|
Dakshina
| |
| Friday, February 01, 2008 - 8:36 am: |
|
|
घरी जाऊन झोपावंसं वाटतंय.... खूप कंटाळा आलाय.
|
Dakshina
| |
| Friday, February 01, 2008 - 9:24 am: |
|
|
घरी जऊन झोपावंसं वाटतंय.... खूप कंटाळा आलय.
|
दक्षिणा, असली संसर्गजन्य भावना इथे कशाला लिहिलीस?
|
हीत काई दम न्हाई... बीबी म्हंजे कसा पायजे... थु.!म्हजी आपल पर आपल काय न्हाई म्हजी कस बर आसतया... काई समजलासा?.. आ?.. तस म्हजी आपल काई हीतल रोच्च येणजाण पर कवा कवा तिच्या लई ईट्ट येतुया.. कुनी काई कुनी काई लिवत्यात बडबडत्यात.. थु.! पर आतली म्हाईती सांगु काय?.. आ?.. कुनी कवाच आतली म्हनजे मनातली गोशट का भावना काय हाय त्ये कदी सांगतया का?.. भावना म्हजी मला वाटल भावड्या का काय.. पर मग कळ्ळ ह्ये भावना म्हजी गोशट हीत कुनी बी सांगाव... मनातली गोशट.. काडा जरा ईडी काडी काय आसल तर.. लई कट्टाळा आला..
|
>>दक्षिणा, असली संसर्गजन्य भावना इथे कशाला लिहिलीस? << आणि तीही दोन्दा??
|
Mandarnk
| |
| Friday, February 01, 2008 - 2:55 pm: |
|
|
>>>आणि तीही दोन्दा?? बहुतेक पहीला संसर्ग स्वतालाच झाला असेल!
|
Ankyno1
| |
| Friday, February 01, 2008 - 3:43 pm: |
|
|
सर्दीनी जाम झालोय... नाक काढून ठेवायची काही सोय आहे का? सर्दी बरी झाली की परत बसवून घेईन....
|
Slarti
| |
| Friday, February 01, 2008 - 8:19 pm: |
|
|
चिडचिड, वैताग, जळजळ, मळमळ... मायबोलीवर हट्टाने देवनागरीत न लिहीणारे लोक पाहिले की येणार्या भावना. पहिल्या दोन मानसिक भावना तीव्र झाल्या की त्या शारिरिक होतात म्हणून त्याही लिहिल्या...
|
Hkumar
| |
| Saturday, February 02, 2008 - 4:32 am: |
|
|
स्लार्ती, पूर्ण सहमत. इथे इंग्रजीत लिहीणारे खरेच छळतात मायबोलीप्रेमिंना!
|
Anaghavn
| |
| Saturday, February 02, 2008 - 5:06 am: |
|
|
मला एका व्यक्तिच्या "सतत दुसर्याने चुकच केली आहे"--अशा आविर्भावात बोलण्याचा खूऊऊऊउप्प्प्प्प कंटाळा आला आहे. एखादी वयाने लहान व्यक्ती असती किंवा जर नात्यात मोकळेपणा असता तर विनोदाने बोललेली असते. तिलाही खरतर बोलावस वाटत. खरच त्या व्यक्तिला सान्गाव कि नाही या विचारात आहे. (ती व्यक्ति मायबोली वरची नाहिये, सो, स्वत:वर कुणीही ओढवुन घेऊ नये).
|
मला आत्ता माणसांच्या खोटेपणाचा खुप खुप कंटळा आलाय. काही माणसं सतत कस खोटं खोटं आणि गोड गोड बोलत असतात आणि असच बोलता बोलता फसवतातहिड आली आहे या सगळ्याची. असं वाटत की या लोकाना...... मला कंटाळा आलाय लोकांच्या खोट्या वागण्याचा
|
माझी हट्टयादी... मी गेल्या ४ वर्षांत आठवड्यापेक्षा जास्त वेळ घरी काढू शकलो नाही... माला घली जाऽऽच्चं!! माला मम्मी पाऽऽयजे!! मला [[[माझं]]] घर लवकरात-लवकर घ्यायचंय- आईबाबांना कायमचं तिथे आणायचंय... मला इथल्या घरी पोचल्यावर कुणीतरी चौकशी करणारं हवंय. मला व्यायाम-रियाज़-लिखाणासाठी वेळ काढायचाय- मला बाॅसला टिच्चून सांगायचंय- "मला ह्या स्टोरीवर काम करायचं नाही- मी ती स्टोरी करणार!" म्हणून.
|
Maanus
| |
| Tuesday, February 05, 2008 - 7:47 pm: |
|
|
गरम गरम डार्क चॉकलेट केक आणि दही.... आहाहा... काय मस्त वाटतेय खाताना. केक चा प्रत्येक तुकडा जिभेपासुन ते पोटापर्यंत सगळ्या भावता तृप्त करतोय...
|
Manjud
| |
| Wednesday, February 06, 2008 - 8:59 am: |
|
|
मला आत्ता माणासाच्या हातातला केकचा पीस हिसकावून घेऊन जिथे तो पोचू शकणार नाही अश्य्या जागी बसून त्याला टूकटूक करत खावासा वाटतोय.... आणि मी हिसकावून ह्यायच्या आधी त्याने तो पीस संपवला तर त्याला बुकलून काढावंसं वाटतंय.............
|
चॉकलेट केक आणि दही.. अरे माणसा काय खातो आहेस??? दिवे घ्या.. खात पण असतील बाबा. तसे मला खाण्यातले देखील फार काही कळत नाही. एकदा मलाई कोफ्ता खाताना काय मस्त गोळ्याची आमटी केली आहे असे म्हणालो आणि पुढे बरेच रामायण घडले
|
Sas
| |
| Thursday, February 07, 2008 - 2:05 am: |
|
|
संध्याकाळ झाली आहे वाटतय ...... १. मस्त पैकी बाहेर जाव, 'ठेल्यांवर ' जावुन भेळ, पाणी पुरी, रगडा, बटाटा वडा, पावभाजी...मनसोक्त हादडाव मग मस्त्पैकी ५-६ वेगवेगळ्या Flavor and Color चे Ice-Cream विकत घ्यावेत व चाटुन चाटुन खावेत. OR.... २. एखाद्या 'ढाब्या' (१००% शाकाहारी हो) वर जावुन तडका दाल, तंदुरी रोटी with कांदा and मिरची, बोट चाडुन चाटुन खावी आणी सोबत लस्सी गटकवावी. OR.... ३. एखाद्या 'Restaurant' (१००% शाकाहारी) जावुन मस्त पैकी Veg कोल्हापुरी, सोलापुरी, दाल, ....बटर नान, मसाला पापड ची order द्यावी व भरपुर खाव and at the end 'मस्तानी' वा सिताफळ ice-cream hmmmmm पण ह्यातल काहीही करण इथे ह्या 'USA' मध्ये शक्य नसल्याने वाटतय जोर जोरात ओरडाव आणी रडाव.
|
Sas
| |
| Thursday, February 07, 2008 - 3:00 am: |
|
|
मक्या च भाजलेल गरम गरम कणस त्यावर लिंबु आणी मीठ... I want to go to India right now
|
Upas
| |
| Thursday, February 07, 2008 - 7:19 pm: |
|
|
हाणा रे ह्या सासला.. मनाताली भावना..
|
Tiu
| |
| Thursday, February 07, 2008 - 7:54 pm: |
|
|
पण ह्यातल काहीही करण इथे ह्या 'USA' मध्ये शक्य नसल्याने... >>> सध्या हे पुण्या मुंबईत पण शक्य नाही... १. ठेले म्हणजे भैये २. ढाबे म्हणजे सरदार ३. १००% शाकाहारी हॉटेल म्हणजे गुज्जु जय भवानी, जय शिवाजी... राज ठाकरे जिंदाबाद इतकीच हौस असेल तर मराठी लोकांचे ठेले, ढाबे आणि हॉटेल शोधा. तसे ते सापडणार नाहीतच. मग शोधुन शोधुन दमल्यावर घरी या आणि वरण भात किंवा खिचडी खाउन झोपा...
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 6:15 am: |
|
|
टिऊ, हाहाहाहाहाहा!!!!! (दात काढुन हसणार्या माणसाचा चेहरा) (हे प्रकरण्--असे चेहरे टाकण्याचं मला अजुनही जमलं नाहीये, मदत केली तर उपकार होतील)
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|