माणसा, हॅपी व्हेलेंटाइन डे. ENJOY
|
Manuswini
| |
| Thursday, February 14, 2008 - 7:20 pm: |
|
|
माणसा, एव्हढा हवेत उडतोस नुसत्या escalator मधल्या राईड मिळाली म्हणून. चांगलेय. त्या मुलींच्या 'मनातील भावना' नाही विचारलीस त्या वेळची? त्यातली एखादी मनात म्हणाली असेल .. 'आपल्या सर्व मुलींमध्ये हा एक लांडोर इथे पण... जराही मोकळीक नाही. दिवे घे रे.. सगळ्यांना हप्पी वॅलेन्टाईन डे!
|
Prr
| |
| Thursday, February 14, 2008 - 7:28 pm: |
|
|
आजच्यादिवशी unmarried लोक इथे कशी काय एवढा वेळ .... कोणी valentine नाही का? एवढी कशी वाईट परिस्थिती?
|
Sas
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:17 pm: |
|
|
आज मला Valentine चा Cake (१००% शाकाहारी) with Candle light Dinner अस सेलीब्रेट करावस वाटतय
|
Sas
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:18 pm: |
|
|
तस आजकाल माझ्या मनात वेगवेगळे पदार्थ खाण्याच्या खुप खुप भावना उचंबळुन येत आहेत, आज एकदम लक्षात आल ... आजार पणात अस काही वाटत असेल तर 'काही खर नाही अस म्हणतात', माणुस जायला निघाला की अश्याच इच्छा होतात म्हणतात....बापरे ...मी पण आजारी आहे...म्हणजे माझ काही... नको Valentine च्या 'मंगल' दिनी अश्या 'अमंगल' भावना नको Happy Valentine Day to ALL
|
Asami
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:24 pm: |
|
|
'आपल्या सर्व मुलींमध्ये हा एक लांडोर इथे पण... जराही मोकळीक नाही. >> अग लांडोर म्हणजे female मोर. त्या माणसाची अवस्था तू अगदीच नकोषी करून टाकलीस बघ. त्याचा केका बंद झाला
|
Runi
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:32 pm: |
|
|
मनस्विनी तु तर पार वाट लावुन टाकलीस. तिकडे तो माणुस तु बी ची वाट लावली म्हणुन त्याची काळजी करतोय आणि तु त्याचाच इथे पोपट लांडोर केलास की.
|
Maanus
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:50 pm: |
|
|
बेपर्दा नज़र आई जो कल चंद बीबियां अक़बर ज़मी में गैरते कौमी से गड़ गया पूछा जो उनसे आपका पर्दा वो क्या हुआ? कहने लगीं कि अक्ल पे मर्दों की पड़ गया
|
Manuswini
| |
| Thursday, February 14, 2008 - 9:01 pm: |
|
|
लांडोर म्हणजे female .. अरेरे हाय रे माझे मराठी. हा असा गोंधळ होतो कधी कधी.
|
त्याचा केका बंद झाला> LOL माणसा आज कोणाला फुल दिलेस? निदान सात तरी ने ऑफीसमध्ये. कालच्या जन्नत मध्ली एखादी मिळायची. ( तेवढच संध्याकाळचे जेवन सुटेल)
|
Dakshina
| |
| Friday, February 15, 2008 - 5:10 am: |
|
|
आज कंपनीची नेहमीची (ब्रॅंडेड) बस घ्यायला आली नाही. दुसरीच कुठलीतरी रंगिबेरंगी बस आलेली. त्यात शुक्रवार आत बसलेल्या लोकांचे ड्रेसेस पण रंगित. ड्रायव्हर पण नविन.... मनात आलं ऑफ़िस ऐवजी हा आपल्या बस ला एखाद्या पिकनिक स्पॉटला घेऊन गेला तर काय बरं होईल.... पण मेला बरोब्बर हापिसात घेऊन आला ना...
|
Manjud
| |
| Friday, February 15, 2008 - 10:44 am: |
|
|
'आपल्या सर्व मुलींमध्ये हा एक लांडोर इथे पण... जराही मोकळीक नाही. अग लांडोर म्हणजे female मोर. मनू, अगं तुला 'मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा' असं म्हणायचं होतं का?
