|
Tonaga
| |
| Thursday, February 21, 2008 - 4:36 pm: |
| 
|
तेन्डुलकर एक बरे लेखक आहेत पण त्यांचं सगळं आयुष्य काहितरी वादग्रस्त विधानं करून पब्लिसिटी करून मोजून मापून स्ट्रटेजी आखून हुशारीने मार्केटिंग करण्यात गेले आहे... असलेल्या गुणवत्तेपेक्षा मार्केटिंगने मेडियाचा चतुरपणे वापर करून सतत टिकून राहिलेले गृहस्थ म्हणजे हुसेन बाबा! माधुरी पुराण हा त्याचाच भाग... (येथे हुसेन बाबाचे मुसलमान असणे विचारात घेतलेले नाही)हुसेन म्हनजे काही व्हॅन गॉग अथवा मायकेलांजेलो किंवा गेला बाजार रविवर्मा नव्हे पण हाईप एवढी की हा पिकासोचा आजोबा आहे... मुरली लाहोटी कोणाच्या स्मरणात तरी आहेत का? हुसेनच्या घोड्यांचे कौतुक पण लाहोटींचे बैलही तेवढेच जोरकस आहेत याचे कौतुक कोण करणार? हुसेनच्या जीन्सला बांधलेले नाडकर्णी? दुबेत आणि विजयाबाइंत गुणवत्ता असूनही ही 'बुवाबाजी' त्याना जमली नाही.... कदाचित गुणवत्ता असल्यानेच जमली नसेल...
|
Dineshvs
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:17 pm: |
| 
|
मला सगळ्यात हुबेहुब गांधी वाटले ते अतुल कुलकर्णीने, गांधी विरुद्ध गांधी नाटकात सादर केलेले. त्यात बराच कालावधी होता आणि काळानुसार, अतुलचा मेकप बदललेला होता. पण बाकि सर्वच गणितं सोडवत उच्च प्रतीचा सिनेमा बनवणे, फ़ारच थोड्या लोकाना जमते. आणि समजा ते गणित जमलच, तर पुढे त्याच्या भ्रष्ट आवृत्त्या काढल्या जातात. गोवारीकरने निदान विषयाचे तरी वैविध्य दिलेय.
|
Sandu
| |
| Thursday, February 21, 2008 - 9:58 pm: |
| 
|
आज्जुकाच्या नवर्याचे किती हाल होत असतिल विचार करा बिच्चारा..
|
Chinya1985
| |
| Thursday, February 21, 2008 - 10:21 pm: |
| 
|
आजवर तू माझ्यावर केवळ तलवारच उपसलेली पाह्यलीये त्यामुळे शंका येणं साहजिक आहे मला तु मांडलेले मुद्दे न पटल्याने तलवार उपसली असेल. nothing personal . तुझे मुद्दे बरोबर वाटले तर अनुमोदनही देईल. काहीकाही लोकांच्या मते 'भगत सिंग' आणि ;'वीर सावरकर' मधले गांधीजी खर्या गांधीजींशी मिळतेजुळते होते. 'मेकिंग ऑफ़ महात्मा' हा चित्रपटच छान आहे ' my experiences with truth' या गांधीजींच्या आत्मचरित्रासारखा.
|
Zakki
| |
| Thursday, February 21, 2008 - 10:59 pm: |
| 
|
आज्जुकाच्या नवर्याचे किती हाल होत असतिल विचार करा असले काही नसते. यच्चयावत् सगळ्याच नवर्यांचे हाल होतच असतात, या ना त्या कारणाने. सगळेच बिच्चारे असतात. कुणावर तरी प्रेम करावे म्हणून पुरुष लग्न करतात, बायका मात्र हाल करायला हक्काचे गिर्हाईक मिळाले असे समजतात. उगीच एकाच व्यक्तिचे त्यात वैशिष्ठ्य नाही!
|
Tulip
| |
| Friday, February 22, 2008 - 3:15 am: |
| 
|
अनुराग काश्यप ऑन जोधा-अकबर कन्ट्रोवर्सी. काश इतपत लॉजिक ह्या विषयावरचा हा फ़ालतू वाद घालणार्या सर्वांनीच वापरलं असतं.
