|
Manuswini
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:19 am: |
| 
|
farend, मानले बुवा, एवढे आपण पण निरीक्षण करत नाही. त्यात झीनत आहे म्हटल्यावर मुलांचे 'सुर्यावर' लक्ष असणे म्हणजे.. Goodone!
|
Dakshina
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:43 am: |
| 
|
नाहीतर 'भगवान' जरा ज्यास्त उदार असेल हिंदी शीनेमातल्या प्रेम करणार्यावर, ते नाही का मुस्लीम बंधूसारखे 'भगवान की देन'... >>>>> मनू.... बास, पोट दुखायला लागलं आता... जरा वेळ या बी बी वर येणारंच नाही.
|
Mansmi18
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:29 pm: |
| 
|
बारीक लक्ष तुझ सुर्यावर कस काय खिळुन राहिल रे??? --------------------------------------- झकासराव अगदी बरोबर! आम्हाला त्या गाण्यात अर्जुनाला दिसणार्या पोपटाच्या डोळ्याप्रमाणे इतर काही दिसले नव्हते
|
Divya
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:55 pm: |
| 
|
सही comments दक्षिणा, मनुस्विनी. त्यात झीनत आहे म्हटल्यावर मुलांचे 'सुर्यावर' लक्ष असणे म्हणजे.. हे सुद्धा एकवेळ खपेल, पण मंगलाष्टका ऐकताना भुगोलात शिरुन गंगा आधी कुठे मिळते यावरुन मुलीचे आधी कुणावर तरी प्रेम असावे असा अंदाज म्हणजे... ए. ते. न. :P take it lightly...
|
Farend
| |
| Tuesday, February 19, 2008 - 6:17 pm: |
| 
|
दिव्या LOL भावना पोहोचल्या. लोकहो म्हणूनच मी ती पहिली प्ले बॉय ची कॉमेंट टाकली होती. तरीही तो पार्ट लिहिताना मला वाटलेच होते की 'असा मी असामी' तील 'तो ब्लाऊज बघितलात का?' प्रमाणे प्रतिक्रिया येणार पण एक भा. प्र. अशाच प्रतिक्रिया आधीच्या 'मोहब्बते' वर शमिता शेट्टीच्या बाबतीत आल्या नाहीत. तेव्हा 'त्या' दृष्टीने शमिता आणि झीनत यात फरक मुलीही करतात का? mi_anu त्यात तो शेवटी वाळवंटात चार इंच उंचीची झुडुपे असताना ते दोघे एकमेकांना 'शोधत' फिरतात तो शॉट आठवतो का? सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
|
Zakasrao
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:13 am: |
| 
|
मी अनु अगदी बरोब्बर. यल्गारच आहे तो. अमोल मला आथ्यवला रे. कैच्या काय पिक्चर होता.
|
त्या 'यल्गार' च्या 'आखिर तुम्हे आना है' गाण्यात मला एक मजा नेहेमी वाटते- ती नगमा इकडेतिकडे नाचून वेताळासारखी संजय दत्तच्या खांद्यावर जाते (का कडेवर्- कुक्कुलं बाळ!) मग भर पावसात ते स्विमिंगपूल मध्ये जातात (मला पोरवयात ते खूप dumb वाटायचं- पाऊस पडतांना कुणी झाडाला पाणी घालतं का? त्या प्रमाणेच कुणी डुंबतं का?- इयत्ता तिसरी. घ्या!) कुर्बानीच्या गाण्याची ओळ पण "आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए, तो बाप बन जाए" म्हणून गायच्या क्लासमेट्स!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|