|
Manuswini
| |
| Thursday, March 13, 2008 - 6:07 pm: |
| 
|
बाकी बडजात्याच्या शीनेमात पोरी तर काहीच करत नाहे असे दाखवतात. वर तर वर ह्या सीनेमामुळे,मुली ह्या पतीधर्मीय(नवीन धर्म बायंकाचा) असाव्यात असा ग्रह निर्माण करतात. बायका म्हणजे चूल नी मूल नी 'पतीचरण' हेच समीकरण पुर्ण मूवी मध्ये खरे तर 'ह्या' अश्या मूवीस मुळेच समानतेची पातळी ढसळली आहे हे मला वाटते कारण मूवी 'सर्वसामान्य(अतीसामान्य नाही)' अश्या वर्गावर परीणाम करते. आता तो वर्ग कोणता हे विचारू नका. श्रद्धाच्या मूवीच्या रसग्रहणाने असे बरेच मुद्दे समोर आले म्हणून तुला धन्यवाद समस्तानी दिवे घ्यावे.
|
त्या सिनेमानन्तर कोणत्याही लग्नाला गेलो की जोडे लपविण्याचा तो प्रकार पाहुन तेच जोडे त्या करवल्याना मारावेसे वाटत. बाकी श्रद्धा, उचापती आणी फारेन्ड यान्च्या लेखापुर्वी ही सूचना लिहिणे आवश्यक आहे. " हा लेख ऑफीस मध्ये वाचू नये. खो खो हसल्याने नोकरी गेली तर मायबोली जबाबदार नाही"
|
vijaykulkarni यांना मोदक! बाकि कुत्र्याच काय घेवुन बसलात मण्डळि, अहो MPK मध्ये कबुतरानि बरेच चमत्कार दाखवले होते. निष्कर्ष काय तर बडजात्या खानदानात प्राणि intelligent design follow करतात Darwinism नाहि. श्रध्धा, आता 'हम साथ साथ है' लिहायला घे. एवढा भयानक picture बडजात्या खानदानात देखिल कुणि केला नव्हता. सर्वोदयवादि सल्लुमिया बघण हाच काय तो एकमेव मनोरंजनाचा भाग.
|
तो पायताणं लपवायचा फालतू प्रकार वाचून एक आठवले. माझ्या महितीतल्या एका लग्नस्थळी जिथे मुलीकडचे लोक ह आ है को चे पंखे आणि मुलाकडचे जुन्या वळणाचे मराठी लोक. तिथे जोडे लपवायचा प्रकार झाला आणि वरपिता खवळले, हा काय मूर्खपणा आहे वगैरे वगैरे. कशीबशी समजूत घालून मुलीकडच्याच कुणीतरी पैसे दिले आणि हा अर्थपूर्ण फिल्मी विधी पूर्ण केला.
|
Farend
| |
| Friday, March 14, 2008 - 12:45 am: |
| 
|
सही लिहिले आहे. यात मुख्य अचाट व अतर्क्य पणा म्हणजे ते पहिल्यांदा लिहिले आहेस ते.... दोन्ही कुटुंबे, चित्रपटातील "दुय्यम नागरीक" वगैरे. आलोक नाथ पासून सगळे नक्की काम काय करतात कळत नाही. मोहनिश बहल काही "बिझिनेस संभालत" असतो ना? अशा पिक्चर्स मधे बिझिनेस असला की थेट परदेशात त्याची मीटिंग असावी लागते. ते ही आहे ना? ते दुय्यम नागरीक तर यांच्या घरी लुडबुडणे हेच जीवनकार्य असल्यासारखे येत जात असतात. त्यामुळे त्या स्वीटीच्या लग्नात आलोक नाथ पासून सगळे असेच त्यांच्या घरी जाऊन बसले होते का वगैरे प्रश्न पडतात मला आता लक्षात नाही, पण यात माधुरीला कोणी विचारतात का की तुला ते लग्न करायचे आहे का म्हणून? तो कुत्र्याचा शॉट तर अफलातून! आधी अम्पायर म्हणूनही. ते ग्राउंड आणि ते घर नंतर इतरही पिक्चर्स मधे बघितले. पण हेच जोहर किंवा चोप्त्रा गंॅग ने यांना बास्केटबॉल खेळायला लावले असते. आता पुन्हा बघायला पाहिजे HAHK , माधुरी मात्र आवडली होती या चित्रपटात, तसेच लता ची गाणी सुद्धा (जरी अगदी महान संगीत वगैरे नव्हते तरी). दीपालीने लिहीले तेवढा analysis आम्ही केला नाही तेव्हा पण तिचे एकूण हावभाव वगैरे एकदम आवडण्यासारखे होते. उदा: सलमान ने "पहले जूते" म्हंटल्यावर "खायेंगे क्या?" विचारताना लताचा आवाज आणि माधुरीची action एकदम जमून गेली होती. श्रद्धा, या ही पेक्षा "हम साथ साथ है" जास्त मसाला पुरवेल असे वाटते. तेथे म्हणे यांचे एक स्वत:चे थियेटर असते घरातील लोकांना घरातील लोकांसमोर (आणि दुय्यम नागरिकांसमोर) विविध गुणदर्शन करायला!
|
श्र, हम साथ साथ है मैने प्यार किया आणि हम आपके है कौन... बरजात्याचे इतकेच पिक्चर आहेत??? अरे, महान अतर्क्य अचाट पकाऊ... मै प्रेम की दिवानी हू.... त्यावर कुणीतरी लिहा.. मला वेळ मिळाला की मी लिहेनच. आणि हम आपके है कौन माझा आवडता पिक्चर होता, आहे आणि राहील..   
|
Ajjuka
| |
| Friday, March 14, 2008 - 5:39 am: |
| 
|
>>एवढ्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच दिलं असतं तर... माधुरीचे नेमके बहिणीच्या लग्नाआधी Year Down झाले असावे नि अनुपम खेरला निलंबित केले असावे, ती काय पूरग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त खेड्यांची पाहणी आहे का हनीमून म्हणजे? अभी भी वेळ गई नही है.... ' खरीखुरी सिगरेट दाखवली असती तर? पण मग तो महेश भट्टचा सिनेमा झाला असता. देव म्हणजे काय? ' वर भांडणार्यांनी कृष्णाच्या डोळ्यांतून किरण निघतानाचा शॉट अवश्य पहावा. देवाबद्दलच्या सगळ्या शंका दूर होतील << अशक्य!!! ह ह पु वा!! नुसतीच पु वा नाही गब लो सुद्धा! ते हिरवे पांढरे घागरे इतके बोकाळले होते नंतर. प्रत्येक लग्नकार्य, समारंभ (फंक्शन म्हणूया?) एक तरी वाईट नक्कल असायचीच त्याची. तो कपडा घातलेली मुलगी किंवा मुलगी लहान असल्यास तिची माता 'माधुरी अवतरली' असल्याच्या आवेशात असायचे. मला डिजेच्या इतकं नाही झालं माधुरीला बघून. पण कपडे विनोदी होतेच.. अगं मनु, त्या सगळ्या स्वतःची बुद्धी/ कपड्याचा सेन्स चालवत होत्या म्हणून तर इतकं भीषण होतं सगळं. TY ला असताना अभ्यासाने वैतागून(हे कसे काय कुणास माहित!) परीक्षेच्या आधी मंगला मधे स्टॉलमधे बसून पाह्यला होता. त्यामुळे एक बरं झालं की बघत असताना बरोबर मस्त आवाज पडत असताना बघायला मिळाला!! त्यामुळे अर्थातच सुसह्य झाला. पण याहून अचाट आणि अर्तक्य MPK आहे. त्या भागाबाईचे जीव गेल्यासारखं गोडमिट्ट बोलणं!! सुदैवाने HSSH मी पाह्यला नाही पण कुठल्या ना कुठल्या ना चॅनेलवर सतत रतीब चालूच असतो त्यामुळे अधून मधून गोडमिट्ट सीन्स पाह्यलेत. ढवळू लागलं पाच मिनिटात. अरे हो.. प्रेम की दिवानी तर महानच होता.. त्यावर पण लिहा रे कुणीतरी. पण
|
Farend
| |
| Friday, March 14, 2008 - 6:07 am: |
| 
|
भागाबाई . अज्जुका तिकडे जनरल बीबीवर (अ. आणि अ. च्या) बघ तिला.
|
Mukund
| |
| Friday, March 14, 2008 - 8:03 am: |
| 
|
त्या फ़ंक्शनमधले अनुपम खेरचे माकडचाळे पाहून ( माणसाला काही पाचपोचच नाही. आपण मुलीच्या सासरी लग्नासंबंधीचे विधी पार पाडायला आलोय, अजून धाकटीलाही उजवायचीये, कश्शाचा म्हणून विचार नाही. :-P ) ती रीमा लागू ' देखो जी, तुम ऐसे बिहेव करोगे ना तो मै इससे शादी कर लूंगी.. अभी भी वेळ गई नही है.... ' अशी धमकी देईल असे वाटते. श्रद्धा... तुझ्यातल्या सेंस ऑफ़ ह्युमरला मानल पाहीजे.. जबरी.... इथे अमेरिकेत ९० च्या दशकात कॉमेडी सेंट्रल चॅनलवर मिस्टरी सायंस थिएटर ३००० म्हणुन एक कार्यक्रम असायचा.. त्यात एक माणुस त्याच्या दोन रोबॉट सवंगड्यांबरोबर असेच अचाट व अतर्क्य.. पण इंग्रजी चित्रपट बघायला जात असे. त्या कार्यक्रमात आपल्याला तसला अचाट व अतर्क्य इंग्रजी चित्रपट दाखवला जात असे... पण तो अचाट आणी अतर्क्य चित्रपट आपण टिव्हीवर बघत असताना.... आपल्याला या तिघांची डोकी पाठीमागुन दिसायची... म्हणजे या तिघांच्या पाठी आपण बसलो अहोत असे.... मग हे तिघे सबंध चित्रपट चालु असताना... त्या अचाट आणी अतर्क्य चित्रपटावर... एकदम सही कॉमेंट्स मारत बसतात.. व आपल्याला त्यांचे ते हसुन हसुन पोट दुखवणारे कॉमेंट्स.... चित्रपटाबरोबर ऐकायला यायचे.... हे इथे सांगायचे कारण हे की...... तु,उचापती व अमोल.... त्या तिघांपेक्षा नक्कीच भारी आहात....
|
Dakshina
| |
| Friday, March 14, 2008 - 9:14 am: |
| 
|
लग्नाच्या शेवटच्या सिन मध्ये, तो हार परत करायला माधुरीला फ़क्त कुत्रंच कसं काय सापडतं? बुवा? घरातल एखादं लहान मुल, एखादी खास मैत्रिण यावेळी कुठे गायब होते म्हणे? आणि ते कुत्रं त्याला केव्हढी अक्कल, आमचं कुत्रं इतकं महान(?) कार्यं पार पडेल का? आणि जरी समजा केलं असतं ना तरिही, आमच्या इथल्या मोहनिशच्या जागच्या, बिजवराने, स्वतःची मर्दानगी गाजवत, 'जो पहलेसे किसिकी हो चुकी है, उससे कैसी शादी'? असं म्हणत ते लग्नं मोडलं असतं. नाहीतर, तबडतोब मुलिच्या घरातल्यांना तिचा हा पराक्रम सांगितला असता... आणि वर म्हणला असता.. एक के साथ एक फ़्री चहिये? (म्हणज़े मोहनिश वर सल्लू....) 
|
Tonaga
| |
| Friday, March 14, 2008 - 2:36 pm: |
| 
|
आणि हम आपके है कौन माझा आवडता पिक्चर होता, आहे आणि राहील.. >>>>>>>>>>>> काय म्हणाव लोकांच्या टेस्ट ला ! >>>>>>>>>
|
Sayonara
| |
| Friday, March 14, 2008 - 3:17 pm: |
| 
|
सहीच लिहिलं आहेस श्र. मी एकदाच पाहिलीय ही लग्नाची कॅसेट. त्यामुळे एवढे डिटेल्स काही लक्षात नाहीत. पण सध्या झी वर 'ये मौसम का जादू है मितवा' ह्या गाण्याने धुमकुळ घातलाय त्यात दिसतोच माधुरीचा लाल भडक लेसी फ्रॉक. कसला हॉरीबल ड्रेसिंग सेन्स आहे तिचा.
|
श्र, तुला दोन मूवीस आहेत लिहायला HSSH नी मै प्रेम की दिवानी. हा तर एकदम अचाट आहे. बरे तर त्या मूवीचे नाव हम सात साथ है का हम सात सात है? का हम साथ साथ है? खरे तर मी ह्या मूवीसचे अजून नावच नीट एकले नाही पण फुकटात टीवी वर लागला नी हसून वाट लागली होती. बहीणीचा नवरा काय सासरीच रगडलेला असतो ने काय ने काय. करीनाचा जेव्हा Mai prem ki diwani release झाला तेव्हा तीने सुरज बडजात्याची काय तोंडभरून तारीफ़ केली की मी कीती नशीबवान आहे, सुरजच्या रंग रूपावर(?) जावू नका, तो जरी साधा दिसला तरी भारी romantic माणूस आहे, तो इतका हळवा आहे त्यामुळेच तो असे चित्रपट देवू शकतो. human emotions specially love हा त्याचा strong point वगैरे वगैरे.. एकून किटायला झाले.
|
Sonalisl
| |
| Friday, March 14, 2008 - 10:47 pm: |
| 
|
ईतके कलाकार भरलेत त्या चित्रपटात म्हणुन आम्ही आधी "हम सात आठ है" अन नंतर "हम साठ साठ है" असं म्हणायचो.
|
Prachee
| |
| Saturday, March 22, 2008 - 10:13 am: |
| 
|
राजश्रीचा फार पुर्वी 'नदिया के पार' नामक एक सिनेमा आला होता. सचिन (आपले महागुरु हो) आणि साधना सिंग असे कलाकार होते त्यात. 'हम आपके......' त्याचीच कॉपी आहे. (रीमेक म्हणायचं त्याला)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|