Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 12, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through March 12, 2008 « Previous Next »

Zakki
Thursday, January 24, 2008 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल

आजकाल म्हंटल्यामुळे बरे वाटले. मी स्वत: अनेक वर्षांपूर्वी इकडे आलो, तेंव्हा माझा फोटो नागपूरच्या पेपरात छापला होता, अमेरिकेला जाणार म्हणून!

मी आपणहून सांगतो की माझे भारतात जमले नसते, तिथल्या सगळ्या हुषार लोकात आपल्याला कोण विचारतो, अमेरिका बरी, तिथे अनेऽक मूर्ख लोक आहेत, कुणालाहि पैसे कमावता येतात.

यावर एक खरी गोष्ट.

एका गुजराती मित्राला काही वर्षांपूर्वी भारतात गेलो असताना विचारले, काय रे, तुझी मुले कॉलेजात असतील, काय होणार आहेत?

तो म्हणाला 'मोठ्याचे ठीक चालू आहे, तो डॉक्टर होईल. पण धाकट्याचे लक्षण काही ठीक नाही, त्याला बहुतेक अमेरिकेत पाठवावे लागणार!'


Amruta
Thursday, January 24, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायच्या काय हो तुमचे मित्र झक्की :-)

Dakshina
Monday, February 11, 2008 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण धाकट्याचे लक्षण काही ठीक नाही,
त्याला बहुतेक अमेरिकेत पाठवावे लागणार!' >>>>>

झक्की... LOL


Mrinmayee
Monday, February 11, 2008 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, कुठल्या (मानवरुप धारी )गाढवानं तुला सांगीतलं अमेरिकेत यायला हुषारी लागते?

बोचणार्‍या किश्श्यात भर.. दुसर्‍याचं बोलणं मध्येच तोडून स्वत:च्या कहाण्यांची पाल्हाळं लावणं!

कुणी कुणाबद्दल चांगलं काही सांगीतलं की 'आपण स्वत: किंवा आपला बाब्या-बाबी पण कसे अगदी अस्सेच' असं सांगणारे लोक!

(एकुण काय शून्य श्रवणभक्ती पण संभाषणात पूर्ण वेळ आपणच बडबडणे!!)



Hi_psp
Monday, February 18, 2008 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत सौदीला ये. सर्वे स्वस्त आहे. आता सौदी पुर्वीसर्खे क्ड्क नाही राहीले. जुबेल तर खुप चाग्ले आहे.

Sonalisl
Thursday, February 28, 2008 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच वर्ष झाली या किस्स्याला आता....
एकदा दुपारी काॅलेजला निघाले होते. जीना उतरत असताना एका फ़्लॅट मधल्या आजींनी मला बघितल्या बरोबर हाक मारली. दार उघडं ठेऊन कोणीतरी भेटेल म्हणुन वाट बघत होत्या.
मी, "काय म्हणता आजी? एकट्याच आहात का? "
आजी, "हो. प्रिया(माझी मैत्रिण, त्यांची नात) काॅलेजला गेली अन वसुधा(काकू) बाहेर गेलीय. मला एकटीला कंटाळा आलाय. हा रिमोट घे अन मला टि.व्ही. कसा लावायचा, कसा बंद करायचा ते सांग."
मग मी त्यांना टि.व्ही. चालु-बंद कसा करायचा, आवाज कमी-जास्त करायला आणि वाहिन्या बदलायला शिकवलं.
मी,"अजुन काही?"
आजी,"नाही. एवढच. अगं, माझ्या हातात कोणी रिमोट देत नाही आणि त्यांचा कार्यक्रम बघुन झाला कि लगेच टिव्ही बंद करुन टकतात. शेजारच्या घराला कुलुप आहे. मघापासुन वाट बघत होते कोण दिसतय का ते."
मी,"बरं, आता जाऊ मी? अजुन काही लागलं तर सांगा."
आजी,"आणि हो...कोणाला सांगु नकोस हं. मी तुला ही विचारलं ते. प्रियाला पण नको."


Anaghavn
Friday, February 29, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कोणी काही कुणाबद्दल चांगलं बोलल की
"आपण किंवा आपला बाब्या / बाबी कसे अगदी अस्सेच" असं सांगणारे लोक //////
म्रुन्मयी अगदी अनुमोदन.



Dakshina
Friday, February 29, 2008 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनाली, तुमचा किस्सा वाचून वाईट वाटलं. घरातल्या थोरांना टि.व्हीच्या रिमोटला ही हात लावायची चोरी असावी का?

