Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 19, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through January 19, 2008 « Previous Next »

Ninawi
Thursday, January 17, 2008 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Supermom,
Don't you have a facility of calling security immediately? I got rid of the of a smelly dog on my floor. We used to use stairs if we feel like the owner has taken him for a walk (elevator used to smell really foul)

Supermom
Thursday, January 17, 2008 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, चिनू,अग मला तशी त्याच्या कुत्र्याबद्दल तक्रार नव्हतीच ग. भुंकणारं कुत्रं गप्प बसवता येत नाही हे जसं मला कळतंय तसं लहान मूल कधीतरी किंचाळणारच हे त्यालाही कळायला नको?

मी इतके दिवस त्याच्या कुत्र्याचा त्रास सहन केला, अन आता एवढ्याशा मुलीबद्दल कसली तक्रार? अन मुलीसमोर हा संवाद झाल्यानं मी जास्तच वैतागले. निदान मला किंवा माझ्या नवर्‍याला बाहेर बोलावून सांगायचं तेही नीट शब्दात.


माझ्या या आधीच्या घरात वरती एक इराणी कुटुंब राहत होतं. तीन लहान लहान मुलं नि नवरा बायको. इतके आवाज यायचे ना वरून. उड्या मारण्याचे, हसण्या खिदळण्याचे. पण आम्ही दोघंही नेहमी हेच म्हणायचो की इतकी लहान मुलं एका जागी बसणारच कशी? अन आम्ही तर या माणसाच्या खालच्या घरी राहतो. खालून वर आवाज जाणार तरी किती? त्यातून आपली मुलं म्हणून सांगत नाहीय पण माझी मुलं अती मस्ती करण्यातली नाहीत.

असो. प्रत्येक जण समजून घेतोच असे नाही. पण इथे लिहिल्यावर बरं वाटलं हे खरं. धन्स तुम्हा दोघींना.



Priyab
Thursday, January 17, 2008 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताच एक घडले..
माझ्या एका नविन project मधे खूप complicated scenario आहेत. सगळे permutation combination केले तर १०-२० हजार तरी होतिल. मि just एका american developer शी बोलत होते या वेळी की हा कसे confirm करणार आहे कि त्याने सगळे scenarios cover केले आहेत कि नाहि.. hi just said की I should ask some cheap illigal immigrant to sit and press button when every scenario is covered मि काहि इथे illegal immegrant नहिये.. but just for a single moment I felt bad .कालच ह्याच माणसाने मला एक news दाखवली होति की इथे maximum cheap illegal immigrant Indian आहेत. that news was about meso american Indians. But these people don't interpret it that way. They think thay the Indians means always us. He said see it says Indians
बर्‍याचदा ही लोक आपल्याला cheap labor असल्याचे feeling देतात directly or indirectly


Farend
Friday, January 18, 2008 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Priyab बाकी समजले पण नेटिव इंडियन्स immigrants कसे काय? ते येथेच जन्मलेले ना? का हे मेक्सिको व आणखी खालतून आलेले इंडियन्स? (' mayan civilizations ' वगैरे म्हणतात तसे). आणि हे जरी इंग्रजांनी भारतातील आदिवासींना भारतीय नागरिकत्व दिल्यासाराखे वाटले तरी... अशा सर्व नेटिव इंडियन्स ना काही वर्षापूर्वी अमेरिकेचे नागरिकत्व दिले गेले होते.

Bhagya
Friday, January 18, 2008 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, तू त्याला म्हणायचेस की...

The way your dog barks is unbelievable...... thats what triggers my daughters screams!


Runi
Friday, January 18, 2008 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, एम.ए. ला असतांना ही अवस्था, ते पण ललित कला केंद्रात. बाप रे. काय पण एक एक लोक जसे काही प्रत्येकजण स्वत: ठरवुन एखाद्या जातीत किंवा धर्मात जन्म घेतो.
पण मारामारी म्हणजे जरा अतीच झाल.

सुमॉ तु सरळ जावुन त्या अपार्टमेंटच्या केअर टेकरला सांग आणि पुढच्या वेळी तो कुत्रा ओरडला तर भाग्य म्हणाली तसे त्या माणसालापण जाऊन सांग तुझ्या कुत्र्यामुळे माझ्या मुलांना त्रास होतोय ते.


Priyab
Friday, January 18, 2008 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend it was about Meso American Indian ..correct केले आहे वर

Ajjuka
Friday, January 18, 2008 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग रुनी मारामारी नाही.. मी काय मारामारी करायला जाणार. मी तेव्हा होते पाप्याचं पितर आणि तो होता क्येवढा होता.. तो मारायला आला या कॉन्सेप्टनेच मी घाबरून गेले. पण नंतर निस्तरलं सगळं प्रकरण.

Dakshina
Friday, January 18, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, आता पैलवान आहेस, असं म्हणायचंय का तूला...
(प्लिज मनाला लावून घेऊ नको, मी गम्मत करतेय.)


Ajjuka
Friday, January 18, 2008 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं मनाला काय लावून घ्यायचं, आता झालेच आहे पैलवान म्हणून तर डाएट फूडची खुळं घुसलीयेत डोक्यात.
आणि जरी पैलवान झाले असले तरी ते दिसायलाच फक्त. बाकी कुणाच्या कानाखाली ठेवून द्यायची तर दम नाही अंगात.. तिथे अजूनही पाप्याचे पितरच :-)


Abhijeet25
Friday, January 18, 2008 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसंग क्र २
मी आणि माझा एक मित्र नेव्हि आणि मिलिटरि च्या प्रवेश परिक्षेबद्दल चर्चा करत होतो.
तो माझ्यापेक्षा तीन चार सेंटिमीटर ने बुटका आहे. तो मला म्हणाला कि मला त्यांनी उंची मुळे बाहेर काढले.
मी त्याला म्हणालो "कस काय? मी तर दोनदा सिलेक्ट झालो होतो."

तर हा पठ्ठ्या क्षणाचाहि विलंब न लावता म्हणतो कि "तुझ्या कडे कास्ट होती म्हणुन." मला विचारायचे तरि! आधिच निष्कर्श काढुन रिकामा.

मी त्याला शांत पणे सांगितले कि मी तिथे कास्ट वापरली नव्हती. आणि तिथेच काय मी माझ्या आख्ख्या आयुष्यात कधीच जात वापरली नाहि. त्या साठि मी बी.टेक ला प्रवेश न घेता डिप्लोमा केला ( जातीचा दाखला असुनहि), पण जात वापरणे चुकिचे आहे माहित असल्यामुळे कधीच जात वापरली नाहि. पण जे मी आजुबाजुला बघतो त्यावरुन मला असे नक्किच वाटते कि जातीच्या आधारे नाही तर निदान उत्पनाच्या आधारावर रिझर्वेशन आवश्यक आहे.

कुणीतरि वर म्हणल्याप्रमाणे आपणहि जुन्या लोकांप्रमाणे जातीला धरुन बसलो तर काहिच फायदा नाहि. पण माझे म्हणने इतकेच आहे कि या अशा टिपन्न्या येता जाता करणे टाळले पाहिजे. नाहितर जातियवादाची भावना प्रबळ होत जाते. हे सगळ्यांनाच लागु होते. ओपन आणि रिझर्व वाल्यांना सुध्धा


Ajjuka
Friday, January 18, 2008 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मधे शेजार्‍यांचा त्रास हा एक फारच पॉप्युलर प्रकार आहे. आम्ही पण चांगलाच अनुभवलाय.
फॉल मधे उसगावात, अथेन्स, जॉर्जिया मधे पोचले. प्रदेश, भाषा ( सदर्न इन्ग्लिश), माणसं, रूममेट सगळं सगळं नवीन.
आमच्या बरोब्बर खाली दोन देसी मुलं रहायची. डॉक्टरेटचे विद्यार्थी पण एकुणात undergrads ची पण maturity नाही. जसजशी सेम संपायला आली तसा यांचा वीकेंडचा दंगा वाढतच जायला लागला. मग त्यांना एकदा नीट रिक्वेस्ट केली. त्यांनी दुर्लक्ष केले. आम्ही मूग गिळून बसलो. पण मग जाता येता आम्हाला कळतील असे आवाज टाकणे सुरू झाले. तिकडे दुर्लक्ष करायचे तर हे लोक आम्ही एका रूममधून दुसर्‍या रूममधे चालत गेलो की खालून कशाने तरी ठोकायचे. हळू पळा, हळू चाला, आम्हाला distrub होतं असं सांगायला. मग उगाचच्या उगाच खालून ठोकाठोकी करू लागले. मग आम्ही India Student Association च्या प्रेसिडेंटला सांगितले. त्याने एकदा येऊन त्यांना नीट वागा असे सांगितले तर यांचा वीकेंडला त्रास देणे अजूनच वाढले. आम्ही घाबरतच चाललो.
एकदा फायनल्स च्या वेळेला स्वतःच्या डोक्यात काय बोलतोय तेही ऐकू येईना म्हणून शेवटी त्यांना फोन करून रिक्वेस्ट केली. तर त्यातला एक जण म्हणे 'की मी काय करू हे बाकीचे फुल टाइट आहेत. तूच खाली येऊन यांना सांग.' असे म्हणून वर निर्लज्जपणे हसला. मग अर्थातच पोलिस बोलावले. कॉप्स ने समज दिली त्यांना. तेवढ्यापुरतं थांबलं.
मग त्यांच्याकडे एक अनाहूत गोरी रूममेट रहायला आली. मग खालच्या अपार्टमेंट मधून भीषण भीषण आवाज येऊ लागले. एकतर ती मुलगी आणि त्यातला एक यांचा 'खेळीमेळी' रंगात आलेलं असायचं किंवा भांडण चालू असायचं.
बर या सगळ्Yआबद्दल नक्की काय रिक्वेस्ट करायची किंवा नक्की काय तक्रार आणि कुणाकडे करायची हेही कळत नव्हतं. आणि नवीनच असल्यामुळे घाबरायलाही खूप होत होतं.
मी Xmas च्या सुट्टीत मामाकडे गेले. आणि रूपल ४ दिवसांनी जाणार होती. तो वीकेंड तिने फार भयंकर रित्या घालवला. खालच्या घरातून इतके विकृत आवाज येत होते नाहीतर मोठ्या आवाजात system चालू असायची. रूपल खूप घाबरली. तिने कॉप्स ही बोलावले शेवटी आणि मग एका मैत्रिणीला फोन करून बोलावून घेतलं नी तिच्याबरोबर तिच्याघरी निघून गेली.


Nilima_v
Friday, January 18, 2008 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत २५,
तुमचे विचार खरोखर आवडले.
जातियता नश्ट करायची असेल, तर जातीचा वापर
समजात कमी झाला पाहिजे.



Kilbil
Friday, January 18, 2008 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक खुप जवळची मैत्रिण आहे. आमचे नवरे एकाच ठिकाणी नोकरी करतात. सध्या दोघेही कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. मग आम्हि दोघीही माझ्या घरी एकत्र राहत होतो. होतो..... कारण २ दिवसान्पुर्वी माझ्या पाठीत उसण भरली. आणि त्यानंतर ती माझ्याकडे फ़िरकली देखिल नाही. आतापर्यंत जेव्हा जेव्हा ती आजारी होती, मी तिला खुप मदत केली. अगदी सगळ्यापरीने मदत केली. २ दिवसांपुर्वीपर्यंत ती आरामात माझ्या हातचे आयते खात होती. आणि आता जेव्हा मला गरज आहे. ती गायब......! माझी ३ वर्षांची मुलगी आहे. पाठीच्या दुखण्यामुळे मला तिला सांभाळणेही जड जाते आहे. कोणीतरी मदत करावी असे वाटते अश्यावेळी. पण....... फ़ार वाईट वाटते आहे.

Chinnu
Friday, January 18, 2008 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किलबिल, तुम्हाला लवकर बरे वाटो. तुम्हाला जर कुणी मदत करावी असे वाटले तर फोन करून ते स्पष्ट सांगून टाका. परदेशात असतांना एकमेकांची मदत लागतेच.
नी भयंकर आहेत गं किस्से. कसे राहिला असाल तुम्ही सर्व. कल्पना करवत नाही.
प्रिया ह्या गोष्टी चालायच्याच. कारणे बरीच असतात. अशी गोरी लोकं बर्‍याचदा स्वत:च्या नोकरीवर आणि मिळकतीत सुखी नसतात. त्याचे खापर फोडायला असे काहीतरी काढून दाखवत असतात. सहसा मनात असले तरी हे लोकं असं directly बोलून दाखवत नाही. Office policies मुळे त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता असते. Anyways, दुर्लक्ष करणे उत्तम.


Arch
Friday, January 18, 2008 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या आख्ख्या आयुष्यात कधीच जात वापरली नाहि. त्या साठि मी बी.टेक ला प्रवेश न घेता डिप्लोमा केला ( जातीचा दाखला असुनहि)>>
अभिजीत, तुझ कौतुक वाटल.
तू नक्कीच खूप मोठ्ठा कोणीतरी होशील.

पण उत्पन्नाच्या आधारावरही जर reservation ठेवल तर खोटी certificates देणारे खूप असतील. college मध्ये असताना रोज स्कूटरवर १० बोटांत सोन्याच्या अंगठ्या घालून येणारा फ़ुकट शिकत होता तर वडिल govt service मध्ये clerk असूनही पूर्ण फ़ी भरत होता. कारण पहिल्याच्या वडिलांचा business होता.


Ameyadeshpande
Friday, January 18, 2008 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US मधे आल्या आल्या सिनसिनाटी ला मी आणि अजून २ मित्र जिथे रहायचो ते घर दुसर्‍या मजल्यावर होतं. खाली एक अफ़गानिस्तानची बाई रहायची तिशीतली. तिचं खरं नाव माहीत नसल्याने तिला आम्ही व आमचे सगळे मित्र तिला अफ़गाणी बाई म्हणायचो ज्याचा नंतर नंतर फ़क्त "अफ़गाणी" एवढाच shortform झाला होता. तिला तिची कार विकायची होती तर एक दिवस आम्हाला वरती येऊन तिनी सांगितलं की तुमच्या ओळखीतलं कुणी असेल कार हवं असलेलं तर सांगा तिला फ़ोन करायला.
नुकताच त्या आठवड्यात एक जण आला होता भारतातून तर आम्ही त्याला तिचा नंबर दिला आणि बोलता बोलता सांगितलं की "अरे वो अफ़गाणी कार बेच रही हई तो देख". तर ह्या मित्रानी तिला कॉल केला आणि " hello, am I talking to afgaani " अशी सुरुवात केली! :-) तिने चिडून फ़ोन आपटला म्हणुन त्यानी आम्हाला नंतर सांगितलं. त्यानंतर ते घर सोडेपर्यंत ती आमच्या कडे रागानी पहायची :-( :-)


Amruta
Friday, January 18, 2008 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा तुला का बर बोचतो?? ह तर तिचा बोचणारा किस्सा होइल. :-)

Ajjuka
Saturday, January 19, 2008 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला सदसद्विवेकबुद्धिची टोचणी लागून बोचत असेल.. :-)

Priyab
Saturday, January 19, 2008 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chinnu खरे आहे ग.. पण हा माणुस आहे ना याच्यबरोबर मी lunch ला गेले १-२ दा..तेंव्हा बाहेर गेल्यावर बोलला. office मधे एकदम directly नाहि बोलत.कधी कधी वाटते की सोडुन द्यावे या लोकांबरोबर lunch ला जाणे सुद्धा.
कालचाच किस्सा, office मधे layoff सुरु आहेत.तर lunch च्य वेळि सगळे त्याबद्दल बोलत होते.मी म्हटले मला India ला परत जायला लागेल जर माझा job गेला तर हा गोरा लगेच म्हणतो कसा कि don't worry our company will hire you there also as a cheap indian labor आमच्या company मधे बरेच indian लोक आहेत India तुन आलेले wipro, infy,TCS, accenture हुन


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators