|
Asami
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:34 pm: |
| 
|
आणि सर्वात बावळटपणा म्हणजे टॉमबॉय असलेल्या काजोलचं रूपांतर डायरेक्ट 'सुशील नारी'त! साडीशिवाय ऐकतच नाही. अगदी कॅंपलाही साडीच नेसणार आता! >> बाकी काय वाट्टेल ते असो, कजोल भलतिच खल्लास दिसते साड्यांमधे. केवळ तेव्हढ्यासाठी बघितला.
|
Sonalisl
| |
| Thursday, December 13, 2007 - 7:51 pm: |
| 
|
मी एका वर्षी एका रात्रित ९२ तुटलेले तारे मोजले होते १७ नोव्हेंबरला >> मी सुद्धा, एका वर्षी एका रात्रीत खूप तारे तुटताना पाहीलेत, आता आठवत नाही कोणतं वर्ष ते. मोजले पण होते...१०५. पेपर मध्ये पण आलं होतं तेव्ह कि जास्तीत जास्त तारे तुटताना दिसतील म्हणून. आमच्या बाजूच्या ईमारतीच्या गच्चीत पण बरेच लोक तारा तुटताना बघन्यासाठी जमले होते. आम्ही पण गच्चीत शेकोटी करुन रात्री २ वाजेपर्यंत जागे होतो सगळे.
|
Naatyaa
| |
| Thursday, December 13, 2007 - 8:09 pm: |
| 
|
रबिटाल मस्त लिहिले आहेस.. मी असाच कुठलातरी एक चित्रपट बघितला (नाव आठवत नाही) त्यात ती अभिनेत्री एक अभिनव खेळ खेळताना दाखवली आहे.. ती football/soccer ball हा basketball सारखा आपटत एका golf course वर हा खेळ खेळत असते.. जरा कोणीतरी या खेळाचे नाव सांगा हो मला..
|
तो शाहरुखला काजोलच्या स्त्रीत्वाचा अविष्कार होणारा सीन म्हणजे कळस होता. च्यायला ह्या हिंदी पिक्चरच्या हिरोंना हिरॉइनचा पदर पडला वा ढासळला की मगच स्त्रीत्वाचा साक्षात्कार होतो. कधी सुधारणार ही लोकं कोण जाणे. म्हणजे स्वभाव, आवड, जाणीव वगैरे भानगडी जास्ती महत्त्वाच्या असतात हे नाहीच. नुसता रंग, आकार.. अर्थात मी खर्या आयुष्यात पण हेच बघितले आहे. माझ्या अनेक चुलत, आत्ये, मामे भावंडांच्या मुली बघणे कार्यक्रमात, मुलीचा रंग ही बर्याच जणांची पहिली चाळणी असते.
|
Maanus
| |
| Thursday, December 13, 2007 - 9:17 pm: |
| 
|
मुलींना शाहरुख खान का आवडतो ह्याचे गणित मला अजुन उलगडले नाही. कालच एकीला विचारले तर म्हणाली की तो ४२ वर्षाचा झाला तरी त्याने अजुन 6 pack abs maintain केलेत म्हणुन. अहो brad pitt देखील 44 चा आहे. तोच कशाला जितेंद्रला देखील अजुन पोट नाही सुटले. शाहरुक चे सगळे चित्रपट एकाच style चे असतात. हिरोईन त्याच्या मागे लागलेली असते, पण हा काय तीला भाव देत नाही. आणि ज्या क्षणी तीला कोणतरी दुसरा हिरो मिळतो, त्या क्षणापासुन लगेच ह्याला ती हिरोईन आवडायला लागते. KKHH देखील त्याला अपवाद नाही. ते पत्र, अंजली नाव वैगेरे सगळ झुट. सलमान तीच्याबरोबर लग्न करतोय म्हटल्यावर त्याला लगेच काजोल पाहीजे
|
Farend
| |
| Thursday, December 13, 2007 - 9:44 pm: |
| 
|
आणि 'दिलवाले दुल्हनिया...' व 'कुछ कुछ होता है' पासून त्याला कोणी साखरपुड्याला बोलावीत नाहीत म्हणे
|
Chinya1985
| |
| Thursday, December 13, 2007 - 10:45 pm: |
| 
|
दिव्या, पुढील ब्याण्णव जन्मांचा प्रश्न मिटला माझा!!!! च्यायला आजकाल मला सगळेच take it lightly,take it lightly सांगायला लागलेत मी सुद्धा, एका वर्षी एका रात्रीत खूप तारे तुटताना पाहीलेत, आता आठवत नाही कोणतं वर्ष ते. सोनाली,माझ्यामते बहुतेक १९९८ साल असेल ते.मात्र मी रात्री ३ ते सकाळी ६पर्यंत मोजले होते. तेंव्हा हजारो उल्का पडतील वगैरे हाइप पेपरवाल्यांनी केली होती मात्र काही शेच पडल्या होत्या. च्यायला ह्या हिंदी पिक्चरच्या हिरोंना हिरॉइनचा पदर पडला वा ढासळला की मगच स्त्रीत्वाचा साक्षात्कार होतो. तेच ना!!!आम्हाला तर नुसत बघितलकीच कळत सगळं. पदर पडायची वाट पहात नाही बसावी लागत. सिनेमावाल्यांची ट्युब पेटत नसावी लवकर
|
Zakasrao
| |
| Friday, December 14, 2007 - 11:17 am: |
| 
|
हे घ्या उल्का वर्षाव चिन्या वरच्या लिन्क वर क्लिक करुन अजुन पुढचे अजुन जन्म फ़िक्स करुन टाक रे.
|
Ankyno1
| |
| Friday, December 14, 2007 - 12:01 pm: |
| 
|
शाहरुख च्य जवळ जवळ सगळ्या चित्रपटात तो इतर कोणाची तरी बायको प्रेयसी पळवतो तसा प्रयत्न करतो. दीवाना मधे ऋषी कपूर ची बाज़ीगर मधे सुशान्त रे ची डर मधे सनी ची राम जाने मधे विवेक मुश्रन ची अंजाम मधे दीपक तिजोरी ची दिलवाले दुल्हनिया... मधे परमीत सेठी ची दिल तो पागल है मधे अक्षय ची . . . . चलते चलते, कँक, वीर ज़ारा..... किती उदाहरणं देउ.... स्वदेस मधे ही गायत्री चं लग्न मोडल्यावर याला किती आनंद झाला होता आठवा......
|
शाहरुखने पण हे मान्य केल होतं एका मुलाखतीत की मी गेले १५ वर्ष दुसर्यांच्या बायका पळवतोय झकास,आता अजुन किती जन्म घेउ???
|
Aashu29
| |
| Saturday, December 15, 2007 - 9:20 pm: |
| 
|
हे मात्र खरयं, शहरुख सदैव बायका भगाव गेम खेळत असतो, आणि या मुव्हित तो फ़ारच पकाव दिसतो! एवढा दिल तो पागल मधे नाहि दिसत!
|
Dakshina
| |
| Friday, December 28, 2007 - 12:04 pm: |
| 
|
अहो, ankyno1 येस बॉस लिहायचा राहीला... KKHH मधला अजून के आचरटपणा म्हणजे, समर कॅम्प मधे पाऊस कसला पडतो? कायच्याकाय? आणि ही वर दिड आचरट अंजली वरंवार ' शायद मेरे ममा - पापा को आप आच्छी लगी हो, इसलिए मेरा नाम अंजली रखा है, किंवा मै भगवान से माँ के लिये क्या मांगू, वो तो उन्हीके पास है.... ' असले डायलॉग ऐकवून कजोल आणि प्रेक्षकांना गार करते. आम्ही लहान असताना आम्हाला साधा शेंबूड नव्हता काढता येत, आणि ही मारे चालली स्वतःच्या बापचं दुसरं लग्न लावायला... मग त्या पावसात काजोल आणि srk गाणं पण म्हणतात. आणि डॅन्स करतात, ती पळत जंगलात जाते, तिथे आपला सलमानभाऊ कूठून येतो म्हणे? आहो मंडळी काजोलला मंगळ असतो, म्हणून आठ वर्षांची गॅप पडते. आणि तिला मंगळ आहे ही काजोल राणिला मरताना कानात सांगते, म्हणून तर ती पत्रं लिहीते ना....
|
Rashmee
| |
| Friday, January 04, 2008 - 6:49 pm: |
| 
|
शाहरुख चा एक मुव्ही आला होता, कोयला, त्यात तर तो चक्क अमरीश पुरीचि बायको पळवतो.
|
Tulip
| |
| Wednesday, January 09, 2008 - 7:29 pm: |
| 
|
हा .. हा.. सशल, सन्मी आणि पूनम तिघींनीही सहीच लिहिलय खरंच काजोल मोस्ट इरीटेटींग आहे ह्या फ़िल्ममधे. आणि शेवटच्या त्या लग्नाच्या .. सलमान तिचा हात धरुन फराफरा ओढत नेतो शाहरुख कडे त्या सीनमधे काजोल त्या शादीच्या जोड्यात काय हेफ़्टी दिसलिय. अगदी WWE wrestler सारखी. आधीच्या टॉमबॉय लुकमधे तर येडपटच दिसते. असाम्याला काय खल्लास दिसलं म्हणे तिच्यात
|
Sweetgirl
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:11 am: |
| 
|
मला पण एक कळले नाही की summer camp ला पाउस कसा काय आला?
|
Dakshina
| |
| Thursday, January 10, 2008 - 6:53 am: |
| 
|
आणि लहान पोरं कॅम्प फ़ायर ला काय डम शॅरर ( हे नाव मला कधी कळ्ळं नाही exactly काय आहे ते.. ) खेळतात का? आणि ते सुद्ध इतकं सुचक? की शाहरूख आणि काजोलला एकमेकांबद्दल प्रेम वाटवं? पिक्चर मधे लहान मुलांकडून काय काय करून घेतात. आणि अवास्तविकतेचा कहर म्हणजे, छोट्या अंजलीचा बापूस, आजी, आणि मोठ्या अंजलीचा होणारा नवरा... यांना लहान मुलांच्या समर कॅम्प मध्ये आरामात प्रवेश मिळतो. मब बाकिच्या पोरांच्या आईबापांनी कोणतं घोडं मारलं होतं? शिवाय, ही सगळी पोरं इतक्या हायफ़ाय एरियात राहीलेली दाखवली आहेत, आणि पावसात छप्पर गळतं ते कसं काय? शाहरूख पण येताना एक तो टिपू सुलतान सारखा कोट घालून येतो, आणि एक बॅग दिसते, बाकीचे कपडे?
|
Maitreyee
| |
| Thursday, January 10, 2008 - 2:32 pm: |
| 
|
बाकी ठीक पण समर कॅंप मधे पाऊस आला तर आश्चर्य कसलं त्यात कितीतरी वेळा मे महिन्यात वळिवाचा पाऊस येतो की
|
Nyati
| |
| Wednesday, January 23, 2008 - 8:53 pm: |
| 
|
शाहरुख एकदम सिमला शहरात कसा जातो तर एका ट्र्कला लिफ़्ट मागुन
|
सही... SRK आणि त्याचे movies न आवडणारे बरेच लोक आहेत हे बघून बरे वाटले
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 26, 2008 - 5:35 am: |
| 
|
>>आम्ही लहान असताना आम्हाला साधा शेंबूड नव्हता काढता येत, आणि ही मारे चालली स्वतःच्या बापचं दुसरं लग्न लावायला...<< दक्षिणे, अगदी अगदी गं! >>डम शॅरर ( हे नाव मला कधी कळ्ळं नाही exactly काय आहे ते.. )<< Dumb Charades (मुकाभिनय.. वेगळ्या अर्थांवर जाऊ नका चोरांनो!)
|
Dakshina
| |
| Tuesday, February 26, 2008 - 12:54 pm: |
| 
|
अज्जुका, मुकाभिनय.... सांगितल्याबद्दल धन्यवाद! (तरिही english नाव कळ्ळंच नाहीए तसं अजून... )
|
charades :- a game in which each syllable of a word, and then the whole word, is acted and the audience has to guess the word शरेड्स या शब्दाचा अर्थ असाच आहे...
|
'शराऽऽड्स' त्या शेवटच्या सीनमध्ये सलमान पागोटं काढून फेकतो- तेव्हां वाटतं, की आता हा बाकीचेही कपडे काढून नाचू लागेल की काय? इथे पोरवयात आपल्याच धर्मातलं अथर्वशीर्ष शिकतांना दोन आठवड्यांची तपश्चर्या- हज्जारो उजळण्या आणि अर्धा डझन टपल्यांचं भांडवल खर्ची पडतं. संध्येचंही तेच! अंजली आजीची गायत्रीमंत्राची आज्ञा पुरवू शकत नाही, नमाज़ मात्र व्यवस्थित ठाण मांडून म्हणते- 'केजो' ( JLo सारखं) ने धार्मिक समभावाचं काय उत्तम उदाहरण मांडलंय!!
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:42 pm: |
| 
|
अंजली आजीची गायत्रीमंत्राची आज्ञा पुरवू शकत नाही, नमाज़ मात्र व्यवस्थित ठाण मांडून म्हणते- वा, वा असे आहे हो त्या चित्रपटात? मग त्यावर का नाही आणली बंदी? तेव्हढी हिंमतच नाही ८० टक्के हिंदूंची! बरोबर आहे, मुसलमानांचे ते चांगले नि हिंदूंचे वाईट! कदाचित् आपल्या बुद्धीचा दोष असल्याने आपल्याला त्यातला खरा अर्थ समजत नसेल! जे दिसते त्याच्यामागे हिंदू मुसलमान या प्रश्नापेक्षा इतर काही मंगल, सुंदर सत्य(!) दडलेले असेल. कला झिंदाबाद, नवभारत झिंदाबाद!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|