Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 09, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through January 09, 2008 « Previous Next »

Vinaydesai
Tuesday, January 08, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मात्र खरं.. बेसबॉलचे खेळाडू सतत तंबाखू खाऊन थुकत असतात, अगदी मैदानात सुध्दा...
:-(

Shendenaxatra
Wednesday, January 09, 2008 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकन लोक थुंकणे हे आपण कसे माचो मर्द आहोत ते दाखवायला करतात म्हणे.
पण निदान मोटर गाडी चालवत असताना सिग्नल आला की पच्, रेल्वेत बसल्यावर स्टेशन आले की पचापच् असे थुंकण्याचे गलिच्छ प्रकार फार दिसत नाहीत.
न्यू यॉर्कमधे गर्दीच्या थिकाणी चालत असताना कुणी अंगावर थुंकेल अशी भीती नसते.
भारतात घाईत असल्यामुळे भरभर चाललो तर एखाद्या थुंकीवीराचा प्रसाद मिळू शकतो.

थोडक्यात अमेरिकेत हे प्रकार बरेच मर्यादेत आहेत. भारतात प्रकार हाताबाहेर गेला आहे.


Ankyno1
Wednesday, January 09, 2008 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बाईकवरनं म्हात्रे पुलाकडून शास्त्री रोड कडे जात होतो....
मझ्यामागे बस होती आणि समोर एक राजस्थानी सायकलस्वार (कानातल्या बाळीवरनं ओळखलं)....
मी त्याला ओवरटेक करत असताना तो पचकन उजवीकडे थुन्कला... अंगावर उडू नये म्हणून मला ब्रेक लावावा लागला... मागे पी. एम. टी... मला धडकी... बस चे ब्रेक नाही लागले तर आहे राम नाम सत्य.... पण नशिबानि वाचलो... मग शिस्तीत बस ला साइड दिली आणि निघालो...
त्या सायकलवाल्याच्या शेजारी आल्यावर बाईक स्लो केली आणि डाव्या हातानी त्याच्या कानाखाली सणसणीत हाणली.... त्या मारमुळे त्याचं तोन्ड पलीकडे झालं आणि तोन्डात होता नव्हता तेवढा सगळा ऐवज त्यानी थुन्कला (ओकला म्हणणं जास्ती योग्य ठरेल)
ते पाहून त्या ही परीस्थितीत मला साॅलिड हसायला आलं आणि मी हसत हसत निघून गेलो
तो जाम भंजाळला असेल... पण असूदे
he deserved that

Monakshi
Wednesday, January 09, 2008 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

very good Anky, well done. ह्या लोकांशी असच वागायला पाहिजे.

Aashu29
Wednesday, January 09, 2008 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकी पण त्याला कळाले का कि तू का मारलेस ? यांच्या गावीहि नसते कि आपण काहि चूक केली वगैरे असे.

Zakki
Wednesday, January 09, 2008 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, खरे आहे. पण त्या वेळी मैदानात जवळपास २० यार्डात एकही मनुष्य नसतो. नि त्या जागी उभ्या रहाणार्‍या लोकांखेरीज इतर कुणालाहि त्याचा त्रास होत नाही!

Arch
Wednesday, January 09, 2008 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, public property वर थुंकण वाईट म्हणजे वाईटच. आणि घाण म्हणजे घाणच.

आणि कोणी थुंकल तर मारहाण करणंपण चुकीच आहे. may be त्याला त्याच्या शर्टाने थुंकलेल पुसायला सांगाव. पण जसा त्याला रस्त्यात थुंकायचा हक्क नाही तसा आपल्याला मारायचाही हक्क नाही. हे माझं मत आहे.


Shendenaxatra
Wednesday, January 09, 2008 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंकी, ब्राव्हो! चांगला समाचार घेतलास त्या नालायक माणसाचा.
फक्त त्याला का फटकावले ते सांगितलेस तर पुन्हा थुंकण्यापूर्वी विचार करेल.
इतक्या हलकट वागण्याला चौदावे रत्न हाच उत्तम उपाय. गांधीगिरीचा इथे काही उपयोग नाही!


Supermom
Wednesday, January 09, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आर्चचे म्हणणे पटते. मारणे हा फ़ारच टोकाचा उपाय झाला. अंगावर हात उचलणे ही गोष्ट सगळ्याच परिस्थितीत बरोबर नाही. अर्थात हे माझे मत झाले.

Tiu
Wednesday, January 09, 2008 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

may be त्याला त्याच्या शर्टाने थुंकलेल पुसायला सांगाव.
>>>

आणी असं सांगितलं तर तो लगेच शर्टाने पुसेल का? अश्या लोकांना फटकवायलाच पाहिजे!

Sunidhee
Wednesday, January 09, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण हा वाईट्ट अनुभव आला होता.
अशीच बस ने गावाला जात होते कॉलेजात असताना आणि पुढे बसलेल्या शेतकर्‍यानी पान खाऊन बस जोरात धावत असताना खिडकीतून पिन्क टाकली. मी त्याच्या मागच्या खिडकीशी बसले होते व खिडकी उघडी होती. काय झाले असेल तुम्हाला सांगायला नको. ई SSSS !!!! तोलच गेला माझा रागाने, आयुष्यात भडकले नव्हते एवढी मी भडकले आणि त्या माणसावर इतकी जोरात ओरडले, 'समजत नाही का थूंकू नये ते. पुन्हा थुंकाल तर बघा'. म्हटले इतकेच पण खच्चून, जवळजवळ किंचाळून ओरडले. मग तोच काय बाकीची पण पुढे,आसपास बसलेली माणसे, जी पानाचा तोबरा भरून बसली होती, त्या पैकी पण कोणी थुंकले नाही. बस थांबल्यावर नळावर जाऊन नंतर कितीवेळा मी तोन्ड धुतले असेल सीमा नाही. कारण प्रवास संपला नव्हता ना.. तो ड्रेस तर फेकुनच दिला. धुण्याच्या भानगडीत पण पडले नाही. अजुनही शहारा येतो.. ई!!!


Manuswini
Wednesday, January 09, 2008 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुंकण्यावर खरेच fine बसवला पाहीजे. इतकी घाण वाटते ना थुकताना कोणाला बघणे पण.
ह्या लोकांच्या घाणेरड्या सवयीनी माझी class test बुडाली होती लहानपणी.
शाळा खुप जवळ होती, चालत जाऊ अशी. परीक्षा होती... सकाळची वेळ होती. मी रस्ता क्रॉस करायला नी सायकलवरचा दूधवाला भैया थुकणे एकदम.
सगळी त्याची थुकी माझ्या पुर्ण तोंडावर नी ड्रेसवर.. सरळ परत घरी गेले.
आजही विचार करून किळस वाटतो आठवून.. चांगले बदडावेसे वाटले. त्यामुळे कोणाला मारणे वाईटच असले तरी 'हे' असे झाले की बघा तुम्हाला 'खरोखर' बदडावेसे वाटते की नाही. believe me . त्यामुळे 'चोपावेच' जरा. शीक्षा ही झालीच पाहीजे त्या माणसाला.

त्यादिवशी मी कीतीतरी वेळा रगडून रगडून चेहरा धुतला होता........ कोणाला एखादा रोग असेल तर कीतीतरी भयानक प्रकार आहे हा रस्त्यावर थुकणे.


Manuswini
Wednesday, January 09, 2008 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, sorry to say पण माझा वरचा किस्सा जरा imagine करून बघ. तुला त्याक्षणी बदडावेसेच वातेल.

तेव्हा म्हणतात ना 'लातो के भूत बातो से नही' त्यातला प्रकार आहे.
उगाच नको तितका सभ्यपणा नको तिथे दखवणे किंवा भासवणे जरा ज्यास्तच आहे.(हे तुला उद्देशून नाही आर्च). :-)
(खरे तर मला स्वतला सुद्धा 'थुक्याला' बदडावेसे वाटले तरी कितपत शक्या आहे हा ही प्रश्ण आहे, तेव्हा तर लहान होते.)).

जर इतकी 'सरळ' पणे एकणारी कोणी व्याक्ती असेल तर असे करेलच कशाला. थुकणारी लोक अगदी बेशिश्त,माजोरीच असतात. त्यांना चोपल्यावरच कळेल.



Jadoo
Wednesday, January 09, 2008 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रस्त्यावर थुंकायची एक घाणेरडी सवय असते लोकांना आणि दुसरी म्हणजे सिगरेट पिणार्‍याना बर्‍याचदा दुचाकिवर जाताना हा अनुभव आला आहे कि car मधे बसलेलि लोके खिडकी उघडि ठेवुन त्यांचे सिगरेट चे जळके थोटुक बाहेर धरतात.. वार्‍यामुळे त्याचि गरम राख उडते व बर्‍याचदा हे लोक बाहेर न बघता तशीच जळती सिगरेट बाहेर फेकुन देतात..एकदा माझ्या ओढणीला भोक पडले होते त्यामुळे.

Arch
Wednesday, January 09, 2008 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मनु, आपण कशाला आपली पातळी सोडायची? आणि थुंकणार्‍याच्या अंगाला हात लावायचा? अगदी घाण.

Asami
Wednesday, January 09, 2008 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मनु, आपण कशाला आपली पातळी सोडायची? आणि थुंकणार्‍याच्या अंगाला हात लावायचा? अगदी घाण. >> पण त्याचा shirt नाही घाण मग

झक्की baseball मधल्या players नी त.म्बाखू खाऊन ती image तयार करणे तेव्हढेच वाइट. किती जण माझा idol असे करतो म्हणून मिही करणार अशा विचाराची असतात बघा ना


Zakki
Wednesday, January 09, 2008 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय. खरे आहे.
निदान बेसबॉलवाले थुंकण्यापूर्वी आजूबाजूला कुणि नाही याची खात्री करतात. तंबाखू नेहेमीच खातात, पण रस्त्यावर, इतर लोकांच्या अंगावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसत नाहीत.

भारतातल्या लोकांनी तेव्हढे पाळले तरी पुरे!

गाडीतून निष्काळजीपणे सिगारेट बाहेर फेकणे हे मात्र मी अमेरिकेत फार फार मोठ्या प्रमाणावर बघतो. तसे इथे कचरा गाडीबाहेर फेकल्यास भारी दंड आहेत, पण कुणाला पकडल्याचे ऐकिवात नाही.


Peshawa
Wednesday, January 09, 2008 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बर्याच वर्शापुर्वी पौड रस्त्यावर जाताना समओरच्या गाडितुन सिगरेत्चे जळते थोदुक अगवर पडले होते अनि काहि थिणग्या डोल्यात जाता जाता राहील्या. इतका संतापलो होतो कि माझि पितुकली म८० त्या गाडिच्या अक्शर्श समोर आडवी घातली त्या गाडितल्या लंगोट्वाल्या सभ्य माणसाला आइ माइ बाबा भाउच्या भासेह्त अतिशय सभ्यपणे सांगितले की ह्यापुढे गाडिच्या काचा वरती कऋन गाडितला एष ट्रे वापरत चला.

तीच चिमुकली म८० कधी आडवी जाईल काही नेम नव्हता. दश्भुजा समोरचा रस्ता ( तो फ़्लाय ओवर नामक हिडिस प्रकार बांधत (?) असताना ) एकेरी वाह्तुकीस होता. एकदा त्यारस्त्यावरू विर्रुद्ध बाजुने (नो एन्त्रीतून) एक मुलगा अनी त्याच्य मैत्रीनी सुखाने कार्मधून येत होत्या. त्याच वेळेस त्यांच्या दुर्दैवाने त्याच रस्त्यावरून मी बरोबर दिशेने चललो होतो. अम्हि समोरा समोर येउन उभे राहीलो. त्यावेळेस त्या कारला त्या नो एन्त्रीत पाहून इतका पिसाटलो होतो की त्या गर्दीच्या वेळेस म८० त्या रस्त्यावरच पर्क करून त्या मुलाला त्याची कार रेवेर्से घ्यायला लावली होति. पुन्हा आइ बाप बंधू भगीनी ह्यांच्या संदर्भातील विशेशणांची उजळणी (माझी) आणी (कदाचीत) शिकवणी (त्याची) झाली हे सांगायला नकोच!

थुंकणार्या, नो एन्त्रीत खुशाल घुसणार्यांना हात्तीच्या पायी द्यावे असे वाटते.


Kedarjoshi
Thursday, January 10, 2008 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विशेशणांची उजळणी (माझी) आणी (कदाचीत) शिकवणी (त्याची) झाली हे सांगायला नकोच>>>> LOL पेशव्या.

गांधीगिरी ने थुंकनारा फक्त पिक्चर मध्येच पस्तावतो. वास्तवात त्याला दिवसा तारे अन रात्री सुर्य दाखवावा लागतोच. ( ऑफकोर्स आपल्याला त्रास झाला तर).
देशात तुम्ही थुंकनार्‍याला शर्टाने वा रुमालाने पुसुन द्याल का ही विनंती केली तर तो परत पचकन तुमच्या तोंडावर थुंकुन (म्हणनारा मुलगा असेल तर) निघुन जाईल. येथे पाहीजेत जातीचे. हां मुलीने विनंती केली तर फारतर तो माफी मागेन पण पुसनार नाही.


Ajjuka
Thursday, January 10, 2008 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे हात बित नाही लावायचा त्या माणसाला.. आपली चप्पल, छत्री, भरभक्कम भरलेली पर्स, लाथ, दुचाकीच पुढचं चाक इत्यादी सगळ्या गोष्टी असतातच की. थुंकणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी काहीही नियम नाहीत आणि असले तरी त्याने कुणालाही शिक्षा होत नाही. त्यामुळे कुठल्या थुंक्याची थुंकी आपल्या अंगावर उडाली तर त्याला तिथल्या तिथे सरळ करायला हवे. किंवा अजून मस्त म्हणजे त्याच्या अंगावर उलटे थुंकावे.
सगळं काही हात न लावता करता येतं.
शी अश्या थुंकणार्‍या माणसाच्या शर्टाने तोंड पुसायचं... एईएईएईएई!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators