|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:37 am: |
|
|
मला वाटते आपण सध्याच्या समाजतल्या असमनतेबद्दल चर्चा करणे जास्त श्रेयस्कर ठरेल. उगाच पुराणातली वांगी खणुन काय फायदा? उगाच चर्चा भरकटत आहे.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:37 am: |
|
|
गिरीराजचे म्हणणे बरोबर आहे कि जरा अतीच आज्ञाधारक पणा किंवा बाऊ होतो पण सन्मे तुझे म्हणणे नाहि पटत मला. तीची आई इथेच जवळपास रहात असली तर ठिक आहे तीला बोलावुन घेणे पण इतक्या लांबुन येण्याची खरच गरज आहे का?? दुसरा मुद्दा म्हणजे मुल सांभाळायची जबाबदारी हि फ़क्त आई, सासु, पर्यायाने बाईचीच असते का?? त्या त्यांच्या मुलालाहि ८ दिवस घरी थांबायला सांगु शकतात. हि अजुन confirm नाहि अशा परिस्थीतीत ८ दिवस रजा फ़क्त मुल सांभाळण्यासाठि घेणे योग्य नाहि असे मला वाटते. आणि जर मुलांना पाळणाघरात ठेवले तर ते असुरक्षित असते असे म्हंणणे वाढत्या पाळणाघरांची संख्या बघुन तरी वाटत नाहि. आणि मला तरी असे वाटते कि आपल्याला नक्कि काय हवे हे आपण ठरवावे आणि त्यानुसार उपाययोजना करावी आणि ती करताना मुलगा आणि मुलगी भेद करु नये.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:40 am: |
|
|
रमानी मला हेच म्हणायचे आहे. पण इथे त्या मुली असे का ऐकुन घेतात? विरोध का नाही करत? हे नाही कळत.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:42 am: |
|
|
पण मुल लहान असताना अस नाही होत. जनरली आई शिवाय इतकं लहान पोर कसं रहणार म्हणुन बाऊ केला जातोच. आजतागायत तरी मी ८-१० महीन्याच्या मुलाला ताप आला आहे, म्हणुन रजा घेणारा बाप नाही पाहिला.
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:45 am: |
|
|
गिरी, जियो मेरे भाय! आज्ञाधारकपणाचा अतिरेक. सगळ्यात मोठ्ठा प्रॉब्लेम.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:45 am: |
|
|
हो तेही खरच आहे. इथे ही मुल ५ वर्षाची आहेत.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:45 am: |
|
|
सखी, अगं मुल लहान असताना त्याची बाहेर आबाळ होइल हे इतक्या पद्धतशीरपणे ठसवलं जातं ना, की शेवटी आईची ममता घात करतेच. अजुन एक, मला रमणी म्हणा.
|
Chyayla
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:55 am: |
|
|
मुळात स्त्रियांनीच एकमेकिचा आदर करायला शिकणे खूप गरक्जेचे आह सखी, गिरीराज चर्चा वळणावर आणल्याबद्दल धन्यवाद. रमणीच्या मताशी सहमत पुराणतली वांगी ईथे काढायची काहीच गरज नव्हती. गिरीराज चे मत योग्य आहेच. पण मला वाटत त्याकाळची कारणेही असावी जसे गुलामी, गरीबी, तर त्या च्याही पुर्वी आक्रमणे या गोष्ठींचा समाजाच्या निकोप घडी वर फ़रक पडतोच आज जेमतेम ६० वर्ष झालीत स्वतंत्र होउन ज्यात आपण जरा मोकळा श्वास घेतोय त्यामुळे ही असमानता दुर होण्यास मदत होत आहे असे वाटते. असो माझ्या कडुन चालु वादावर हे शेवटचे पोस्ट... तुम्हा लोकांचा सगळ्यांनी हुसेनला शिव्या घातल्याच पाहिजेत हा fascist आग्रह मी मानणार नाही. एक्दम बरोब्बर.. मला हेच दाखवायचे होते त्यासाठीच MF Husain चा विषय आणला होता. तो हेतु सफ़ल झाला. आज जी समोर संस्कृतीची विकृती या माणसाने चालवली आहे त्याचा निषेध करायला तोंड सुद्धा उघडत नाही., का तर Fascist ठरण्याची भीती. तर तथाकथीत ज्याची खात्रीलायक माहितीही नाही (ईंडोलोजी चा कोणताही अभ्यास न करता) असल्या विधीसाठी संस्कृतीची शिसारी यावी? हा दुट्टप्पीपणा, विरोधाभास तुच स्वता: उघड करुन दाखवलास, आता मला याउप्पर काहीच लिहायची आवश्यकता नाही. यानंतरही केवळ संस्कृतीच्या नावाने टाहो फ़ोडत जुनी हाडे चघळत बसायचीत तर खुशाल बसावे. सगळ्यात महत्वाचे निघुन गेलेल्या तथाकथीत विधीचा निषेध करताना तुम्ही Fascist ठरत नाहीत. मात्र MF Husain च्या धढधडीत पणे दिसणार्या विकृतीचा निषेध करताना Fascist ठरता... क्या बात है? ही केवढी मोठी असमानता आहे. अजुन एक वैयक्तिक हल्ला तुच सुरु केलास मध्ययुगीन, तब्लीज, पुरुषप्रधान वैगेरे... माझ्या अर्ध्या हळकुंडाने एवढा थयथयाट करायची काहीच आवश्यकता नव्हती.
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:04 pm: |
|
|
च्यायला तुला बोंबलायचं तेवढं बोंबल. तू माझी पोस्टस वाचलीच नाहीयेस किंवा तुला कळलंच नाहीये मी काय म्हणतेय ते. त्यामुळे मी जे दावे केलेच नाहीयेत ते मी म्हणालेय असं तू सतत ओरडून सांगतोयस. असल्या तुझ्या बडबडीला किंमत द्यायची मला गरजच वाटत नाही.
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:04 pm: |
|
|
समाधी अवस्थेचा उल्लेख आहे का तुमच्या एंडोलोजीत? पसायदानाची प्रगल्भता काय आहे हे माहीती आहे का तुमच्या त्या ईंडोलोजिवाल्यांना..?
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:18 pm: |
|
|
धोंडोपंत, त्याचा समानतेशी काय संबन्ध?? मुद्द्यावर आलेली चर्चा गुद्द्यांवर का टाकत आहत?
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:37 pm: |
|
|
रमणी, अगं या काही लोकांची ही नेहमीचीच पद्धत आहे. कुठलीही चर्चा नीट होऊ द्यायची नाही. यांच्या डोक्यात जी एक संस्कृतीची गोड गोड व्याख्या आहे त्यापलिकडे जायचे नाही. यांची मतं मान्य नसलेल्याची अक्कल काढायची. बोलण्याचा विपर्यास करायचा. त्या व्यक्तीचा जो काय अनुभव किंवा अभ्यास असेल तर त्याची खिल्ली उडवायची. हे यांचं नेहमीचंच आहे. यांच्यावर वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:51 pm: |
|
|
मी वर उल्लेखलेल्या मैत्रीणीचाच हा किस्सा पण. लग्न झाले तेव्ह हीच भाकरी विजेता होती त्या दोघंमधे. हे उघड डोळ्यांनी दिसत असुनही सासू, सासरे आणि नवरा, तिघेही ती घराकडे पुरेसे लक्ष देत नाही म्हणुन बड्बडत असत. आनि हे लक्ष न देणे म्हणजे घरातले वाणसामन, इस्त्रीच्या कपड्यांचा हिशेब, स्वयंपाकात नवे प्रयोग करण्याची नावड (तिच्या सासुबाई सुगरण आहेत, पण त्या पुर्णवेळ ग्रुहीणी आहेत.) या आणि असल्या फुटकळ गोष्टी होत्या. सारे काम सासु सासर्यांच करावे लगते, म्हणुन नवरापण बड्बड करायचा ती वेगळीच. पण त्य पठ्ठ्याने स्वत्: कधीच एकही जबब्दारी घेतली नाही. तो स्वत्: स्वयंपाक उत्तम करतो, पण लग्नानंतर कधिही केलेला नाही. अश्या प्रसंगी टोकाचा उपाय सोडुन काय करता येईल त्यांना धडा शिकवायला?
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:10 pm: |
|
|
संस्क्रुतीची शिसारी येते असे वाचनात आले त्यामुळे लिहीणे अपरीहार्य ठरते. संस्क्रुतीची शिसारी येण्याचा काय संबंध?... स्वताची मते मांडताना जी प्रगल्भता आपल्याला येथे मिळाली, जी नाती मिळाली,जी स्वतंत्रता मिळाली,जे ज्ञान मिळाले ते सर्व विसरायचे आणि वाट्टेल तसे आरोप करत सुटायचे? प्राचीन काळचे ज्ञान नाही बरे दीसत तुम्हाला... समानतेच्या नावाने गळे काढण्या आधी संस्क्रुती समजुन घ्या..!
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:24 pm: |
|
|
>>संस्क्रुतीची शिसारी येते असे वाचनात आले त्यामुळे लिहीणे अपरीहार्य ठरते. संस्क्रुतीची शिसारी येण्याचा काय संबंध?<< धोंडोपंत, तोंड सांभाळून बोला. संस्कृतीची शिसारी कुठे लिहिलंय मी? केवळ संस्कृती संस्कृती असं म्हणालात की मनाला येईल ते आरोप करायची मुभा मिळाली तुम्हाला असं नाही. आता संस्कृतीची शिसारी असं मी म्हणाल्याचं दाखवा नाहीतर माफी मागा खोटेनाटे आरोप केल्याबद्दल.
|
Gobu
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:37 pm: |
|
|
अज्जुक्का, शांत हो... शांत हो. एखाद्याचे वाक्य distort करण्याची संस्कृती कधी थांबणार?
|
Meeradha
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:44 pm: |
|
|
अज्जुका,तुला ' Chyayala ' या ID वरुनहि या व्यक्तीची मानसिकता कळली नाहि का?मुळात या व्यक्तीच्या ID लाच Mod ने accept करायला नको. ही एक अतिशय घाण प्रत्येक स्त्रीला अपमानकारक अशी शीवी आहे.मराठी भाषेत यांना हा एकच शब्द स्वत्:च्या ओळखीसाठी सापडला,म्हणजे यांचे विचार कसे असतील हे स्पष्टच दिसते. आणि हो ch***la मी स्वत्: कोल्हापुरचीच आहे तिथेहि मी या शब्दाला विरोध करतेच.एखादा शब्द खुप वापरला म्हणुन त्याचा अर्थ तर बदलत नाहि ना? दिवे न घेता विचार करा.
|
Meeradha
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:55 pm: |
|
|
यांना संस्कृती कळते म्हणे,आधी आई म्हणजे काय ते शीका नंतर संस्कृतीबद्दल बोला.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 2:09 pm: |
|
|
अज्जुके, ह्या लोकांना अनुल्लेखानेच मारा. मुळ चर्चा भरकटु देउ नका ग!! मीराधा, तुम्हाला अनुमोदन. मला कळत नाही, समानतेच्या बी बी वर, सन्स्कृतीच्या तथाकथित रक्षकांच्या क्षुद्र विचारावर इतकी चर्चा, आणि मी विषयाला धरुन काही प्रश्न विचारत आहे, त्याला उत्तर नाही... ऐसा क्यों?
|
Meeradha
| |
| Wednesday, February 13, 2008 - 2:44 pm: |
|
|
रमणी माझ्यामते आई एकटि आपली मुले-संसार नोकरी सांभाळु शकते पण पुरुषाला हे सहज जमु शकत नाही. हे बहुतेक सर्वाना माहिती असते पण मान्य करायचे नसते हे सर्व करायला आईला superwoman बनावे लागते. superwoman चे कौतुक काही तीच्या वाट्याला येत नाही,पण superwoman चे सर्व त्याग मात्र तीला करावे लागतात.यावर उपाय म्हणजे स्त्रीनेच स्वत्: ठरवावे कि जर त्याग कष्ट हे maximumum तिचेच असणार आहेत तर निर्णय घेण्याचा अधीकार सुध्धा तीचाच असला पाहिजे.मग मुले पाळनाघरात थेवने किन्वा घरात एखादी बाई ठेवने हा निर्णय आईनेच घ्यावा व अमलात आनावा.घरात सासुबाई असतील तर बाई ठेवने खुप सोयीचे पडते सां.बाईनांहि मदत होते व आई सुध्धा पुर्णपणे कुणावरही अवलंबुन रहात नाहि.बाईला हक्काने काम सांगता येते.बरेच problem सुटतात हा माझा स्वत:चा अनुभव आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|