आता माझा अनुभव सांगते. मागच्या आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. तिला USA चा एक मुलगा नुकताच पाहून गेला होता आणि त्याने होकार वगैरे काही दिला नव्हता पण चॅटींगवर / फोनवर बोलून आपण पुढचं पाऊल उचलू असं म्हणाला होता. त्याप्रमाणे त्याने तिला मेल टाकून चॅटींगसाठी बोलवलं. ह्या मुलीला इंटरनेट म्हणजे काय? आणि ते कशाशी खातात हे माहीती नव्हतं. तिचा इमेल आयडी मी उघडला, भारत मॅट्रीमोनी च अकाऊंट पण मीच उघडलं होतं. आणि हाईट म्हणजे त्या दिवशी त्या मुलाचा तिला चॅट ला बोलवणी करणारा इमेल पण मीच पाहून तिला चॅट करायला जा असं सांगितलं. तिने मला तिच्याबरोबर येण्याची रिक्वेस्ट केली. काही लोक इतके मंद असतात.... कारण मला चॅटींग माहीत आहे, आणि माझा टायपिंगचा स्पीड पण बरा आहे. माझ्यामते चॅट करताना तुम्ही फ़ार क्विक थिंकिंग करून पटापट उत्तरं दिली पाहीजेत. चॅट करायला मी बसलेले, ही बजूला बसून मला हे लिही, ते लिही असं सांगत होती. मला वैताग आला, कारण ती क्षणोक्षणी त्या मुलासमोर स्वतःचं इंप्रेशन खराब करत होती. मी एक दोनदा विचार केला की जाऊदे आपल्याला काय करायचं आहे? पण तरिही मी थोडं इनिशिएटीव्ह घेऊन स्वतः चॅट केलं. माझा हेतू फ़क्त हाच होता की तो मुलगा नसत्या कारणाने नकार देऊन बसला तर प्रॉब्लेम होईल. असं करत, एक तासात मोजून १० ते १२ ओळींचं संभाषण झालं. ते ही पोटेंशिअल नाहीच. (हे सगळं माझ्यामते.)
अखेर आम्ही ते प्रकरण संपवून आपापल्या घरी गेलो. आणि तिच्या बहीणीचा मला फोन आला. आणि त्यात प्रचंड नाराजीचा सूर होता. जणू काही मी काहीतरी मोठा गुन्हा केल्याप्रमाणे. ती डायरेक्टली मला काही बोलू शकत नव्हती. कारण मी तशी सदृश स्वरूपात तिला मदतच केली होती. पण जो काही डायलॉग झाला तो काही समाधानकारक नव्हता... माझ्या मनाला ती गोष्टं फ़ार लागली. एक्झॅक्टली झालं काय तेच मला कळलं नाही.
पण त्या दिवशी मी तिला पोलाईटली सांगून टाकलं की यापुढी मला तुझे इमेल्स वगैरे चेक करणं जमणार नाही, त्याहीपेक्षा आवडणार नाही.


Sas
Friday, February 29, 2008 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजित,

अमेरिकेत यायला हुषारी लागते >>>>>>>>>>>>>>> हे मला तरी अनुभवात आल नाही,
निदान नोकरिच्या बाबतित... नोकरी साठी इथे येण्यास तुमच्या कडे 'विसा', असल की झाल. :-)

इथे मला, ईंग्रजी वाचता लिहता न येणारे पंजाबी, तेलगु, गुजराथी etc भेटले. Baby Sitter, Gas Station, Manufacturing Companies, Beauty Parlor... मध्ये काम करुन उपजीवीका करुन इथे अनेक वर्षांपासुन आहेत हे लोक. :-)

BA, Bcom..etc झालेल असेल आणी Visa सोबत Fake USA Work Exp. of 5 yrs हा जुगाड झाला की IT Job मिळतो, (इथे SQA Tester च job करणार्‍या कितीतरी लोकांना धड 'इंग्रजी' बोलता येत नाही...Pls. Note: हा माझा अनुभव आहे...कुणाला दुखवीण्याचा हेतु अजिबात नाही)

इथला Work Visa नसलेल्या आणी शिक्षण ही नसलेल्या व्यक्ती ही इथे 'नोकर्‍या' करातात आणी महिना $1000-2000 कमवितात. (धड ईंग्रजी वाचता, लिहता, बोलता येत नाही तरी)

हुशारी USA त 'शिकायला' यायच असेल तर लागत असावी, for passing GRE etc exams :-)

********************************

anyway for your trouble:

मध, खजुर, Apple वै. ज्या पदार्थांना फ्रिज ची गरज नाही ते तुम्ही तुमच्या Bage त Room मध्ये ठेवु शकता in lock, (मी खाण्याचे पदार्थ ठेवण्यास एक वेगळी Bag केली होती, lock असलेली, नोकरीसाठी इतर मुलींबरोबर रहातांना :-))

बाकी दुध वै. सर्वांसमोर उष्ट करुन ठेवायच किंवा त्यात एखाद्या बाटलितुन (पाण्याचे) काही Drop टाकायचे व औषध टाकलय सांगायच (हे मी कधी केलेल नाही, वाटायच कराव अस)



Uday123
Friday, February 29, 2008 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधाच्या बाटली मधे (औषध म्हणुन) पाणी छानच कल्पना आहे. होमीओपाथीक औषध आहे म्हणावं.


Zakki
Saturday, March 01, 2008 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत यायला हुषारी लागते

माझ्या मते, भारतात रहायलाच हुषारी जास्त लागते. भारतात जमत नसेल तर अमेरिकेत यावे. फक्त पैसे नि व्हिसा पाहिजे.

मग कुणिही इथे श्रीमंत होऊ शकतात. रहाणी मान मात्र काही बाबतीत भारतापेक्षा वाईट. स्वत:ची कामे स्वत:ला करायला लागणे, स्वत:चे घर स्वत:च साफ करायचे इ. तसे करायचे नसेल तरी चालते, फक्त जास्त पैसे मिळवले की तेहि जमते. मग तर स्वत:ची गाडी चालवायला पण चालक ठेवता येतो.


Arch
Sunday, March 02, 2008 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत:ची कामे स्वत:ला करायला लागणे>>
झक्की, तुम्ही हे म्हणताय?

Dakshina
Monday, March 03, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास, ते उष्टं दूधही कुणितरी वापरलं तर?(ए.भा.प्र.)


Zakki
Monday, March 03, 2008 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मी आपले सर्वसाधारणपणे म्हणत होतो.

मला दोन मोठे व दोन लहान भाऊ आहेत. लहानपणापासून घरातल्या कामांसाठी मी एकतर लहान किंवा मोठा असे. त्यामुळे मोठे भाऊ नि धाकटे भाऊच सर्व कामे करत! मग मी कुठून बरे शिकणार कामे करायला?

नि मी मागे लिहील्याप्रमाणे, माझे लग्न केंव्हा झाले ते आठवत नाही. आठवते तेंव्हा पासून सौ. घरात आहे. तिला मात्र तिच्या आईने चांगले शिकवले आहे कामे करायला.

तर मी हा असा परिस्थितीमुळे दुर्दैवी आहे. कामच करता येत नाही, ना घरी ना ऑफिसमधे!


Sas
Monday, March 03, 2008 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dakshina,
>>>>उष्टं दूधही कुणितरी वापरलं तर :-) :-)खरच ना अश्या लोकांचा काही भरवसा नाही :-)

तसा आणखि एक उपाय मला सुचलाय:
देशात मी ह्या विद्यालयात (College) मध्ये शिकवायचे तिथे Hostel वर रहाणारी मुल, दुकाणात जावुन दुधाची पिशवी विकत घ्यायची व तिथेच ती फोडुन दुध गटकावुन टाकायची (दुध भांड्यात ओतण्याचा, गरम करण्याचा, नासण्याचा आणी फुकट्यांनी साफ करण्याचा no question)...जमल्यास अस करायला हरकत नाही :-)

झक्की,
मी तुमच्याशी सहमत, हुशारी भारतात रहाण्यास व job करण्यास लागते, अमेरिकेसाठी नाही. तो गुजराथी माणुस हुशार आहे, ज्या मुलाच खर नाही त्याला अमेरिकेला धाडतोय :-)

