Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2008

Hitguj » My Experience » Swayampakache 'purushi' anubhav » Archive through March 13, 2008 « Previous Next »

Hkumar
Tuesday, March 11, 2008 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोहे करणे व डाळ तांदळाची खिचडी टाकणे हे प्रकार पुरूषांचे अगदी 'आधार' आहेत. साधारण ते बर्‍यापैकी जमतात व खाण्याची वेळ निभावून जाते.

Nandini2911
Tuesday, March 11, 2008 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोळ्या गोल करण्यापेक्षा मोठे आव्हान आहे ते कि प्रत्येक पोळी प्रत्येक ठिकाणी समान जाडीची पाहिजे
>>>>>
नाही जमत असं वाटलं की परत गोळा करून लाटायचे :-)
चपातीपेक्षा फ़ुलके करावेत, पटकन होतात आणि जास्त कष्ट पडत नाहीत.

आलू पराठ्याचा दांडगा अनुभव घेऊन मी पुरण पोळ्या करायला घेतल्या. पुरण सर्व तव्याला चिकटून.
:-(
रूममेटला समजेचना असं कसं झालं ते..



Sanghamitra
Tuesday, March 11, 2008 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> त. टी. : पुरुषांना पण समानता हवीय नाही दीली तर पुरुषी व्यथा



Yogita_dear
Tuesday, March 11, 2008 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणी दह्याची कढी अगदी उकळ येईपर्यंत गरम केलीय???आईने जेवण गरम करायला सांगितल होतं.जेवण म्हटल की अगदी सगळच गरम करायच असा समज.कढीचा टोप उचलला आणि ठेवला gas वर.थोड्यावेळाने येउन बघितल तर काय..सगळी कढी उकळ येउन फाटुन गेली...

Psg
Tuesday, March 11, 2008 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/644/102074.html?1139019893

खरंच, स्त्रीया काय आणि पुरुष काय.. स्वयंपाकातल्या फ़जित्या असतील तर कृपया इथे या वरच्या लिंकवर लिहा.. अगदी त्याच विषयाचे वेगळे बीबी नकोत :-)

मॉड्स, हरकत नसेल तर या सगळ्या पोस्ट तिथे हलवा ना..


Ds
Tuesday, March 11, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा चहा करायला ठेवला आणि खुप झोप येत असल्यामुळे जरा पडलो. ज़ेव्हा जाग आली तेव्हा घरभर धुर च धुर आणि भान्डे जळलेले...मग मनात एक च भीति कि आई काय म्हणेल..भान्डे उचलले आणि सरळ केराच्या बाद्लीत टाकुन दिले.

मि येथे नविन आहे, त्या मुळे चुका सुधारुन वाचाव्यात अशी विनन्ति.


Ds
Tuesday, March 11, 2008 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रयोग शाळेत असतानाचा आहे...

Hkumar
Wednesday, March 12, 2008 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांदा चिरणे हे जसे मस्त जमते त्याउलट टोमॅटो चिरणे हे मात्र कटकटीचे वाटते. सगळे कसे गिळगिळीत होऊन जाते. मला ते कधिही समाधानकारक वटलेले नाही.

Abhijeet25
Wednesday, March 12, 2008 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही जमत असं वाटलं की परत गोळा करून लाटायचे
चपातीपेक्षा फ़ुलके करावेत>>>>>>>>>>

मी अशा व्यवस्थित न झालेल्या चपत्या परत परत लाटत बसलो तर झालेच मग! रात्रिच्या जेवणाची तयारी दुपारपासूनच करावी लागेल.

असो हे फुलके काय प्रकार आहे? छोट्या आकाराच्या परिघाने कमी असणार्‍या चपात्या का? कशा करायच्या ते ही सांगा


Dakshina
Wednesday, March 12, 2008 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, आपळी नेहमीची पोळी ही आधी छोटा गोल लाटून, त्यावर तेल लावून, त्याची त्रिकोणी घडी घालून करतात.
फ़ुलका मात्र तसा नाही करत.
फ़ुलका करताना कणिकेचा छोटा गोळा घेऊन तो पोळीसारखा लाटत जातात सर्व बाजूनी एकसारखा.... पण तो नेहमीच्या पोळीपेक्षा छोट्या आकाराचा असतो. पुर्ण लाटून झाला की फ़क्त एक मिनिटासाठी तव्यावर (दोन्ही बजूंनी) भाजून, चिमट्याने डायरेक्ट गॅसच्या आचेवर भाजतात.फ़ुलक्याला तेल लावत नाहीत. हवे असल्यास तूप घेता येते. त्यामूळेच diat consious लोक, पोळीऐवजी फ़ुलके खातात.




Ajjuka
Wednesday, March 12, 2008 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलके म्हणजे लाटताना घडी न घातलेल्या पोळ्या. लाटायला सोपे आणि भाजताना आधी तव्यावर आणि मग डायरेक्ट चटका द्यायचा. चांगला झाला तर अक्षरशः पुरीसारखा टम्म फुगतो.
अभि दर वीकेंडला सराव केलास तर २ महिन्यात खाता येईल इतपत बरी घडीची पोळी पण जमेल.
सगळ्याच स्वैपाकात गोंधळ करू शकणार्‍या पुरूषांसाठी एक वि. सू.
१. जसे तुम्ही गोंधळ घालता तसे आमचे पण गोंधळ होतात स्वैपाकात त्यात काही प्रचंड चुकलं नाही. फक्त आम्ही शिकतो त्या सुरूवातीच्या काळात(लहान वयात, आईच्या राज्यात) ते होत असल्याने त्याचा बाउ करून टाळता येत नाही. करत रहावे लागते आणि मग हळूहळू जमूही लागते. तस्मात स्वैपाक ही सर्वतः सराव व कॉमनसेन्स ची गोष्ट आहे.

२. स्वैपाक करताना 'हे बायकांचे काम, हे कमी प्रतीचे काम नाइलाजाने मला करायला लागतेय!' असं काही किंवा 'हे बायकांचं काम आम्हा पुरूषांना कसं जमणार!' असं काही डोक्यात घेऊन कराल तर स्वैपाक कधीच चांगला जमणार नाही. स्वैपाक करणार्‍याचं प्रसन्न मन किंवा कंटाळा दोन्हीही स्वैपाकात उतरतं. तेव्हा जे करायला जाल ते करताना त्याची मजा घेत करा. नक्की चांगलं होईल.


Giriraj
Wednesday, March 12, 2008 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वैपाक करणार्‍याचं प्रसन्न मन किंवा कंटाळा दोन्हीही स्वैपाकात उतरतं>>अज्जुक,अगदी अगदी!
मी खूप लहानपणीच बरेच (बेसिक) पदर्थ करायला शिकलो!तेव्हा हौसेने केले म्हणून जमायलाही लागले!

एक सोप्पी ट्रिक म्हणजे गोड पदर्थ सहसा बिघडत नाहीत.. ते खाणार्‍याच्या आवडीप्रमाणे कुणाला कमी गोड तर कुणाला जास्त गोड लागतात! :-)


Tonaga
Wednesday, March 12, 2008 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

management च्या CPM & PERT च्या टेकनिकचे स्वयंपाक हे उत्कृष्ट उदाहरण आहे असे मानले जाते....

Manuswini
Wednesday, March 12, 2008 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अगदी अगदी,
ते 'मन' लावून आणि प्रेमाने(म्हणजेच आवडीने) मेनु केला ना कधीच बिघडत नाही.

जेवण हे 'मन' लावूनच करायचे, छान होते(स्वानुभव). आता ह्यावर (मन लावूनवर) कोणी कोटी करेल. :-)


Sonalisl
Wednesday, March 12, 2008 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका अगदी अगदी.
प्रसन्न मनाने केलेला स्वयंपाक घरातील सगळ्यांना प्रसन्न करतो.
अन कधी कधी शेजारच्यांनाही.... :-) आमच्या शेजारच्या काकु छान वास आला कि हमखास घरी यायच्या...."आज काय भाजी? बघु बर कशी लागते?" :-)
आता दुसरीकडे गेल्या रहायला, अजुनही वेगळा पदार्थ केला कि त्यांची आठवण येते.


Zakki
Wednesday, March 12, 2008 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसे तुम्ही गोंधळ घालता तसे आमचे पण गोंधळ होतात स्वैपाकात त्यात काही प्रचंड चुकलं नाही.

फक्त ते 'नवीन पाकक्रिया' या सदरात लिहीतो, 'घोटाळे' या सदरात नाही!
राग आल्यास, आ. बु. दो. स.!

Tonaga
Thursday, March 13, 2008 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राग आल्यास, आ. बु. दो. स.!

>>>हे आबुदोस काय आहे?

Kedar123
Thursday, March 13, 2008 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


राग आल्यास, आ. बु. दो. स.!

हे आबुदोस काय आहे?

आगळ

बु बुन्दी

दो दोडका

समानता सलगम

तरीही जर कळल नाही तर आपल्या बुद्धीचा दोष समजा.


Ajjuka
Thursday, March 13, 2008 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>फक्त ते 'नवीन पाकक्रिया' या सदरात लिहीतो, 'घोटाळे' या सदरात नाही!<<
हा हा! take hint from that! शिकलात काही बायकांकडून तर काय ४२ पिढ्या नरकात जाणार नाहीत!! :-)

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज काल 'दिव्यांना' फ़ार डिमांड आलंय्; नाही...?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators