Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 21, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Jodhaa akbar - anti marathi lobby -how much truth » Archive through February 21, 2008 « Previous Next »

Mansmi18
Monday, February 18, 2008 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

आज मटा मधे वरील बातमी वाचली कि मराठी विरोधी lobby च jodhaa akbar पाडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. वरील बातमीत तथ्य असले तरी "जोधा अकबर" superhit होइल असे मला वाटले नव्हते.

आशुतोश ग़ोवारीकर अतिशय उत्तम आणि प्रामाणिक दिग्दर्शक जरी असला तरी (लगान नंतर)व्यावसायिक गणित त्याला नीट जमले असे दिसत नाही. "स्वदेस" मला खुप आवडला तरी त्याला मिळालेला "थंड" प्रतिसाद काहीसा अपेक्षितच होता.

जेव्हा त्याने "जोधा अकबर" ची घोषणा केली होती तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आजच्या राहुल्रोहीत yash chopra/karan johar type चित्रपटाना चटावलेल्या प्रेक्षकाना एक मुघलकालीन प्रेमकथा कितपत रुचेल असे वाटले होते आणि (दुर्दैवाने) तसेच झाले. त्याला opening ८०% मिळाले. कदाचित हा चित्रपट investment भरून काढेलही पण superhit होणे कठीणच आहे.(अजुनही माझा अन्दाज चुकला तर मला खुप आनंद होइल).

या पार्श्वभूमीवर ameer khaan बराच savvy वाटतो. त्याने बनवलेला taare zameen par मधे त्याला १००% खात्री होती कि हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याला नक्की चांगला प्रतिसाद मिळेल आणि झालेही तसेच. दुसरी गोष्ट म्हणजे त्या चित्रपटात investment अगदी नगण्य होती (तो स्वत: निर्मातादिग्दर्शक असल्याने खर्च शुन्य) त्यामुळे तो हा gamble खेळु शकला.

मला वाटते आशुतोष ला कलात्मकता, sincere प्रयत्न, मनोरंजन आणि व्यावसायिक गणित यांची सान्गड घालणे (लगान नंतर) नीट जमले नाही.

तुम्हाला काय वाटते?


Anjali28
Monday, February 18, 2008 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज,
मी पण इथे हाच प्रश्न विचारला आहे


/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=1050995#POST1050995

Zakki
Tuesday, February 19, 2008 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, पण त्या नायकाला नि नायिकेला बघायला नि शिवाय एकंदरीत देवदास प्रमाणे भव्य, सोने चांदींनी खच्चून भरले महाल बघायला वगैरे भरपूर गर्दी होईल ना.

अहो, इथल्या चांगल्या ५५ ते साठ वर्षाच्या बायका तेव्हढेच बघायला नवीन देवदास बघायला १०० कि. मी. गेल्या होत्या, नि डी व्ही डी आल्यावर, भराभरा विकत घेतली. (आता धूळ खात पडली आहे म्हणा!) चंगळवाद बातमी फलक सुरु झाला नव्हता तेंव्हा.

मायबोलीवरील एक दोघांनी (एक दोघींनी) म्हंटलेच आहे की पुन: पुन: पहाणार. तसेच इतरहि असतीलच.

तर जरा वाट बघू, नाही जमले तर तुमचा बायोडेटा पाठवून द्या त्याला. पुढच्या चित्रपटाच्या वेळी तो तुम्हाला विचारेल नि त्याचे गणित चुकले तरी तुमचे बरोब्बर येईल, नाही का?





Deepanjali
Tuesday, February 19, 2008 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अन्जली
वाचलं मी ते .
रा . ठा . ना म्हणाव या आता सांभाळून घ्या मराठी माणसाला .
:-)

Anjali28
Tuesday, February 19, 2008 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL DJ ...

त्यात त्यांचा किती 'फायदा' आहे ते आधी पाहतील..


Mansmi18
Tuesday, February 19, 2008 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,

हे सगळे मोठे लोक आमच्यासारख्या सामान्य माणसाचे थोडेच ऐकतात? ते classes साठी चित्रपट बनवतात आणि आम्ही masses मधे येतो ना:-)

राज ठाकरेनी सर्व मराठी आणि इतर भाषिकाना जोधा अकबर पाहण्याची सक्ती केली तर?:-)



Mansmi18
Tuesday, February 19, 2008 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा अन्दाज चुकला.. I am so happy
http://www.rediff.com/movies/2008/feb/19jodhaa.htm

Zakki
Tuesday, February 19, 2008 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरेनी सर्व मराठी आणि इतर भाषिकाना जोधा अकबर पाहण्याची सक्ती केली तर?

काही गरज नाही, भारताबाहेरील लोकांना हे राजपुत, मुसलमान, इतिहास याच्याबद्दल फारशी माहिती नाही, आणि ज्यांना असते तेसुद्धा चित्रपट कसा आहे ते बघायला तरी दहा डॉलरचे तिकीट काढून जातातच. झाले पैसे!

Ajjuka
Wednesday, February 20, 2008 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>दुसरी गोष्ट म्हणजे त्या चित्रपटात investment अगदी नगण्य होती (तो स्वत: निर्मातादिग्दर्शक असल्याने खर्च शुन्य) त्यामुळे तो हा gamble खेळु शकला.<<
तपशीलात चूक. तो आधी केवळ निर्माता होता मग दिग्दर्शक बनला. आणि काहीही असले तरी investment नगण्य असं मुळीच म्हणता येणार नाही. प्रॉडक्शन कॉस्ट आणि मार्केटींग कॉस्ट यायची तेवढी येतेच. 'सेलेबल स्टारचं रेम्युनरेशन' हा खर्च वाचला एवढंच म्हणता येईल. असो. हा बीबीचा विषय नाही पण समजुतीत किंवा तपशीलातली चूक खटकली म्हणून लिहिले. (पूर्वानुभवावरून हे माहितीये कि तुम्हाला काही सांगितले की तुम्ही माझी अक्कल काढायला जाणार पण तरी...)
बाकी जोधा अकबर अजूब पाह्यला नाही त्यामुळे काही लिहित नाही. प्रोमोज बघून बघावा असं तर नक्की वाटतंय.


Chinya1985
Wednesday, February 20, 2008 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका तारे जमिन पर किती करोडमधे बनला होता???आत्ता किती करोडचा व्यवसाय केलाय त्याने???मागे वाचले होते तेंव्हा ७० करोडचा व्यवसाय झाला होता

Bee
Thursday, February 21, 2008 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोधा आणि अकबर ही दोघेही घार्‍या डोळ्यांची नव्हती. मग हृथिक आणि रॉय ला का अभिनय देण्यात आला? उद्याला जर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायचे ठरविले तर धारदार नाकाचा कुणी अभिनेता आहे का हे आधी शोधण्यात येईल. गांधी चित्रपट सर्वांना ठावूक आहे, त्यातील गांधीची भुमिका ज्यांनी केली ती व्यक्ती किती हुबेहुब गांधीजी सारखी दिसत होती.

अज्जुकाला कदाचित सांगता येईल की ऐतिहासिक चित्रपट करताना पात्रांची शरिरयष्टी कशी होती ह्याचा अभ्यास केला जात नाही का? करायला हवा हे महत्त्वाचे नाही का? मग तशा प्रकारचे अभिनेते मिळणे आवश्यक वाटत नाही का?


Ajjuka
Thursday, February 21, 2008 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,
तुझ्या प्रश्नांची उत्तरे मला माहित नाहीत. आणि प्रश्नाचा रोखही मला कळला नाही. असो.

बी,
शरीरयष्टी व चेहरेपट्टी या दोन्ही गोष्टींवर casting अवलंबून असतेच. असायलाच हवे.
पण...
गांधी चित्रपटासाठी बेन किंग्जले योग्य वाटला याला नुसती चण महत्वाची नव्हती. मुळातली चण, मग चेहरेपट्टीचं मूळ व्यक्तिरेखेच्या जवळ जाणं, मग मेकप (प्रोस्थेटिक सुद्धा) आणि त्याही पलिकडे जाऊन अभिनेत्याने त्या व्यक्तिरेखेला स्वतःमधे उतरवणं. या शेवटच्या मुद्द्यामुळेच बेन किंग्जले हा ब्रिटिश असूनही आजपर्यंत चित्रपटात आलेल्या सर्व गांधीपेक्षा जास्त योग्य, सरस वाटतो. (मला तरी असंच वाटतं. आता यावर आपल्या नटांना कमी लेखणं आणि परक्यांना मोठे मानणे इत्यादी इत्यादी अर्थ लावून तलवारी घेऊन सुरू होऊ नका कुणी. कृपया!)

मुळात जोधा नक्की होती की नाही ह्यामधेच वेगवेगळी मते आहेत तर तिचे डोळे हिरवे होते की नाही हे आपण कसं ठरवणार? त्या ठिकाणी दिग्दर्शकाला ते स्वातंत्र्य घेण्याची मुभा आहे.
अकबराचे डोळे घारे होते की नाही याबद्दल स्पष्ट उल्लेख असेल आणि त्याप्रमाणे दिग्दर्शकाने केले नसेल तर ह्या आक्षेपाला अर्थ राहिल. पण मुळात घारे नव्हतेच यासाठी जर काही प्रूफ नसेल तर परत एकदा दिग्दर्शकाला ती मुभा आहे.


Bee
Thursday, February 21, 2008 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, धन्यवाद. आत्ताच जोधाच्या कुठल्या तरी बीबीवर वाचले की ऐश्वर्या रॉयने brown रंगाचे contact lenses लावले होते म्हणून ती soft दिसत होती. ( soft तर ती आधी पासूनच आहे. सगळ्याच हिन्दी अभिनेत्र्या soft च असतात :-))

Ajjuka
Thursday, February 21, 2008 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर.
चार शब्द.
प्रचंड टाळ्या.


Chinya1985
Thursday, February 21, 2008 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या प्रश्नांची उत्तरे मला माहित नाहीत. आणि प्रश्नाचा रोखही मला कळला नाही. असो.

यात रोख कसला आलाय????साधा सरळ प्रश्न विचारलाय. सतत कोणीतरी आपला विरोध करण्यासाठी तलवारी उपसण्याच्या तयारीत आहे अशी तुझी समजुत झालेली दिसते.

गांधी चित्रपट सर्वांना ठावूक आहे, त्यातील गांधीची भुमिका ज्यांनी केली ती व्यक्ती किती हुबेहुब गांधीजी सारखी दिसत होती.

विजय तेंडुलकरांना ती गांधींची भुमिका अजिबात आवडली नव्हती. त्यांच म्हणन होतं की बेन किंगस्ले धष्टपुष्ट होता,आणि गांधीजी लुकडे सुकडे होते. तो चित्रपट पाहिल्यानंतर रागावुन तेंडुलकर आले होते. त्यानंतर त्यांनी 'सरदार' हा चित्रपट लिहिला ज्यात त्यांना हवे होते तसे लुकडे-सुकडे गांधीजी दाखवण्यात आले होते. (अज्जुका ही तलवार उपसलेली नाहिये)

मला मेकिंग ऑफ़ महात्मा या चित्रपटातील रजित कपुरने वठवलेले गांधीजी आणि 'गांधी-माय फ़ादर' मधील वठवलेले गांधीजी चांगले वाटले.


Ajjuka
Thursday, February 21, 2008 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजवर तू माझ्यावर केवळ तलवारच उपसलेली पाह्यलीये त्यामुळे शंका येणं साहजिक आहे. असो..

शक्य आहे.
शरीरयष्टीमधे तेवढा फरक (बेन किंग्जले व गांधी) आहे यात अमान्य काहीच नाही. पण तरी तो अविस्मरणीय होतो किंवा मला गांधी म्हणून इतरांपेक्षा तोच उजवा वाटलेला आहे.
सरदार मधला गांधी (अन्नू कपूर बहुतेक) मला तरी खूप आवडला नव्हता. वाईट निश्चितच नव्हता पण फाटका असून प्रचंड सामर्थ्य आत्मविश्वास आणि प्रसन्नता जी गांधीच्या चेहर्‍यावर दिसायची ती अन्नू कपूरच्या चेहर्‍यावर दिसली नाही. लुकडे असल्याने अनेकजण बिचारे वाटतात तसाच तो दिसला असं आपलं माझं impression झालं. हे सगळं बेनकडे होतं ह्यात वाद नाही.
रजित कपूर चा गांधी दुर्दैवाने मला पहायला मिळाला नाही. विक्रम कडे फोटो पाह्यले होते तेवढेच त्यामुळे त्यावर मी काही बोलू शकणार नाही.

आणि यापलिकडे जाऊन.. कदाचित तेंडुलकरांना अजून काही जास्त वेगळं जाणवलं असेल. जे माझ्याकडून सुटलं असेल. किंवा मग निव्वळ प अ अ.


Mandard
Thursday, February 21, 2008 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुन्नाभाई मधले गांधीजी कुणाला आवडले नाहित का?

Tonaga
Thursday, February 21, 2008 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबा इथे खरे गांधीजीच बर्‍याच जाणाना आवडत नाहीत तर मुन्नाभाईचे काय घेऊन बसलास?
प्रभावळकर उत्तमच होते पण गांधी सारख्या पूर्ण चित्रपटाचे बेअरिंग ते तोलू शकले असते की नाही याबद्दल शंका आहे. कारण मुन्नात बोलण्याचा एकच लडिवाळ टोन आवश्यक होता तो त्याना जमला. पण सर्वांगीण भूमिकेबद्दल मला शंका वाटते. यात प्रभावळकराना कमी लेखण्याचा उद्देश नाही. नाही तर याल दगड धोडे घेऊन मारायला....


Bee
Thursday, February 21, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर अज्जुका, त्या टाळ्या कशासाठी. मी लिहिलेला मजकूर टाळ्यांसाठी लायक नव्हता, त्याही तुझ्या... :-)

मी गांधीजींची भुमिका साकार करू शकणारे इतर चित्रपट बघितलेले नाहीत पण मला बेन किंग्जले ह्यांची भुमिका कमालीची आवडली होती. त्या चित्रपटातील ऐकूनच सर्व पात्रे अभिनयात कुठेही कमी पडले नव्हते. हो मान्य आहे खरे गांधाजी वाळलेल्या खारकेसारखे होते पण बेन किंग्जले इतर बाबतीत हुबेहुब गांधीजीच वाटत होते. एका परकीय देशातील अभिनेत्याने गांधीजींची भुमिका यश्स्वीपणे पार पाडावी ही गोष्ट महानच नाही का! विजय तेंडुलकरांना इतक्या क्षुल्लक गोष्टीचा राग यावा हे वाचून दुःख झाले. बेन किन्ग्जले इतकेही काही गुटगुटीत नव्हते.

आता विषय निघालाच आहे म्हणून जाणू इच्छितो की चित्रपट सृष्टीत अजून कुणी कुणी खर्‍या व्यक्तीच्या भुमिका केलेल्या आहेत आणि त्या पुर्णपणे यशस्वी झालेल्या आहेत. सध्या मला तरी स्मरत नाही आहे. माझे ऐतिहासिक चित्रपटांकडे फ़ारसे लक्ष नसते. अशोकामधील शारूखचा अवतार बघून मी तो चित्रपट बघायला जाणे रद्द केले होते.


Tonaga
Thursday, February 21, 2008 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरदारमध्ये परेश रावळने सरदार पटेल यथोचित साकारले आहेत...
तसे बरेच सलीम, अकबर, गालिब,मंगल पान्डे,डॉ.कोटणीस,सेन्ट ग्यानेश्वर,भगतसिन्ग, सुभाष चन्द्र बोस,झाशीची राणी,लो.टिळक,शिवाजी, वासुदेव फडके,गाडगेबाबा,तुकाराम,राम जोशी,शेगावचे महाराज,शाहू महाराज,बहादुर शाह जफर,डॉ.आम्बेडकर,सावरकर,गुरुभाई...आपलं.. धीरुभाई अम्बानी,वाजीद अली शाह,चन्द्रगुप्त,तानसेन,नरसी महेता,इत्यादी (यात सगले मर्त्य मानव घेतले आहेत, पौरानिक भाकडकथा जर धरल्या तर आणखी यादी वाढेल...)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators