Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 08, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through January 08, 2008 « Previous Next »

Dineshvs
Friday, December 14, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डेन्टिस्टच्या बाबतीत माझा अनुभव खुपच चांगला आहे. आपण खुपदा डिग्रीकडे बघत नाही पण B.D.S. पेक्षा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डेंटिस्ट कधीही चांगले.
माझी एक दाढ बर्‍याच वर्षापासुन भरलेली होती. पण ती परत दुखायला लागली. गोव्यातील डॉ. प्रिती वळवईकर, यानी माझे पुर्ण रुट कॅनल मला कुठलेही इंजेक्शन न देता केले.
प्रत्येक हत्यार मला दाखवुन, प्रत्येक औषधाची चव सांगुन. अगदी फ़ुरसतीने तिने हे केले.
खर्चाचा अंदाज आधीच दिला होता आणि तो मुंबईपेक्षा खुपच कमी होता.
नवीन दात बसवल्यावरही तो व्यवस्थित घासुन, तो कुठेही टोचणार नाही, याची खात्री केली. तो बसवल्यावर, नेमके कसे वाटेल याचे सुंदर वर्णन केले होते.
प्रत्येक सेशनच्या आधी, जेवुन आलास ना, याची आवर्जुन चौकशी करत असे, ती. ( अशी आठ सेशन्स झाली. )
हे सर्व उपचार चालत असताना केवळ हाताची बोटे उचलुन मला ते कधीही थांबवता येत होते. अलिकडे पुर्वीसारखी खुर्ची नसते बेडच असतो. त्यामुळे डॉक्टरसाठीच ते थोडेसे अवघडल्यासारखे असते. म्हणुन खुपदा मला तिची दया येऊन मी ब्रेक घेत असे.
आणि तिच्या ते लक्षात आल्यावर तिने, तिला काहि त्रास होत नाही, हे आवर्जुन सांगितले.


Na_kool
Friday, December 14, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ डेंटिस्ट च्या रिलेटेड आहे म्हणून बोचणारा किस्सा आहे का हा Dineshvs ? केवळ रूट कॅनाल साठी ८ सेशन्स. मजा आहे बुवा तुमची. माझ्या अंदाजाप्रमाणे हा किस्सा अचाट आणि अतर्क्य या सदरात घालायला हवा.

Manjud
Friday, December 14, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूट कॅनाल वाटते तेवढी सोपी ट्रीटमेंट नहीये. ती जर व्यवस्थित नाही केली तर लोक डेंटिस्टलाच शिव्या घालतात. एवढे पैसे घेतले तरी दात अजून दुखतोच अहे अशी सततची तक्रार असते. रूट कॅनालची ट्रीटमेंट निर्दोष पूर्ण करायला ८-१० सिटिंग्स लागतातच लागतात. ह्यात केवळ पेशंटचा नाही तर डॉक्टरचा पण पेशन्स कमालीचा लागतो.

Dineshvs
Friday, December 14, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हा अनुभव खरच चांगला होता. गालाच्या आतुन एक व्हॅक्युम सक्शन ट्युब लावलेली असायची. त्यामुळे सारखे पाणी पिऊन थुकावे लागायचे नाही. तोंडात आजुबाजुला व्यवस्थित कॉटन पॅकिंग असायचे.
याच डॉक्टरचा आणखी एक अनुभव. ती एकदा माझ्या ऑफ़िसात, डेंटिस्ट कॉनफ़रन्स साठी जाहिरात मागायला आली होती. काहि कारणानी तिला ती मिळाली नाही.
पण हे जरा मला लागले म्हणुन मी एक हितचिंतक म्हणुन वैयक्तिक जाहिरात देऊ का, असे विचारले. ( तिने माझ्याकडुन फारच कमी पैसे घेतले, याची मला बोच होती ) तर तिने, दॅट्स नॉट वर्थ ईट, असे म्हणत नकार दिला.


Kanak27
Friday, January 04, 2008 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

16 Dec ला माझ्या नवराच्या मित्राच लग्न होत. तो ह्यान्च्या २-३ वर्ष roommate होता. आमच्या लग्ना नन्तर बरचद जेवला यायचा for eating south Idian special Rice , Samabr . त्याचा बरेचदा phone आला होता ह्याना बरेचदा सान्गितल होत reservation करायला पण he is very lazy . माझ जाण तर Cancel च होत. पण त्याचा 14 Dec ला phone आल. खुप आग्रह करत होत म्हणुन ह्यानि त्या दिवशि Air Ticket आणले आमच्या दोघाचे. लग्न Bangole पासुन ४ तासच्या आन्तरवर हासन म्हणुन गाव आहे तिथे. पहिल्यान्दा मी माझ्या १ वर्षाच्या मुलिला सोडुन ज़ाणार होते. १५ dec ला गेलो Banglore ला तिथे सन्तोष चि cousine राहते. तिथे रात्रि रहिलो सकाळि हासन ल बस नि निघालो लग्नला १२ ला पोह्न्चलो. तिथे गेल्यावर त्याचा प्रतिसाद एवढ थन्ड. लग्न झाल होत. Reception चालु होत. कोणि पाणि हि आणुन दिल नाहि. नन्तर जेवुन २ वाजता त्याला सन्गितल कि आम्हि निघतो तर ठिक आहे. bus stand सोडायाचा पण त्रास त्याने घेतला नाहि he have car तो कोणालाहि सान्गु शकत होता. आम्हि Auto केला, आणि आलो bus Stand . रत्रि Banglore. Monday la Puna . इथे माझ्या मुलिला (अवनि) ताप आला होता. ति भिलि होति कि mummy , papa कोठि गेलि म्हणुन.
Wastage 15000 Rs , One Leave , अवनिला त्रास.
ख़ुप वाइट वाटल.


Nandini2911
Friday, January 04, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे दोन रूट कॅनॉल माझ्या मित्राने केले. तो सेंट जॉर्जमधे पीजी करतोय. माझे सात सेशन्स झाले आणी एकही इंजेक्शन नाही. वर ट्रीटमेंट झाल्यावर आईस्क्रीम नाहीतर शहाळे.:-) :-) :-)

कनक.. लग्नाच्या वेळेला त्या लोकाची मनस्थिती काय होती हे आपण सांगू शकत नाही म्हणून त्यानी व्यवस्थित पाहुणचार केला नाही ही बोच ठेवू नये. त्यानाही काही गडबड असेलच ना...
शिवाय नवरा आणि नवरी दोघानाही सर्वाकडे बघायला वेळ नसतो. त्याच्या घरवाल्याना आपण कोण हे माहीत नसते. लग्नानंतरही त्याने असेच वागले तर ते चूक ठरेल.

दुसरा मुद्दा हा की इतक्या लहान मुलीला तुम्ही घरी ठेवुन जाण्याऐवजी तिला घेऊन गेले असते तरी चालले असते ना??


Ajjuka
Saturday, January 05, 2008 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या किश्श्यात खुप बोचणारं असं काही नाही पण तरी...
पुणे मुंबई डेक्कन क्वीन. फर्स्टक्लास/ एसी चेअर कारचा पासहोल्डरचा डबा. त्यातल्या १५ सीटस बायकांसाठी असतात.
२३ तारखेला एक महत्वाचा इव्हेंट होता पुण्यात त्यामुळे सतत पुणे-मुंबई करत होते. पार्ल्यात ऑफिसमधे पोचेपर्यंत फोनाफोनी करून काम चालू करून द्यायचं म्हणजे गेल्यानंतरचा तासभर वाचेल आणि मला चक्क जेवायलाही वेळ मिळेल असं गणित होतं माझं. त्यानुसार ८:३० पासून मी एकदोन फोन केले. दीडदोन मिनिटांचे फोन्स. ते झाल्यावर एका बाईंनी दटावून सांगितले मला की आता फोन करायचे नाहीत. इथे असा अलिखित नियम आहे लोणावळ्यानंतर कुणीही फोन करत नाही. आम्हाला सगळ्यांना झोपायचंय. उगीच पंगा नको म्हणून मी गप्प बसले. पण त्यामुळे दिवस्भरात जेवायला वेळ नाही. संध्याकाळी ७ वाजता भुकेने डोकं दुखून चक्कर येऊन पडायची वेळ आली. थोडावेळ त्यात गेला त्यामुळे रात्री झोपायला २ वाजले आणि मला पहाटेची इंद्रायणी पकडायची होती परत पुण्यात यायला. त्यासाठी पार्ल्यातून ५ वाजता निघायची गरज होती. अर्थातच त्या बाईंना मनोमन शिव्या घातल्याच. निद्रानाशाचा आजार जडावा त्यांना अशी इच्छाही व्यक्त केली मनातल्या मनात!!
२३ चा इव्हेंट झाला आणि २ दिवसात सगळं मागचं आवरून मी परत मुंबईला निघाले. तोच डबा तोच भाग. मी खिडकीपाशी बसले होते. आज एकही फोन करायची गरज नव्हती. लोणावळ्यापर्यंत नाश्ता करून मग मी गाढ झोपी गेले होते. तर नऊ वाजता मला शेजारणीने हलवून जागे केले. "तू दादरला उतरणारेस का? तसं असेल तर मला खिडकीशी बसूदेत. म्हणजे मला व्हिटी पर्यंत सलग झोपायला मिळेल. तुझ्यासाठी माझी झोप disturb होणार नाही!"
मला जागं होऊन हे काय ते कळायला थोडा वेळच लागला. आणि कळलं तेव्हा असली डोक्यात गेली ना शेजीबाई!! एकतर मी गाढ झोपलेली असताना मला जागं करतेस आणि स्वतच्या झोपेची कौतुकं लावते! बर दादर यायला सव्वातास शिल्लक होत. त्यात सुखाने झोपली असती आणि मला झोपू दिले असते तर काय बेचाळीस पिढ्या नरकात जात होत्या काय?
"please shift to this side, if you can understand!" आता अजूनच चिडले मी. च्यायला understanding बद्दल मला सांगतेस पण स्वतःचे काय दिवे आहेत understanding च्या नावाखाली?
"Sorry I have understanding problems since i was a kid!" असं म्हणून मी परत गाढ झोपण्याचं नाटक केलं. पण झोप उडाली होती. आणि शेजीबाई दादर येईपर्यंत झोपायचं सोडून गप्पा मार, चेहरा आवरून गेह, डब्यात फेरफटका मारून घे असं काय काय करत होती.
first class चा पास म्हणजे गाडी स्वतःच्या मालकीची असल्याच्या अवेशात का वावरतात लोक?


Manjud
Saturday, January 05, 2008 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, हे डेक्कन क्वीनचे पासहोल्डर्स म्हणजे सगळे एकजात महानगरपालिका आणि LIC or banks ऑफिसर्स असतात. मग गाडी मालकाच्या थाटात वावरणारच ना. ह्या लोकांचे काही अलिखित आणि विचित्र नियम असतात प्रवासाचे. त्यांच्या सीट्स रोटेशनवर ठरलेल्या असतात. वेफर्स, चिप्स वगैरे खायचे नाहीत, का तर त्याचा खाताना आवाज होतो. डब्यात कोणी नविन प्रवासी आला की असा चेहरा करून बघतील की जणू त्याचा सेकंड क्लासचा पास आहे आणि त्याने ह्या डब्यात यायचा मोठा गुन्हा केलाय.

त्या पहिल्या शेजीबाईला तिच्याच भाषेत सांगायचस ना की फोन माझा, काम माझं, आवाज पण माझाच, तुम्हाला त्रास होत असेल तर कानात बोळे घाला.


Zakasrao
Saturday, January 05, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेफ़र्स खायचे नाहीत फ़ोन करायचा नाही हे म्हणजे अस्सल पांढरपेशा अळ्यांचे लक्षण झाले की. :-)
मला ट्रेनने सोलापुर गाठायच होत. मी सावधपणे नेहमीच आधी बूकिंग करुन ठेवतो. शक्यतो खिडकी शेजारची सीट घेतो म्हणजे "गंध सहवास" तसा कमीच राहतो. (रेल्वे स्टेशन सोडुन)
तर मागच्या वेळी आलेला अनुभव.
एक माणुस ज्याच वय साधारण ३५-४० असाव. चेहरा राकट, काळ्याकडे झुकणारा रंग, चेहर्‍यावर एक मग्रुर भाव, शरिर यष्टी मजबुत. चेहर्‍यावरुन सरकारी हापिसातला वाटत होता. :-)
तो मला बोल्ला की तुम्ही इकडे बसा मी खिडकीच्या बाजुला बसेन. मी नाय बोल्लो तर हा निर्ल्लज्ज पणे मला बोल्ला की मला गुटखा खायची सवय आहे मी सारखा थुकत असतो. तुम्हाला त्रास होइल
मी परत त्याला होउदे असच बोल्लो. मग तो शांत बसला.
अख्ख्या प्रवासात त्याने परत दोन तीन वेळा परत तसच सुचवुन पाहिल होत पण मी त्याच्याकडे लक्षच दिल नाही.
आणि तसही मी मनात तयारी करुनच ठेवली होती की त्याने एकदा थुकले की त्याला अज्जुकावाली ती उलटीची वार्निंग द्यायची आणि नेक्स्ट टाइम खरच करायची. (तस मला उलटी होत नसते परवासात पण काढु शकतो :-))
BTW नंतर त्याने मला स्वतहुन सांगितले की तो सेल्स टेक्स विभागात काम करतो अस. आणि सोलापुरच्या लोकाना बाहेरचे लोक्स कसे गुंड समजतात हा किस्साहि त्याने मला ऐकवला. :-)
माझ्यावर परिणाम शुन्यच. :-)



Ankyno1
Saturday, January 05, 2008 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी झोपमोड केलि कि साॅलिड डोक्यात जातं....

मुम्बई ला जाणारी सकाळची १ली ६ची व्होल्वो....
सकाळी ४.३० ला उठलेलो...
बस मधे मस्त झोपायचा प्लॅन....
औन्ध स्टाॅप ला एक आजोबा शेजारी येउन बसले...
मनात विचार... आजोबा ही झोपतील मला ही झोपता येइल...
झोपेच्या विचरातच झोप लागली...
(सकाळची ही बस फूडमाॅल ला थाम्बत नाही आणि याच कारणामुळे सकाळी लवकर मुम्बई ला जाणार्‍यान्साठी खूप सोइची आहे)
फूडमाॅल शेजारून बस जात असताना दणदणीत आवाजानं जाग अली....
शेजारचे आजोबा "बस थाम्बवा" अशा गर्जना करत होते...
आजोबा आहेत म्हणून लोकान्नी समजावलं.. की बस थाम्बत नाही...
आजोबान्ना औषध वगरे घ्यायचं असेल असं वाटून लोकन्नी पाणी, सँडविचेस असं ऑफर केलं... पण आजोबान्ना वड्याची भूक लागली होती... हे सगळं होइ पर्यन्त बस पुढे आली होती... ड्रायव्हर नी दत्त स्नॅक्स ला थाम्बवतो असं आश्वासन दिल्यावर आजोबा जागेवर बसले...
त्यान्चा एकूण आवेश पाहून मी काही ही न बोलता झोपणं पसंत केलं
थोड्या वेळानी मला कुशीत बोटं खुपसून कोणीतरी जागं केलं... (एक तर झोपमोड आणि बोट खुपसल्यामुळे झालेल्या गुदगुल्या यानी मी प्रचंड वैतागलो होतो...) बघतो तर आजोबा...
मला म्हणे... खाल्लाच की नाई शेवटी वडा...
माझी जाम सटकली... तरीपण वयाचा विचार करून मी गप्प बसलो...

यान्च्या वडे खायच्या हौसेपायी त्या दिवशी बस मधला प्रत्येक जण अर्धा तास लेट झाला...


Manjud
Saturday, January 05, 2008 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गुटखा खाऊन थुंकणारे अस्से डोक्यात जातात ना.....
मागच्याच आठवड्यात मी आणि बाबा ऍक्टीवावरून चाललो होतो. सिग्नलला BEST बस थांबली होती आणि बसच्या पुढे जागा होती म्हणून बाबानी बसच्या बाजूने ऍक्टीवा न्यायला सुरुवात केली. तेवढ्यात एक महाशय बसमधून मान बाहेर काढून चांगले लांबपर्यंत थुंकले. आम्ही अक्षरश: एका सेकंदासाठी वाचलो. नाहीतर आम्हाला गुटखारसस्नानच घडलं असतं. बाबा असले वैतागले होते ना की ऍक्टीवा बसला आडवी घालून बसमधे चढले. आणि त्या माणसाला यथेच्छ बोलून घेतले. तो माणूस निर्लज्जपणे बाबाना सांगतो मी गुटखा खात नाही त्यामूळे थुंकण्याचा प्रश्नच येत नही. पण त्याच्या शेजार्‍याने बाबाना दुजोरा दिला, म्हणाला मगाचपासून त्याच्या या कृतीने मी हैराण झालो म्हणून मी त्याला खिडकिची जागा दिली.
बाबा शेवटी त्याला म्हणाले रस्त्यांवर थुंकण्यापेक्षा पिशव्या ठेवा जवळ थुंकदाणीसारख्या नाहीतर हिंमत असेल तर एकदा स्वत:च्या खिश्यात थुंकून बघा. मग कळेल गुटखारस अंगावर पडल्यावर कसं वाटतं ते.....


Supermom
Saturday, January 05, 2008 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नि आई एकदा गाडीने प्रवास करत होतो. मला नुकतीच नोकरी लागल्याने आई नोकरीच्या गावी सामान लावून द्यायला येत होती.
मधे एका स्टेशनवर एक माणूस चढला.खाली जागा असताना वरच्या बर्थवर जाऊन बसला. नि दर थोड्या वेळाने तंबाखू मळून खाणे सुरू झाले. आम्हाला यात काही प्रॉब्लेम असायचे कारणच नव्हते. पण जरा वेळाने त्याने पंखा सुरू केला. आता तंबाखूचे बारीक बारीक कण उडून खाली येऊ लागले. बरेचदा सांगून पाहिले पण व्यर्थ.

अन अशातच एकदा तंबाखूचा एक मोठासा कण माझ्या डोळ्यातच गेला. मी डोळे चोळून हैराण. (भयंकर आग झाली.)
आता आई शांतपणे उठली नि त्याला म्हणाली,
'बाबाजी, पुन्हा तंबाखू उडला तर तुमचाच तंबाखू तुमच्या डोळ्यात घालीन...'
गाडीतून उतरेपर्यंत त्याने पुन्हा तंबाखू खाल्ला नाही.


Monakshi
Monday, January 07, 2008 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजूने सांगितलेला किस्सा माझ्या नवर्‍याच्या बाबतीत पण घडला आहे. तो असाच एकदा बाईकवरुन जात असताना बाजूच्या बसमधून एकजण थुंकला ह्याला आंघोळ त्याची. सरळ पुढे गेला बसच्या बससमोर बाईक आडवी घातली, आतमध्ये गेला, आणि त्या थुंकणार्‍याच्या एक सणसणित कानाखाली वाजवली. आणि शांतपणे उतरुन निघून गेला. त्या माणसाला बरोब्बर कळले आपल्याला का खावी लागली ते. काही बोलला नाही तो.

Ajjuka
Monday, January 07, 2008 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा माझ्याही बाबतीत हे घडलं होतं. मी तेव्हा वय वर्ष फक्त १७. मी चिडून आरडाओरडा केला पण बसमधल्या थुंक्या माणसाला ढिम्म फरक नाही. मी बस थांबवायचा प्रयत्न केला पण सिग्नल सुटला आणि तेवढ्यात माझी लुना (१६-१८ दरम्यान तेवढीच परवानगी होती) बंद पडली. बस पुढे निघून गेली. मी नुसतीच चरफडत राह्यले.

Maanus
Monday, January 07, 2008 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर की काय अज्जुका :-)

तु चिडुन आरडाओरडा केला आणि तरीही बस थांबली नाही


Arch
Monday, January 07, 2008 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सगळ्यावरून आठवल. माझी बहिण मुंबईत असते. बसमधून जाताना तिच्या शेजारचा माणूस सारखा खिडकितून थुंकत होता. कितीदा सांगितल " थूंकू नका " तरी त्याच आपल चालूच. शेवटी ती त्याला म्हणाली. " तुम्ही माझ्या आधी उतरणार आहात. आता तुम्ही उतरलात की मी इथून तुमच्या अंगावर थुंकेन म्हणजे तुम्हाला कळेल, थुंकू नये म्हणून. " जेंव्हा उतरला तेंव्हा जे धूम पळत सुटला की बस.

Shendenaxatra
Monday, January 07, 2008 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुंकण्याची सवय ही आम्हा भारतीयांना लागलेला कलंक आहे. ही एक किळसवाणी, अनारोग्यकारक सवय आहे. कधी वाटते की बजरंगदलासारखी आक्रमक, थुंकविरोधी संघटना काढावी आणि मग जिथे सापडतील तिथे अशा थुंकीवीरांची थोबाडे रंगवून काढावीत.
ह्या गोष्टीला म्हणे दंड केला जाऊ शकतो पण खरच कुणाला दंड झाल्याचे माहित नाही.


Aashu29
Monday, January 07, 2008 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थुंकीवीरांची थोबाडे रंगवून काढावीत.
>>>>>>>>
बरोबर आणि ती पण थुंकुनच.

Zakki
Tuesday, January 08, 2008 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात् आता ही सवय अमेरिकेपर्यंतहि पोचली आहे. आमच्या कडे एका छोट्या मॉलमधे एक भारतीयाचे दुकान होते. तो पान नि तंबाखू विकायचा. ते खाऊन लोक पचाक्कन, त्याच्या नि इतरांच्या दुकानासमोरसुद्धा थुंकायचे. सगळा फूटपाथ लालेलाल.

बाकीच्या दुकानदाराने तक्रार केली तर भारतीय दुकानदार म्हणतो ते लोक माझ्या दुकानाबाहेर काय करतात त्याला मी जबाबदार नाही. शिवाय मी काय विकायचे नि काय नाही ते तुम्ही कोण सांगणार?

पण काही दिवसांनी त्याचे दुकान बंद पडले. त्या मॉलमधे गेल्या पाच वर्षात एकही भारतीय दुकान दिसले नाही.


Naatyaa
Tuesday, January 08, 2008 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात् आता ही सवय अमेरिकेपर्यंतहि पोचली आहे. आमच्या कडे एका छोट्या मॉलमधे एक भारतीयाचे दुकान होते. >> भारतीय कश्याला.. तुमचे बेसबाल प्लेयर्स सुद्धा तंबाखु खाउन पचापच थुंकतातच की..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators