|
Farend
| |
| Monday, February 11, 2008 - 3:00 am: |
| 
|
प्लेबॉय मधे छापून आलेला एक विनोद आपल्यापैकी कोणाचा होता यात Friends मधे Chandler आणि Ross मधे वाद होतो तेव्हा Joey त्यांना विचारतो की तुम्ही प्लेबॉय जोक्स वाचण्यासाठी आणता की काय? खालचे वर्णन वाचून काहींना तसेच वाटेल, पण कुर्बानी लागला तेव्हा या गाण्यातील दृष्ये जरा अंगप्रदर्शन वगैरे वाली असली तरी सद्ध्याच्या हिशेबाने तो झीनत चा ड्रेस बीचवरचा गणवेषच वाटतो. (आणि आजकाल अश्या दृष्यांबद्दल अंगप्रदर्शन, उत्तानपणा वगैरे शब्द वापरायचे नसतात, 'सेन्शुअल' वगैरे म्हणायचं ) तर कुर्बानी मधे बाकी सगळी धमालच आहे, नागीण लुक घ्यावा की भूत लुक घ्यावा हे न ठरल्यामुळे ( आणखी माहितीसाठी येथे पाहा) विचित्र दिसणारी अरुणा इराणी आहे, गरिबाला लाथाडून पुन्हा "तुम जानते हो मै कौन हू" विचारणार्या अमरीश पुरीला "भगवान तुम हो नही सकते, इन्सान तुम लगते नही और शैतान से मै डरता नही" वगैरे ज्ञानामृत पाजणारा फ़िरोज खान आहे (पण यात तो घोड्यावर बसलेला नाही नेहमीप्रमाणे काउबॉय हॅट घालून), तेव्हा 'बिनाका'त टॉप ला जाण्याएवढं त्यात मधे काय होतं असा आता प्रश्न पाडणारं 'आप जैसा कोई' आहे. धमाल उडवणारा अमजद आहे. तसे बाकी इतर अचाटपणे मला लक्षात नाहीत तेव्हा कोणाला जाणवले असतील तर जरूर टाकावेत, पण एका गाण्याने माझे लक्ष वेधून घेतले, कारण 'कंटिन्यूटी गर्ल' म्हणून श्रेयनामावलीत कोणाचे तरी नाव होते आणि मायबोलीवरच पूर्वी वाचले होते की अशी सलगता ठेवण्यासाठी कोणालातरी बसवून ठेवतात, पण येथे मावळत्या सूर्याबरोबर टायमिंग जमवायचे आहे. कोंबडे झाकून सूर्य उगवायचा थांबत नाही तसेच शूटिंग मधे रीटेक झाले तर त्याच वाक्याला सूर्य पुन्हा तेथेच जाऊन बसत नाही. या गाण्यात प्रत्येक वाक्याला सूर्याच्या पोझिशन्स पाहा: हम तुम्हे चाहते है ऐसे सूर्य मावळण्या पासून २ इन्च अलीकडे मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे एका सेकंदात एवढे ढग कोठून आले? रूठ जाओ अगर तुम तो क्या हो पल मे ऐसे लगे जिस्म से जान जैसे जुदा हो सूर्य आता अस्ताला तेकलय, ढग पुन्हा आलेत हम तुम्हे चाहते है ऐसे सूर्य गायब, हे ठीक पण कडव्यामधे हा लक्ख प्रकाश कोठून आला मग? ज़िन्दगी बिन तुम्हारे अधूरी मधे सूर्याचा नाद सोडून दिलाय बहुधा, कॅमेरा फक्त व्यक्तींवर तुमको पा लू अगर हर कमी मेरी हो जाये पूरी एवढ्या गडबडीत एक चांगले डायरेक्षन सुटते, विनोद खन्नाला त्याची मुलगी येऊन बिलगतानाचे या ओळीबरोबर जमलेले टायमिंग हम तुम्हे चाहते है ऐसे सूर्य पुन्हा अर्धा वरच? अरे मगाशी बुडाला होता ना पूर्ण? का ते Teletubbies बाय करून गेल्यावर पुन्हा again, again करत येतात तसे चालले आहे? ले चलेंगे तुम्हे हम वहॉपर आता सूर्य खरच पश्चिमेला उगवतो का असे वाटेल, कारण पुन्हा वर, ढग ही आले तनहाई सनम शहनाइ बन जाये जहॉपर पुन्हा अस्त हम तुम्हे चाहते है ऐसे सूर्य अर्धा वरच अजून येथे पाण्यात उभा असल्याने विनोद खन्ना जीन फोल्ड करतो त्यामुळे पूर्वी आपल्याकडे लाल पिवळे 'जर्किन्स' आणि वाट्टेल त्या उंचीची जीन पॅंट घेऊन पायापेक्षा लांब असलेला बॉटम उलटा वरती फोल्ड करून लोक हिंडत असत तसे दिसते आणि मुळात बायकोही नसताना स्वत:च्या आठ दहा वर्षाच्या मुलीला वार्यावर सोडून ज्याची आपली गेल्या काही दिवसात ओळख झाली आहे अशा आणि नाही नाही ते धंदे करून नसती लफडी अंगावर ओढून घेणार्या चोर "दोस्ता" साठी ज्यांच्याशी आपला काही संबंध नाही अशांकडून चाळीस पन्नास गोळ्या अंगावर घेऊन जान देणे म्हणजे 'अल्ला को प्यारी' असलेली कुर्बानी? ही जबाबदारीची जाणीव पाहून मात्र करमणूक झाली
|
Slarti
| |
| Monday, February 11, 2008 - 6:08 am: |
| 
|
अमोल, त्यातले 'क्या देखते हो... सूरत तुम्हारी' हे गाणं.... त्यातला झीनतचा कपडा बघा, फिरोझ खानच्या चेहर्यावरचे भाव(!!), कॅमेरा अन् झीनत यांचे अँगल्स बघा.... पहिल्या दोन ओळी दादा कोंडक्यांकडून लिहून घेतल्यात असं वाटतं. शिवाय चित्रण बहुतेक सह्याद्रीतलं असावं. तिथे त्या झीनतचा अवतार पाहून करवंदाच्या जाळीत मध्येच एक passion fruit आलय असं वाटत राहतं.
|
Bee
| |
| Monday, February 11, 2008 - 6:15 am: |
| 
|
इतक निरिक्षण तुम्ही कसे काय करता गळ्या :-)
|
Slarti
| |
| Monday, February 11, 2008 - 7:18 am: |
| 
|
बी, कुर्बानी आणि एकंदरीतच फिरोज खानचे चित्रपट निरीक्षणीयच आहेत.
|
Bee
| |
| Monday, February 11, 2008 - 7:47 am: |
| 
|
ती जिनत अमान असल्यामुळे का :-) मी परवा तिसर्यांदा आराधना पाहिला. वंदना फ़क्त जेल मधे १२ वर्ष असते. जेंव्हा ती जेलमधे जाते तेंव्हा तिचा मुलगा ८ वर्षांचा असतो. जेंव्हा ती बाहेर येते तेंव्हा केस पिकलेले आणि चांगली ७० वर्षाची ती दाखवली आहे. १२ वर्षात इतका बदल योग्य वाटत नाही
|
Dakshina
| |
| Monday, February 11, 2008 - 8:15 am: |
| 
|
१२ वर्षात इतका बदल योग्य वाटत नाही>>>> अहो अराधनात एका भेटीत... जर का शर्मिला प्रेग्नंट रहात असेल, तर हे का शक्य नाही? आपण आपल्या आसपास हजारो लोक पहातो ज्याना काही केल्या मुलं होत नाहीत. आणि आपल्या हिंदी चित्रपटात मात्र, एकदा पाऊस पडला, आणि हिरो, हेरॉईन भेटले, की लगेच 'मैं तुम्हारे बच्चे की मां ...'
|
Ajjuka
| |
| Monday, February 11, 2008 - 9:12 am: |
| 
|
पहिल्या ओळी दादा कोंडकेंच्याकडून.... अगदी अगदी!! चिंधी कपडे घालून क्या देखते हो, क्या चाहते हो विचारायचं म्हणजे अंमळ जरा... आणि त्यातून त्याने सूरत तुम्हारी, चाहत तुम्हारी अशी उत्तरं द्यायची.. अरे शेंबडं पोर पण विश्वास नाही ठेवणार. दक्षिणे.. खरं गं.. हिरोहिरोयनीचा गालाला गाल जेमतेम लागला की दोन गुलाब जवळ येतात एक भुंगा फिरतो आणि... ट्यांहा ट्यांहा.. इतकं सुपरफास्ट फक्त त्यांचंच घडतं हिंदी सिनेमात ज्यांचं लग्न झालेलं नसतं. आणि कारटं येऊन आयुष्याचा घोळ करणार असतं. एरवी लग्न झालेल्या यच्चयावत भय्याभाभी, जिजिजिजू र.धो. कर्व्यांच्या शिष्यगणांपैकी वाटतात.
|
Bee
| |
| Monday, February 11, 2008 - 9:26 am: |
| 
|
आराधना मधे शर्मिलाचा मेक अप मॅन खास करून म्हातार्या शर्मिलाचा मेक अप मॅन खूप चांगला कलाकार असावा. कारण ती हुबेहुब म्हातारी दिसते. हल्ली झी आणि स्टारवर तरणे ताठे पोर आजोबाचा रोल करतात तेंव्हा किव येते मेक अप मॅनची. अधोगती होत आहे
|
Ajjuka
| |
| Monday, February 11, 2008 - 9:58 am: |
| 
|
का बिचार्या मेकपवाल्याला नावं ठेवता रे? हे साले पाठांतरवाले दळभद्री नट, यांना दिसायचं नसतं म्हातारं आणि दिग्दर्शक घेतो चालवून. मेकपमॅनला मग कोण काळं कुत्र विचारत नाही. असं असं कर नाहीतर चालू पड हीच भाषा असते. शेवटी रोजावर कमावतो तो माणूस. हातावर पोट असतं. त्याची काय बिशाद नाही म्हणेल. अधोगती कसली डोंबलाची. हल्ली पूर्वी असं करायचं तर कितीतरी मूर्ख गोष्टी पूर्वी चालवून घेतल्या जात होत्या त्या आता कोणी करू धजत नाही. आणि टिव्ही सिरीयल्स हा एक प्रचंड विनोदी पण अनेकांना पोटाला देणारा बाजार आहे त्यामुळे त्याबद्दल काही न बोललेलंच बरं.
|
Bee
| |
| Monday, February 11, 2008 - 10:32 am: |
| 
|
अज्जुका, मेक अप खोलीच्या आत मधे काय संवाद होतात मला माहिती नाही. झी सोनी तर जाऊ दे कित्येक चित्रपटात देखील मेक अप हा दर्जेदार नसतो. पांढरे केस वार्निस लावल्यासारखे दिसतात. पुर्वी नाही का तरुण स्मिता पाटिलने म्हातार्या स्त्रिची भुमिका केलेली. तो मेक अप कसा झक्कास जमला होता. तेंव्हा मेक अप मॅनचे चालायचे आणि आता चालत नाही असे कसे. सगळ्याच बाबतीत अधोगती आहे. एक मेक अप मॅन सोडला किंवा वुमन सोडली तर बाकीचे चांगले असे नव्हते म्हणावयाचे मला. आणि झीवरील नट्या भावनाशील संवाद म्हणताना इतक्या थरथर का कापतात. भावना व्यक्त करताना का मनुष्य थरथर कापतो आणि कंप सुटतो अंगाला?
|
Mi_anu
| |
| Monday, February 11, 2008 - 10:41 am: |
| 
|
वृद्धत्व आले, चरित्र अभिनेती किंवा अभिनेती चित्रपटात एका मोठ्या २०- २५ वर्षाच्या घोड्याचा बाप किंवा आई दाखवली तरी या वृद्ध व्यक्तीचा केसांचा फक्त एका बाजूचा १ इंच रुंदीचा एकच पट्टा पांढरा होऊन बाकी केस काळेभोर दाखवतात तो सर्वात मोठा चक्रमपणा आहे. असे फक्त एकाच पट्ट्यापुरते पांढरे झालेयत का कधी कोणाचे केस? आणि तेही चमकदार चंदेरी पांढरे? सामान्यत: पांढरे झालेले केस चमकदार गुळगुळीत न दिसता थोडे रुक्ष आणि कोरडे दिसतात. सध्या हिंदी मालिकांमध्ये तर लहानलहान तरुणींना सर्रास त्यांच्याइतक्या किंवा त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या तरुणीची मा केलेलं असतं. या मा ने केस काळे केले तर नायक तरुणीऐवजी तिच्या आईलाच जास्त पसंत करेल असे वाटते.
|
Shraddhak
| |
| Monday, February 11, 2008 - 11:22 am: |
| 
|
का ते Teletubbies बाय करून गेल्यावर पुन्हा again, again करत येतात तसे चालले आहे?<<<<<<<<< LOL फ़ारेंड, अगदी अगदी. मोहोब्बतें आणि कुर्बानी दोन्हीवरचे ' अचाट नि अतर्क्य ' लेख आवडले. 
|
Swa_26
| |
| Monday, February 11, 2008 - 11:43 am: |
| 
|
आईशप्पथ... आत्ता इथे FM Gold वर हेच गाणं चालु आहे नि मी एकटीच हसतेय हपिसात!!
|
Asami
| |
| Monday, February 11, 2008 - 2:21 pm: |
| 
|
इतक निरिक्षण तुम्ही कसे काय करता गळ्या :-) हे post वाचून मी परत एकदा ते करणार्याचे profile बघून खात्री करून घेतली. कुर्बानीमधे तुम्ही हे continuity tec निरिक्षण कसे करू शकता ? चला बोळा निघाला , पाणी वाहते झाले. Bee दिवा घे रे
|
Maitreyee
| |
| Monday, February 11, 2008 - 2:26 pm: |
| 
|
लय खास रे एरवी लग्न झालेल्या यच्चयावत भय्याभाभी, जिजिजिजू र.धो. कर्व्यांच्या शिष्यगणांपैकी वाटतात.

|
>> ही जबाबदारीची जाणीव पाहून मात्र करमणूक झाली
आणि हे वाचून आमची पण ती झीनत ज्या प्रकारे सगळ्या मूव्हीजमधे आणि विशेषतः गाण्यांमधे निरागस दिसायसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते ते तिच्या कपड्यांशी इतके विसंगत असते की सॉल्लिड हहपुवा होते. ते ओठ मुरडत बोलणे तिला अज्जिबात शोनाहो. यादोंकी बारात मधल्या चुरा लिया है मधली ऍक्टिंग तर "कौन मै?" आणि मग गाणे म्हणताना पण. >> एरवी लग्न झालेल्या यच्चयावत भय्याभाभी, जिजिजिजू र.धो. कर्व्यांच्या शिष्यगणांपैकी वाटतात.
मग?आराधना पॉप्युलेशन ला काही काऊंटर ऍक्शन नको का? देशाचे जबाबदार नागरीक म्हणून?
|
Marhatmoli
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:28 am: |
| 
|
Farend , HHPV मस्तच लिहलय. या कुर्बानि मधलि लहान मुलगि हि KKHH मधल्या मुलिचि Gen. 1 असावि, एरवि निष्पाप निरागस ई. असणारि हि बालिक महत्वपूर्ण प्रसंगि धोरणिपणे गप्प बसते. उदा. विनोद खन्ना आणि फ़िरोझ खान यांच्या प्रथम भेटिचा प्रसंग. हि बालिका झीनत काकुच्या अंगावर पाणि उडवण्याचा खेळ खेळत असते (जैसि heroin वैसा खेल?), तितक्यात तिथे अतिशय नाट्यपुर्ण रित्या नुकतिच ओळख झालेले विनोद आणि फ़िरोझ येतात. मुलिच्या योग्य खेळ निवडिला फ़िरोझ काका ताबडतोब प्रशस्तिपत्रक देतात आणि काकुंना विचारतात कौन है ये बच्चि? तेंव्हा काकु (ज्या दोन मिनिटांपूर्वि पोरिचे नाव घेउन कान्फ़टात मारिन अशि प्रेमळ धमकि देत असतात) सहजपणे म्हणतात मुझे नहि मालुम युहि खेलने आगयी (आणि direct पाणि उडवायला लागलि?) तेन्व्हा हि बालिका पण अळिमिळि गुप चिळि म्हणते हो उगाच नविन ओळख झालेल्या काकांच्या मनात संशय कलोळ्ळ नको!
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 19, 2008 - 7:06 am: |
| 
|
अमोल हाइट आहे ही कंटिन्युइटी बारीक लक्ष तुझ सुर्यावर कस काय खिळुन राहिल रे??? ही सादह्ना तुला जमली झिनत समोर?? स्लार्टी, अज्जुका मला एक प्रश्न पडला आहे. त्या काळात म्हणे मर्दानगी म्हणुन फ़िरोज खान अस सुत्र होत. हे का????? कारण त्याची पर्सनॅलिटी तर काही एवढी भारी नाही. उलट कुर्बानी मध्येच पाहिल तर विनोद खन्नाच जास्त रुबाबदार आहे की. BTW हाच फ़िरोज खान एका फ़िल्म मध्ये मुकेश खन्ना (शक्तिमान) चा मुलगा आहे आणि मनिषा कोइरालाचा काका. त्यात संजय दत्त आणि कबीर बेदी आहेत. त्या फ़िल्मच नाव विसरलो मी. त्यात देखिल बरच अंगप्रदर्शन करवुन घेतलय नगमाकडुन. तिला स्विमिंग कॉस्चुम म्हणजे अगदीच........
|
Mi_anu
| |
| Tuesday, February 19, 2008 - 7:41 am: |
| 
|
तो सिनेमा यल्गार. शेवटी संजय दत्त आणि फि खा एकमेकांना वाळवंटात एकाच वेळी गोळ्या मारुन मरतात. भयंकर रटाळ चित्रपट होता. फिरोझ खान पेक्षा त्याचा भाऊ उर्फ ह्रितिकचा सासरा उर्फ टिपू सुलतान संजय खानपण परवडला बघायला असे वाटते. (दगडापेक्षा वीट मऊ तसे. अर्थात ही वीट पण भट्टीत भाजलेली बर्यापैकी टणक वीटच होती!)
|
Manuswini
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:13 am: |
| 
|
दक्षिणा, "fertile soil" चा योग असेल. जर एका पावसात भीजून 'मै तुम्हारी बच्चे की मां' हिंदी शीनेमातला प्रकार म्हणजे. नाहीतर 'भगवान' जरा ज्यास्त उदार असेल हिंदी शीनेमातल्या प्रेम करणार्यावर, ते नाही का मुस्लीम बंधूसारखे 'भगवान की देन'...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|