Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 10, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Manatil bhavana » Archive through March 10, 2008 « Previous Next »

Nandini2911
Friday, March 07, 2008 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच्या आता ताबडतोब कुठेतरी मस्त फ़िरायला जायचं आहे.
बॉस ऑफ़िसमधे नाहीये. कुणीच गप्पापण मारायला नाहीये. वैताग येऊन गेला पण. :-)

योगेश, सेम माझ्या मनातली भावना. मी एकटं असतान सतत असंच वाटायचं,
आता आई असल्यामुळे मला बिघडवाअय्ची जबाबदारी तिची आहे. हॉस्टेलला गेल्यावर परत थोडे दिवस त्रास होणार. :-)


Dakshina
Friday, March 07, 2008 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मला पण सेम टू सेम असंच वाटतंय... पण माझा बॉस आहे ऑफ़िसात
आणि आमचा कॉल सुरू आहे. हा कॉल मेला दर शुक्रवारी असतो.
५.३० ला सुरू होतो आणि ७ ला संपतो... घरी पोहोचायला ९ होतात...


Zakki
Friday, March 07, 2008 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो दक्षिणा, असे म्हणू नये. मायबोलीवर सगळे मित्र मैत्रिणी असतात. त्यांनी मोठ्या मनाने, मदत करण्याच्या उद्देशाने लिहीले हो.

गिरीराज, धन्यवाद. बघतो आता.

पण मी ऐकले की भारतात असे कर्ज मिळायला बरीच वर्षे लागतात. किंवा कुणाला तरी पैसे चारले, नि जबरदस्त वशिला लावला तर जमते. असल्या गोष्टी चांगल्या का वाईट हे ठरवणारा तो हटकेश्वरच. मला मात्र तसे जमणार नाही हे कळल्यावर मी लगेच इकडेच निघून आलो.


Abhijeet25
Sunday, March 09, 2008 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका अनुमोदन,
अरे योग, नंदिनी, तुम्ही फार सुखी आहत रे. जास्त कंटाळा आला तर बाहेर जावुन मस्त पैकी मिसळ पाव वडा पाव काहि तरी हाणू शकता. आमच्या नशिबी तर तो खबुस आणि ती सॅन्डविचेस यांच्या शिवाय काहि नाही.

घरच्यांशी फोनवर बोलु शकता.

ईथे महिना महिना मराठी सुध्धा कानावर पडत नाहि. घरच्यांशी बोलताना सुध्धा बिलाच्या आकड्या कडे नजर ठेवुन बोलावे लागते. मनमोकळ्या गप्पा सुध्धा नशिबी नाहित.

सहा सहा महिने कधि कधि वर्षभर घरच्यांना भेटायला मिळत नाहि. कुठे कुठे काढलेले फोटो बघुन मनाची समजुत काढावी लागते.

वैताग वैताग आला आहे सगळ्याचा. कधि एकदा घरी जावुन आईच्या हातच्य गरम गरम चपात्या खातोय असे झालेय. जगात सगळ्या गोष्टी मिळतील खायला एक सो एक पण आईच्या हातच्या चपात्या आणि आज्जीच्या हातच्या मस्त भाकरी कुठेच मिळत नाहित. ( शी फारच सेंटी झालोय यार मी ईकडे येवुन)
आईला हे सगळं सांगायला गेलो तर म्हणली लग्न करुन टाक.
योगेश तुला असे सल्ले मिळत असतीलच कदाचित!


Mrinmayee
Sunday, March 09, 2008 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणली लग्न करुन टाक... म्हणजे जोडीनं भाकरी आणि फुलक्यांच्या आठवणी काढता येतील! (समानतेचं युग आहे बा अभिजीता! :-) )

Nandini2911
Monday, March 10, 2008 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईच्या हातच्या चपात्या आणि आज्जीच्या हातच्या मस्त भाकरी कुठेच मिळत नाहित
>>>
एकदम बरोबर... त्यातही गरम गरम वरण, तूप आणि तव्यावरची ताटात आलेली चपाती.. अहाहा.

Abhijeet25
Monday, March 10, 2008 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समानतेचे युग असेल कुठेतरी तुमच्या पुण्या मुंबई मधे आमच्या गावाला अजुन जुनेच दिवस आहेत. (हास्यमुद्रा)

मागच्या वेळेला मुलगी बघायला गेलो होतो किती छान स्वयंपाक केला होत मुलीने. छान भाकरी आणि सुकं चिकन.
घरच्यांनी माझ्याकडुन होकार असुन त्यांना नकार कळविला. काय तर म्हणे पत्रिकेत काहितरी जमत नाही का नाडि जमत नाही. आता जी मुलगी इतका चांगला स्वयंपाक करते तिच्या सोबत पत्रिका जमली नसती तरी मी आनंदाने मिठ भाकर खावुन दिवस काढले असते कि. माझ्या घरच्या ना काहि म्हणजे काहि कळत नाही.

आमच्या वहिनी सुध्धा काय सुंदर स्वयंपाक करतात. अगदि लग्नाच्या आधी शिकल्या होत्या म्हणे आणि वर एम.बी. ए आहेत तरी. कसे जमते यांना शिक्षण आणि स्वयंपाक दोन्ही एकत्र देव जाणे

मनातील भावनांचा बिबि आहे ना मग एक मनातील भावना लिहुनच टाकतो.

खरेच अतिशय प्रबळ भावना आहे कि गोरी गोमटी नसली, दिसायला सुंदर नसली तरी चालेल पण छान स्वयंपाक करणारी बायको मिळावी.


Mrinmayee
Monday, March 10, 2008 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, पुण्या-म्हमईची नाय रे भाव मी! (नागपुर नावाच्या भल्यामोठ्ठ्या खेड्यातली आहे! :-) )
मुलीला (किंवा मुलाला) उत्तम स्वयंपाक करता येतो म्हणजे छत्तीसातले पस्तीस गुण तर इथेच जुळले! :-)
तुला उत्तम स्वयंपाक करणारी बायको मिळो! (रोज गरम भाकर्‍या, मटण चिकनचे रस्से, भरली वांगी, मसालेभात वगैरे खायला मिळो ही सदिच्छा!) :-)


Tonaga
Monday, March 10, 2008 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम बरोबर... त्यातही गरम गरम वरण, तूप आणि तव्यावरची ताटात आलेली चपाती.. अहाहा. >>>>>>
नन्दिनी, मेरे अन्दरके जानवरको मत जगाओ sssssssssssss !


D_ani
Monday, March 10, 2008 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आता सायकल वरुन मैत्रिणी बरोबर उन्डारावेसे वाटते आहे, कॉलेज मधे असताना जात होतो तसे. पण बाहेर दोनतीन फूट बर्फ़ जमा आहे, आणि मैत्रीण पण भारतात गेली आहे.

Maanus
Monday, March 10, 2008 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय दुबई मधे बर्फ पडतोय?????? बापरे म्हणजे ते ग्लोबल वार्मीग वैगेरे म्हणतात ते खरे दिसतेय की काय....


का तुम्ही OH मधे रहाता?
btw by any chance, सौरभ दाणी ह्याला ओळखता का?


D_ani
Monday, March 10, 2008 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, अरे मी आता टोरोन्टो मधे आहे. :-)

D_ani
Monday, March 10, 2008 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ओळखत मी सौरभ दाणी याना.

Abhijeet25
Monday, March 10, 2008 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी छान स्वयंपाक करणारी बायको मिळावी म्हणुन कुठल्या देवाची पुजा आणि कुठे नवस करावा बरे?

म्रुन्मयी, तुमच्या शुभेच्छांबद्दल मनापासुन धन्यवाद अशा शुभेच्छांमुळे जर अशि सुगरन पत्नी मिळणार असेल तर सगळ्यांनी प्रार्थना करा यार.

मला वांगी आवडत नाहित


Manuswini
Monday, March 10, 2008 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभीजीत २५,
अशी बायको मिळण्याची प्रार्थना करण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतच छान चवी चवीचे जेवण शिकून वेळ घालवला तर काय मत आहे?
( ref: समानता बीबी) :-)

btw , मटणाचे जेवण जेवून नकार :-)
दिवे घ्या.


Tanyabedekar
Monday, March 10, 2008 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे का इथे अशी भाकरी, वांग्याची भाजी, सुकी कोंबडी अश्या चविष्ट पदार्थांची वर्णने चालु आहे. किती जळवाल. गेल्या ३ महिन्यात भात सोडुन काहिही खाल्ले नाहिये. आई आता फोनवरुन बोलते की 'घरी असताना शिकला नाहीस स्वयंपाक करायला, आता भोग नशिबाची फळं.' इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे जवळच्या गावात पण त्याला मसालेदार कर, तिखट कर असे सांगितले तरी जमत नाही छान करायला.

माझ्या मनात आत्ता मस्त भाकरी, लोणी, घरच्या बागेतल्या ताज्या ताज्या वांग्याची (भरली) भाजी, ताक, लसणाची चटणी.. आहाहा, आहाहा..

ता.क.: भात टाकतो आणि त्यात मटार टाकुन फोडणी देतो त्याला. मग स्वतःच "बेडेकर आप महान हो" असे म्हणत तो भात पुलाव समजुन खातो. नशिबाचे भोग :-)


Sonalisl
Monday, March 10, 2008 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस,
तो सौरभ दाणी? डाॅक्टर का? पुण्याचा.... बी. जे. मेडिकल ला होता तो?


Abhijeet25
Monday, March 10, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे यार कामावरुन मरुन मरुन घरी आल्यावर येवढे सगळे जेवन स्वता: बनविने कुठे आणि बायकोने अतिशय प्रेमाने बनविलेले जेवन तिला समोर बसवुन नजरेने पसंतीची पावती देत बोटे चाटुन जेवन मटकाविने यातला शृंगार, यात काही फरक आहे कि नाहि?

आणि हो जेवन मटनाचे नव्हते कोंबडी होती हो......

नकार मला द्यायचा नव्हता पण माता पित्याच्या आज्ञेसमोर मी पामर काय बोलणार.



Maanus
Monday, March 10, 2008 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो तोच, आम्ही एका बॅचचेच (शाळेत).

तु देखील अभिनवची का?


Bsk
Monday, March 10, 2008 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय माणूस, तु पण अभिनवचा का? मराठी मिडीयम? सौरभ दाणी बहुधा आम्हाला २ वर्ष सिनीयर असावा.. कधीतरी नाव ऐकले होते त्याचे. मी ९९ पास आऊट.
* विषयांतराबद्दल क्षमस्व! छान चर्चा चालू आहे! :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators