|
Shraddhak
| |
| Tuesday, December 11, 2007 - 12:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काही लोकांना आवडणार नाही, पण तरीही मी ऑबझर्व्ह केलेली एक गोष्ट म्हणजे सॉफ़्टवेअर कंपनीतल्या लोकांना ढिगाने पगार असून सुद्धा ते दहा आणि पाच रुपयांसाठी रडतात.<<<<< हे काही पटलं नाही दक्षिणा. जर तसं नियमांत असेल तर पाच दहा रुपयांवरदेखील का पाणी सोडायचं? तू जे वर गाडी नेण्याचं उदाहरण लिहिलं आहेस ते वेगळं. तसला खोटेपणा करू नये. पण काही नियमांनुसार कंपनीने तुमचा अमुक एखादा खर्च रिएंबर्स होतो, असं सांगितलं असेल तर तो एक रुपया असला तरी तो का घ्यायचा नाही? तुम्ही लबाडी करून तर नाही ना मागत आहात ते पैसे? आणि पाच दहा रुपये करून सोडून द्यायचं म्हटलं तर तसं कुठपर्यंत करायचं? ( थेंबे थेंबे तळे साचे, याही पाच दहा रुपयांबाबत लागू पडतं.)
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 12:33 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खरे मन्हातात ना की पुरुषाला पगार अणि बायकांना वय विचारू नये, पण हे सर्व संसकार कोण पाळते ? दुसरयाची अमुक एक गोष्ट मनाला खुपली की अश्या बोच्र्या कमेंट्स पास करतात हे लोक ! अणि कसला तरी उगाच त्रास देतात, या लोकाना फक्त पगार दिसतो त्या मागचे कष्ट अणि शिक्षण दिसत नाही, असो त्या साठी मानुस कुठल्याही ही डिपार्टमेन्ट मधला असेल त्याच्याशी कही घेणे नाही
|
Ninawi
| |
| Tuesday, December 11, 2007 - 7:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Shraddhak and ladtushar, May be someone will accept your comments on Dakshina's post (if I understood correctly) but I would like to stick to what Dakshina says. I have seen many software engineers arriving here for small terms. They get paid very hefty sums. Now ask how do we know? They ask us our salaries so we ask them theirs. Inspite of getting almost double salary than us (plus their Indian salaries in Indian banks), I can list tons of my experiences which will pretty much prove their stinginess. To give a simple example, house rent is usually paid by bank giro. Since these guys come for short period, they don't get a social security number and so such individuals have to pay 5 Euros on the top of their rent to use bank services (they can't do it online). To avoid paying these 5Euros, so many of such guys have requested me to pay their rent. C'on, when you get paid almost 3500-4000 Euros a month, you are being stingy for 5 Euros?? I don't know what comment I should make... And as far as hard work & education is concerned, required for any kind of job, I think most of us here on maayboli are very well qualified and well aware of hard work. Afterall, nobody gets paid for warming up their chairs, right? so lets not point on this direction yet...
|
Zakki
| |
| Tuesday, December 11, 2007 - 9:19 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला वाटते, पैसे वाचवणे हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वभावावर अवलंबून आहे. त्याचा पैसे असण्याशी किंवा नसण्याशी संबंध नाही. असे अनेक अति श्रीमंत लोक मी पाहिले आहेत जे 'हिशेबात चोख असावे' म्हणून पैसा नि पैसा मोजतात. रेस्टॉरंटमधले बिल वाटून घेताना, किंवा इतर खर्च वाटून घेताना ही वृत्ति दिसून येते. काही दिलदार असतात ते म्हणतात माझ्याकडून तुला चहा, जेवण इ. पण इतर काही तसे म्हणत नाहीत. खरे तर अमेरिकेत कुणिच कुणाला उगीच काहीहि फुकट देत नाहीत. कुणि देऊ केले तरी संशय येतो, का बरे हा मला फुकट देतो आहे? नि अमेरिकेत पण Expense report मधे खोटे नाटे लिहिणारे अनेक आहेत. विशेषत: जेवायला दररोज २५ डॉ. विनातक्रार मान्य असत, म्हणून मित्राच्या घरी जेवायला जाऊन, बिलात मात्र २५ डॉ. नेमाने लावणे वगैरे धंदे करतात. इन्कम टॅक्समधे काय वाट्टेल तेव्हढे पैसे खर्च म्हणून दाखवतात. पकडले गेलात तर फार तर म्हणतील, हे खोटे आहे, टॅक्स भरा, नि पेनल्टी भरा. तुरुंगात जावे लागत नाही. पण वर्षानुवर्षे फसवणारे लोक मला माहित आहेत.
|
तर संध्याकाळी माझ्याकडे येऊन अर्धा तास भांडला की माझे ३० रुपये रिएंबर्स कर म्हणून. मी म्हणल देत नाही जा <<< दक्षिणा, आता तो इथं येऊन हेच 'बोचणारा किस्सा' म्हणून लिहायचा!
|
Ladtushar
| |
| Wednesday, December 12, 2007 - 9:52 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
>> मला वाटते, पैसे वाचवणे हे ज्याच्या त्याच्या वैयक्तिक स्वभावावर अवलंबून आहे. त्याचा पैसे असण्याशी किंवा नसण्याशी संबंध नाही. माला हे पटते, अणि zaki चे ही बरोबर आहे जी सेवा अपन वापरतो त्या साठी पैसे मोजाणे माला ही पटते! >>>जर तसं नियमांत असेल तर पाच दहा रुपयांवरदेखील का पाणी सोडायचं? अणि हे ही तितकेच बरोबर आहे ! पण म्हणुन नियम सोडून भलते सलते एक्स्पेंन्सेस क्लेम कराने ही चुकीचे अणि थोड़े अदाशी पणाचे लक्षण आहे अणि सगलेच सॉफ्टवेअर वाले सारखे नसतात !
|
Nkashi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 10:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काय हो एकटे भौ तुम्ही माझ्या हापिसात तर नाहीत ना? मलापण सगळ्या admin आणि HR वाल्यांचा जाम राग येतो....
|
Zakki
| |
| Wednesday, December 12, 2007 - 12:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काही दिवस Admin नि HR मधे काम करून बघा, नि मग ठरवा. तसे मॅनेजरांबद्दलहि चांगली मते नसतात, प्रोजेक्ट मॅनेजरबद्दलहि. पण तुम्ही मॅनेजर किंवा किंवा प्रोजेक्ट मॅनेजर झाल्यावर ही मते बदलतील. एकूण सगळे अनुभव घेतल्याशिवाय उगीच कुणाचा राग धरू नये.
|
Aktta
| |
| Wednesday, December 12, 2007 - 12:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नाय बै chance कमी आहे..... आमच्य हापिसात कुठे ही न्कशि नाय हाय.. मला त्यांचा राग येतो कारन त्याना वाटत कि आम्ही जगातली सगळी काम सोडुन त्यानी दिलेले फ़ोर्म भरावे... आनी HR चे इंटरव्हु.... त्याच्या साथि तर एक वेग़ळा BB लागेल एकटा....
|
Dakshina
| |
| Wednesday, December 12, 2007 - 1:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झक्की आणि निनावी, धन्यवाद.... श्रद्धा के - मी जे बोलले की पाच दहा रुपयांसाठी रडतात ते सरसकट सर्वांसाठी नाही हो. मी ही इथे दिलदार लोकं पाहीली आहेत. आणि तुमचं अगदी बरोब्बर आहे, की जर कंपनीने कमिट केलं असेल तर ते ५ / १० रुपये तुम्ही वसूल केलेच पाहीजेत. पण ज्या गोष्टींसाठी पॉलिसी नाही, आणि त्यासाठी मॅनेजमेंट कडे जाण्याची धमक नसेल तर उगिच कोणावरही राग काढावा तो ही ३० रुपयांसाठी? बरं त्यातून काही आऊटपूट निघणार असेल तर..... ठिक.... नाहीतर नुसतीच तोंडाची वाफ़, आणि वेळ दवडायचा... आणि ज्यांना HR, Admin चा राग येतो, त्यांना यावा. शेवटी, पाण्यामधे मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. एकटे भाऊ फ़क्त तुमच्या माहीतीसाठी सांगते, की मी कोणत्याही डिपार्टमेन्ट बद्दल बायस नाहीए.. गजानन - तो दक्षिणेकडचा आहे, त्यामूळे इथे येण्याची शक्यता कमी आहे.. म्हणून तर मी.....
|
Aktta
| |
| Thursday, December 13, 2007 - 12:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
dakshina काकु मि फ़्कस्त माझ्य मनात होत ते लिहिल...... उगाच राग नका मानु.... एकटा....
|
Meggi
| |
| Thursday, December 13, 2007 - 1:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आधीच्या post चा राग नाही येणार तिला, पण आता काकू म्हंटल्यावर काही खरं नाही तुझं
|
Maanus
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दोन एक वर्षापुर्वी पुण्यात गेलो होतो, तेव्हा एका दातांच्या दवाखाण्यात गेलो. ह्या दातात cavity आहे, त्या दातात आहे असे सांगत त्या बाईने माझे सगळे दात drill करुण ठेवले. आता सिमेंट भरायची वेळ आली तशी म्हणते की माझा अजुन एक पेशंट आलाय आणि त्याला abrod ला जायचेय, तर तु उद्या ये आता. WTF तीच्यामुळे मला आता दर वर्षी थंडी पडायला लागली की दात दुखीचा त्रास सहन करावा लागतो.
|
Arch
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पैसे वाचवायला पुण्यात जाऊन dentist कडे गेलास न? ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
Maanus
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:19 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो पण त्या बाईने मोठ्या खर्चात पाडले त्यामुळे.
|
Simm
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Maanus--I am laughing so hard!!!!My sides are hurting! 'Bochra' kissa in the real sense.
|
Naatyaa
| |
| Thursday, December 13, 2007 - 8:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जायचेय, तर तु उद्या ये आता. >> दुसर्या दिवशी गेला असतास तर दात दुखले नसते आता.. ;)
|
Maanus
| |
| Thursday, December 13, 2007 - 9:40 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्यातला स्वाभीमानी मराठी माणूस जागा झाला. मग जरा चांगल्या डॉक्टर कडे गेलो (पौड रोडवर, आनंदनगर च्या ईथे. नाव विसरलो), त्यांनी दोन दिवसात खुप चांगले काम केले. त्या वरच्या बाईने माझा एक दात घासुन घासुन पार गुळगुळीत केलेला, त्याला काढुन ह्या डॉ ने लगेच bridge देखील बसवला. पण वेळ कमी असल्याने एका दातात चांदी भरायची राहीली, त्यामुळे तो दात दुखतो थंडी पडायला लागली की.
|
Arch
| |
| Thursday, December 13, 2007 - 10:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दात नीट घासत जा बर. आधीच नीट घासले असतेस तर अशी वेळ आली नसती. आणि हो ते chocolates, candies खाणं सोडून दे आता. ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
Gsumit
| |
| Friday, December 14, 2007 - 3:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
एक नवीन चित्रपटाचे टायटल... "एका माणसाची दंतकथा..." आता तो थरारपट होउ शकतो की भयपट हे तुम्हीच ठरवा... माणसा, any suggestions? ![](/hitguj/clipart/diva2.gif)
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|