|
Ajjuka
| |
| Friday, February 22, 2008 - 5:12 am: |
| 
|
Copy pasting the article Tulip has given link to. As it takes several clicks to get to the article from the link given. ------------------------------------ Not about Rajput pride The Jodhaa Akbar controversy is more about the film industry not wanting Ashutosh Gowariker to succeed than a misrepresentation of historical facts Twenty-five people walk to a multiplex and threaten the exhibitors with dire consequences if they screen Jodhaa Akbar and the entire city of Ahmedabad refuses to show the film... we sit and watch... Rajasthan puts a ban on Jodhaa Akbar, we sit and watch... in the evening we sit down over drinks and discuss how Ashutosh Gowariker should have been careful and how much loss the film is going to make and we have sides to choose and we know exactly what and how the film should have been made. It’s pathetic. JA has brought out the Rajput in us. And what exactly is offending us? Is it history? Distortion of history? When wasn’t our history distorted, first in the textbooks, before that by very many custodians of history? In a country that has staid and negligible copyright laws, who has copyright over history? Don’t we have various versions of it officially available? Well, if we are honest to the fake Rajput pride coursing through our veins then what really is threatening the upwardly mobile moustache of the warrior clan is the very idea of one of our women sleeping with one of their emperors. History is an excuse here and creativity bears the brunt of it. If Jodha was the king and Akbar the queen, I wonder if we would have felt the same. Well, I am a Rajput too and I don’t care about my history because my present worries me (God!! I need a hit), my future makes me insecure (will they give me good reviews next time around)... I don’t care if Jodha married an Akbar or a Salim or some Pratap Singh from her own clan, I don’t care if she was Jodha or Jodh or Jo-bhi. What I want to celebrate is that someone has the courage to go out there and lift our cinematic standards a notch higher. I might not like it through and through but I cannot ignore some of those great sequences that Mr Gowariker has managed to pull off, giving us a platform to believe there are ways to get around things like Maneka Gandhi. I don’t care if Ashutosh Gowariker is wrong and others are right. What I care about and what worries me is the state of our democracy. I don’t recall a single Rajput murmuring that went around when Mughale-Azam released, both times around. I wonder where was the Rajput’s sense of history when Jodhaa Akbar was announced... well the film was obviously going to be about the two people in the title. What doesn’t surprise me is the timing of the protest. We’ve now come to expect it. What depresses me is the industry watching, secretly rejoicing because they didn’t want Gowariker to be able to see it through, them not coming together and saying, ‘Okay, enough of these protests, if next time any of the exhibitors don’t stand by one of them which is us, we ban them, let’s ban Rajasthan, let’s withdraw all of our films from the state and let’s not beam into their TV sets and let them travel to Delhi or Haryana if they want to watch it...’ Why for once can’t we come together and say it’s high time you recognise our importance in the nation’s daily state of affairs and stop treating us like a puppet on a string and give us our rights? Even in Pakistan, the head of state stood by the anti-fundamentalist controversial Khuda Ke Liye and said if it hurts your sensibilities, don’t watch it. I was witness to how a writer’s strike forced a Hollywood shutdown and affected the economy of California, adding to the recessional woes of the big daddy. In there, film-makers and people know their rights. We need to know ours. And what I know is that “History” is “His-story” and the “His” in this context, according to me, is the one who writes it and not the one it is about, because it is never about one, it’s always about “them” and them is how we see them. I know that’s very convoluted but then what isn’t, I got it from the man who coined the word and it has been passed down the ages to me and I will protest against anyone who says otherwise and hurts my ancestral sensibilities. What is depressing is how the film industry watched instead of supporting the film’s director Ashutosh Gowariker Bollywood’s enfant terrible Anurag Kashyap says, “I don’t write. I yell. I scream. I abuse. I generally rant.” - Article by Director Anurag Kashyap
|
Tulip
| |
| Friday, February 22, 2008 - 6:17 am: |
| 
|
hey thanx Ajjukaa ! btw तु पाहिला आहेस कां JA?
|
Ajjuka
| |
| Friday, February 22, 2008 - 9:00 am: |
| 
|
नाही गं. आत्ताच तिकिटे आणलीत. रात्री जाणारे.
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 9:06 am: |
| 
|
असे काय आहे वरील cut n paste केलेल्या document मधे? मला तरी काही खास आढळलं नाही. कित्येकदा असे वाद, भडक बातम्या नि लेख हे सर्व देखील जाहीरातीचाच एक भाग असतो. मान्य आहे आशुतोष गोवारीकरांनी इतिहास समोर आणण्याचा प्रयास केला. जोधा अकबरची अज्ञात कथा जगापुढे ठेवली. पण जी मंडळी इतिहासाचे सच्चे जाणकार आहेत ती तर ह्या चित्रपटाचे मंथन करतीलच ना? उद्या जर एखाद्या अमराठी दिग्दर्शकाने राजे छत्रपती समोर आणलेत तर त्यावर टिका करणारे बरेच मराठी लोक पुढे येतील ह्याची शक्यता नाकारता येत नाही.
|
Ajjuka
| |
| Friday, February 22, 2008 - 10:17 am: |
| 
|
>>काहीकाही लोकांच्या मते 'भगत सिंग' आणि ;'वीर सावरकर' मधले गांधीजी खर्या गांधीजींशी मिळतेजुळते होते.<< भगतसिंगबद्दल लक्षात नाही. पण वीर सावरकर हा चित्रपट म्हणजे मुळात एवढ्या मोठ्या(स्वा. सावरकर) माणसाचं नशिबच वाइट. मरणानंतरही त्यांना न्याय मिळाला नाही. चित्रपट निघाला तोही इतका भंगार असं वाटायला लावणारा होता. या चित्रपटातले सुभाषबाबू आणि गांधीजी हे दोघेही या व्यक्तिरेखांची खिल्ली उडवण्यासाठी घेतलेत की काय असे वाटावेत इतपत विनोदी होते. मुळात सावरकर करणारा शैलेंद्र गौड (तुपतुपीत भैय्या!) हाच इतका चुकीचा होता. ना त्याच्या तोंडावरची माशी हालत होती ना सावरकरांच्या डोळ्यातले/ चेहर्यावरचे बुद्धीचे तेज कुठे दिसत होते. बर सावरकरांच्याबद्दल प्रचंड आदर असल्याने (मला!) या चित्रपटाला विनोदी पण म्हणता येत नव्हते. महात्मा गांधी मोठे की स्वातंत्र्यवीर सावरकर हा वाद बाजुला ठेवून तटस्थपणे गांधी आणि वीर सावरकर या चित्रपटांकडे पाह्यले तर गांधी चित्रपट फार मोठ्या उंचीवर आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही. वीर सावरकर हा चित्रपट अश्या पद्धतीने होणं हे सावरकरांचं दुर्दैव. अश्या पद्धतीन म्हणजे ६ दिग्दर्शक, पटेनासं झालं एकाचं की हाकल त्याला आणि आण दुसरा असे ६, कुठल्या तरी साउंड आणि लाइट शो मधले कलाकार ज्यांच्याकडे फारसा अनुभव नाही, अभिनयाची ज्यांची क्षमता अतीव मर्यादित आहे असे किंवा मग हिंदी सिरीयल्स मधले भडक अभिनय करणारे, मेकप - कॉश्च्युम्स च्या तपशीलांकडे संपूर्ण दुर्लक्ष, चित्रपटाची मांडणी सावरकरांचा मोठेपणा किंवा विचार अधोरेखित करण्यापेक्षा बाकीचे नेते कसे मूर्ख होते याकडे जास्त लक्ष देणारी... इत्यादी इत्यादी.. असो.. BTW तुला माझा उद्दा पटला नाही तरी तलवार उपसून यायची गरज नाही मित्रा. दुसर्याचं मत चुकीचं वाटत असेल तर ते खोडून काढ त्या व्यक्तीवर टिका करून तुझं मत बरोबर होत नाही. नाही का?
|
BTW तुला माझा उद्दा पटला नाही तरी तलवार उपसून यायची गरज नाही मित्रा. दुसर्याचं मत चुकीचं वाटत असेल तर ते खोडून काढ त्या व्यक्तीवर टिका करून तुझं मत बरोबर होत नाही. नाही का? मी आत्तापर्यंत मला न पटणारे मुद्दे खोडुनच काढले आहेत. माझ्या मतांना मी नेहमीच लॉजिक देउन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुझ्यावर अथवा कुणावर कधी वैयक्तीक टिका केलिय याचे संदर्भ द्यावेत. देता येत नसेल तर उगाच माझ्यावर चुकिचे,खोटे,व्यक्तिगत आरोप करु नयेत. अनुराग कश्यपचे २ चित्रपट सेन्सोरमुळे अडकल्याने तो नेहमीच अशी भुमिका घेतो. ऐतिहासिक चित्रपट असल्याने त्याच्या सत्य असत्याबद्दल चर्चा होणे साहजिकच आहे. उद्या म्हणाल इतिहासाच पुस्तकावरही चर्चा करु नका. जर जोधाबाईच्या अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह आहे तर त्यावर चुकिच्या गोष्टी कशाला दाखवायच्या??मी मागेच म्हटल होत की आशुतोशने चित्रपट काढताना 'एक मुस्लिम राजा आणि राणी' अशा पध्दतिने काढायला हवा होता. शिवाय राजस्थानमधे कुठलाही चित्रपट प्रदर्षीत करायला इन्डस्ट्री वाल्यांनी बंदी आणावी अशी मागणी करुन अनुरागही तोच मार्ग स्विकारतोय जो प्रोटेस्ट करणार्यांनी स्विकारलाय. शेवटी काय अनुराग कश्यप एक लेखक म्हणून चांगला आहे त्यामुळे त्याचा लेख वाचनिय आहे बाकी काही नाही.
|
लय भारी चर्चा चालूय तरी मला वाटंतय ते सांगून मोकळी होते (सम्दे त्येच करायल्यात की बाई. तुमी काय लई भारी करायलाव का?) तर असो. मला असं म्हणायचंय की शहाण्या लोकांनी ज्यांना हा पूर्ण सत्य असा इतिहास नाही हे माहीतीय त्यांनी बघावा की तो. आगोबाबा म्हणतोय म्हणून त्यांना माहित असलेला इतिहास इरेझ होऊन हा नवा थोडाच त्यांच्या डोक्यात भरला जाणार आहे? आणि ज्यांना एकूणच इतिहासाशी आणि त्याच्या या distortion शी काडीचं देणंघेणं नाहीये अशी समस्त जन्ता तर ह्रितिक ऍश आणि बाकी डोळे दिपवणारा मालमसाला पहायला जातेच्जाणारच आहे. आणि त्यातून जर हे लोक तो इतिहास मानणार असले तर व्हायचं तेवढं नुकसान होणार आहेच इतिहासाचं. तर सुजाण सुशिक्षित लोकहो इतर कारणांसाठी हा चित्रपट बघू वाटत असेल तर जरूर बघा. हां प्रश्न तत्वाचाच असेल(असतं काही काही लोकांचं असं) तर राहू द्या. कसं?
|
Zakki
| |
| Friday, February 22, 2008 - 3:18 pm: |
| 
|
किंवा एकंदरीतच आळशी, चित्रपटांबद्दल (विशेषत: हिंदी) उदासीन असाल तर बरेच. मग काय शांतीच शांतीच. (ओं शांति ओं न बघायला आणखी एक कारण!!

|
Research म्हणजे प्रसंगांची chronological मांडणी, वंशवृक्ष आणि नातीगोती ह्यांचे शाॅर्ट नोट्स इतकंच? प्रसंगांची मांडणी करतांना थोडी common sense दाखवावी ना!! १) अकबरला आणि अख्ख्या दरबाराला भर गोंगाटात जोधाच्या अंत:पुरातलं भजन ऐकू येतं आणि आपला हीरो चक्क दरबार सोडून आतमध्ये येतो! दोनतीन बुरूज आणि तटबंद्यांपलिकडेही ऐकू यायला ती काय अज़ान आहे का? जोधाच्या फुफ्फुसांत इतकी ताकत भलेही असो- इतक्या volume चं भजन गातांना तिच्या गळ्याच्या-कपाळाच्या शिरा अगदी नाॅर्मल?! २) राणी म्हणून चांगली असो, पण 'जोधा बच्चन' स्वयंपाकीण म्हणून उधळी दिसतेय. बावर्चीखान्यात भाज्यांचा ढीग पाहून मॅडम गावजेवण घालतील असं वाटलं, पण तितकं अन्न आणि इला अरुणचं रक्त आटवून ती फक्त सात-आठ पातेली रांधून घेऊन आली?! वरून अकबरला म्हणते- "उसे मत खाईये!! (ढॅण्टढॅण!!) "उसमें नमक कम है!!" (सतारीची लकेर आणि हास्यकल्लोळ!!) -आमच्यात वाढायच्या आधीच हे तपासून घेतात बरं! ३) ज्या काळात नवरे लढाईला गेल्यावर बायका पडद्यांआड जोहाराची तयारी करून बसत, तिथे जोधाराणी घोड्यावर बसून रणांगणावर आलेल्या दाखवल्याय्त! ४) समशेरीचा रियाज़ करतांना बिनचिलखताची माणसं लोखंडी समशेर चालवतात- यह बात हज़म नहीं हुई! ५) पाचसहाशे माणसांना 'अज़ीम्-ओ-शान शहनशाह' ह्या ओळी एकाच यमकात एकाच वेळी सुचतात हेही विनोदी वाटतं खरं- गाण्याचे शब्द त्याला पार्श्वसंगीताच्या category साठी योग्य ठरवतात- जश्न्-ए-बहारा आणि इन लमहों के दामन में- ही गाणी पण तर अशीच वापरलीत ना? पार्श्वसंगीतासारखी? Gowariker! You too? स्वदेस किंवा लगानच्या पात्रांना हे ट्रीटमेंट ठीक आहे, पण ऐतिहासिक पात्रांनी काय हत्तीघोडी मारलीत? नितिन देसाई, किरण देवहंस आणि तनिष्कच्या सुवर्णकारांना टाळ्या!! ऋतिकचा अभिनय बरा जमलाय, ash did best possible justice to her role - तसंही ही मंडळी काहीही (नाही) नेसलं तरी देखणी वाटतात्- कास्टिंग फ़ूलप्रूफ़्- UTV चा खर्च (बहुतेक) वसूल... अजून काय हवंय?
|
ता.क.- अजून एक चमत्कार!! 'ख़्वाजा मेरे ख़्वाजा' मध्ये हार्मोनियम ऐकू येतो. मात्र हार्मोनियम १९व्या शतकात भारतात आला. नौशादजींनी मुघल्-ए-आज़म मघ्ये असला काही लोच्या नाही होऊ दिला. B&W चित्रपट होता तरीही के. आसिफ़ने रंगांच्या निवडीत आळस नाही केला हे चित्रपट रंगवल्यानंतर सिद्ध झालं! आपली पिढी कुठल्या रीसर्च च्या गोष्टी करते?
|
मी काहि जोधा अकबर ला पाठिंबा देत नाही, पन सहज माझ्या माहिती प्रमाणे. समशेरीचा रियाज जो होतो त्या तलवारींना धार नसते. ( जश्या तलवारी पोलीस परेड ला वगैरे वापरल्या जातात तशाच या असतात.) आणि प्रशिक्षण आणि युद्ध याची तलवारबाजी वेगवेगळी असते. त्याचे हात वेगवेगळे असतात. आणि तलवारीची संहारक शक्ती तिच्या धारे एवढिच ति समोरच्या वर वार करताना तिच्या angle वर अवलंबुन असते. सराव म्हणुन खेळताना या गोष्टि लक्षात ठेवलेल्या असतात आणि गृहित धरलेल्या असतात. मी मागे एकदा सिंहगडावर गेलो होतो तेंव्हा तिथला एक मार्गदर्शक सांगत होता कि सिंहगडावर एक असे ठिकाण आहे कि कोणतीही कलावंतीण आली कि तिला तिथे उतरवले जात असे. ती तिथे बसुन गायला लागली कि सगळ्या गडावर ऐकु जात असे. ध्वनी पसरविण्यासाठी वास्तुची रचना तशी असु शकते. राजगडावर जो सभामंडप आहे तिथे कोणत्याहि कोपर्याप बसुन बोलले कि महाराजांना ऐकु जात असे म्हणे त्याची रचनाच तशी केली गेली आहे. (आणी हो तो नमक कम है वालं दृश्य फक्त त्या दाईला खुन्नस देण्यासाठी आहे.) हार्मोनियम चा मुद्दा चित्रपट बघताना ध्यानातच नाहि आला
|
Alpana
| |
| Wednesday, March 19, 2008 - 6:19 am: |
| 
|
ध्वनी चा मुद्दा योग्य असला तरी एखाद्या मुघल राणीच्या अंत:पुरातील आवाज दरबारात एकु यावेत अशी सोय केली असण्याची शक्यता कमी
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 19, 2008 - 7:15 am: |
| 
|
अभि, तलवारींना धार नसली तरी हातात जोर असतो ना. तो वाचवण्यासाठी हवंच ना काहीतरी. योडा, हार्मोनियम.. अशक्य आहेस तू.. याला म्हणतात बाल की खाल निकालना... असं इथले जोधा अकबर प्रेमी म्हणतील बघ आता. केवळ विषय म्हणतोयस म्हणून ठिके नाहीतर मुघल ए आझम ची आणि या डबड्या सिनेमाची कुठेही तुलना होऊ शकत नाही.
|
Arc
| |
| Wednesday, March 19, 2008 - 10:52 am: |
| 
|
१०० कोटीचा व्यवसाय केला आहे म्हणे ह्या सिनेमाने http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2837063.cms ही बातमी खरी आहे का?
|
Zakki
| |
| Wednesday, March 19, 2008 - 12:11 pm: |
| 
|
पहा, इतिहास माहित नसेना का? आजकालच्या जगात पैसे कसे मिळवायचे हे कळले त्याला. आता तो कशाला कुणाच्या बोलण्याकडे लक्ष देणार? पुढचा चित्रपट: बाजीराव मस्तानि. 'मुसलमान चालीरिती कित्ती कित्ती चांगल्या आहेत नाही? संकुचित मनाच्या, असहिष्णू हिंदूंनी बिचार्या मुसलमान बाईचे कित्ती हाल केले? वाइट्ट वाइट्ट हिंदू!' त्यात हृतिक, दोन तीन खान, कमी कपडे घालणार्या सुंदर स्त्रिया, असे असले की इतिहास, धर्म हे 'जुने जाऊ द्या मरणालागूनि'! स्वतंत्र, व्यक्तिस्वातंत्र्याला मान असलेला भारत, तिथे पैशासाठी काही पण करावे, लोक नुसते, सौंदर्य, कला, संगीत इ. बघायला येतात नि कोट्यावधी पैसे देतात! याहून अधिक वास्तव काय आहे? चार दोन हुषार लोकांनी चित्रपट चांगला नाही, चुकीचा आहे म्हंटले तरी काय झाले? 'टेंशन नही लेनेका, क्या?'
|
>>> ध्वनी चा मुद्दा योग्य असला तरी एखाद्या मुघल राणीच्या अंत:पुरातील आवाज दरबारात एकु यावेत अशी सोय केली असण्याची शक्यता कमी आइशप्पथ!! कल्पना करा... "असं म्हणतोस? तुला पाहून शत्रूचा सेनापती काय म्हणाला?" "ईऽऽऽ!! उंदीर!! मेले!!"
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|