या राणीला गायब करा जरा कुणी तरी . सगळ्या movies मधे ती च आज काल दिसते पण किती boring ! आणि acting पण तेच typical!!>>.. अगदी दिपाजंली.. आणि तीचा तो सुरेल आवाज.. उगाचच style मारणे.. नक्को झालिये अगदी..
|
चिन्या, मला शाहरोख पैसे देत नाही आमिर देत नाही. मी त्याची पेड पी आर नाही मी कधी म्हटल त्याने तुला पैसे चारलेत???पण पेपर,मॅगझीन owners ला नक्कीच चारलेत. राग मानुन घेऊ नकोस. मी तुझ्यावर एकही आरोप केला नव्हता. आज काल दिसते पण किती boring ! आणि acting पण तेच typical आणि तीचा तो सुरेल आवाज.. उगाचच style मारणे.. नक्को झालिये अगदी.. दीपांजली,लोपमुद्रा लैच भारी!!!
|
आजा नचले बघण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. साधारण अर्धा झाल्यावर सोडून दिला. फक्त राजपाल यादव च बघण्यासारखे काम करतो. जोधा-अकबर वरून आठवले. त्याचे ट्रेलर दाखवले कुठल्यातरी सिनेमाच्या आधी. त्यातल्या कुठल्याही डायलॉग वरुन तो ह्रितिक रोशन अकबर असावा असे वाटत नाही. तो ह्रितिक रोशनच वाटतो. मुळात कुठल्यातरी काल्पनिक कथांवरुन पिक्चर काढायचा. त्यात जरा अभिनय येणारे नट तरी घ्यावेत.
|
Ajjuka
| |
| Monday, December 10, 2007 - 5:46 pm: |
| 
|
अभिनय येणारे नट आहेत का ते सांग आधी.. सेलेबल हा!
|
Gsumit
| |
| Monday, December 10, 2007 - 6:31 pm: |
| 
|
अभिनय येणारा नग, सॉरी नट बघा http://www.esakal.com/esakal/12102007/MumbaiTajyabatmyaC42C7D9409.htm
|
नच ले मधे राजपाल यादव. मला कसा दिसला नाही? आणि टण्या, उत्तरार्धातलं लैला मजनूचं नाटकच मला जाम आवडलं. तू तेच चुकवलंस? त्या अकबराच्या पिक्चरवरून एक धमाल जोक आहे. वेळ मिळाला की टाकेन.
|
मग तो तीन चाकी सायकल वरून ओरडत फिरणारा कोण आहे? मला तोच राजपाल यादव वाटला. आत्ता ऑफिस मधून आल्यावर मी ते लैला-मजनू नाटक पाहण्याचा पण प्रयत्न केला. ५ मिनीटात फास्ट फॉरवर्ड करून संपवलं. माझी बौद्धीक पातळी असे चित्रपट एंजॉय करण्याएव्हडी उच्च नाहीये. असले पिक्चर बघण्यापेक्षा मला मिथुनचे पिक्चर आवडतात. इंजिनीअरिंगला असताना, मिथुनचा एक न एक पिक्चर बघितला आहे. चिता, आग ही आग, लोहा, गुंडा.. कित्येक. रविवारी शॉशॅंक रिडेम्प्शन बघितला. मॉर्गन फ्रीमन आणि टिम रॉबिंसन अफलातून. अभिनय येणारे नट म्हणजे मॉर्गन फ्रीमन सारखे. आपल्याकडे सुद्धा ओम पुरी, नसीर ते अतुल कुलकर्णी, के के सारखे नट झाले आहेतच. पण आपल्या पब्लिकलाच बकवास हिरो बघायची आवड आहे त्याला काय करणार. २००५ की ०६ चा लघुपटाचा पुरस्कार गिरणी ह्या मराठी लघु-चित्रपटाला मिळाला होता. त्याच लघुपटाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी ह्याचा वळू नावाचा चित्रपट थोड्याच दिवसात प्रदर्शित होईल.
|
Ajai
| |
| Tuesday, December 11, 2007 - 5:21 am: |
| 
|
मिथुनचे पिक्चर बघायचे ते ही सिटिलाईट, पॅराडाईज,कोहिनुर, शारदा असल्या थेटरात. या चकाचक मल्टिप्लेक्सेसनी ती धमाल घालवली. श्या गेले ते दिवस..
|
Ajjuka
| |
| Tuesday, December 11, 2007 - 5:54 am: |
| 
|
वळू पाह्यलाय मी.. अनेकांना आवडलाय म्हणे. मला नाही आवडला. तुम्ही सगळ्यांनी बघा मग बोलू आपण. काही इश्टोरीच नाहीये असं वाटतय मला.
|
वळु मी आता भारतात आलो की बघेन. अज्जुका, वळु बद्दल चित्रपटाच्या बीबी वर परिक्षण टाकशील का? उमेशशी जर भेटता आले तर सांगेन त्याला इथल्या लोकांच्या पण प्रतिक्रिया..
|
Ajjuka
| |
| Tuesday, December 11, 2007 - 8:33 am: |
| 
|
कशाला? उमेशला मी ऑलरेडी सांगितल्यायत! ऍडलॅब मधल्या प्रीव्ह्यू नंतर लगेच.
|
Ajjuka
| |
| Tuesday, December 11, 2007 - 8:38 am: |
| 
|
बाकी इथल्या लोकांसाठी टाकीन मी पण एवढ्यात नाही. अजून ४-५ लोकांना बघूतरी देत.
|
नंदिनी, मला राजपाल नाही रघुवीर यादव म्हणायचे होते. आणि वरच्या एका पोस्ट मधले "माझी बौद्धीक पातळी असे चित्रपट एंजॉय करण्याएव्हडी उच्च नाहीये." हे वाक्य कोणालाही उद्देशुन लिहिले नाहिये. इथे भांडण व्हायला वेळ लागत नाही म्हणुन खुलासा.
|
Slarti
| |
| Wednesday, December 12, 2007 - 4:54 am: |
| 
|
>>> "माझी बौद्धीक पातळी असे चित्रपट एंजॉय करण्याएव्हडी उच्च नाहीये." हे वाक्य कोणालाही उद्देशुन लिहिले नाहिये.
काय हे तान्या ? आणि मी बाह्या सरसावून टायपणारच होतो त्या वाक्यावर...
|
मलाच माझी ती पोस्ट वाचताना जाणवले की उगीचच भडक झाले आहे. म्हणुन खुलासा. ह्या बीबी वर भांडण नको रे.. भांडायला आपल्याला v&c आहे ना. देवावरची चर्चा परत नाहितरी पेटली आहेच तिथे. इथे सगळे एंजॉय करत आहेत. त्याचा पचका नको. नाहीतर त्या ऑर्कुटच्या चर्चेसारखे व्हायचे.
|
बरूबर... इथे फ़कस्त एंजॉय करा. बाय द वे, आजा नच ले मी फ़क्त माधुरीसाठी पाहिला. पण त्यातल्या नृत्यानी पार निराश केले. माधुरीच्या यशामधे सरोज खानचा किती हात होता ते आता कळतय.
|
Akhi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:22 am: |
| 
|
आजा नच ले मधे वैभवी चे नृत्य दिग्दर्शन आहे ना???
|
हो वैभवीचेच आहे. म्हणून तर सरोज खानची उणीव भासतेय.
|
Sunidhee
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:27 pm: |
| 
|
ए नंदिनी, त्या हिंदी मालिकांमधे बायका इतक्या सुंदर सुंदर साड्या, चुडीदार घालतात त्यांचे नंतर काय करतात गं? मला हा प्रश्न कायम पडतो.
|
Chinya1985
| |
| Wednesday, December 12, 2007 - 9:52 pm: |
| 
|
नंदिनी, मला राजपाल नाही रघुवीर यादव म्हणायचे होते अरे तु मागे पण अनुराग कश्यपच्या ऐवजी अनुराग बसु म्हटला होतास आठवतय ना???
|