|
sorry to interupt in your discussion पण सासरा काही day in day out जावयाशी interact नसतो ना करत चुलीपासून.... धुणीघरात सकाळ नाही झाली तर... मग कशाला कधीतरी येण्यार्या 'पावण्याशी' कोण वाद घालेल(हे इथे सासरा मुलीला भेटायला गेल्यावर जावयाचे विचार). जावई तोंड सूजवून बसेल नाहीतर नुसते वर वर गोड बोलेल की झाले.(कृपया सर्वच जावई असे नसतात नाहीतर नवीन वाद सुरु होइल लगेच) अर्थात जावई VS सासरा comparision बसत नाही सासू नी सून मध्ये. हा आता कोणी 'घरजावई' असेल तर बात वेगळी. आणि घरजावयात नी सासर्यात नक्कीच असे prob येतातच येतात हो... अगदी माझ्या मैत्रीणीचे(एकुलती एक मुलगी) वडील नी नवर्यात सासू सून सारखे वाद असत. फरक इतकाच की ते भाजी भात अश्या टाईपचे नसून नी भांडी कप फोड प्रकार नसून जरा अहंकार, तुमची achievements Vs Mine असे असत. शेवटी सासू काय सून काय नी कोण काय मुळाशी अहंकार नी सत्तेचाच(आणि आतल्या मुळाशी insecurity ) प्रश्ण असतो असे व्हायला. दुसरे काय नाय बा...
|
Zakki
| |
| Sunday, March 02, 2008 - 4:12 pm: |
|
|
घरात बायकोकडचे लोक जास्त दिवस राहिल्यावर, माझ्या माहितीत तीन घरांमधे, एक सख्खा भाऊ, एक मावसभाऊ, नि एक जवळचा मित्र यांचे घटस्फोट झाले आहेत. तत्पूर्वी अनेक वर्षे त्यांचा संसार अत्यंत आनंदात चालू होता. मित्रामधे अवगुण होतेच. पण तरी त्याचे लग्न टिकले होते. दोन छान मुले होती. सगळे आनंदात होते. पण बायकोचे आई, वडिल आल्यावर एकाएकी घटस्फोट घेण्यापर्यांत मजल गेली.
|
Gobu
| |
| Sunday, March 02, 2008 - 6:12 pm: |
|
|
मनुस्विनी, छान लिहीले आहेस.
|
Giriraj
| |
| Monday, March 03, 2008 - 4:21 am: |
|
|
मी उपस्थित केलेला मुद्दा हा स्त्रियांना 'कश्या दुय्यम आहेत' वगैरे दाखवण्याचा किंवा हेटाळणीच्या स्वरातला नाहीये. समानतेच्या बाबतीत आधी स्त्रियांनी स्वतला आणि पर्यायाने दुसर्या स्त्रीला कमी लेखू नये. स्त्रियांना आधी स्वतशीच लाढायचे आहे हा पुरुषांच्या व्यथ वगैरे BB नहिये.. यात स्त्रियांना कमी लेखण्याचा मुद्दही नाहिय्ते किंवा पुरुष कसे adjustable वगैरे आहेत हे पण सांगण्याचा सूर नाहिये माझा! म्हणून आधी लिहिलेले पुन्हा एकदा वर ठळकपणे दिलेय.. मुद्द समजून घ्या आणि उगीच इकडे तिकडे BB भरकटू नये असे वाटते. धन्यवाद!
|
http://www.hindustantimes.com/StoryPage/StoryPage.aspx?id=87c059ba-08f6-4a06-8b31-99d7ca5ccd51 http://www.newspostindia.com/report-8434 http://www.religionnewsblog.com/9237/woman-killed-on-suspicion-of-being-witch http://www.indiaenews.com/india/20060912/21960.htm http://www.mapsofindia.com/census2001/sexratio/sexratio-Maharashtra.htm
|
Ashbaby
| |
| Monday, March 03, 2008 - 5:52 am: |
|
|
बरेसचे विषयांतर पण सासूसुने बद्दल वाचल्यावर माझ्या एका मित्राची आठवण झाली, आणि मग अगदीच राहावत नाही म्हणून त्याचा किस्सा देतेय. ह्या मित्राचे वडिल अकालीच गेल्यावर त्याला आईने वाढविले. आई शाळेत मुख्याध्यापिका होती. अतिशय टापटिप, वक्तशीर आणि कामसू अशी होती. मित्राचे लग्न झाल्यावर काही दिवसांनी मी त्याला सासूसुनेचे कसे चालले म्हणून विचारले. तो म्हणाला, मला "माझे घर, माझा संसार" सारखे प्रॉब्लेम्स घरी नकोयत, म्हणून आधीच मी आईला सांगितलेय की माझी बायको नव्या पिढीतील आहे, कामाची सवय नाही आणि तुझ्याइतकी व तुझ्यासारखी कामे तिला जमणार नाहीत. तेव्हा उगाच तिने अमुक तमुक केले नाही म्हणून रागावत बसु नकोस. त्याचवेळी बायकोलाही सांगीतले की, आईने आयुष्यभर कामच केले आहे, आणि ती सवय जाणार नाही. पण ती काम करत असताना तू बसुन राहू नकोस. तुला जमेल तितके, जमेल तसे करत जा. दोन्ही बायका घरीच असुनही घरात ब-यापैकी शांतता असायची.
|
male female ratio map २००१ सालचा आहे.
|
situation might be worse now?
|
Uday123
| |
| Monday, March 03, 2008 - 10:55 pm: |
|
|
मुलगी/ मुलगा यांचे घटणारे प्रमाण हे नजीकच्या भविष्य काळातील सामाजीक अव्हानच आहे. देशातील सरासरी ९४५ (१९९१) वरून ९२७ (२००१) वर खाली आलेली आहे. काही राज्यात तर ८०० (नंदिनीने दिलेल्या लिंक मधे) अपवाद फ़क्त केरळ आहे. दुर्देवाने हा ढासळणारा समतोल मानव निर्मीत आहे. माझ्या असेही वाचनात आले आहे की मुलगी होणार असेल तर ब्रिटन (बहुधा पंजाबी?) मधून काही लोकं खास भारत वारी करतात. हे प्रमाण कमीच असावे, पण असाही विचार लोकं करु शकतात? महाराष्ट्रात देखील दवाखन्याच्या बाहेर कायदेशीर (गर्भ जल परीक्षा विरोधी) नोटीस लावलेली असते, पण अंबलबजावणी म्हणावी तशी होताना दिसत नाही (हा माझा २००३ चा अनुभव आहे). कायद्यात पळवाटा आहेतच, आणी (काही!) डॉक्टर देखील प्रमाण घटवण्यास हातभार लावतात. सर्वप्रथम स्त्रीनेच आपल्या अपत्या बद्दल खंबीर असायला हवे, आणी तिला घरातील पुरुषाने पुर्ण पाठिंबा द्यायला हवा. मग बाकीचे सोबत येतातच, नाही आले तर जास्त कळजी करु नये. या सन्दर्भात सरकारने एक चांगलं पाऊल घेतलं आहे. http://www.infochangeindia.org/ChildrenItop.jsp?section_idv=4
|
सर्वप्रथम स्त्रीनेच आपल्या अपत्या बद्दल खंबीर असायला हवे, आणी तिला घरातील पुरुषाने पुर्ण पाठिंबा द्यायला हवा <<<<खंबीर काय डोंबल ! दुर्दैवाने किती तरी बायकांनाच मुलगाच हवा असतो ! अडाणी पणाचा कळस म्हणाजे काही बायका मुलगा होण्या साठी भोंदू डोक्टरां कडून औषधं वगैरे ही घेतात . अकोल्या मधे तर आस पास च्या अनेक गावां मधून मुलगा होण्या साठी भोंदू औषध घ्यायला अनेक अडाणी बाया येतात ! भारतात इतर ठिकाणीही असले लोक असणार च ! Illegal गर्भजल परीक्षे साठीही अकोल्याला बरेच लोक येतात असं ऐकलं होतं . मूर्ख पणाचा कळस आहे .. या बाबतीत भारत कधीही सुधारणार नाही !
|
Anaghavn
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:02 am: |
|
|
दीप, चिडचिड सहाजिकच आहे, पण chear up . भारत सुधारणार आहे, नक्कीच....खात्रीने. हे लोक आडाणी आहेत हे खरं त्यामुळेच त्यांन्ना जरा वेळ द्यावा लागेल. परवाच बातमी वाचली, राजस्थानात आता लग्न करताना "आठवा फेरा" घेतात--आठवी शपथ--"कुठली संतान असली तरी त्याची हत्या करणार नाही. मुलगा आणि मुलगी असा भेद करणार नाही." आणि या नवीन पायंड्याची तरुणांकडुन तरी प्रशंसा होत आहे, तरुण त्यात सामिल होत आहेत.परिस्थिती बदलत आहे. बदलणार आहे. अनघा
|
Arc
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:17 am: |
|
|
कोकणात गेले होते तेव्हाचा किस्सा.. मासे विकणार्या कोळीणीशी गप्पा मारताना तिला विचारले की किती मुले, तर ५,मला वाटले की बिचारी अडाणी असेल,त्यामुळे कुतुम्ब नियोजन म्हणजे काय हे माहीत नसेल, पण तसे काही नव्हते मला अभिमानाने आणि ठसक्यात म्हणाली ४ मुलीच्या पाठीवर ५वा मुलगा ज़ाला, मग केले कि operation . कदाचित मुली लग्नानतर आइवडिलाना आर्थिक मदत करत नाहीत म्हणुन असावे असे. अर्थात सगळ्याच मुली अशा नसतात.
|
Ashbaby
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:19 am: |
|
|
सर्वप्रथम स्त्रीनेच आपल्या अपत्या बद्दल खंबीर असायला हवे, आणी तिला घरातील पुरुषाने पुर्ण पाठिंबा द्यायला हवा मला वाटते हे जास्त बरोबर आहे.. बायकांनाच मुलगाच पाहिजे असतो हे खरेच आहे. पण त्याचे कारण मुलगे असणे हे आपल्या समाजात प्रतिष्ठेचे समजले जाते, अगदी आजही. (मग त्यासाठी कुठल्याही थराला माणसे जातात. अगदी भोंदूबाबापर्यंत.. आणि शिकलेलेही त्या गर्दीत असतात) दोन अपत्यांची आई असलेल्या बाईला तीला दोन्ही मुलगेच आहेत हे सांगायला अगदी धन्य वाटते, अभिमानास्पद गोष्ट वाटते, आणि ऐकणारा- री ही अगदी कौतुकाने मान हलवतो- ते. तेच दोन्ही मुली आहेत हे सांगताना जरा ओशाळल्यासारखे वाटते, ऐकणारा- री त्याच्या- तिच्या कुवतीप्रमाणे 'एकतरी मुलगा पाहिजे होता' किंवा 'आजकाल मुली आणि मुलगे दोन्ही सारखेच आहेत हो' असे उद्गार काढुन सांत्वन करतो- ते. (दोन अपत्यांचा बाप असलेल्या पुरुषालाही असे अनुभव येत असतील कदाचित, मला कल्पना नाही, पण एकच अपत्य आणि तेही मुलगीच असलेल्या मलासुद्धा असले अनुभव गेल्या बारा वर्षात बरेच आले. काही माणसे सरळ बोलुन दाखवतात, काहींचा चेहरा बोलतो. अर्थात मला ओशाळवाणे वगैरे काही वाटत नाही. ज्याना असे वाटते ते आपल्या मुलीचा अपमान करताहेत असे मला वाटते.) शिक्षणाचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही. शिक्षीत आणि सुशिक्षीत ह्यात खुप फ़रक आहे. आर्क- कोळि समाजात तर मुलीच जास्त कामाला येतात. मुलाच्या आग्रहामागे, आर्थीक कारणही आहे पण सामाजिक कारण प्रथम आहे, इतर कारणे दुय्यम, फ़क्त समर्थनार्थ वापरली जातात. आर्थिक मदत करणा-या मुलींचे आइ-बाबाही 'मुलगा नाही, नाइलाजाने मुलीचा आधार घ्यावा लागतोय' असे म्हणून खंतावताना दिसतात. राजस्थानात जे घडते आहे ते खुप चांगले आहे. इतरत्रही हा विचार यायला हवा आणि वर म्हटल्याप्रमाणे तो येईलच. सुधारणा होताहेत, फ़क्त वेग कमीजास्त आहे.
|
शिक्षणाचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही. शिक्षीत आणि सुशिक्षीत ह्यात खुप फ़रक आहे. <<<<अगदी अगदी , मी ते ' अडाणी ' हे याच दृष्टीने लिहिलेय ,educational qualification चा काहीही संबंध नाही यात .
|
माझ्या मित्राच्याबाबतीत घडलेले आहे. दुसरी मुलगी झाल्यावर त्याची मावशी व आई म्हणतात"अरेरे!! दुसरी पण मुलगीच रे!!"आणि त्याच्या सासूबाई म्हणतात "आता तिसरा चान्स घ्या!!! "बरे झाले दोघे ही अत्यन्त सूज्ञ असल्याने त्यानी मुलींना काहीही खंत न बाळगता उत्तम सन्गोपन व शिक्षण दिले.दोनीही मुली डोक्टोरेट ( doctor कसे लिहायचे) करून कर्तृत्व वान आणि मानाने पुढे आल्या आहेत. अशी ही उदाहरणे नवीन पिढीला कुठे तरी नक्कीच असे निर्णय घेताना खंबीर करतील यात शन्का नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 12:21 pm: |
|
|
अहो, पुरुष लोक, कबूल करा ना, समानता नाहीये, पण ती झाली पाहिजे!! ** येत्या शंभर वर्षात तरी शक्य दिसत नाहीये, पण झालीच पाहिजे! ** म्हणजे दुसर्या कुठल्यातरी असल्याच गोष्टीवर भांडणे करता येतील, जसे, ** काहीहि **
|
Uday123
| |
| Tuesday, March 04, 2008 - 4:04 pm: |
|
|
डॉक्टर साठी DOkTar असे लिहावे.
|
Amruta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:38 pm: |
|
|
मलाहि १ मुलगी असल्याने असले अनुभव बरेच येतात. तरी हि आजची गोष्ट पण आम्ही लहान असताना हि असल्या गोष्टी बर्याच ऐकल्यात कारण आम्ही दोघी बहिणी म्हंटल की लोक लगेच "अय्या!!! भाउ नाहि तुम्हाला.?? " आणि तोंड वाकडी. अस्स्सा राग येतो ना कुणि अस म्हंतल की. आम्हाला काहि प्रॉबलेम नाहि आमच्या आई बाबांना काहि प्रॉब नाहि तर ह्यांना काय प्रॉब असतो नकळे. अग DJ इथे आत्ताच माझी शेजारीण आहे तिला जेव्हा कळल की तिला मुलगी होणार आहे तेव्हा असला चेहेरा पाडलेला तिने.. खरच कधि कळणार ह्या बायकांना??
|
Uday123
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:20 pm: |
|
|
दोन अपत्यांचा बाप असलेल्या पुरुषालाही असे अनुभव येत असतील कदाचित ---मला दोन छान मुली आहेत, दुसर्या मुलीनंतर काकूंना प्रश्न पडला होता अभीनंदन कसे करावे (प्रथम करावे की नाही). बायको या बाबत तरी आक्रमक (चेहेरे पाडलेत तर याद राखा!) होती/ आहे म्हणुन घरा(दारा)तील कोणाची डाळ शिजली नाही. आम्ही आनंदी आहोत तर मग तुम्हाला काय त्रास? हा विचार ठेवला तर मग समोरचे मुर्ख ठरतात.
|
Amruta
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:34 pm: |
|
|
अगदी खर आहे तुमच उदय. आपणच आक्र्मक राहिल पाहिजे घरी तरी आमच्या कधी अस ऐकायला मिळाल नाहि लहानपणी पण नाहि नी आत्ताही नाही. पण दारी मात्र नविन नविन ओळखी झालेली लोक पण बोलतातच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|