Sush
Wednesday, March 12, 2008 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजचिच पेपर मधिल एक बातमी, १२ वर्षाच्या एका मुलाला pmt बस ने उडवले, संतप्त जमावाने ६३ बसेस च्या काचा फोडल्या.
नक्किच ही घटना वाइट आहे, पण त्यामुळे ६३ बसेस चे नुकसान हे योग्य नाहि. त्यामुळे काय pmt driver चे driving सुधारणार आहे का?
असो, यात मला बोचणारि गोष्ट म्हणजे, दगड्फेक.
नेहेमिप्रमाणे मी office ला जाण्यासठि मनपा च्या बस मधे बसले, दक्शिण्मुखिला सगळ्याना बसमधुन उतरवले कारण पुढे दगड्फेक होत होति. आम्हि चालत चालत मनपाकडे निघालो. मग असे कळाले कि अपघात झाला आहे चिडुन लोकानि दगड फे केलि आहे. जाताना पाहिले खरच १५-२० बस च्या काचा फोडलेल्या. पोलिस पोचले होते. त्यामुळे वाटले परिस्तिथि निवळलि आहे. पण कसचे काय? मनपाला पोहोचल्यावर अचानक गोन्धळ ऐकु आला. सगळे लोक पळत होते काय करावे सुचेचना, झट्कन रस्त्यावरुन बाजुला झाले,आणि पळत पळत एका टपरिचा आसरा घेतला. खुप घाबरले होते. इतरहि काहि लोकानि आसरा घेतला आणि काहि लोक पळत पळत पुढे गेले. तेव्हड्यात १०-१२ जण आले आणि बसेस च्या काचा फोडु लागले. आणि आश्चर्याचि गोष्ट म्हणजे हा जमाव बिल्कुल सन्तप्त वाटत नव्हता, म्हणजे उगिच मिळाला चान्स मग फोडा काचा. घ्या मजा करुन हसत हसत काचा फोडत होते एक्मेकाना टाळ्या देत होते. मनात आलं काय हे, कोण आहेत हे लोक? काम धन्दा नसतो, मग वाटच पहात असतात, कधि एकदा अस काहितरि घड्तय आणि मि माझि मर्दुमकि गाजव्तोय काचा फोडुन. वाइट वाटले, म्हणजे अपघाताचे याना सुख दुख सुधा नव्हते. खरतर ज्या पहिल्या ४-५ बस फोडल्या त्या सन्तप्त जमावाने फोडल्या उरलेल्या अशा जमावाने फोडल्या ज्याना फ्क्त एक असुरि आनन्द मिळवायचा होता.


Dakshina
Wednesday, March 12, 2008 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं आहे सुश, गेलेल्याचा जीव अशा गोष्टी करून परत येत नाही इतपत जाणिव झाली तरिही आपल्या देशाचे बरेच प्रश्नं सुटतील. काही काही वेळेला तर राजकारणियच अशा प्रकारच्या जमावाला प्रवृत्त करतात फ़ोडाफ़ोडीसाठी आणि दगडफ़ेकीसाठी. ताशी पैसे देतात असं ही ऐकलंय.

Dakshina
Wednesday, March 12, 2008 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास तुम्ही कोणता फ़ॉन्ट वापरता? मला जरा डिस्क्रिप्शन सांगा ना.

Gajanandesai
Wednesday, March 12, 2008 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ओळखीतली एक व्यक्ती संगणक आणि त्याचे सुटे भाग विकणार्‍या एका मोठ्या दुकानात गिर्‍हाईकाचा माल पोहचवण्याचं काम करते. एकदा दुकान मालकाचा खूप महागडा मोबाईल हरवला. नंतर दोन तीन दिवसांनी हा त्यांच्या गोदामात गेल्यावर याला तो सापडला आणि त्याने तो मालकाला परत केला. ही घटना घडल्यावर मालकीणबाई आणि त्यांचा मुलगा म्हणाले की, आता बिचार्‍याने एवढ्या प्रामाणिकपणानं परत केला आहे, तर त्याला काही रोख रक्कम किंवा दुसरे काही बक्षीस देऊ या. यावर तो मालक म्हणाला, की काही गरज नाही. अशानेच हे लोक माजुर्डे होतात. मालकीणबाई म्हणाली की त्याने मोबाईल परत केला नसता तर पंचवीस-तीस हजार घालून तुम्ही दुसरा घेतलाच असता की. मग याला काही बक्षीस दिले तर काय होते? यावर मालक उखडला आणि बरेच काही अद्वातद्वा बोलला. आणि हे सगळे त्या बिचार्‍या मोबाईल परत करणार्‍याच्या समोरच चालले होते.



Upas
Wednesday, March 12, 2008 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो सुश, अतिशय वेदनादायी स्थिती दर्शवलेय तुम्ही.. अशावेळी काय कराव?
१. पटकन मोबाईल वर क्लीप काढून घेता येण शक्य होतं का?
२. मिडीयाला ऍप्रॉच होणं शक्य आहे का?
अर्थात ह्यात रीस्क आहेच पण जागरुक नागरीक म्हणून आपल्याला काही करता येणं शक्यच नाही का.. पोलिस किती आणि कुठे पुरे पडणार.. विशेषतः वाढणारे लोंढे पहाता.. आपणच जास्त जागरुक रहाणं आवश्यक झालय आता.. अशा लोकांवर peer pressure आणलं तरच काहीतरी फरक पडेल..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators