|
दिनेश मी तुम्हाला सहमत न्हवतो. मला असे म्हनायचे होते (त्या पोस्ट मध्ये) ही तो मुद्दा उभाच राहात नाही येथे. कारण गेल्या ३००० वर्षात तसा यज्ञ झाला नाही. संस्कृती ची जडन घडन ही स्थल आणि काल सापेक्ष आहे. जी गोष्ट तेव्हा मान्य होती ती आज नसनार वा आज जी मान्य नाही ती कदाचीत उद्या असु शकेन. ( जसे आता लिव्ह ईन रिलेशनशिप भारतात मान्य नाही पण उद्या कदाचीत असेन आणि २०० वर्षांनंतर ती संस्कृती म्हणुन ओळखली जाईल) जर तो यज्ञच आता होत नसेल (बदलत्या काळामुळे) तर त्यावर चर्चा करने (समानता बिबीवर) निरर्थक ठरेल). च्यायला गोमांस खाणे व गायींचा बळी देने ही पण आपली संस्कृती होती. गोतम बुध्दाने अहींसा या साठीच स्विकारली होती. त्या काळी ( इस पुर्व ६००) गायी वा अन्य कुठलेही मॉंस खाने हे निशीष्ध न्हवते. प्रत्येक यज्ञात गायी, बकर्या, तुप, तांदुळ आणि दुर्वा ह्या असायच्याच. अज्जुका म्हणते तसे आपल्या संस्कृती वर आधी वाचन करायला हवे. ( त्या बाजुने वा विरुध्द बोलन्यासाठी). त्या विकासाला क्रमप्राप्त घडल्या असतील काही घटना कींवा नसतीलही.. पण त्यातुन आलेले तत्वज्ञान पाहा ना.. एक ना दोन कीतीतरी गोष्टी आहेत की ज्यांची महती संपणार नाही.>>>>>>>>> बरोबर आहे धोंडोपंत. पण विरोधक हे लक्षात घेत नाहीत त्यांचासाठी सतिप्रथा ही महत्वाची. आयुर्वेद नाही.
|
Ramani
| |
| Tuesday, February 12, 2008 - 4:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अनुमोदक. झक्की, केदार आणि अज्जुका तिघांना अनुमोदक. च्यायला, तुम्ही परदेशी जाउनच इंडोलॉजीचा अभ्यास केला पहिजे असे नाही, पण कुठेतरी अभ्यास करायला हवा ना, तेव्हाच तर अधिकारवाणीने बोलता येइल. झक्की म्हणतात त्यात तथ्य आहे, सन्स्क्रुती ही समाज नदीकाठचा दगड नसुन वाहती नदी आहे. त्यामुळे ती काठावरचे गुणधर्म घेत वाहणार, हे स्वाभविक आहे.
|
Maanus
| |
| Tuesday, February 12, 2008 - 4:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तसे संस्कृतीचे पण Re engineering करा! आम्हाला सोमरस हवा, आणि रक्त उसळुन लावणारी अशी स्फुर्तीदायक गाणी हवी ----------------------------------- आता पेटवु सारे राण आता पेटवु सारे राण शत्रु संगे युद्ध कराया... (पुढचे आठवत नाही) अम्ही चार किरणांची ही आस का धरावी. ----------------------------------- म्यानातुन उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजूस डोळे, किंचीत ओले सरदार सहा सरसावुनी उठले शेले रिकबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेध सात निमिषात आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावाणित शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात खालुन आग, वर आग, आग बाजूंनी समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी गदीर्त लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा ओढयात तरंगे अजुनी रंग रक्ताचा क्षितीजावर उठतो अजुनी मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वार्यावर गात हर हर महादेव
|
Slarti
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माणसा, सोमरस पिऊनच लिहीत आहेस का ? ते राण नाही रे, रान आहे.
|
"भारतीय संस्कृती काही आभाळातून नाही पडली. किंवा एका रात्रीत तयार नाही झाली. माणसाचे पशुत्व संपून civilisation च्या दिशेने जो प्रवास आहे त्या वाटेवरच्या या काही पायर्या आहेत. " १००% पटल. त्या काळि म्हणजे जेंव्हा मानव उत्क्रांत होत होता तेंव्हा कदाचित स्त्री आणि पुरुषांमध्ये हि comman practise असावि म्हणुनच यज्ञातहि तिचा समावेश केला गेला. पुढे जशि जशि संस्कृति प्रगत होत गेलि तशि हि गोष्ट फ़क्त प्रतिक म्हणुन उरलि. आपल्याला फ़क्त तिथपासुनचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. म्हणुन याचा समानतेशि संबंध जोडण कदाचित योग्य ठरणार नाहि. "तिच्या (सीतेच्या) अपहरणानंतर बाकिच्या घटना घडल्या पण तिच्या अपहरणाला ती स्वत:च जबाबदार होती मग तिचा काहिच दोष नाही का? फक्त रामाला दोष देउन कसे चालेल? " खरच यावर काय बोलणार? चुक आणि अपराध यामध्ये तुमचि गल्लत होतेय बहुदा. तसहि सीतेच्या अपहरणासाठि कुणिहि कधि रामाला दोष दिल्याच मी ऐकल किंवा वाचल नाहि, सगळ्यांचा आक्षेप हा ज्या कारणासाठि रामाने सीतेचा त्याग केला त्यावर आहे. एक राजा म्हणुन सीतेचा त्याग करण जर योग्य होत तर एक व्यक्ति म्हणुन राज्याचा त्याग करण योग्य नव्हत का? राज्य चालवायला भरतासारखा सर्वस्वि योग्य उमेदवार होताच कि. मला वाटत सत्ता हि त्या काळापासुनच परुषांवर सत्त गाजवतेय अगदि मर्यादा पुरुषोत्तम (?) हि यातुन सुटु शकले नाहि म्हणजे बघा. मला स्वत:ला अस वाटत कि रामायण ह्या काव्यात पुरुषि मानसिकतेच वास्तववादि चित्रण आहे. पण रामच्या उदात्त प्रतिमेचा उपयोग करुन हि मानसिकता glorify करण्याचा प्रय्त्न होणार हे लक्षात आल्यावर महर्षि व्यासांनि कृष्णाच्या रुपाने पतितांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे हे जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या या प्रयत्नाला अजुनहि यश मिळु शकत नाहि ह्यातुनच "समानता" ह्या विषयावरिल चर्चेचि गरज आणि मर्यादा दोन्हि स्पष्ट होतात.
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:59 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>LoL ... म्हणजे भारतिय ईतिहास, संस्कृती भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर दुर युरोपात ऑक्सफ़ोर्ड, केम्ब्रिजच्या विश्वविद्यालयात Indology शिकल्याने कळतो...<< केवळ इन्डॉलॉजी हा शब्द वापरला म्हणून तुम्हाला युरोप, अमेरीका आठवली का? भारताच्या बाबतच्या कुठल्याही अभ्यासाला जगभर अगदी भारतातही इन्डॉलॉजीच म्हणले जाते. त्यात भारताचा इतिहास, संस्कृती, समाज सर्व काही आले. पुण्यातले डेक्कन कॉलेज हे यासाठी खूप महत्वाचे संशोधन केंद्र मानले जाते. नुसतं भारतात राहून भारताची प्राचीन संस्कृती नसते माहीत. अभ्यास करावाच लागतो. पण ते करायचं नाही आणि अभ्यास करणे यालाच नावं ठेवायची. मग उगाच संबंध नसताना परदेशांची नाव घ्यायची की देशप्रेमी असल्याच समाधान तुमचं तुम्हाला.
|
Peshawa
| |
| Tuesday, February 12, 2008 - 6:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्त्रि ही पुरुशा पेक्शा वेगळी नाही. ही इतर discoveries सारखीच एक discovery आहे जि माणसाला १७व्या १८व्या सह्तकाच्या आस्सपास झाली. त्यामुळे त्या discovery आधिच्या काल्खंदात स्त्री आणि नन्तरची स्त्री ह्यांच्या बबतीतच्या सामाजीक attitudes ची तुलना निरर्थक आहे. तसे प्रत्येक समाजात, पोट समाजात ही discovery पोचायला वेळ लागतोय. इतर गणितीक किंवा भौतीक शोधांसारखे ह्या शोधाचे नसल्याने विचार पोचालाय पण अचारातला inertia प्रखर पणे जाणवतो आहे. स्त्री आणि पुरुश समानता स्विकारल्यावर पुर्ण समाजचे व ह्या विशमतेवर आधारीत सगळ्याच अभिव्यक्तींचे, अभिरुचींचे पुनर्रचना होणार किंबहुना व्हायला हवे... एखादी संस्क्रुती किटि स्त्रि विरोधक होती असे म्हणणे त्यामुळेच मला चुकिचे वाटते. जे काही आज स्त्रीच्या विरोधात केवळ ती स्त्रि आहे म्हणुन आहे ते सगळे बदलायला ए हवे.आणि काय स्त्रीच्या विरोधात अहे हे ठरवण्याचा अधिकार फ़क्त स्त्रिलाच असायला हवा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भारतीय संकृति म्हणण्यापेक्षा, भारतातील ज्ञानाचा उल्लेख करु या का ? त्याबद्दल मला अभिमानच आहे. पण इथे हा मुद्दा नव्हता, अनेक सर्वोत्तम गोष्टीत जर एक वाईट असेल तर तिच्याकडे डोळेझाक का करायची. ते शल्य दुर केले तर बाकिचे अस्सलच ठरते ना ? इथे रामायणाचा तरुण मनावरील पगडा बघुन मला भिती वाटते. निव्वळ राजकिय हेतुने केलेल्या विखारी प्रचाराचा परिपाक आहे हा. रामाची कथा तशी भारतात लोकप्रिय होती, पण त्याला देवत्व केवळ गेल्या साताठशे वर्षातच दिले गेलेय. सीतेचे उदाहरण घ्यायचे तर जे शिवधनुष्य रावणाला पेलवले नाही, त्याच्याशी ती लहानपणीच खेळत होती. ती स्वतः शूर होतीच. तिने कुणाच्याही मदतीविना, शतमुखी रावणाचा वध केला होता आणि त्या प्रतिमेचे स्मरण, नवरात्रातील ललिता पंचमीला करत असत. तिने स्वतः, रामाची कसलीही मदत न घेता, लव आणि कुश याना, वाढवले इतकेच नव्हे तर रामाला आव्हान करण्या इतपत सक्षम बनवले. त्या युद्धानंतर आता माझ्याबरोबर चल, असे ज्यावेळी राम म्हणाला, त्यावेळी तिने स्वाभिमानाने नकार दिला. ( असाच नकार तिने, अशोकवनात असताना मारुती बरोबर जाण्याला दिला होता ) ते हरिण मायावी होते, हे रामाला कळत होते तर त्याने तिला स्पष्ट का संगितले नाही ? जर त्या हरिणाने मरताना हे लक्ष्मणा, धाव असा आरडा ओरडा केला, तर रामानेदेखील तसाच आरडा ओरडा करुन, हा आवाज माझा नाही, मी सुखरुप आहे, असे का नाही सांगितले ? रामायणदेखील, काहि ठराविक घटना टाळुनच सांगितले जाते. वरच्या शतमुखी रावणाच्या वधाचा, वा रामाच्या आत्महत्येचा किस्सा सांगितलाच जात नाही. कारण स्त्री शूर असणे, हे स्वीकारणेच होत नाही. अनेक पुराणकथांमधुन, स्त्रीवर झालेला अन्यायच दिसतो. ( अहिल्येची कथा घ्या. जे काहि झाले त्याची कठोर शिक्षा तिला, इंद्राला मात्र सौम्य शिक्षा. नेहमीच बुळ्या वागणारा, जुगारी युधिष्ठिर स्वर्गात जायच्या लायकीचा आणि प्रत्येक अन्यायाला तिच्या परिने प्रतिकार करणारी द्रौपदी, मात्र त्या योग्यतेची नाही, उलट महाभारताला कारणीभुत झाल्याचा, ठप्पा तिच्या माथ्यावर. ) . गोमास आणि मधुपर्क म्हणजेच बीफ़ सूप, याचा उल्लेख इथे व्यर्थ आहे.
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 4:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्लार्टी, तुम्ही माणूसाची एक चुक काढली राण नाही रान बद्दल. मग पेशव्याच्या अशा तर किती तरी चुका आहेतच की.. त्या का नाही :-) दिवे हं.
|
Meggi
| |
| Wednesday, February 13, 2008 - 5:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रामायणातल्या अनेक गोष्टी पटत नाहीत. जे धनुष्य रावणाला पेलवले नाही, ते धनुष्य सीता लहानपणी खेळायची. याच सीतेला रावण इतक्या सहज उचलुन घेऊन गेला. फक्त गोष्ट म्हणूनच ऐकावं हे सगळं...
|
Chyayla
| |
| Wednesday, February 13, 2008 - 6:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हुसेनची इतर पेंटींग्ज पाह्यलीयेस का तू? मी पाह्यलीयेत. आणि मला ती खरंच ग्रेट वाटतात. तुला वाटत नसतील तर मी काय करू? याबद्दल थोडेसे.. म्हणजे तुझा त्याच्या कृतीला समर्थन नाही पण त्यापल्याड त्या व्यक्तिला (विकृतीला) समर्थन आहे. उद्या कुणी महान चित्रपट तारकाने एखाद्या अबलेवर अत्याचार केला तरी तुम्ही तिलाच शिकवाल अग तु काय त्या अत्याचाराच घेउन बसलीस मुर्ख कुठची, तो बघ किती मोठा सूपरस्टार आहे तुला त्याची ऍक्टिंग कळण्याची अक्कल आहे का? कोणत्या ड्रामा स्कूल मधे गेली आहेस का?. रमणी, तु म्हणतेस कुठेतरी अभ्यास करायला पाहिजे.. माझे प्रोफ़ाइल बघ माझा विषय ईतिहासच होता. तरी चर्चा करण्यासाठी केवळ ईंडोलॉजी चीच पदवी अशी अट आहे का? तसे असेल तर मग चर्चेला काही अर्थच नाही. असो माझा आक्षेप हा आहे की दोन पुस्तक वाचुन, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यानी दुसर्याना उपदेश करण्यापेक्षा आधी स्वता: अभ्यास करावा. जगातल्या सगळ्या व्यक्ति स्वता:च्या चांगल्या मुल्यांचा संस्कृतीचा अभिमान बाळगतात. आणी हे असले महाभाग आपल्याच देशात मिळणे हे एक दुख: आपली संस्कृती खरच एवढी वाईट आहे की शिसारी यावी? त्यातल्या ईतर चांगल्या गोष्तीही पहा, ते न बघता सरसकट सगळ शिसारी होते? याच उत्तर तुच दे. मला वाटतय जो ईथे उपदेश देतोय त्यालाच ईंडोलोजी शिकण्याची जास्त गरज आहे, नाही तर असले अपरीपक्व विधान नसते केले. गोतम बुध्दाने अहींसा या साठीच स्विकारली होती. त्या काळी केदार, असामीना मी त्या वेळेस हेच उत्तर दिले होते. पण त्यावरुन आज शिव्या देण्यात काय अर्थ आहे? असामी लिंक देतिलच तेंव्हा माझ मत जरुर वाचावे. अहो आता, पुरे ती जुनी भारतीय संस्कृति! त्यात कित्येक चांगल्या गोष्टी होत्या, त्या तर आता कुणि पाळत नाहीत, वाईट गोष्टी फक्त लोकांना आठवतात. एकदम पटेश.. झक्की मलाही हेच म्हणायचे आहे.. १००% अनुमोदन अजूका, मध्ययुगीन संस्कृती, तब्लीग, Prejudice , पुरुषप्रधान वैगेरे असे लेबल पोस्ट न वाचता लावण्यात काही अर्थ नाही. त्यातल्या त्यात माधव, व धोंडोपंत यांच्या पोस्ट मधे मला काहीच वावग दिसत नाही आणी तरी तु पुरुषप्रधान वैगेरे लेबल लावले याला ना बुडा ना शेंडा. संस्कृती घडतानाच्या टप्प्यातील Facts मान्य करणे वेगळे आणी त्यालाच कवटाळुन शिव्या घालत बसणे वेगळे असला तालिबानीपणा तुच करत आहेस. माझे पोस्ट परत वाच त्यात मी हेच स्पष्ट लिहिले आहे. आता ईथे तालिबानी कोण ठरतय? आणी कोण पुढे जायच्या, आधुनिकतेच्या गोष्टी करत आहे.? शेवटी परत एकदा सांगु ईछितो कोणतीच व्यवस्था अगदी समाजव्यवस्थाही १००% परीपुर्ण नसते (ग्रीक, रोमन वैगेरे सुद्धा)काळानुसार, परिस्थितीनुसार त्यात काही विकृती येतात पण मला अभिमान आहे आपल्या संस्कृतीचा की जी काळानुसार बदलली व असल्या रुढीन्ना कवटाळुन न बसता, ईतिहासापासुन बोध घेत पुढे जात आहे. ज्याना जुन्या कालबाह्य रुढीवरुन संस्कृतीला शिव्या द्यायच्यात त्याना बसु देत बापडे.
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 6:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मेग्गी, रामायण महाभारतातील फ़क्त सार घ्यायचे. बाकी रंजकप्रधान भाग फ़क्त सार नीट समजावा आणि गोडी कायम टिकून रहावी म्हणावी तयार झालेला असावा. कारण इतक्या लहान वयात रामायण व महाभारत ह्याशी आपण परिचित होतो त्याला कारण म्हणजे त्यातील तत्वज्ञान नसून रंजकप्रधान भाग आहे. तो भाग नसता तर गीता आपल्या पर्यंत इतक्या सहजपणे पोचली नसती. दुसरे असे की ह्या पौराणानिक ग्रंथात आपल्या पुर्वजांनी अनेक दंतकथाची भर केली आणि त्यामुळे मुळ भाग आणखीनच रंजक झाला.
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 7:03 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>याबद्दल थोडेसे.. म्हणजे तुझा त्याच्या कृतीला समर्थन नाही पण त्यापल्याड त्या व्यक्तिला (विकृतीला) समर्थन आहे. उद्या कुणी महान चित्रपट तारकाने एखाद्या अबलेवर अत्याचार केला तरी तुम्ही तिलाच शिकवाल अग तु काय त्या अत्याचाराच घेउन बसलीस मुर्ख कुठची, तो बघ किती मोठा सूपरस्टार आहे तुला त्याची ऍक्टिंग कळण्याची अक्कल आहे का? कोणत्या ड्रामा स्कूल मधे गेली आहेस का?<< मी जे जे लिहितेय त्यातला वाकडाच अर्थ काढायचा असं ठरवलंय का? कारण मी जे म्हणालेय त्याचा हा असा अर्थ मुळीच होत नाही. बलात्कार आणि वादग्रस्त चित्र यांची तुलनाच होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे कला आणि एक माणूस म्हणून निर्माण करणारा कलाकार ह्यात फरक मला करता येतो. तुम्हा लोकांचा सगळ्यांनी हुसेनला शिव्या घातल्याच पाहिजेत हा fascist आग्रह मी मानणार नाही. गेलात उडत. >>असो माझा आक्षेप हा आहे की दोन पुस्तक वाचुन, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यानी दुसर्याना उपदेश करण्यापेक्षा आधी स्वता: अभ्यास करावा. जगातल्या सगळ्या व्यक्ति स्वता:च्या चांगल्या मुल्यांचा संस्कृतीचा अभिमान बाळगतात. आणी हे असले महाभाग आपल्याच देशात मिळणे हे एक दुख: आपली संस्कृती खरच एवढी वाईट आहे की शिसारी यावी?<< तुझा इतिहास हा विषय असूनही तू ही महत्वाची पुस्तके वाचली नाहीस यातच आलं सगळं काही. एवढा आहे तुझा अभ्यास तर तर्काने विरोध कर ना. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे अशी वैयक्तिक टिका आणि संस्कृतीची शिसारी असं जे मी म्हणलंच नाही ते माझ्यावर थोपणे याला काय अर्थ आहे? मी काय म्हणाले आहे ते नीट वाचलस तर कळेल तुला. पण मग अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, परदेशात शिकून आम्हाला शिकवतात इत्यादी नावं कशी ठेवता येतील नाही का?
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 7:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>स्त्रि ही पुरुशा पेक्शा वेगळी नाही. ही इतर discoveries सारखीच एक discovery आहे जि माणसाला १७व्या १८व्या सह्तकाच्या आस्सपास झाली. त्यामुळे त्या discovery आधिच्या काल्खंदात स्त्री आणि नन्तरची स्त्री ह्यांच्या बबतीतच्या सामाजीक attitudes ची तुलना निरर्थक आहे.<< बरोबर आहे जया. ज्या त्या काळात जे ते बरोबर असेल, त्याला आजचा चष्मा लावूया नको. पण म्हणजे जे होतं ते नाकारणं पण योग्य नाही. एक वस्तुस्थिती म्हणून आपण ते स्वीकारूया की. त्यामधे इतकं टची होण्यात काय अर्थ आहे? इथे अभिमान असण्या नसण्याचा कुठे संबंध आला? आणि आधीच्या कालखंडातील दाखले देऊन स्त्रीला आजही कमीपणाची वर्तणूक देणे हेही योग्य नाही. नाही का?
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 7:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>अजूका, मध्ययुगीन संस्कृती, तब्लीग, Prejudice , पुरुषप्रधान वैगेरे असे लेबल पोस्ट न वाचता लावण्यात काही अर्थ नाही. त्यातल्या त्यात माधव, व धोंडोपंत यांच्या पोस्ट मधे मला काहीच वावग दिसत नाही आणी तरी तु पुरुषप्रधान वैगेरे लेबल लावले याला ना बुडा ना शेंडा.<< तुला जे योग्य वाटतं ते योग्य? मी एकही पोस्ट वाचत नाही आणि नुसती लेबलं लावत सुटते? खरंतर तू जे लिहितोयस न ते वाचल्यावर मलाच हे म्हणाव लागेल की तू न वाचता केवळ माझ्या पोस्टला विरोध म्हणून अत्यंत भडक शब्दात प्रतिक्रिया देतो आहेस. आणि मला माधव आणि धोंडोपंत यांच्या पोस्टस जर मध्ययुगीन आणि पुरूषप्रधान मानसिकतेचे प्रातिनिधित्व करणार्या वाटत असतील तर केवळ तू म्हणतोस म्हणून या वाटण्याला शेंडा बुडखा नाही? ही कसली जबरदस्ती आहे? मला माझं मत आहे आणि मी ते मांडणार. तुला पटत नसेल तर माझा नाईलाज आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, देशचं दुर्दैव आणि अजून काय काय या वैयक्तिक पातळीवर तुला उतरायचे असेल तर उतर. मी माझा वेळ आणि शक्ती त्यात वाया घालवणार नाही. तुझ्या कुठल्याही पोस्टवर उत्तर द्यायला यापुढे मी बांधील नाही.
|
Sakhi_d
| |
| Wednesday, February 13, 2008 - 10:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एक किस्सा माझ्या office मधे एक मुलगी नविनच join झालीय. अजुन probation वर आहे. software engineer आहे. तीला जुळी मुले आहेत ५ वर्षाची. घरी सा.बा. असतात म्हणुन इतकी वर्षे मुलांना पाळणाघरात ठेवले नाहि पण हल्ली सा.बा. बरेचदा बाहेर जातात म्हणून गेल्या महिन्यातच त्यांना पाळणाघरात ठेवायला सुरवात केली. पण.... सा.बा. नी त्यांना घरात ठेव मी बघेन म्हणुन पाळणाघर बंद केले. आता सा.बा. पुन्हा ८ दिवसांनसाठि बाहेर जाणार आहेत आणि त्यांचे म्हणणे आहे हिने सुट्टि घेवुन मुलांकडे बघावे. नाहितर हिच्या आईला बोलावुन घ्यावे. (हि मुंबईत आणि आई औरंगाबादला) हिला सल्ला दिला कि मुलांना पाळणाघरात ठेव तर म्हणे घरी भांडण होतात. मला कळत नाहि हि मुलगी इतकि शिकलेली असुन काहि निर्णय स्वत्:ला घेता येत नाहित का??? आपली भुमिका नक्कि काय हे कळत नाहि का ह्या मुलींना??? ह्याच मुली असमानता वाढवायला हातभार लावतात असे मला वाटते.
|
Giriraj
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शिकलेली असली आणि software engineer असली म्हणून काय झाले?? अगदी बालपणापासूनच आज्ञाधारकपणा हा एक गुण आणि स्वतःच्या बुद्धेइने निरणय्त घेणे म्हणजे शिंग फ़ुटणे ई.ई. संस्कार होत असले तर १२-१५ वर्षांच्या शिक्षणाने फ़ारसा फ़रक पडत नाही. जरा आपल्यावर होणारे संस्कार किंवा वळण लावण्याचे प्रयोग पाहिले तर आध्याधारकपणाचा खूपच बाऊ केला जतो हे लक्षात येईल.फ़ार फ़ार जुन्या काळचे माहीत नाही पण साधारण ४००-५०० वर्षांमागे स्त्रियांची स्थिती जरा जास्तच बिघडायला सुरवात झाली असावी. अगदी जातिव्यवस्थेनेही आपले ओंगळ स्वरूप त्याच्याच आसपास धारण केले होते. मुळात स्त्रियांनीच एकमेकिचा आदर करायला शिकणे खूप गरक्जेचे आहे. सासू-सून हे नातं किती बदनाम आहे हे माहीत आहेच. पुरुषांचा सहभाग यात मदतीचाच असू शकेल. (अर्थात हे सगळे भारतिय आणि खुपश्या प्रमाणात मराठी जनतेबद्दलचे निरिक्षण आहे.)
|
अगं सखी त्या साबांना काळजी वाटतेय नातवंडांची म्हणून म्हणत असतील त्या. पण यात असमानता कसली म्हणे? उलट मी नाही तर तुझ्या आईला बोलावून समानताच दाखवतायत की त्या.
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
... आणि धोंडोपंत यांच्या पोस्टसबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. त्यांना चर्चा नकोय. जे जे पुरूषप्रधान ते ते चांगले आणि स्त्रिया या वाईटच, त्यांनी पतीच्या आज्ञेत रहावे एवढंच म्हणत रहायचंय. यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही.... १.) असे मी कधीही म्हटले नाही की बायकोने पतीच्या आज्ञेत राहावे. २.) पुरुषप्रधान की स्त्रीप्रधान या बाबतीत केतीतरी वेळा आम्ही हा श्लोक सांगितला आहे.. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते स्त्री आणि पुरुषाला आमच्या संस्क्रुतीत सारखाच मान, स्थान, आदर दीला आहे. ३.)काही पुस्तके त्याचप्रमाणे सिनेमे आणि एतिहासात घडलेल्या गोष्टींवरुअन लगेच तेच खरे मानण्याचे बिलकुल कारण नाही. कुणीही उठतो आणि रामाcया आणि क्रुष्णाच्या चुका काढतो हे योग्य नाही. ४.)आई, वडील, भाउ, सेवक, मित्र, बायको ई. ई. विषयीची कर्तव्ये ज्यानी आचरली आणि आम्हाला शिकवली त्या रामायणातील देवतुल्य व्यक्तीमत्वांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रभु श्रीराम हे काय व्यक्तीमत्व होत हे जाणुन घेण्यासाठी आधी दशावतारातील संगती आणि त्यांचे कार्य हे जाणुन घेतले पाहीजे. ६.) प्रभु श्रीराम, सीता, हनुमान, भरत, लक्षमण यांचे जीवन हे त्यांच्या कार्याला समर्पित जीवन होते आणि त्याची तुलना आअच्या चौकटीत करु नये. आज आपण करतोच काय असे विषेश??
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 11:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अगदी हाच हाच प्रॉब्लेम!! ह्याच त्रासामुळे माझ्या एका एम.बी.ए. मैत्रीणीने तिची नोकरी सोडुन दिली आहे. आणि तेसुद्धा नवरा अजुन सेट्ल नसताना. लग्न करताना त्या दोघांनी ती सेट आहे ना मग का उशिर करावा अश्या प्रागतिक विचाराने लग्न केले. आणि आता मुल झाल्यावर जेव्हा सांभळण्याचा प्रश्न आला तेव्हा ह्याने घरात काहिही भुमिका घेतलीच नाही.काय तर म्हणे, आई आणि बायको दोघी अति वाद घलतात, मधे न पडणं शहाणपणाचं आहे. आता ह्या आप्पलपोटेपणाला काय म्हणायचं?
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|