Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 11, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through January 11, 2008 « Previous Next »

Maanus
Thursday, January 10, 2008 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए विशय बदला. .. ..

Ankyno1
Thursday, January 10, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Actually मी त्याला कानखाली हाणल्या नंतर आई,माई च्या सभ्य भाषेत समज देणार होतो...
पण तो कानाखाली खाल्यावर ज्या पद्धतीनी ओकला... ते पाहून मला प्रचंड हसायला आलं...

नुसतं समजाउन कोणीही ऐकत नाही...
आपलंच बोलणं हवेत जातं...
त्यापेक्षा त्यांना कळेल अशा हाताच्या भाषेत सांगणंच बरं...


Dineshvs
Thursday, January 10, 2008 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे थुंकण्याची पद्धत आपल्याकडे बहुतेक तंबाखुमूळेच सुरु झाली असावी. नुसत्या पानात किंवा अगदी त्रयोदशगुणी विडा घेतला, तरी त्यात थुंकण्यासारखे काहीच नसते.
तोंडातील लाळ, पाचनाबरोबर तोंडातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचेही काम करते. एखादा रोग वा कफ़खोकला झाला नसेल तर थुंकण्याचे काही कारणच नाही. माझ्यामते लाळ हे काही शरिराचे उत्सर्जित नाही.

भारतपेक्षाही जास्त तंबाखु वापरणारे देश आहेत, ( उदा. इजिप्त, टर्की, मेक्सिको ) पण तिथे सिगारेट, हुक्का, चिरुट वगैरे जास्त वापरले जातात. त्यामूळे थुंकण्याचा प्रश्नच येत नाही.

थुंकण्याच्या बाबतीत आपले सख्खे शेजारीच म्हणजे पाकिस्तान आणि बांगला देशच आपले स्पर्धक ठरतील.

कोल्हापुरात, पुण्यातही हा प्रकार जास्त दिसतो. मुंबईत आहेच. ( काल सांताक्रुझच्या नव्या एअरपोर्टवर गेलो होतो. तिथला अरायव्हल एरिया, छान सुशोभित केलाय. सगळीकडे पांढर्‍या लाद्या आहेत. तिथे काहि ठिकाणी, पुढे उपयोगी येतील म्हणुन जमिनीखालुन काहि केबल्स घातल्या आहेत आणि त्याची टोके वर काढली आहेत. लोकानी थुंकण्यासाठी नेमका तोच स्पॉट निवडला आहे.

जुन्या इमारतीमधे कोपर्‍यात मुद्दाम देवाच्या टाईल्स लावलेल्या दिसतात. यात सर्वधर्मसमभाव साधला असल्याने, त्याचा उपयोग होतो असे दिसतेय.
कायदा करुन, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध ठरवणे हाच यावर उपाय आहे. आणि अर्थातच राजकिय इच्छाशक्ति देखील हवी. ( त्याचीच आपल्याकडे वानवा आहे. )

थायलंडमधे मात्र यावर उत्तम उपाययोजना झालेली आहे.



Varsha11
Thursday, January 10, 2008 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुंकणारया लोकांना पकडायला पोलिस तर जागेवर पाहिजेत ना. असे पचापच थुंकणारया लोकांना बघुन तळपायाची आग मस्तकात जाते. माझे ऑफिस सुटल्यावर मी ट्रेन पकडायला जाताना शेजारच्या बिल्डिंग मधुन एक मुलगी पण निघते आणि रोज न चुकता रस्त्यावर थुंकते. अशी घाण वाटते ना पण एकदा सांगितले पण काहि फायदा नाही झाला. आता तर मुद्दाम थुंकते आणि मारक्या म्हशी सारखे बघते. (तिचे डोळे मांजरी सारखे आहेत.)

Varsha11
Thursday, January 10, 2008 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक किस्स्सा
मला माझ्या लेकिला घेउन अंधेरीला जायचे होते. सोसायटिच्या बाहेर आल्यावर रिक्षा दिसली तो यायला तयार झाल्यावर बसलो. त्याला मी रिक्षा वळवुन दुसर्या रस्त्याने घेयला सांगितले तरी हा आपला सरळच जातोय मी त्याला दोन्-तिन वेळा सांगितले तरी एइकायलाच तयार नाही मग मी त्याला जरा जोरत बोलले की रिक्षा वळवुन घे तर तोंडातला पानाचा तोबरा सगळा रस्त्यावर, समोरुन येणारा माणुस पण वेआतागला. मी तर अजुनच चिडुन त्याला बोलले तर म्हणतो खाली उतरा मी येणार नाहि मी सांगितले की मलाच यायचे नाही तुझ्या रिक्षातुन.

(हा रिक्षावाला भय्या होता. थोडे पुधे गेल्यावर सगळे मरठी रिक्षावाले उभे असतात एक्जण यायला तयार होत नाहि कशाला उभे राहतात तेच कळत नाहि.)


Aashu29
Thursday, January 10, 2008 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अंधार पडायला लागल्यावर कोणि रिक्शावाल्याने नाहि म्हटले कि जी चिड येते ना मी त्याला शाप देउन जाते आज राततक तुमको कोइ passenger नही मिलेगा.


Dineshvs
Thursday, January 10, 2008 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुंकण्याबाबत सार्वजनिक नसले, तरी खालील प्रकार मला अत्यंत घृणास्पद वाटतात.
१. थुंकी लावुन पुस्तकाचे पान उलटणे ( तसेच पानाचे कोपरे दुमडणे, वा पाने आवाज करत उलटणे )
२. थुंकी लावुन नोटा मोजणे.
३. काहिही घाण वस्तु दिसली कि पचकन थुंकणे.

तसेच मला, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, एखाद्याची थुंकी झेलणे या क्रियाही आवडत नाहीत आणि ते वाक्प्रचारही.


Maasture
Thursday, January 10, 2008 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कित्ती छान माहिती दिलीत. पण तुम्ही वाटूंबे का ओडूंबेला होता तिथे लोक कसे थुंकायचे किंवा मग तुम्ही तिथे त्यावर काय उपाय केला हे पण सांगा ना प्लीज.

Prady
Thursday, January 10, 2008 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा २००५ च्या डिसेंबरचा आहे. मी आणी माझा नवरा आमची सॅन फ्रान्सिस्कोची ट्रिप संपवून अटलांटाला परत येत होतो. एयरपोर्टवर थांबलो होतो बोर्डिंगची वाट बघत. आमच्या समोरच एक देसी माणूस बसला होता. मधेच त्याने चक्क पानाचा डबा काढला. व्यवस्थीत पान वगैरे लावून घेतलं आणी बसला चघळत. साधारण १५-२० मिनिटात बोर्डिंग सुरू झालं आणी सगळे उठून रांगेत उभे राहिले. ह्या माणसाने काय करावं. सगळे रांगेत उभे आहेत आणी कुणाचं लक्ष नाही पाहून हा माणूस चक्क तिथल्या एका झाडाच्या कुंडीत थुंकला. काय म्हणावं अशा लोकांना. लाज तर नाहीच पण भितीही नाही वाटत ह्या लोकांना. आजुबाजूला सिक्युरिटी वाले असतात, कॅमेरे लावलेले असतात. पकडले गेलो तर शासन होऊ शकतं. कसलंही भान नाही.

Mrinmayee
Thursday, January 10, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोंडाचा मचामच आवाज करत, घास चावताना तोंडाचं विश्वदर्शन करत जेवणारी माणसं.
सगळ्यांबरोबर जेवायला बसताना फुर्र फुर्र करत वाटीतल्या कढ्या, वरण आणि पातळ भाज्यांचे भुरके मारणारे लोक.
जेवताना पाचही बोटं चाटून वर त्याच बोटांनी आपल्या पानातला घास लहान मुलांना भरवणारे लोक.
ओळखीच्या एका आजोबांना वरच्यापैकी पहिल्या दोन क्रिया करताना बघीतल्या. इतरांना जेवण जाईना. नातु (वय वर्षे ५)म्हणाला, "आबु असं आवाज करत जेवलं की आई रागवते!"


Manuswini
Thursday, January 10, 2008 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या वरच्या list मध्ये आनखी एक जेवण झाल्याअव्र मोठ्याने ढेकर देणे.
आणि घाण वास सोदणे
शीऽऽ.!


बरे पुरे आता हा विषय.


मलाच येवत नाही इथे आता :-)


Prajaktad
Thursday, January 10, 2008 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा! बोचणारा किस्सा माझ्या मैत्रीणिचा .. तिने नुकतच इथे स्व:ताच घर घेतल आहे. राहत अपार्टेमेंट सोडुन जाताना सगळ क्लिनिंग वैगरे छान करुन गेलीली..२ महिन्यांनी तिला ४०० $ चा दंड शिवाय २०० $ जे डिपॉजिट होते तेही जप्त केल्याची नोटिस..कारण म्हणे कारपेट वर burn maarks होते,दाराला होल करुन ठेवले...माझ या मैत्रिणी कडे बरच जाणयेण होते..तिच घर अगदी नेहमी टापटिप आणी छान स्वच्छ असायचे.
तिने फोन करुन सांगितले की माझ्याकडे कुणी स्मोक करत नाही.. बर्नमार्क येतिलच कुठुन? तर म्हणे तु गरम ईस्त्री वैगरे पाडली असशिल..बरच सांगुनही म्हणे आम्हाला कार्पेट चेंज करायला १६०० लागले तुम्हाला फ़क़्त लिविंग रुम चे मागतोय.. मुकाट भरा नाहितर वकिल घेवुन कोर्टात या!.. नविन घराचा पहिला हप्ता जायचा होता..क्रेडिटवर परिणाम नको म्हणून भरले पैसे तिने..


Sunidhee
Thursday, January 10, 2008 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे.... ऑ!! बास आता :-) :-) :-) लोक्स पेटून की हो उठलात..

Deepanjali
Friday, January 11, 2008 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US प्रमाणेच कुत्र्यांचे फ़ाजिल लाड करणारे लोक वेताळ टकडीवर भरपूर दिसतात .
पण लोकांवर स्वत : चे कुत्र प्रेम लादणार्‍या व्यक्तीं साठी आणि त्यांच्या लाडक्या कुत्र्यां साठी जालिम उपाय करायला लागल्या पासून माझा त्रास आटोक्यात आला आहे .
त्या कुत्रे वाल्यां समोर त्यांच्याच कुत्र्याला असा दगड मारते कि तो मालक आणि कुत्र दोघांना लागला पाहिज .

अज्जुका ,
त्या कंगवा मागणार्‍या मुलीं वरून अजुन एक भयानक वाईट सवय असलेल्या मुलींची category आठवली , दुसर्‍यांना चक्क लिपस्टिक मागतात त्या मुली !
आणि अगदी so called neat n clean म्हणवणार्‍या मुलींनाही ही केवळ एखादी शेड घ्यायचा आळस म्हणून ही सवय असते हे पाहून irritate होतं !
अशा मुलींना टाळण्या साठी सुर्वातीला मी काही तरी थापा मारून वेळ निभाउन न्यायची पण अता सरळ नाही म्हणून सांगते .
माझ्या personal make up kit मधली कुठलीही गोष्ट share करणे किंवा दुसर्‍याची used cosmetics मागणे मला मुळीच आवडत नाही .


Ajjuka
Friday, January 11, 2008 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍याची कॉस्मेटिक्स या वापरणे या गोष्टीला मी आता immune झाले आहे दुर्दैवाने. मी वापरत नाही पण कुणी वापरलं तर मला काही वाटेनासं झालंय.. नाटकात राहून..
तिथे १ मेकप किट असतो सगळी तोंडं रंगवायला. प्रत्येकासाठी वेगळा स्पंज, पफ, ब्रशेस हे परवडत नाही. त्यामुळे चेहर्‍यावर ते सगळे रोगण थापले जाण्यापूर्वी चेहरा नीट साफ करून astringent, moisturiser चा थर द्यायचा आणि निधड्या छातीने आल्या मेकपला सामोरे जायचे आणि प्रयोग संपला की तडक चेहरा साफ करायचा ह्याची सवय लागली.
मग त्या नाटकातल्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यात एरवी पण मेकप शेअर करणे सुरू झाले. जसं एका छोट्याश्या खोलीत २५ बायका एकावेळेला असताना धडाधडा निर्लज्जासारखे कपडे बदलायचे आणि entry घ्यायची याचीही सवय लागली.
नंतर theatrical, film makeup शिकल्यावर नाटकांच्या orders घेताना लक्षात आलं की एका प्रयोगाचे जर मला २०० मिळणार असतील तर त्यात प्रत्येकासाठी वेगळ्या वस्तू आणणे शक्यच नसतं. हो पण मला कुणी चॅपस्टिक मागितली तर ती मात्र मी सरळ नाही सांगते.
पण एकुणातच नाटकांचे दौरे किंवा शूटींग्ज यामुळे तुम्ही अनेक गैरसोयींना tune in होता.
एका outdoor शूटच्या वेळेला शूट लांबलं आणि माझे बरोबर असलेले सगळे कपडे मळवून संपले कहि ओढ्यात पडून ओले झाले. जीन्स तर अर्थात जगभराच्या धूळ मातीने भरलेली होती. एकही स्वच्छ शर्ट किंवा टिशर्ट उरला नव्हता. जिथे आम्हाला झोपायलाही ४ तासाच्यावर वेळ मिळत नव्हता तिथे कपडे धुवायला थोडीच मिळणार! आणि युनिट वर धोबी नव्हताच. मग काय संदीपकडे एक शर्ट उरला होता तोच पळवला मी. तेव्हा तो नवरा नव्हता किंवा भावी नवरा असू शकेल अशीही शक्यता निर्माण झाली नव्हती. पण पर्याय नव्हता..
सगळ्याची सवय होते. त्यामुळे कधी कुठेही अडत नाही. अर्थात या गोष्टी रोजच्या आयुष्यात करायच्या नसतातच.


Deepanjali
Friday, January 11, 2008 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजुका ,
Face painting artists एका round sponge ची दोन तुकडे करून संख्या वाढवतात:-)
Clean करताना पाण्या मधे स्पंज उकळून strlise करतात .
अर्थात प्रत्येक वेळा brush बदलणं शक्य च होत नसेल इतके लोक असताना , पण जसे sephora सारख्या cosmetic store मधे use n throw lip buds, use n throw mascara tips मिळातात असे काही solution नाही का मिळत इथे ?


Ajjuka
Friday, January 11, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाळ डिजे,
तू पृथ्वीतलावरच्या कुठल्या भागाबद्दल बोलतेयस हे विसरलीस का? :-)
मी तर प्रायोगिक करायचे/ करते, पण भारतातल्या नाटकांचे अगदी व्यावसायिक सुद्धा चित्र फार गरिबीचे असते.
८ १० जणांच्या मेकपसाठी २०० - ३०० रूपये नाईट मिळते बिचार्‍याला. काय काय expect करायचं त्याच्याकडून? त्यातल्या त्यात मेन नट्/ नटी असेल तर त्यासाठी वेगळं ठेवलं जातं.
प्रायोगिक असेल तर ग्रुपचं एक किट बनवलेलं असतं अगदी गरजेच्या काही वस्तूंचं. त्यात जे काय होईल ते.
जाणता राजा करायचो तेव्हा १५० २०० तोंडं रंगवायची असायची. मेकपवाले ४ ५ आणि वेळ २ ३ तास. नव्या मुलांनी ५ मिनिटाला एक आणि जुन्यांनी ३ मिनिटाला एक चेहरा या वेगाने उरकलं नाही तर आमच्या दिशेने विक्रमचा(विक्रम गायकवाड, माझा मेकपचा गुरू) एक सणसणीत टोमणा यायचा. अगदी जाहीररीत्या. असा टोमणा की धरती दुभंगून मला पोटात घेईल तर बरं.. कसलं Use n throw घेऊन बसलीस. आणि आम्ही स्पंजचे तुकडेच वापरायचो तिथे.
प्रयोग संपल्यावर खोबरेल तेलाने तोंड चांगलं चोळून काढा. पुसून काढा आणि मग साबणाने धुवून काढा.
काही प्रोब्लेम येत नाही. यायचा नाही.
इथे देशात सगळ्यांच्या स्किना गेंड्याच्या आहेत.. त्या मेकपने त्रास होण्यापेक्षा दौर्‍याची जेवणं आणि जाग्रणं, प्रवास याचाच त्रास जास्त होतो.


Ajjuka
Friday, January 11, 2008 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्रेकर्स कसे काहीही ऍडजस्ट करू शकतात पण रोजचे रोज तसंच वागत नाहीत... तोच प्रकार हा!

Supermom
Friday, January 11, 2008 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिपस्टिक मागणार्‍या मुलींचा मलाही खूप वाईट्ट अनुभव आलाय. गंमत म्हणजे आपण काही चूक वागतोय हे गावीही नसतं यांच्या. असंच दुसर्‍याची पाण्याची बाटली बिनदिक्कतपणे तोंडाला लावून पाणी पिऊन वर उरलेलं परत करणार्‍या लोकांमुळे तर अगदी तिडीकच येते. फ़ेकूनच द्यायची बाटली अशावेळी...

Divya
Friday, January 11, 2008 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसे sephora सारख्या cosmetic store
हे shop मात्र मस्त आहे... एकदा आत गेल कि लवकर बाहेर यायच नाव नको.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators