|
Arch
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
असामी, धड हिंदीत लिही नाहीतर मराठीत. नाहितर भलताच अर्थ होतो. ते अस आहे सौ सुनारकी और एक लुहारकी
|
Sashal
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:39 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
असामी, धड हिंदीत लिही नाहीतर मराठीत. नाहितर भलताच अर्थ होतो. >> म्हणजे काय, म्हणजे काय, अर्थ सांग ना .. नाही कळला ..
|
Asami
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:34 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खरच काय अर्थ बदलतो ते तरी सांग. }
|
Marhatmoli
| |
| Wednesday, January 30, 2008 - 12:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सौ म्हणजे १०० च्या ऐवजि सो म्हणजे 'ते' ("जो हुआ सो हुआ" मधल्या सो चा अर्थ).
|
>>>सो म्हणजे 'ते' ह्या! इतका साधा अर्थ असता तर दात विचकत हसली नसती मंडळी.
|
Bee
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खटल्याच्या घरात जेंव्हा एकाचवेळी आई, मुलगी, भावजय, जावा ह्या नांदत असतात तेंव्हा ह्या स्त्रियांमधे तरी कुठे समानता असते. पण इथे समानता असावी ह्याबद्दल आजच्या स्त्रिया वाद करत नाही. त्यांचा मुख्य वाद स्त्री पुरुष समानतेवर जास्त होतो. स्त्री स्त्री एकमेकींना विषम लेखत असेल तर ते चालत पण पुरुषांनी मात्र समान लेखावे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कुंकवाबद्दल योगशास्त्राचे कारण वगैरे फ़ार नंतरच्या गोष्टी झाल्या. मी त्या पुर्वीचे सांगत होतो. सत्य विदारक असते हेच खरे. असो मी फ़क्त स्त्रीला गौण स्थान कसे मिळत गेले ते सांगत होतो. गर्दीमधला धक्का, हा मुलीना सलणारा विषय. एकतर गर्दीत अहेतुकपणे झालेला स्पर्श आणि सहेतुक स्पर्श साधारणपणे मुलीना सहज कळतो. त्या दिशेने टाकलेला कटाक्ष, याची खात्री पटवुन देतो. त्याला योग्य तो प्रतिकार करणे, कधी शब्दाने तर कधी कृतिने, सहज शक्य आहे. आणि तो करावाच असे तर राष्ट्रपति देखील सांगताहेत. नुसत्या स्पर्शाने कुठलाही अपमान वगैरे होतो, हि कल्पना स्त्रीने आणि तिच्याशी संबंधित व्यक्तीने देखील मनात आणता कामा नये. मी ज्या काळाबद्दल सांगत होतो, त्या काळात स्त्रीकडे कुटुंबाचे नेत्रुत्व होते. पुढे केवळ मुले जन्माला घालणे हेच कार्य राहिल्याने, त्यातच सर्व शक्ति व वेळ गेल्याने बायकांवर बंधने आली. अजुनही स्त्रीत्व हे मुलांवर ठरवले जाते. मुल असावे कि नको याच्या निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य मुलीना क्वचितच असते. मुलांवर प्रेम करणे हि अगदी नैसर्गिक उर्मी आहे हे मला मान्य आहे पण हिच उर्मी इतर मार्गानेही भागवता येतेच. निदान आजच्या काळात तरी संतति हा निकष असू नये, स्त्रीत्वाचा. आता राहिला नेतृत्वाचा मुद्दा. यासाठी राखीव जागा ठेवल्या, तर राबडी सारख्या कठपुतळ्याच पुढे येणार. त्यापेक्षा हा गुण कसा जोपासला जाईल, ते बघणे महत्वाचे. मला सांगा कि हाऊसिंग सोसायट्यांचे सेक्रेटरीपण हे अगदी घरच्या घरी करता येणारे नेतेपण. शहरात किती सोसायट्यांमधे असे आहे ?
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बसमधे स्त्रियांना राखीव जागा नकोत असं म्हणणारे ignorant बरेच पाह्यलेत पण दिनेश तुम्ही त्यात असावे हे खटकले. असा आक्षेप घेणार्यांना एकच विचारते मी.. तुम्ही अशी खात्री देऊ शकता मला की बसमधे/ लोकलमधे मी जनरल भागातून प्रवास केला तर मला कोणीही घाणेरडा स्पर्श, नको त्या ठिकाणी जाणारे हात या कशातूनही जावे लागणार नाही? जोवर भारतीय पुरूषांना गर्दीतली बाई ही त्यांची हाताळायची property वाटत रहाते तोवर खड्ड्यात गेली सगळी तत्वं.. मी या घाणेरड्या अनुभवापासून वाचण्यासाठी स्त्रियांच्या राखीव जागेचाच उपयोग करणार. आणि ज्यांच्या पोटात दुखतं या राखीव जागांबाबत त्यांनी स्वतःची पोटदुखी स्वतः सांभाळावी. वृद्धांना जागा इत्यादी ठीक आहे.. पण हे असे घाणेरडे स्पर्श करणारे, उगाच अंगचटीला येणारे पुरूष ह्यांचा वयोगट ४०-५० च्या पुढचा असतो. १८-२० वर्षाची मुलं नाहीत. ६५ चा माणूस बसमधे स्वतःच्या पांढर्या केसांचं भांडवल करत खेटून बसल्याचा अनुभव आहे माझ्या गाठीला.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अज्जुका, मी वरच लिहिले आहे. का सहन करता असले स्पर्श ? खेटुन बसणार्या आजोबाना, जरा सरुन बसा, हे चढ्या आवाजात सांगायचे की. सांगायचीदेखील गरज नाही, एक कटाक्ष देखील पुरेसा आहे. स्त्रीला उपभोग्य वस्तु म्हणुन प्रसारामध्यमानीच सादर केलेय. त्या सगळ्याचा जाहिर निषेध करा. शृंगार अगदी शारिर पातळीवर आणलाय, या माध्यमानी. चढ गयो पापी बिछुवा आणि पान खाये सैंया हमारो हि गाणी श्रुंगारिक नव्हती का ग्रेसफुल नव्हती, त्यातला अर्थ सहजपणे लक्षात येत होता, पण कजरारे च्या शब्दात नसलेला अर्थ, नाचातुन दिसला. आपल्या कुठल्याच शास्त्रीय नृत्यात अश्या हालचाली नाहीत. अश्या म्हणजे कजरारे मधे बच्चन पितापुत्र बारच्या टेबलावर चढुन करतात तश्या. का चालवुन घ्यायच्या या ?
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>नुसत्या स्पर्शाने कुठलाही अपमान वगैरे होतो, हि कल्पना स्त्रीने आणि तिच्याशी संबंधित व्यक्तीने देखील मनात आणता कामा नये.<< वाक्य विनोदी आहे. तुमच्या इच्छेविरूद्ध तुमच्या शरीरावर कुणी हात फिरवला किंवा अजून काही केलं तर वाईट वाटून घेऊ नका?? काहीही!! हो तात्काळ प्रतिकार अगदी शक्य आहे. फारच सोपं आहे नाही का ते? मी तर नेहमीच करते पण त्याने आलेली किळस, violated feeling हे कमी होतं का? मी उलटं वळून कानाखाली मारलेली आहे.. काय झालं? गर्दीत असल्यांच गोष्टी करणारे सगळे जण "जाऊद्याहो सोडून द्या!" म्हणत असल्याने तो माणूस गुर्मीत आला. मी पोलिसांकडे घेऊन जाणार होते तेवढ्यात त्याला पळून जायला सगळ्या गर्दीने मदतच केली. एवढंच काय! मधे फर्स्टक्लासच्या लेडीज डब्यात जाळीतून डोकावून आचकट विचकट बोलत बायकांना त्रास देणारे पकडले गेले नव्हते का? अगदी सुशिक्षित दिसणारी, चांगल्या घरातील मानसे होती ना ती. चार फटके पडल्यावर 'आमचं चुकलं' वगैरे!! पण तोवर काय? तोवर हे असलं बोलणं हा त्यांचा अधिकारच नाही का? नशिबाने जाळी मधे होती. ती नसती तर यांनी हातांचाही वापर केला असताच की.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अश्या सहेतुक स्पर्शाला प्रतिकार करणार्या कितीजणी असतात ? अनेकजणी घाबरुन, आपलेच काहितरी चुकले असेल असे समजुन अजुन अंग चोरतात. काय म्हणुन अपराधी भावना बाळगायची ? कुणीच मुलगी असले काहि खपवुन घेत नाही असे लक्षात आल्यावर कोण हिम्मत करेल, असे करण्याची ? आणि अचकट विचकट बोलणार्यांचे ऐकुन कश्याला त्रास करुन घ्यायचा ? राखीव जागा ठेवुन हे थांबणार आहे का ? बाकाच्या कडेला उभा राहणारादेखील अंगचटीला येणारच. काढा कि चिमटा त्याच्या पायाला. राखीव जागांबद्दल मला पोटदुखी नाही, पण त्याने मुलीना आत्मविश्वास मिळतो का ? कि प्रतिकार करण्याची शक्ति मिळते ?
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 3:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नुसत्या कटाक्षाने हलण्याइतके सरळ असतात का हे लोक? आता संपूर्ण अनुभव सांगते. पुणे-मुंबई वोल्वो चा प्रवास. लेडीज सीट मागूनही शेजारी ६०-६५ चा पुरूष. त्यावर विचारलं असता खाजगी बसवाल्यांची नेहमीची मुजोरी. आधी सीटसच्या मधली हात ठेवायचं खुर्चीचं हॅण्डल असत ते या माणसाने मागे केल. गरज काय? मी सटकलेच. दुप्पट वेगाने ते हॅण्डल मधे परत आणल. मग हॅण्डलवरून हात असा पसरून ठेवला गेला की त्या माणसाचं कोपर मला सतत लागत राहिल. मग हा माणूस अर्धी मांडी घालून बसला. या प्रकारात मी त्याच्याकडे रागाने अनेकवेळा कटाक्ष वगैरे टाकले. पण त्याचं खेटणं चालूच होतं. ते मुद्दाम होतं. अहेतूक नाही. मी स्पष्ट शब्दात तुम्ही तुमच्याच सीटवर बसा माझ्या बाजूला येऊ नका असं सांगितलं तर २ मिनिटापुरतं आवरून घेतलं त्याने पण परत पहिले पाढे पंचावन्न. मग मी माझी पर्स, पाण्याची बाटली मधे ठेवून टाळण्याचा प्रयत्न केला पण मला बसायलाच जागा उरेना आणि माझ्या पाठीच्या दुखण्याने तेव्हा उचल खाल्लेली असल्याने ४ - ५ तास अवघडून बसणे मला शक्य नव्हते. मी शेवटी 'तुम्ही तुमचे हातपाय तुमच्या सीटच्या आत ठेवले नाहीत तर जे होईल ती माझी जबाबदारी नाही.' असे सांगितल्यावर तो माणूस मला म्हणे की 'तू माझ्या मुलीसारखी' वगैएरे. 'मुलीसारखी असले तरी मला खेटून बसायची तुम्हाला काही गरज नाही.' मी बसवाल्याला परत बोलावले. आणि सांगितले तर 'ऍडजस्ट करा!' एवढंच त्याने सांगितले. माझ्याकडे सुदैवाने तेव्हा शिवणाचे माझे बेसिक सामान होते पर्समधे. मी सरळ त्यातले seam ripper (हे काय काय करू शकते हे ज्यांनी वापरलय त्यांना चांगलंच कळेल) काढले. हाताची घडी घालून उजव्या मुठीत ठेवून दिले. हॅण्डल वरून त्याचा हात आला परत आणि 'आ!' असा आवाजही. seam ripper ने आपलं काम केलं होतं. तो माणूस खुन्नस ने माझ्याकडे बघत होता. 'परत माझ्या सीटकडे तुमचा हात वा पाय आला तर अजूनही काही गोष्टींचा प्रसाद मिळेल. तेव्हा behave! ' एवढंच मी सांगितलं पण संपूर्ण प्रवासभर जागं रहाणं, संताप यांनी मला त्रास झाला त्याचं काय?
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 4:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रतिकार हं... दिवसभरात दर ५व्या मिनिटाला प्रतिकार करत जायचं असेल तर मुलींनी कॉलेज किंवा नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोचण्याचं विसरलंच पाहिजे नाही का? प्रतिकार केलाच तरी झालेला मनस्ताप कमी होतो का? स्वतःबद्दल वाटलेली किळस कमी होते का? इतक्या सहजपणे कुणीही आपल्याला कसंही violate करावं याची घाण वाटणं थांबतं का?
|
Bee
| |
| Wednesday, January 30, 2008 - 4:19 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी माझ्या १२वीला असणार्या पुतणीला विचारले की तू हल्ली चांगली राहत नाही. पुर्वी नीटनेटकी रहायची. त्यावर ती उत्तरली जरा छान राहील की १० जण मागे पडतात. १२वीचे विद्यान शाखेचे, भरपूर अभ्यासक्रम असण्याचे वर्ष ह्या १० जणांना तोंड देण्यात मला घालवायचे नाही म्हणून टिकली लावायची नाही, रंगीत कपडे घालायचे नाहीत, केस नीट करायचे नाहीत जेणेकरून आपण आकर्षक दिसणारच नाहीत. मग आपोआप कुणी आपल्या मागे लागत नाही.
|
Maanus
| |
| Wednesday, January 30, 2008 - 4:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विषय भरकतोय.. .. .. A must read for everyone, http://www.amazon.com/Mars-Women-Venus-Communication-Relationships/dp/006016848X men and women are supposed to be different, God has created them different. We should appreciate and accept what we are, than to compete with each other.
|
Mi_anu
| |
| Wednesday, January 30, 2008 - 4:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
समानता या विषयावर आता इतका उहापोह (काथ्याकूट??)झाला आहे की माझ्या कडे मांडायला वेगळे मुद्दे नाहीत. पण बसमधले किंवा सार्वजनिक जागांमधले वगैरे स्पर्श याबद्दल बोलावेसे वाटले. कितीदा वळून कानाखाली मारणार? आणि कोणाकोणाच्या? शिवाय बसमध्ये ठीक आहे, पण रस्त्यावर किंवा पूलावर मुळात आपल्याला असा स्पर्श झाला आहे या धक्क्यातून सावरुन मागे बघेपर्यंत तो नीच मनुष्य पुढे गेलेला असतो. मध्यम्वयीन एखादा माणूस बसमध्ये असे करत असल्यास उलटा कांगावा करतो. 'गर्दी आहे,मी काय करणार? मुद्दाम नाही झालं. तुम्हाला असे संशय येत असतील तर स्वत:च्या कार ने येत जा' असे म्हणणारेही सापडतात. सभोवतालचा समुदाय भांडणात बाजू घेण्यापेक्षा बाजूला उभे राहून गंमत पाहणे पसंत करतो. कधीकधी खुद्द बसचा वाहकच पैसे देता घेताना आणि तिकीटे द्यायला फिरताना असे स्पर्श करतो. कुणाकुणाला झापणार? अंग चोरणार्या बायका स्वत:ची चूक आहे असे मुळीच समजत नसतात. पण मने मेलेली असतात अशा स्पर्शांना आणि भांडणांना पण. भांडणे करण्यापेक्षा असे स्पर्श आणि अशी भांडणे टाळण्याकडे कल राहतो. स्वत:जवळ ब्लेड किंवा पिन असल्यास ती टोचण्याचा प्रयोग मात्र यशस्वी ठरतो. मुळात हे सर्व का होते? भारतात कपड्यातली किंवा आचार विचारातली मुक्तता पाश्चात्त्य देशांपेक्षा कमी. जे सहजप्राप्य नाही ते मग असे स्पर्श करुन मिळवण्याचा प्रयत्न केला जात असावा. युरोप अमेरिकेत हे लेडीज डबे किंवा राखीव जागा ठेवाव्या लागतात का? पण त्याचबरोबर आज भारतात अशा स्पर्शांना स्त्री प्रतीकार तरी करु शकते. अरबी देशासारखे बलात्काराला चार साक्षीदार मागून ते न मिळाल्यास स्त्रीला फटक्यांची शिक्षा तरी मिळत नाही हे नशिब.
|
Slarti
| |
| Wednesday, January 30, 2008 - 4:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
केदार, मलाही तेच म्हणायचे आहे जे तू मांडलेस. आताच्या काळात सीतेचा सरसकट आदर्श घेताना त्या कालाचा व आजचा विचार नको करायला ? सीता वगैरे दूर जाण्यापेक्षा स्वतःच्या घरीच आदर्श मानावीत अशी उदाहरणे नक्की सापडतील. मुख्य म्हणजे त्या उदाहरणांना आजच्या काळाचा पाया असेल.
|
Anaghavn
| |
| Wednesday, January 30, 2008 - 5:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अज्जुका ने छान मुद्दा आणलाय--रामाने मनात कशावरुन एकदाही दुसर्या बाईच विचार आणलाच नाही? सगळ्या कथाकारानी, किर्तन्कारांनी अस आळावुन आळवुन सांगितल आहे, पण प्रत्यक्ष पुरावा कुठी आहे? सितेची जशी हिंमत होती स्वत:ला सिद्ध्ह करण्याची तशी त्याच्यात का नव्हती? तो स्वत:हुन अस का म्हणाला नाही की "एकवचनी पणा सिद्ध्ह करण्याचा नियम मलाही लागु आहे, आणि मी त्याला तयार आहे." आणि अजूका म्हणते तशी सिता नशिबवान होती. तिल विचारल गेल, रावणाने त्या बाबतीत जबरदस्तिने कार्यभाग उरकला नाही. आजच्या जगात काय? ६ महिन्यांची मुलगी काय आणि ६० वर्षची आजी काय!!! जर बायकोबाबतीत कोणी जबरदस्ति केली तर ती "नवर्याशी एकनिष्ठ" नाही का मग? अजुन एक, जे किर्तनकार ईतकं आळवुन आळवून सांगतात रामाच्या "एकनिष्ठपणा" बद्दल, ते समोर बसलेल्या एखाद्या आकर्षक स्री कडे नक्की पहात नाहीत "तशा" द्रुष्टीने? मी जर मनापासुन सांगुन किंवा सिध्ध करुनही तुला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर गेलास उडत. तुच लायकीचा नाहीस माझ्या. मीच नाकारते तुला. अनघा
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 5:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
केदार अरे सीतेचा मुद्दा मी नाही काढला रे. धोंडोपंताने आख्यान लावलं होतं. माझ्या मुद्द्यांच्यातून हेच म्हणायचंय मला की त्या गोष्टींचा आज relevence राह्यला नाहीये.
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 5:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>>आपल्या कुठल्याच शास्त्रीय नृत्यात अश्या हालचाली नाहीत. अश्या म्हणजे कजरारे मधे बच्चन पितापुत्र बारच्या टेबलावर चढुन करतात तश्या. का चालवुन घ्यायच्या या ? << एक मिनिट.. शास्त्रात नाहीत म्हणून खपवून घ्यायच्या नाहीत याला काहीच आधार नाही. हे म्हणजे आमच्या नाट्यशास्त्रात नाही म्हणून आम्ही ग्रीक ट्रेजडी किंवा शेक्स्पिअर वाचणार नाही असं म्हणणं आहे. mass objectifying woman's body! हे वाईट आहे हे म्हणू हवं तर... पण हिंदी सिनेमांच्यातल्या गाण्यांमधे काय होतं हा मुद्दा नाहीये. हा समानता या संदर्भातला बीबी आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात जी असमान वागणूक दिसते, पटत नाही त्याबद्दल आहे. ते त्याबद्दलच राहूद्या.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|