Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 13, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » कुछ कुछ होता है » Archive through December 13, 2007 « Previous Next »

Sashal
Wednesday, December 12, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुछ कुछ होता है तर 'अचाट आणि अतर्क्य movie no. 1' आहे .. कसला total non-sense होता तो पिक्चर म्हणजे ..

सुरुवात काय तर टॉमबॉय काजोल आणि किंग खान शहरुख एका boarding college मध्ये शिकत असतात .. अर्थातच खूप हुषारही असतात, esp. extra-curricular activities मध्ये .. ते म्हणे एकमेकांचे 'best friends' असतात .. म्हणजे ते दोघेच बास्केटबॉल खेळतात, मग राहुल ( SRK ) काहातरी cheating करतो आणि मग काजोल त्याला Rahul is a cheater, Rahul is a cheater म्हणून चिडवते .. तर असे ते एकमेकांचे best friends असतात .. त्यांच्या त्या कॉलेज मध्ये एक अचाट आणि अतर्क्य principal असतो अनुपम खेर आणि अजुन एक अचाट आणि अतर्क्य professor असते, अर्चना पूरनसिंह .. ते एकमेकांशी खुलेआम flirt करत असतात .. मग एक दिवस अनुपम खेरची मुलगी England हून suddenly त्या कॉलेजात शिकायला येते .. मिनीत मिनी स्कर्ट घालून .. (हा बहुदा England ला असल्याचा परिणाम असावा) .. मग शाहरुख आणि त्याच्या मित्रांचं टोळकं ragging म्हणून तिला भजन म्हणायला सांगतात .. आणि ती सुध्दा अतिशय सुरेल आवाजात 'रघुपती राघव राजाराम' म्हणून सगळ्यांची मनं जिंकते .. लगेचच तिच्यातल्या या सुसंस्कृतपणामुळे शाहरुख आणखीनच impress होतो ( mini skirt मुळे आधी बराचसा impress झालेलाच असतो) आणि मग त्यांच्यात 'नेत्रपल्लवी' होऊन त्यांचं एकमेकांवर प्रेम बसतं .. दरम्यान राणी मुखर्जीच्या मेकप आणि mini skirts कडे बघून काजोल ला तिच्यातल्या स्त्रीत्वाचा साक्षात्कार होतो .. आणि मग ह्याचाही साक्षात्कार होतो की तिचं तिच्या best friend राहुल वरच प्रेम आहे .. शाहरुख आणि काजोल best friend असल्यामुळे त्यांना आपपल्या respective प्रेमाची information share करायची telepathy होते .. पण शाहरुख बाजी मारतो आणि मग काजोल ला 'त्यागाची मुर्ती' बनणं भाग पडतं आणि ती कॉलेज सोडून जायला निघते .. हे कळताच शाहरुख तिला स्टेशन वर अगदी ट्रेन सुटताना भेटायला जातो आणि काजोल तीची आठवण म्हणून आपली ओढणी चालत्या ट्रेन मधून शाहरुख च्या दिशेने फ़ेकते .. (ह्याकडे चाणाक्ष प्रेक्षकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये .. हा भाग एक मोठा दुवा आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्धातला, बरं का .. )

इकडेच बहुतेक interval होतं

ह्याननंतर साधारण ८ - १० वर्षांनंतरच्या काळात उत्तरार्ध सुरू होतो .. एव्हाना शाहरुख ला एक ७ वर्ष आणि ११ महिन्यांची मुलगी आहे .. अगदी सुदुढ भासत असूनही राणी मुखर्जी बाळंतपणात स्वर्गवासी झाली आहे .. शाहरुख आपल्या अचाट आणि अतर्क्य आई आणि अचाट आणि अतर्क्य मुलीबरोबर एका शहरात आहे .. अर्थातच तो खूप श्रीमंत असतो (कॉलेज मध्ये बास्केटबॉल खेळण्याचा परिणाम असेल, दुसरं काय .. ) बहुदा काजोलची आठवण म्हणून राणी आणि शाहरुख त्यांच्या मुलीचं नाव अंजली च ठेवतात (पण एव्हढ्या वर्षांच्या काळात काजोल कुठे आहे, काय करते हे जाणून घ्यायचा अजिबात प्रयत्न करत नाहीत .. कदाचित best friends च्या त्यांच्या definition मध्ये family background , पत्ता वगैरे तपशील बसत नसावेत .. तेव्हा असो!) जेव्हा राणी मुखर्जीला कळतं की ती आता मरणार, बाळंतपणाच्या complications मुळे, तेव्हा ती लगेच आपल्या मुलीला आठ पत्रं लिहीते, तिच्या आठ वर्षापर्यंतच्या प्रत्येक वाढदिवसाला भेट म्हणून .. बाई फ़ार जिगरीची आहे, मरायला टेकलेली असून सुध्दा एव्हढा पत्रं लिहिण्याचा खटाटोप करण्याचा stamina तिच्याकडे आहे .. त्यातलं आठव्या वाढदिवसाचं पत्र तर एकदम critical .. त्यात ती आपल्या मुलीला काजोल, राणी आणि शाहरुख ह्यांच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल माहिती देते आणि शाहरुख कसा 'loanly' आहे आणि त्याचं आता अंजलीशी लग्न होणं कसं आवश्यक आहे ह्याचं ज्ञान देते .. सगळंच अचाट आणि अतर्क्य .. first of all केव्हढं ज्ञान आणि विचारशक्ती असते राणी कडे .. ८ - १० वर्षांच्या काळात काजोल तिच्या (पत्रावर विसंबून???) लग्न न करताच रहाणार आहे हे तिला आधीच माहित असतं .. तसंच फ़क्त आठ वर्षांच्या मुलीकडेही केव्हढी maturity .. तिलाही प्रसांगाचं गांभीर्य लगेच कळून ती कमाला लागते .. फ़ार पूर्वी आठवण म्हणून दिलेली ओढणी आणि तेव्हा काजोल ने जसा ड्रेस घातलेला असतो अगदी तस्साच घालून (बहुदा हे पण पत्रात लिहीलं असावं, केव्हढा हा अगाध महिमा!) ती शाहरुखला अंजली शर्माबद्दल विचारते .. मग इतका वेळ गायब झालेला अनुपम खेर त्यांना (म्हणजे त्या मुलीला आणि शाहरुख च्या आईला) काजोलची माहिती कुठे मिळेल ही मोलाची माहिती देतो .. क्षणाचाही विलंब न करता ते त्या रिफ़तबी की आफ़तबी कडे जातात .. (ही पुर्वी काजोल च्या hostel वर कामाला असते आणि अर्थातच काजोल ची 'best' असते .. ) ती त्यांना सांगते की काजोल ची सगाई लवकरच होणार आहे .. ह्या प्रसंगाचं औचित्य साधून ती 'आठ' वर्षांची मुलगी लगच नमाज पढते .. म्हणजे अल्लाह ला विनंती करते की ही सगाई होऊ देऊ नकोस अशी ..

आता काजोल ला भेटायचं म्हणून कुठल्या तरी आचरट summer camp ला ती मुलगी जाते .. आचरट अशासाठी की तिकडे तो अचाट आणि अतर्क्य Johny Lever असतो म्हणून .. तिकडे काजोलही येणार असते .. actually, ह्याच summer camp ला जायचं म्हणून ती engagement पुढे ढकलते .. मग शाहरुखही कसा तरी तिकडे पोचतो .. कसातरी म्हणजे ही आठ वर्षांची मुलगीच एक शिंक काढून त्याला बोलावून घेते .. तिकडे एका सुंदर स्त्री मध्ये रुपांतर झालेल्या काजोल ला बघून तो एकदम परत 'impress' होतो .. मग मुलांचा summer camp राहतो बाजूलाच आणि शाहरुख आणि काजोलचे Bollywood standard चे adult games चालू होतात .. यथावकाश काजोल चा 'मंगेतर' ( हा नक्की काय शब्द आहे ते मला अजूनपर्यंत कळलं नाहीये!) सलमान तिकडे येतो .. तोपर्यंत शाहरुख वर असलेलं काजोलचं प्रेम पुन्हा जागृत होतं .. पण सलमान तिकडे आल्याने तिला सत्य परिस्थितीची जाणीव होते आणि ती engagement करायला सलमान बरोबर परत येते .. का ते माहित नाही आणि बोलावलेलं असतं की नाही तेही माहित नाही पण शाहरुख आणि त्याची team तिकडे पोचतात मग final रडारडी होऊन, सलमान काजोल ला शाहरुख शी लग्न करायला सांगतो ..

तर असा हा साडे तीन तासांचा 'कुछ कुछ' नव्हे तर 'पुछ पुछ क्या क्या हो सकता है' सिनेमा ..


Chinnu
Thursday, December 13, 2007 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'पुछ पुछ क्या क्या हो सकता है' >> अगदी अगदी सशल. HHPV! :-)

Farend
Thursday, December 13, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काजोल तिच्या (पत्रावर विसंबून???) लग्न न करताच रहाणार आहे

मला ते टायटल गाणे खूप आवडते, पण असंख्य अचाट प्रकार आहेत या KKHH मधे. ते एक दोन वेळा अकारण मारलेले सरदार आणि १२ वाजताचे जोक तसेच. या चोप्रा, जोहर वगैरे चित्रपटातील हीरोंच्या आवडत्या गोष्टी सगळ्या अमेरिकन असतात (बहुधा त्या ब्रॅन्ड्स कडून छुप्या जाहिराती करता येत असतील). ते नेहमी जूस पीत बास्केटबॉल खेळतात, त्यांच्या भिंतीवर सुद्धा येथील बेसबॉल किंवा अमेरिकन फ़ूटबॉल च्या टीम्स च्या जाहिराती असतात ('ता रा रम पम' बहुधा).

काजोलचे लग्न SRK नंतर तब्बल ८-९ वर्षे (राणीचा प्रेग्नन्सी टाईम धरून :-) ) होत नाही, पण जेव्हा ते शोधत असतात तिला तेव्हाच बरोबर मंगनी वगैरे असते. कारण करण जोहर ला तोपर्यंत चित्रपटात 'पन्जाबी एलिमेन्ट' फारसा आला नाही हे लक्षात येते त्यामुळे तशी १-२ गाणी टाकायला निमित्त पाहिजे असते.

रानी मुखर्जीचा एन्ट्रीला मेकप ही इंग्लंड मधून आली म्हणून घारे डोळे वगैरे असा आहे ना?


Divya
Thursday, December 13, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, छान लिहीलय.
या movie तला अजुन एक अचाटपणा म्हणजे टुटा हुआ तारा... हा movie बघितल्यावर मी इतके वेळा गच्चीत जाउन एक तरी टुटा हुआ तारा दिसतोय का बघायची. हाय अफ़सोस अजुन पर्यन्त एकही कधी दिसला नाही. बहुतेक त्याचही पेटंट करण जोहर ने त्याच्या movie मधल्या hero heroine साठी राखुन ठेवले असावे. काश कभी दिखता तो....


Meggi
Thursday, December 13, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, मस्त लिहिलय...

मला कळत नाही, राणी तिच्या मुलीसाठी ८ वाढदिवसाची ८ पत्र लिहिते. १ आणि २ वर्षाचं बाळ पत्र वाचु शकत? खरच अतर्क्य. करण जोहर कडुन खूप अपेक्षा पण नाहीत म्हणा..


Akhi
Thursday, December 13, 2007 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा दिव्या मस्त idea आहे पेटंट ची.
सशल, छान लिहीलय.


Manjud
Thursday, December 13, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, अगदिच HHPV . फक्त एकच, राणी मुखर्जी raagging होताना 'ओम जय जगदिश हरे' म्हणते. ते 'रघुपती राघव राजाराम' नंतर रीमिक्स करून पुढे घुसवलंय. गाणी खरोखर सुश्राव्य आहेत. अर्थात पिक्चर रीलीज झाला तेव्हा आवडला होता. कारण तेव्हा वय पण असं गुलाबी स्वप्नात रमून जाण्याचं होतं. पण आता KKHH बघितला तरी डोक्यात जातो.

शाहरुखचा एक अचाट डायलॉग राणीला प्रपोज करताना, 'मेरा सर सिर्फ तीन लोगोंके सामने झुकता है, एक देवी मां, एक मेरी मां और, और, और.......' अगदीच पांचट आहे.


Psg
Thursday, December 13, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, पूर्ण अनुमोदक. इतका फ़ालतू मूव्ही पाहिला नाही.. गाणी मात्र सगळी श्रवणीय आहेत.

त्यात पुन्हा एकदा 'दिल तो पागल है' नंतर शाहरूख बिना पॅंटचा कुठेतरी जाताना दाखवलाय.. अरे सीन्स तरी वेगळे दाखवा की! काय ही वैचारिक गरीबी!

आणि सर्वात बावळटपणा म्हणजे टॉमबॉय असलेल्या काजोलचं रूपांतर डायरेक्ट 'सुशील नारी'त! साडीशिवाय ऐकतच नाही. अगदी कॅंपलाही साडीच नेसणार आता!

बरं, मुली भरतनाट्यम शिकायला वयाच्या ८व्या वर्षी वगैरे सुरुवात करतात. पण काजोल २१ वर्षाची घोडी होईपर्यंत नुस्ती हुंदडत असते आणि नंतर ८ वर्षात असा कायापालट की थेट भरतनाट्यमची टीचरच. अधेमधे काही स्टॉप्स नाहीतच!

शाहरूखचा मारे डायलॉग आहे.. 'हम प्यार सिर्फ़ एक बार करते है और शादीभी एकही बार करते है'. मग काजोलचं ठरवलेलं लग्न मोडताना, मधेच स्वत्:चा नंबर लावताना, दुसरं लग्न मुलीच्या आणि दिवंगत बायकोच्या आग्रहाखातर करताना कुठे गेला तो डायलॉग?

शी! फालतू चित्रपट खरंच!


Zakasrao
Thursday, December 13, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


भन्नाट लिहिल आहे.
तो चित्रपट मी कुठल्याही चॅनल वर फ़ुकट जरी पहायला मिळत असेल तरी पहात नाही. अजुन एकदाही पाहिला नाही.
त्यापेक्षा एखादा हॉलीवुडचा ऍक्शनपट परवडतो :-)

}

Sanghamitra
Thursday, December 13, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अगदी अगदी सशल.
मेगी एकदोन वर्षांचं बाळ पत्र वाचतं का? योग्य शंका आहे खरंच. पण त्या KJ चा लॉजिकशी काय संबंध? तो वाचत असेल एक वर्षांचा असताना म्हणून मोठेपणी असं झालंय त्याचं. :-)
जबरदस्त HHVP आहे हा मुव्ही म्हणजे.
आम्ही दुर्दैवाने दिवाळीच्या दिवसांत आईवडील, मामामामी या सगळ्यांसकट गेलो होतो. आणि मग तो मुव्ही परवडला अशा त्या
" काय बाई आजकालचे सिनेमे " असल्या कमेंट्स ऐकाव्या लागल्या होत्या.
आता पिच्चर आम्हाला पण बकवासच वाटलं होतं पण आजकालच्या (म्हणजे आपल्या जनरेशन च्या) म्हणून त्याला डिफेंड करावं लागलं होतं. " पण राणी छान दिसते किनई " वगैरे.
या काजोल आणि राणी ऍक्टींग बरी करतात. पण ऍक्टिंग चार आण्याची आणि भाव रुपयाचा. कित्ती तो ऍटिट्युड!
काजोलचा तो टॉम बॉय लुक तर अगदी इरिटेटिंग आहे. ते " Rahul is a cheater " म्हणते तेंव्हाच एक ठेवून द्यावी वाटते. बहुतेक तो इरिटेटिंग प्रकार बघूनच तो राहुल तिच्या प्रेमात पडत नाही.
आणि ती ओढणी!
आठ वर्षं घरचा पत्ता पण माहित नाहीये पण ब्रिफकेस मधे ओढणी ठेवून फिरतोय.
पण हे बरं असा " पॉपकॉर्न खाओ मस्त हो जाओ " नावाचा एक प्रितीश नंदीचा मुव्ही होता त्यात ती काजोलची डिप्रेसिंग बहीण होती. KKHH च्या सेम लाईनवरची स्टोरी आणि साड्या तर काजोलच्याच. म्हणजे वैचारीकच नाही तर आर्थिक पण गरिबी दाखवलीय.


Sadda
Thursday, December 13, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल...
शाहरूखचा मारे डायलॉग आहे.. 'हम प्यार सिर्फ़ एक बार करते है और शादीभी एकही बार करते है'.
>>> आणि तो हे उठसुट सगळ्यांना ऐकवत असतो..

सगळ्यात अतर्क्य म्हणजे ते Conference च्या वेळी झालेली फोन ची अद्लाबदली.. पहिल्या वाक्यालाच कळत आपल्याला wrong no. आहे आणि हे किती बोलतात..

Amruta
Thursday, December 13, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे!!! सिनेमातली माणसा आपल्यासारखी हुशार असतात का?? :-)

Kedarjoshi
Thursday, December 13, 2007 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही. जबरी लिहीलय. मला हा अन ह्या पढडीतले त्याचे सर्व पिक्चरस बद्दल प्रंचड राग आहे. काहीही दाखवतात अन म्हणे समजुन घ्या.

Preetib
Thursday, December 13, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sanghmitra.. u r right..Rahul is a cheater ..he sentence far vaitag aanata..

Sunidhee
Thursday, December 13, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, संघमित्रा, psq तूफान लिहिले आहे. ए पण काजोल त्या साड्यात खरच सुरेख दिसलिये.... आणि मंजु म्हणते तसे, तेव्हा गूलाबी वय होतं म्हणुन हा पण सिनेमा पहावला गेला. पण ते cheater, ती छोटी अंजली सलमान ला 'तू हिच्याशी लगीन करू नको' अशी जबरदस्ती करते वगैरे बरेच सिन्स तेव्हा पण बोर झालेत. आता मात्र हा आणि असे सर्व (जब वी मेट सोडून) बघायचा विचार पण नाही करवत.

Chinya1985
Thursday, December 13, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलांचा summer camp राहतो बाजूलाच आणि शाहरुख आणि काजोलचे Bollywood standard चे adult games चालू होतात

लैच भारी!!!!! सशल सहिच लिहिलय. पण तमाम SRK चे पंखे,तो किती महान असे गोडवे गाणारे कुठे आहेत????

त्यात पुन्हा एकदा 'दिल तो पागल है' नंतर शाहरूख बिना पॅंटचा कुठेतरी जाताना दाखवलाय.. अरे सीन्स तरी वेगळे दाखवा की! काय ही वैचारिक गरीबी!

हेच काय 'अगर ये मुडके देखेगी तो ये मुझसे प्यार करती है' हा डायलॉग तर कितीतरी चित्रपटात जसाच्या तसा वापरलाय (बहुतेक शाहरुखचेच सिनेमे)

मी इतके वेळा गच्चीत जाउन एक तरी टुटा हुआ तारा दिसतोय का बघायची.

अजुन खरा टुटा हुआ तारा बघितलाच नाही????मी असा चित्रपट बघितलेला नाही पण खरा तारा तुटताना बघितलाय. १७-१८ नोव्हेंबरला असे तारे भरपुर तुटतात. मी एका वर्षी एका रात्रित ९२ तुटलेले तारे मोजले होते १७ नोव्हेंबरला

Marathifan
Thursday, December 13, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी त्या शाहरुख खानच्या मुलीला 'संतीण' असे नामाभिधान केले होते हा picture बघून sashal छान लिहिलिअ आहेस

Rashmee
Thursday, December 13, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

KKHH मधे रानी ला मरायच्या आधीच माहित असतं का की Exactly ८ वर्षानी काजोलचं लग्न होणार आहे? ती बरोबर ८च पत्रं कशी लिहिते?

Sashal
Thursday, December 13, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना धन्यवाद ..

मला खरंतर एव्हढं सगळं एकाच shot मध्ये लिहायला जमत नाही त्यामुळे भरपूर अचाट गोष्टी लिहायच्या राहुनच गेल्यात .. आज टाकते जमलं तर ..


Divya
Thursday, December 13, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका वर्षी एका रात्रित ९२ तुटलेले तारे मोजले होते १७ नोव्हेंबरला
तु पण पेटंट घेतल होतस का?
आता movie तर आधी शाहरुख रानीला मागतो (टुट्या हुए तार्यासमोर हात जोडुन) आणि काजोल शाहरुखला, राणि पण आधी शाहरुख मिळावा म्हणुन विश करते. काजोलची विश कशी पुर्ण होणार म्हणुन राणीला मारुन काजोलची wish पण पुरी होते बरोबर...
मग आता तु ब्याण्णव wish काय केल्या म्हणे...

(take it lightly...)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators