|
Chinnu
| |
| Sunday, January 20, 2008 - 2:08 am: |
|
|
प्रिया, हल्ली recession चे वारे सुरु आहेत. अश्या वेळी इकडच्या लोकांच्या मनात असले विचार येणे साहजिक आहे. अश्या लोकांशी जॉब बद्दल discuss न केलेलं चांगलं. पण group बरोबर लंच करणे सोडू नकोस, काही गोष्टी सोडून दिलेल्या बर्या.
|
तू नक्कीच खूप मोठ्ठा कोणीतरी होशील. आर्च शुभेच्छांबद्दल धन्यवाद. पण कोन मोठा आणि कोण लहान? हेच विसरायचे आहे. सगळे एक समान. मग तो कारकुन असो किएखादा सी. इ. ओ. माणुस म्हणुन सगळेच सारखे. असो प्रसंग क्र. ३ माझा असाच अजुन एक मित्र जातीने ब्राम्हण. दुसर्यां कडुन म्हणजे "आमच्या" सारख्यांकडुन काहि चुक झालि वागण्यात किंवा बोलण्यात. तर नेहमीचा डायलाॅग " दाखवलिस ना जात?" मी बरेच दिवस मस्करित घ्यायचो. पण मग त्याच्या या बोलण्यामुळे बर्याच जणांना खटकायला लागले. कारण तो काहीहि काळ्वेळ न बघता कुठे हि कोणा समोरही हे वाक्य बोलायचा. आणि फक्त जे रिझर्व वाले होते त्यांनाच. पण तो वयाने आमच्या सगळ्यांपेक्क्षा मोठा. आणि शिवाय सामाजिक स्थान वरचढ त्यामुळे कोणी काही बोलायचे नाहि. पन एके दिवशी एका छोट्याश्या गोष्टी वरुन त्याने हे वाक्य उच्चारले आणि मी त्याला ईतका सुनावला. नंतर जे मला नको होते तेच झाले आमचे दोन वेगवेगळे ग्रुप झाले. मी आजतागायत त्याच्याशी बोलत नाहि. कधी कधी वाटते, अस नव्हतं करायला पाहिजे पण........
|
Arch
| |
| Sunday, January 20, 2008 - 3:18 pm: |
|
|
अभिजीत, मी जेंव्हा मोठ्ठा म्हटल, त्याचा अर्थ कीर्तिने किंवा यशाने घे. आणि माझ्यामते प्रत्येकाने आपण कोणीतरी बनाव किंवा करून दाखवाव अस ध्येय ठेवल पाहिजे.
|
Ajjuka
| |
| Sunday, January 20, 2008 - 7:14 pm: |
|
|
|कधी कधी वाटते, अस नव्हतं करायला पाहिजे पण........| का? का नव्हतं असं करायला पाहिजे? काही चुकीचं नाही असं सांगण्यात. हा फक्त कसं सांगायचं ते जमलं पाहिजे..
|
Dakshina
| |
| Monday, January 21, 2008 - 5:45 am: |
|
|
अभिजीत मला पण असंच वाटतं की तुम्ही जे केलंत ते बरं केलंत. किती दिवस ऐकून घेणार अशा गोष्टी? कुणी कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे हातात नसतं. त्याचं नशिब म्हणून (थोर म्हणणार नाही मी अजिबात) तो ब्राम्हण झाला. पण जातीवरून बोलून स्वतःला फ़ार छोटं करून घेतलं त्याने. आणि त्याला ही हे कळणं गरजेचंच होतं, की सगळीकडे आपण बोललेलं खपत नाही.
|
Manuswini
| |
| Monday, January 21, 2008 - 6:19 am: |
|
|
बर्यापैकी वरच्यासारखाच एक अनुभव, आमच्या ग्रूपमध्ये एक नेपाळी मित्र होता. तो स्वतला खूप भोला भाला innocent समजायचा(तो न्हवता ही वेगळी गोष्ट आणी ती Accept करणे दूरची गोष्ट) जरासे काही झाले की, काहीही असो तर कायम एक डायलॉग यार तुम नेपाल के नहि ना तो ये सब बाते तुम लोगो को अच्छी जमती है(लाडी लबाडी). नेपाळी सोडून अक्खी दुनिया 'हरामी'(हा त्याचा कायम शब्द). खेळताना (Tennis) आम्ही जिकंलो की लगेच, तूम लोग हरामी हो, हम नेपालीयोंको ये जमता नही. एक दिवस झाडूनच टाकला. त्याच्याच शब्दात सांगून टाकले, पहले जो शब्द तुम इस्तेमाल करते हो ना इसीसे पता चलता है की नेपालीस दोस्तो को कैसे गाली देते है, दुसरी बात की चलो मान लेते है हम हरामी है लेकीन हमे हरामी बनना पडता है क्योंकी तुम्हारे जैसे लोग जो हमारे आजूबाजू रहते है.
|
Sush
| |
| Monday, January 21, 2008 - 9:51 am: |
|
|
थोडस विषयान्तर होतय. पण रहावत नाहि म्हणुन, अभिजीत आपल्याकडे जातिचा दाखला असताना तो न दाखवता open मधे ऐडमिशन घेतलि. पण त्यामुळे open च्या एका विद्यार्थ्याचि seat गेलि असं नाहि का वाटत तुम्हाला? तुमचा द्रुष्टिकोन बरोबर होता. पण त्यामुळे एकाचे नुकसान झाले असं नाहि वाटत? असो याचि +ve आणि -ve दोनहि बाजु पहा.
|
Tiu
| |
| Monday, January 21, 2008 - 4:17 pm: |
|
|
म्हणजे जातीचा दाखला दाखवुन प्रवेश घेतला की म्हणायचं जातीचा फायदा करुन घेतला...आणि दाखला असुन पण ओपन मधे प्रवेश घेतला की म्हणायचं 'बिचार्या ओपनवाल्या विद्यार्थ्याची सिट गेली'. चांगलं आहे! चालु द्या...
|
जोपर्यंत राखीव जागा आहेत तोपर्यंत हा विषय क्लेशकारकच राहील. अभिजीत, तू जे केलेस ते स्पृहणीय आहे. पण मला सुशचा मुद्दा पण पटतो. मला अस वाटत की राखीव जागा असतील तर त्यात आधी प्रवेश मिळतो आहे का ते पहाव. त्यात मिळत नसेल तर ओपनमधे प्रयत्न करावा. तू स्वत: योग्यतेचा असूनही राखीव जागा सोडल्याने दुसर्या कमी मार्कांच्या माणसाला ती जागा मिळाली असेल. हेही उपयोगाचे नाहीच. शेवटी क्रिमच वरती आले पाहीजे. आणि टीऊच्या मुद्दा बरोबर आहे पण ओपनवाल्यांनी तसे बोलणे सोडले पाहीजे आणि ऐकणार्याने ते तसे बोलतात म्हणून मुद्दाम ओपनमधेच प्रवेश घेणेही सोडले पाहीजे.
|
Sush
| |
| Tuesday, January 22, 2008 - 4:09 am: |
|
|
tiu ज्याचि ३-४ मार्कांनी ऐड्मिशन जाते ना त्यालाच कळते त्याचे दुख्: तिर्हाइत माणसाना बोलायला काय लागते? असो open असो की category योग्य व्यक्तिला seat मिळायला हवी हेच माझे म्हणणे आहे. (स्वानुभव असल्याने लिहावे लागले.)
|
मला अस वाटत की राखीव जागा असतील तर त्यात आधी प्रवेश मिळतो आहे का ते पहाव. त्यात मिळत नसेल तर ओपनमधे प्रयत्न करावा.<<< सव्या, राखीवमध्ये प्रवेश मिळत नसेल तर ओपनमध्ये मिळणे आणखी दुरापास्त नाही का होणार?
|
Dakshina
| |
| Tuesday, January 22, 2008 - 8:52 am: |
|
|
सुश, मलाही तुमचे पटले, जागा ही योग्य माणसालाच मिळायला हवी.
|
मी ज्या काॅलेज ला प्रवेश घेतला तिथे ओपन आणि राखीवच्या भरपुर जागा तशाच राहिल्या कारण तेवढे लोक प्रवेश घ्यायला आलेच नाहि. माझे क्षेत्र जरा हट के आहे. असो सुश विचर करण्यासारखे लिहिलेत
|
आर्च भा.पो. धन्यवाद. पण मला कायम प्रश्न पडतो कि माणुस यश आणि किर्ती मिळाल्यावर इतका का बदलतो? आपण किती स्वार्थी असतो नाहि! म्हणजे हेच बघा ना, अपल्यातला प्रत्येक जण समोरुन सी.ई.ओ किंवा मॅनेजर आल्यावर गुड माॅर्नींग वगैरे म्हणतो. पण आपल्यातले किती जण टि बाॅय किंवा एखादा नेहमीचा झाडुवाला समोरुन आल्यावर असे करतो. ईथे अर्थातच अपवाद असतिल पण मी मेजाॅरिटी लोकांबद्दल बोलतोय. हा पण मला बोचनारा किसा आहे कायमचा.
|
Tiu
| |
| Tuesday, January 22, 2008 - 4:50 pm: |
|
|
सुश...तुमचं म्हणणं बरोबर आहे. Reservation बंद व्हायला हवं हे मलाही मान्य आहे. पण तसं होत नाहिये! याला उपाय काय? reservation बंद होण्यासाठी आपल्याला काय करता येइल? राखीव जागेत प्रवेश घेउ नका... राखीव जागा भरल्या गेल्या नाहीत की reservations आपोआप बंद होतील...फक्त सवलत मिळतेय म्हणुन फ़ायदा घ्या (तसं केलं तर ओपनच्या सिट्स पण ओपनवाल्यांना मिळतिल) असा विचार केला तर पुढच्या १०० वर्षात पण reservations बंद होणार नाहीत. केवळ आपली ऍडमिशन ३-४ मार्कांनी गेली म्हणुन reservation वाल्यांनी राखीव जागेत प्रवेश घ्यावा हा स्वार्थी विचार झाला. Think of the bigger picture. आज काही लोकांना त्याचा त्रास झाला तरी जर असं केल्यामुळे reservations बंद होणार असतील तर चांगलीच गोष्ट आहे. अभिजितने जे केलं त्याचं कौतुकच वाटतं मला तरी... असो, तुमच्या भावना दुखवायचा हेतु नाही.
|
Saurabh
| |
| Tuesday, January 22, 2008 - 6:24 pm: |
|
|
सुश चे म्हणणं अगदी बरोबर आहे. एक्दा राखीव म्हणून वेगळा कोटा निर्माण केला की त्या व्याख्येत बसणार्या सर्वांना त्याच कोट्यातून प्रवेश घेणे बंधनकारक असायला पाहिजे खरेतर! त्या व्याख्येत बसुनही त्या कोट्यात प्रवेश न घेणार्यांचा हेतु अतिशय चांगला असतो ह्यात शंकाच नाही. पण बहुतांशी अशा केसेसमधे चांगले गुण मिळालेले असतात. गुण कमी असुनही हि सवलत नाकारणारी उदाहरणे विरळाच आहेत. (मला तर माहितच नाहीत!) रिझर्वेशन सम्प्वायला राखीव जागेत प्रवेश घेउ नये हा कसाकाय उपाय आहे हे समजले नाही. कारण ज्यांना दुसर्या मार्गाने प्रवेश मिळणार नाही पण ही सवलत लागु आहे ते लोक हे करायला तयार होतील असे मानणं अगदीच दुधखुळेपणा म्हणावा लागेल. रिझर्वेशन संपवायला राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. रिझर्वेशनचा खरा हेतु लक्शात घेता ज्या उमेदवारांची मागची एक किंवा जास्त पिढी सुशिक्षीत आहे अशांना ही सवलत कायद्याने नकारली पाहीजे. एक किंवा दोन पिढ्या हा पुरेसा काळ असावा शिक्शणाचं महत्व पटायला आणि त्यासाठी पोषक वातावरण तयार व्ह्यायल माझ्यामते. ह्य पध्धतीने हळु हळु रिझर्वेशन कमि करता यायला हरकत नाही.
|
Tiu
| |
| Tuesday, January 22, 2008 - 6:49 pm: |
|
|
आणि लोक सवलतीचा फायदा घेतायेत तरिही केवळ राजकिय इच्छाशक्तिने reservations बंद होउ शकतील हे समजणेसुद्धा दुधखुळेपणाच आहे... गुण कमी असतांना सवलत नाकारणारी उदाहरणे विरळाच...पण गुण कमी आहेत म्हणुन जातीचे खोटे दाखले मिळवुन सवलतीचा गैरफायदा घेणारे ओपन कॅटेगरीतले लोकही असतातच. आणि अशी उदाहरणे विरळा नाहीत. तेव्हा ' reservation च्या एका विद्यार्थ्याची सिट गेली' असं म्हणालं तर?
|
Maanus
| |
| Tuesday, January 22, 2008 - 7:36 pm: |
|
|
Think Different Assumption: रिजर्वेशन प्रकार बंद होणार नाहीय. Solution: first of all you have to remove the thinking process from your mind that I want to be rocket scientist or want to work 9 to 5, हा विचार मनातुन निघाला तर बर्याच काही गोष्टी शक्य आहेत. B.E. आणि M.B.B.S. सोडुन अजुन कितीतरी शिक्षणाचे प्रकार आहेत. आपन जे काम करतो आणि जे शिकलेलो असतो ह्याचा खुप वेळेस काही संबध नसतो. तेव्हा नावापुरती कोणत्यातरी ठिकाणी admission घ्यावी. व आपल्याला आवडणार्या विषयाचा बाहेरुन जीव तोडुन अभ्यास करावा. मी gr8 असे नाही म्हणायचे मला, पण १२ ते s.y. रोज १० ते १५ तास माझा मी computer शिकलो आणि t.y. असताना मला पहीली नोकरी देखील लागली होती. भले ती ७०० रुपायची होती, पण कुठेतरी सुरवात झाली होती. आणि side by side माझे B.Com., Masters, म्हशींचे दुध काढणे, विकणे देखील सुरु होते. आणि नोकरी नसेल करायची तर बरेच काही करण्यासारखे उद्योग आहेत. अभिजीत, तुझे बोलणे वाचुन मला सरकारनामा मधला तो गावातला माणूस असतो ना, ज्याची जमीन रस्ता रुंदीकरणात जाते, त्याची आठवण झाली
|
Maanus
| |
| Tuesday, January 22, 2008 - 7:47 pm: |
|
|
oh god, i need to stop putting my thoughs on every board
|
Gobu
| |
| Tuesday, January 22, 2008 - 7:53 pm: |
|
|
माणसा, तुझ्या बर्याच पोस्ट विचार करण्यासारख्या असतात... लिहीत रहा..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|