमिट्ट हे वर्णन अगदी उचित आहे. पण १९९४-१९९५ च्या आसपास ह्या सिनेमाची जबरदस्त क्रेझ होती. शेवटच्या सीन मधे टॉमी ते पत्र घेऊन येतो तेव्हा मोहनिश बहल त्याला वीष खायला घालेल आणि माग काहीतरी आक्शन, मारामारी, सस्पेन्स असेल असे वाटले. त्या निमित्ताने त्या आगाऊ कुत्र्याला त्यानंतर बघावे लागले नसते. पण बडजात्यांच्या सिनेमात असले कुठे होणार. त्याने ह्या खलपुरुषालाही नांगी टकायला लावली.
|
Prachee
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:31 pm: |
| 
|
या शिणेमातल्या अभिनया(?????)साठी माधुरीला फ़िल्मफ़ेअर मिळले होते.
|
Mrinmayee
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:06 pm: |
| 
|
श्रध्दा, मस्तच! कुत्र्याला सुपर अक्कल.. , तसाही त्याचा IQ इतरांपेक्षा जरा जास्तच असतो! मधे कुठेतरी "हम कहा बैठे?" वगैरे सलमाननी विचारताच माधुरी एका (खर्याखुर्या) गाढवाकडे बोट दाखवते. (एव्हड्या मोठ्ठ्या पॉश हवेलीमागे 'ही' सोय असेल असं वाटलं नव्हतं!)
|
बर् पण इतका सगळा सव्यापसव्य करुन शेवटी कळले का तुम्हला की ........................... हम आपके है कौन? ..........(आखिर खुनी कौन सारख वाचा.........)
|
Sashal
| |
| Thursday, March 13, 2008 - 4:44 pm: |
| 
|
LOL! सगळी पोस्टस् धमाल आहेत .. त्या 'हम साथ साथ है' मधल सगळ्यांत डोक्यात जणारं म्हणजे ते तब्बू चं, 'रामपूर चले' dialogue .. आणि सारखं ते विनोद बाबू आणि प्रेम बाबू .. आता मला त्या 'हम साथ साथ है' वर लिहायची जाम हुक्की येतेय! पण psg म्हणते तसं कितीही HHPV झाली तरी मी पण बडजात्या चे HAHK आणि हम साथ साथ है enjoy केले .. कसलाही stress न देणारी निखळ करमणूक म्हणून ..
|
Mansmi18
| |
| Thursday, March 13, 2008 - 5:08 pm: |
| 
|
शेवटी कृष्णाच्या मूर्तीच्या डोळ्यातून किरण निघून कुत्र्याला सुपर अक्कल येते नि तो सलमान माधुरीचे लग्न लावून देतो. ' देव म्हणजे काय? ' वर भांडणार्यांनी कृष्णाच्या डोळ्यांतून किरण निघतानाचा शॉट अवश्य पहावा. देवाबद्दलच्या सगळ्या शंका दूर होतील. -----------------------------------------
जबरदस्त!!
|
Tonaga
| |
| Thursday, March 13, 2008 - 5:11 pm: |
| 
|
बाकी जाणकार महिला वर्ग कपडे, दागिने वगैरे इतके बारकाईने बघतात हे अशा बीब्यांमुळे कळले>>>>>> अहो तेवढेच तर त्याना कळते... (मेलो आता मी वाचत नाही....)
|
Manuswini
| |
| Thursday, March 13, 2008 - 5:56 pm: |
| 
|
माधूरी दिक्षीत नी पुर्वीची श्रीदेवी ह्यांचे ड्रेसींग सेन्स इतके हॉरीबल होते / आहे ना सगळ्या चित्रपटात. काय ते फ़्रॉक्स नी काय झगे छी! टॉप वर जावून पण आपली कपड्यांची आवड ह्या नायीकेंना सांगता येत न्हवती काय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|