|
Manuswini
| |
| Friday, February 15, 2008 - 7:14 pm: |
|
|
exactly अगदी तेच ते बरोबर ओळखलेस मंजू. कीतीतरी आठवायचा प्रयत्न केला की असेच काहीतरी होते लाऽऽ ला वरून मग लिहून टाकले लांडोर. BTW लांबोडा म्हणजे काय?
|
Manjud
| |
| Saturday, February 16, 2008 - 5:38 am: |
|
|
लांबोडाचा शब्दश्: अर्थ मलाही माहीत नाही. आम्ही उगीचच मोठ्या मुलींचे अनुकरण करायचो. असं म्हणणं म्हणजे मुलांना चिडवणं एवढी अक्कल होती. त्यांच्यासारखी माआमारी करता येत नाही, मग असं चिडवलं की ती मुलं निघून जातात एवढं बरोब्बर कळलं होतं.
|
भाजून खातो कोंबडा .... वाह ... तंदूरी चिकन ..........
|
कुठे चालला मायबोली सोडून दिव्या ताई?? काल रात्री तुम्ही आजोळ नावाचे एक सुंदर ललित पोस्टले होते. तेही डिलीट केलेले दिसतेय??
|
Sas
| |
| Friday, February 29, 2008 - 6:06 pm: |
|
|
आज मला काहिच करावस वाटत नाही आहे
|
Preetib
| |
| Friday, February 29, 2008 - 6:41 pm: |
|
|
सास अग असाना माला रोजाच वाटत.
|
Sas
| |
| Monday, March 03, 2008 - 8:50 pm: |
|
|
अरेवा! 'प्रिती' मला कुणितरी सोबत आहेतर. मला रोज काहिच करावस वाटत नाही अस नाही पण कधिमधी होत अस. मला तस रोज बरच काही करायच असत पण राहुन जात .....पण!! पण आज मात्र मी मला जे करायच होत ते केल. बर्याच दिवसांनी : * सकाळी लवकर उठले (८ वाजता ) * घराला Vaccume केला (मराठीत केर काढला) मग * भांडी धुतली आणी 'वरण-भात-भाजी' हा बेत तयार करुन ठेवला....संध्याकाळी 'हे' आले की चपात्या करायच्या नी गरम गरम चपात्या ह्यांना वाढायच्या असा वरण-भात भाजी-पोळी, छान Dinner बेत आखलाय बघुया मनातली भावना पुर्ण होते का? ......................... आज माझी ही भावना पुर्ण होवि ही भावना आहे त्यासाठी च्या Sub -मनातिल भावना: १. हे वेळेवर Office सातुन घरी यावे २. हे जरी उशिरा आले तरी मला राग येवु नये ३. मला राग आलाच तरी तो मी व्यक्त न करता, गिळुन घ्यावा अशी 'सुबुद्धि' मला येणे. ४. मुख्य म्हणजे मला चपात्या करण्याचा कंटाळा येवु नये
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 12:47 am: |
|
|
भांडी धुतली आणी 'वरण-भात-भाजी' हा बेत तयार करुन ठेवला....संध्याकाळी 'हे' आले की चपात्या करायच्या नी गरम गरम चपात्या ह्यांना वाढायच्या असा वरण-भात भाजी-पोळी, छान Dinner बेत आखलाय बघुया मनातली भावना पुर्ण होते का? ......................... अहाहा, डोळे भरून आले, भावनावेग उत्कट झाला! गेलेऽ ते दिन गेले! मला स्वप्न पडते आहे का? ही एक कवीकल्पना आहे का? या जगात असेहि असू शकते का? या थोर बाई कोण? आमच्या घरी येतील का? सौ. ला शिकवतील का? की माझ्या मनातील भावना अश्याच जळून जाणार का? मला हे सुख कधीच मिळणार नाही का? खरे तर सध्या बायको दिवसभर नोकरीवर जाते, नि मी घरी बसून MBA करतो, तेंव्हा या भावना कदाचित् तिच्या मनातल्याच असाव्यात. पण त्या माझ्याकडून पूर्ण होणे या जन्मी शक्य नाही, म्हणून ती केंव्हाच आपले दु:ख गिळून बसली आहे. बिच्चारी!
|