|
Meenu
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:45 pm: |
|
|
इथे उसगावात माझ्या पण मनात खूप भावना दाटून आल्यात चला इथे लिहून मनातली गर्दी कमी करायला हरकत नाही. ह्या इथे लोक काय वाट्टेल ते चारापाणी जेवण म्हणून खातात. मस्तपैकी आपल्या घरचं जेवावसं वाटतय. अरे काय ही स्वच्छता धुळीचा कण म्हणुन दिसू देत नाहीयेत. छे छे am missing धूळ सारखं कसलं germ germ म्हणून बाऊ करतात एवढ्या तेवढ्या सर्दीला काय ते मेलं घाबरायचं अरे यांना कुणी तरी नीट उच्चार करायला शिकवा रे मीनाखी काय मीनास्की काय .. माझ्या नावाला अगदी काळीमा फासली या लोकांनी असो आत्ता जरा गर्दी कमी झालीये वाटतं .. नंतर येईन परत.
|
Sashal
| |
| Wednesday, January 16, 2008 - 7:09 pm: |
|
|
LOL श्रध्दा मला फ़ार वाटतं कधी कधी काचेच्या प्लेटस्, ग्लासेस्, bowls ची चळत घ्यावी आणि लाथाडावी चांगली जोरात, पिक्चरमध्ये दाखवतात तसं ..
|
Tulip
| |
| Wednesday, January 16, 2008 - 7:28 pm: |
|
|
श्रद्धा सशल नको गं असं करुसमला ते पिक्चरमधे राग व्यक्त करायला जोरात ग्लास फ़ोडतात किंवा हातातल्या पत्राचे वगैरे छोटे छोटे चिमुकले तुकडे करुन इकडे तिकडे सैरावैरा उडवतात किंवा टेबलावरचं भरलेलं ताट फ़ेकतात तेव्हा कोण साफ़ करणार आता ह्यांच्या कडचा असा पसारा म्हणून अगदी काळजी दाटून येते मनात
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 16, 2008 - 7:35 pm: |
|
|
बोलुनच टाकते मनातली भावना! एक चिनी बाई भेटते चिरंजीवांच्या कराटे क्लासमधे. टॉयलेट साफ करण्याचा जो मोठ्ठा मजबूत ब्रश असतो ना, त्याने तीचे दात (स्वत:च्या नाकाला फडकं बांधून) घसा घसा घासून द्यावेत असं बरेच दिवसांपासून मनात आहे!
|
५ मिनिटांनी सुरू होणार्या एका मिटींगला टांग मारून दुपारची मस्त ताणून द्यावी असं वाटतंय.
|
Manuswini
| |
| Wednesday, January 16, 2008 - 11:46 pm: |
|
|
श्र, LOL माझ्या मनातले, १)आता ह्या क्षणी खरे तर मस्त झोपावेसे वाटतेय. २)दुसरे म्हणजे येता जाता across बसलेल्या handsome Boss कडे बोलण्याचा कुठला बहाणा शोधू बरे हा simultaneously विचार चाललाय. काय क्यूट दिसतो / हसतो नेहमी. . अगदीच उचंबळून पुन्हा पुन्हा खाली वर होणारी तीव्र इच्छा म्हणजे सरळ इथून निघून घरी जावे. झोप घ्यावी, मग उठून फिरायला जावे. (अजून चारच वाजताहेत) नाहीतर,नको तेव्हढे उगीच वाकडे तिकडे प्रश्ण विचारणारा नी कारण नसताना उगीच किडके दतांचे smile देण्यार्या collegue च्या श्रीमुखात भडकावीसी वाटतेय(हा विचार आताच शिवून गेला मनात ही post पाठवताना तो उगीच cubicle मध्ये डोकावून दात विचकून गेला)
|
Manuswini
| |
| Wednesday, January 16, 2008 - 11:50 pm: |
|
|
मृ, LOL गं. अग तोही ब्रश कमी पडेल बहुधा तुझा विचार एकून तीव्रतेची जाणीव करू शकते.
|
विच्छा माजी पुरी करा.... योक नंबर विच्छा म्हंजी गंगीला आता नविन लुगड घ्यायाच हाय.... हीर्व्या लुगड्यात गंगी काय झाक दीस्ती... त्यो नरक्याचा सोपान सदान्कदा बायकुला घीवुन शिनुमाला जातो, इचारल तर म्हंतो नविन लगीन झालया... माज म्हंन्न इतरांची काय नविन लग्न झाली न्हाइत काय??.... पन खर सांगु मलाबी त्याच्यावानी सायकलवरती गंगीला डबलशीट घेउन शिनीमाला जायची लै विच्छा हाय.. झालच तर आपल्या शिर्यान साळत योकदातरी त्या जाधवाच्या रम्यापुढचा नंबर काढला पाहीजेल..लेकाच लै नाकान वांगी सोलतय.. येत्या दिपवाळीला मालकानी बोनसबरोबर कापडचोपड दील तर काय झाक हुईल अशीबी एक विच्छा हाय पन मालकाला कळल तर तो फोडुन काढील म्हणुन ती विच्छा क्यान्सल करतु....
|
है मीना sss ऑक्च्छी,कशी हैस..? रामभाव,लई भावना ऊतु चालल्यात म्हणायच्या की तुमच्या सशल,लई भारी भावना आहे बरं का तुझी... कधी मूर्त स्वरूप देतेस मग भावनेला?
|
Ajjuka
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:04 am: |
|
|
अबरचबर खावंसं वाटतंय.. भेळ, चाट, बटाटेवडे इत्यादी भावनांनी मनात नुसता फेर धरलाय.. आणि मी आजपासून डायेट सुरू केलंय!
|
Rajya
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:45 am: |
|
|
ऑस्ट्रेलिया सर्वबाद ८४, ३२ षटके तेंडुलकर ४ बळी
|
Ajjuka
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:54 am: |
|
|
राज्या, हे तुला वाटतंय की खरंच असं झालंय? :P
|
Itgirl
| |
| Thursday, January 17, 2008 - 12:43 pm: |
|
|
बर्याच वेळानंतर मायबोलीचा ऍक्सेस परत व्यवस्थित झाल्याने अगदी धन्यधन्य वाटतय आता कामात कस व्यवस्थित लक्ष लागेल हो माझ
|
Meenu
| |
| Thursday, January 17, 2008 - 2:17 pm: |
|
|
मला ना हपिसातल्या मोठ्या मोठ्या काचांवर काहीतरी (उदा मोबाईल) फेकून त्या फोडाव्यात असं नेहेमीच वाटतं .. सशल अगदी अगदी मलापण फार वाटतं की आपल्याला राग वगैरे आला की शिनुमात दाखवतात तसं सगळीकडे फेकाफेक करावी ..
|
Amruta
| |
| Thursday, January 17, 2008 - 3:58 pm: |
|
|
मला कंटाळा आला की मोठ्यांदा किंचाळावस वाटत. आणि खरच देशात पळुन जावस वाटतय.
|
Panna
| |
| Thursday, January 17, 2008 - 4:16 pm: |
|
|
मोदक ग अमृता!!! कंटाळा आला की जोरात ओरडुन आळस देते मी!! आत्ता ह्या क्षणाला एक जीनी (सांगकाम्या) असावा आपल्याकडे असं वाटतय... म्हणजे घरातली सगळी कामं उरकतील! आणि मला एखाद्या छानश्या स्पा मधे दिवस घालवासा वाटतोय!!
|
Mandarnk
| |
| Thursday, January 17, 2008 - 4:26 pm: |
|
|
मला माझी Yamaha RX100 घेउन सिंहगड वर जावसं वाटतंय!
|
Chinnu
| |
| Thursday, January 17, 2008 - 4:37 pm: |
|
|
अमृता, पन्ना, मीनु, साशल, मंदार... सर्वांना मोदक
|
Sashal
| |
| Thursday, January 17, 2008 - 5:58 pm: |
|
|
आज मला ऐश्वर्या राय सारखं जगत् सुंदरी व्हावंसं वाटतंय .. म्हणजे छान छान designer wear घालायचं, त्याला designer accessorize करायचं .. आणि जगभर लोकांचं कौतुक झेलत glamarous होऊन फ़िरायचं ..
|
Arch
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:07 pm: |
|
|
आता कोणाला अभिषेक बच्चन व्हावसं वाटतय ते लिहा रे लवकर.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|