खरेतर आधी या विषयावर खुप चर्वन झाले आहे. मला असे वाटते की शिक्षण पध्दतीत थोडे बदल आणले तर हा त्रास आपोआप कमी होईल. जसे १२ वी पर्यंतचे शिक्षन सर्वांना कॉमन असायला पाहीजे. त्यामुळे आपोआप १० वि चे महत्व कमी होईल. कारण एकदा ११ वि ला आर्टस घेतले की त्या विद्यार्थाच्या सायन्सचा वाटा बद होतात. १० वी ला ९० टक्के असलेकीच सायन्सला जाता येते हे सर्व ईथे बंद होईल. १२ वी नी आताच्या CET च्या धर्तीवर प्रत्येक विषयाची परिक्षा असावी जसे कॉमर्स ला जायचे असेल तर कॉमर्स ची ऐन्टरन्स, वा लॉ चे इंटर्न्स वैगरे. १२ वी च्या मार्कांना महत्व न देता ह्या CET चा मार्कांना महत्व द्यावे. १२ वी पर्यंत सर्व विषय सर्वांना कॉमन त्यात दोन सायन्स्चे विषय, एक अंकाऊंट्स चा विषय, ऐक पर्सनल बिहेविअर वैगर. मग जर मला लॉ ला जायचे असेल तर मी इतर पुस्तके वाचुन ती CET देईल व तिकडे पडलेल्या मार्कांवर जाईल. बेटर यट एक मला त्याच परिक्षेत अनेक प्रेफरन्स सुचविता अले पाहीजेत जसे पहीला सायन्स, दुसरा लॉ वैगरे. ह्यामुळे रिझर्व्हेशन कमी होन्यास मदत होईल व सर्वांना चान्स मिळेल तसेच आजच्या किडलेल्या शिक्षन पध्दतीला बदलायला वाव मिळेल. राजकिय इच्छ्शक्ती असल्याशिवाय दोन्ही गोष्टी होनार नाहीत.
|
पण प्रश्ण असा आहे की आरक्षण नको यावर एकमत आहे का? ते सहसा कधीच नसत.
|
गजानन, ते तर आहेच. पण म्हणजेच, तू ओपनवाल्यांची व्यथाच दाखवली आहेस की मला नाही वाटत की राखीव जागा घ्यायच्याच नाहीत अस केल्यास आरक्षण नष्ट होईल. कोणितरी असतीलच प्रवेश घेणारे. ते रद्द करायला वेगळा मार्ग वापरावा लागेल. (जर रद्द करावेसे वाटत असेल तर)
|
Ninawi
| |
| Wednesday, January 23, 2008 - 5:01 am: |
|
|
@Kedar - You are on the point and I don't foresee this happening in India. This is perfectly implemented in few European countries (they have completely free education) but taking into account our sample size and political *motivation*, it would take ages. And as long as the current system is in place, reservation should be there, just not on the caste basis but on financial situation of the student. At the moment, how many can really pay INR50k per year fees of their son's/daughter's engineering degree?
|
Sush
| |
| Wednesday, January 23, 2008 - 5:24 am: |
|
|
माझ्या काहि friends मला म्हणायच्या, ज्याना open मधे जागा मिळते ना त्यानी जातिचा दाखला दाखवु नये. म्हणजे इतर राखिव लोकाना ऐडमिशन मिळेल. आमच्या कॉलेज मधे राखिव विद्यार्थ्याना scolership मिळत असे. त्याबद्दल त्यांचे म्हणनेकाय तर म्हणे हा आमचा हक्क आहे. आमच्या पुर्वजानि आमच्या साठि सोय केलि आहे. इतर वेळि केटेगिरि चे नाव काढले कि हे चिडनार. हेहि चुकिचे आहे ना. आणि मी कोणि महान नाहीये. सामान्य माणुस आहे. मग थोडा स्वार्थि विचार मी केला तर काय बिघडलं. जेव्हा आपल्यापेक्शा कमि marks असुन एखाद्याला केवळ आरक्शणामुळे seat मिळते तेव्हाच ते दुख्: कळते. आणि बरेचदा open च्या seats full असतात आणि राखिव सठि कोणि ca ndidate मिळत नाहि.त्या जागा तशाच रहातात आणि open चे candidate ऐड्मिशन न घेता परत जातात.
|
प्रति, नेमस्तक अहो जरा या सर्व जातीविषयक पोस्ट त्या जातिव्यवस्था वाईटच का समजली जाते अस जो बिबि आहे तिथे हलविता येईल का? असो तर, माझे काहि विचर, आणि मी कोणि महान नाहीये. सामान्य माणुस आहे. मग थोडा स्वार्थि विचार मी केला तर काय बिघडलं सुश तुम्ही जसे म्हणताय तसे आमच्यातले कित्येक लोक म्हणतात. आहेत सवलती तर का नाहि वापरायच्या? जेंव्हा बंद होईल तेंव्हा बघु... आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्या सीट्स भरल्या जात नाहित त्या नंतर ओपन साठी दिल्या जातात. बाकि तुम्ही म्हणालात ते खरेच आहे. कुठेहि प्रवेश घेताना मात्र जात पुढे केली जाते आणि बाकि वेळेस मात्र जातीचा उल्लेख केला कि राग येतो बर्याच जणांना.. बरे तुम्हा सर्वांना असे म्हणायचे आहे का कि आरक्षण पुर्ण पणे रद्द झाले पाहिजे? पण असे लाखो लोक आहेत कि ज्यांना अंगात बाकि कोनाहि पेक्षा जास्त हुशारि असुन, शिकायची अमाप ईछ्चा असुनहि फक्त आर्थिक परिस्थिती नाहि म्हणुन शिक्षण घेता येत नाहि. त्यांच्या साठि आरक्षण ठेवले तर काय बिघडेल? जर आर्थिक परिस्थिती च्या आधारवर आरक्षण ठेवले तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल, नाहि का?
|
जरा विषय बदलावा. मी सध्या नवीन ठिकाणी रहायला आलोय. इथे सगळ्यांसाठि मिळुन एकच फ्रिज आहे. आणि स्वयंपाकघर पण एकच आहे. तिथेच सगळे ठेवावे लागते. इथे जे खावे लागते ते टिपिकल मल्लु स्टाईल असते. जे मला आजिबात आवडत नाहि. आणि शिवाय माझ्या काहि सवयी मी सोडु शकत नाहि. दुध, ताक, बदाम, सफरचंद, मध, खजुर वगैरे. मी आणुन ठेवतो आणि बाकिचे मी नसताना त्याच्यावर अधुन मधुन हात मारतात. कोणी कबुल होयाचा तर प्रश्नच येत नाहि. एखाद्या दिवशी दुधामधे जुलाबाची गोळी टाकुन ठेवावी असा क्रुर विचार मनात येतो पण मी हो टाळतोच आहे.
|
Dakshina
| |
| Wednesday, January 23, 2008 - 10:45 am: |
|
|
अभिजीत, असे प्रकार होत असतील तर तुम्ही एके दिवशी स्पष्टपणे त्यांना सांगा, की तुम्ही आणता त्या वस्तू फ़क्त तुमच्यसाठी आहेत, त्यांच्यासाठी नाहीत.
|
Ankyno1
| |
| Wednesday, January 23, 2008 - 11:31 am: |
|
|
>>>एखाद्या दिवशी दुधामधे जुलाबाची गोळी टाकुन ठेवावी वाचता वाचता माझ्याही मनात हाच विचार आला होता... पण त्यानी साध्य काहीच होणार नाही... संबंध मात्र बिघडू शकतील... त्यामुळे स्पष्टपणे सांगणेच योग्य...
|
Orchid
| |
| Wednesday, January 23, 2008 - 11:45 am: |
|
|
माझी १ मैत्रीण माझ्याकडे जेवायला आली होती तेव्हा तिच्या मुलाला ओकारी झाली, म्हणुन मी माझ्या मुलाचा ड्रेस तिच्या मुलासाठी आणि माझा कुर्ता तिच्यासाठी दिला[तिचेही कपडे खराब झाले होते म्हणुन]. त्यानंतर ३-४ महिन्यांनी हिने ते कपडे परत केले ते दाग पाडुन. हे डाग सहज दिसण्याएतके मोठे होते. मी समजु शकते की अस कोणच्याही हातुन होउ शकत पण हीने परत देतान त्याचा उल्लेखही केला नाही. सॉरी म्हणण तर दुर की बात! शिवाय माझा कुर्ता तर चक्क ड्रायरमधुन काढुन तसच बोळा पिशवीत कोंबुन आणला होता.
|
Dakshina
| |
| Wednesday, January 23, 2008 - 12:29 pm: |
|
|
Orchid मी तुमच्या जागी असते ना.... तर मी तो कुर्ता तिला परत देत (राग लपवून) प्रांजळपणे सांगितलं असतं की, एकदा कुणाला घालायला दिलेला कपडा मी परत येण्याची अपेक्षा ठेवत नाही.... आणि तसाही तो काही नविन नव्हता... जुना(ट)च होता... तेव्हा आता तो तुझ्याकडेच ठेव, आणि तूच घाल.
|
Supermom
| |
| Wednesday, January 23, 2008 - 12:56 pm: |
|
|
दक्षिणाचं बरोबरच आहे. पण याचा अर्थ तिने ते कपडे तसेही पुन्हा पुन्हा वापरून परत केलेत. ईईई... मग तिला देऊन टाकलेलेच उत्तम. माझ्या पण एका मैत्रिणीनं माझी एक सुन्दर साडी लग्नात वापरण्यासाठी नेली होती. परत देताना फ़ॉल च्या खालच्या बाजूला सगळीकडे चिखलाचे डाग... इतका राग आला ना...
|
च इथे एक तर सगळ इतक महाग मिळते ( अजुनही काहिहि घेताना रुपयांमधे मोजायची सवय गेली नाहि !!!!!!!!!!) मध घेताना तर अगदि जिवावर आलं होतं. घरातुन एक किलोची बाटली का घेउन आलो नाहि असे वाटते.!!!!!!!! दुधपण जाम महाग आहे. इथे एखादि म्हैस नाहितर गाय पाळावी काय?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 23, 2008 - 3:10 pm: |
|
|
अभिजीत, तु अमेरिकेत आहेस का? $६०-८० पर्यंत छोटा फ़्रीज मिळतो. तुझा इथे ३-४ वर्षांचा मुक्कम असेल तरी तो विकत घेणं सोईचं होईल. (अगदी कुलुपासगट पण मिळतो.) आधी मित्रांना सांगून पहा. त्यानंतरही खादाडी सुरूच राहिली तर सरळ आपलं वेगळं ठेवावं. इलाज नसतो.
|
Orchid
| |
| Wednesday, January 23, 2008 - 4:28 pm: |
|
|
दक्शिणा आणि सुपरमॉम तिने तो कुर्ता बहुतेक तिच्या रंग जाणार्या ड्रेसबरोबर धुतला होता. त्यामुळे त्यावर मरुन रंगाचे डाग पडले होते. मग हीने वस्तादपणा करुन तो पिशवीत भरला आणि मला दिला.मीही तीच्यासमोर काही चेक केला नाही. घरी येउन बघितल तेव्हा कळल. आता काही बोलायला भीड वाटतेय. शी: भिडस्त स्वभाव फार वाएट!
|
Chinnu
| |
| Wednesday, January 23, 2008 - 5:08 pm: |
|
|
अभिजीत, तुमच्या वस्तुंवर तुमच्या नावाचा tag लावून ठेवा आणि मित्रांना शांतपणे आणि सतत सांगुन पहा की मला माझ्या वस्तुंना हात लावलेलं आवडणार नाही म्हणून. तुम्ही सुद्धा वस्तु वापरली की नीट wrap करून बंद करून, टॅग परत लावून ठेवत जा. नाहीतर दुसरी जागा पहा.
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 23, 2008 - 7:36 pm: |
|
|
अभिजीत, तुमच्या वस्तुंवर तुमच्या नावाचा tag लावून ठेवा आणि मित्रांना शांतपणे आणि सतत सांगुन पहा की मला माझ्या वस्तुंना हात लावलेलं आवडणार नाही म्हणून.>>>>आणी अनवधानाने तुम्ही ही त्यांच्या वस्तु वापरू नका..
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 23, 2008 - 7:44 pm: |
|
|
ऑर्चिड! अगदी काल परवाचीच गोस्ट असेल तर, अवश्य आणी स्पष्ट्च सांग
|
म्रिन्मयी(म्रुन्मयी?) मी अमेरिकेत जाण्याइतका हुशार नाहि आहे(हास्यमुद्रा). हम कतारमें है! आणि मी रुम बदलु शकत नाहि. कंपनीने दिलेला व्हिला आहे दहा जणांना मिळुन
|
Aashu29
| |
| Thursday, January 24, 2008 - 9:06 am: |
|
|
मी अमेरिकेत जाण्याइतका हुशार नाहि आहे......... असं म्हणायची काहि गरज नाहि हो अभिजित, आजकाल जो उठतो तो जातो उसगावात, त्यातले सर्वच ग्रेट आहेत असं नाहि काहि. उसगावातल्यांना दुखवायचा विचारही आलेला नाहिये बरंका मनात
|