Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 05, 2007

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through September 05, 2007 « Previous Next »

Lopamudraa
Friday, January 12, 2007 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

H H.. lol.. .. .. .. .. .

Zakki
Friday, January 12, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार HH , बर्‍याच दिवसांनी दिसलात. काय खबरबात?

Hawa_hawai
Friday, January 12, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मी मजेत... चौकशी बद्दल धन्यवाद.

आणि तुम्ही असे मला उद्देशून " तुम्ही " वर का घसरताय? मला अजिबात चालणार नाही ते.


Arc
Monday, February 12, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@sas
tuzya ASHchi swathachi kahi karane asatil contact na thevnyachi.
actually, ameriketalya maitrini swatahachya soipramane (karan tya mhane tithe khup busy asatat aani bhartiy lok rikame asatat) contact thevtat.
aani fakt contactsathi mhanun contact thevanyat kahi maja nahi.maitri tikvayala parspar-sahvasachi pan garaj asate to nasel ter ekhdyacha interest sampu shakato tyat gair kahich nahi.

Zakki
Monday, February 12, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karan tya mhane tithe khup busy asatat aani bhartiy lok rikame asatat

तुम्ही हे उपरोधाने लिहीले की काय? तसे असेल तर जरा या देशात राहून बघा. का बिझि असतात लोक ते. सगळ्यांकडे काही घरकामाला गडी नसतात, तेंव्हा भांडी घासणे, कपडे धुणे स्वत:चे स्वत:ला. स्वत:ला नटवण्यासाठी (अत्यंत साहाजिक इच्छा) अनेक उपाय! एकदोन तास तरी सहज लागतात! शिवाय मैत्रिणींशी बोलायचे! त्यात तीन चार तास! बरे शिकत असेल तर अभ्यास नि नोकरी असेल तर काम यातून फार थोडा वेळ मिळतो. त्याशिवाय मनोरंजनाला लक्षावधी उपाय.

जर त्या मुलीला 'तुझ्याखेरीज सर्व आयुष्य व्यर्थ आहे' असे वाटत नसेल तर काय? सोडा तिचा नाद. तिला वाटले तर तीच लिहील तुम्हाला!


Robeenhood
Monday, February 12, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक बीबी वर जाऊन 'पिंक' टाकलीच पाहिजे का?

Zakki
Monday, February 12, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय तंगडी वर करू, तुमच्यासारखी? नि मूळचा भारतीय, कुठेहि पिंक टाकण्यात मी कमीपणा मानत नाही!

Imtushar
Monday, February 12, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas , यामागे आळशीपणा हेही एक कारण असू शकते (स्वानुभव).

तू एकदा फोन करायला काही हरकत नाही... आणि तिला फोन करशील तर आधी हे विचार की तिला निवांत वेळ आहे का बोलायला, नाहीतर ती खरच कामात असायची आणि तुला वाटेल की ती तुला टाळतेय.


Arc
Tuesday, February 13, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ameriket lok busy asatat hyat kahi wadach nahi, pan baryach wela te bharatatlya lokana gruhit dhartat ha maza anhubhav aahe.aani kahijanana ter tikade gelyananter ektepana janvayala lagala ki magach aathavan yete bhartiy mitra maitrininchi.

Zakki
Tuesday, February 13, 2007 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे! फार दु:ख झाले हो ऐकून की भारतीयांना गृहित धरून विसरतात! पण का हो, भारतातल्या मुली नि मुले मात्र आपला मित्र किंवा मैत्रिण अमेरिकेला, इंग्लंडला गेली तरी तिला न विसरता दररोज फोन करतात का?

माझ्या ओळखीत तर लग्न ठरले असून, मुलगी, मुलगा परदेशात गेले, सारखे फोन केले भारतात, तरी भारतातल्या लोकांनी त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घेतल्या, त्यांना विसरून गेले!

तर त्यात भारतीय अमेरिकन वगैरे काही भेदभाव नाही, असे माझे मत आहे.




Sas
Tuesday, February 13, 2007 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या तुमच्या सार्‍यांच्या प्रतिकियां बद्द्ल आभार

मी फोन try केला "Number Busy" असा मेसेज मिळाला २ वेळा व नंतर Voice Messge.

I am trying to reach her on her office number. Why she did not send me her Cell No or Home No; I m really not understanding.It is hurting me now.

इथे एकटेपणा वाटतो म्हणुन भारतात Friends ला फोन करायचा अस लोक करतात अस मला नाहि वाटत. पैसे नाहि लागत का फोन करायला. भारतात फोन केला घरी की घरच्यांशी कधी कधि घाई होते बोलतांना बील वाढत रहात म्हणुन. खरतर इथे आल्यावर बरेच जण भारतात Friends ला फोन करतच नाहित त्यापेक्षा घरच्यांना करु अस होत. (हा माझा अनुभव)

१०-१५ मी. फोन वर बोलुन एकटेपणा काही जात नाही थोडावेळ बर वाटत ईतकच. असो.

Zakki बरोबर आहे भारतातुन कोणी करत का अमेरिकेतल्या Friend ला फोन??

खरच सहवास नसला की नाती दुरावत जातात पण तरिही मधुन मधुन संपर्क करत राहिलो एकमेकांना तर नात भुतकाळात तर जात नाही ना आणी बर वाटत क्षण भर का असेना.

Meenu
Thursday, February 15, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki बरोबर आहे भारतातुन कोणी करत का अमेरिकेतल्या Friend ला फोन?? >>>>> पैसे नाहि लागत का फोन करायला.

मला वाटतं नाद सोडुन दे तु .. तु जीथे शिकत असशील अथवा काम करत असशील तिथल्या सहकार्‍यांशी मैत्रीचं नातं जोड. एखादी तरी भेटतेच की मैत्रिण .. आणि गडबड का इतकी ..? तोपर्यंत ईथे येऊ शकतेस की तु वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला ..

Nandini2911
Tuesday, September 04, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे माझ्या बाबतीत आज घडलं... खूप वाईट वाटलं म्हणून इथे लिहितेय. कारण इथे कुणीतरी वाचेल.. ही अपेक्षा..

गेले दीड महिनाभर मी आणि मीझी कलीग सोनल एका प्रोजेक्टवर काम करत होतो. प्रोजेक्ट होता आमच्या कंपनीच्या corporate social responsibility च्या सर्व activities वरती एक documentary बनवायची होती.

मला tv serial मधे asst director चा अनुभव आहे. सोनल तर अल्फा टीव्हीसाठे executive director म्हणून काम करणारी. आम्ही दोघीनी अक्षरश्: दिवसरात्र काम करायला सुरुवात क्केली. सोनल आणि मी जर एकत्र काम करत असू तर एकमेकाना शांत बसू न देण्याची आम्ही शपथ घेतलेली असते. कधी कधी पहाटेपर्यंत आम्ही काम केले आहे. आणि हे सर्व आमचे रुटिन काम सोबत करून.

CSR Actvities वर फ़िल्म बनवायची असल्यामुळे साहजिकच रोज त्या dept बरोअब्र बसून डिस्कशन व्हायचे. बर्‍याचदा या मीटिंग अटेंड करायचे. सोबत स्क्रिप्ट पण आकार घेतच होती.
CSR Team चा जास्तीत जास्त वेळ हा मीटिंग मधेच जायचा. आज हे डिस्कस करू उद्या ते. आज इतकंच बास. वगैरे वगैरे. साडेसहानंतर एक मिनिटपण ते ऑफ़िसमधे थांबत नाहीत. त्याच्याकडून राजश्रि आणि देवांशु असे दोघेजण होते. हे दोघंही नॉन मराठी. एक पंजाबी आणि एक गुजराती. त्याना प्रत्येक गोष्ट हिंदी किंवा इंग्लिशमधे सांगायला लागायची. तरीही आम्ही खूपच स्पीडने काम करत होतो.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शूटिंग झाले. शूटिंगची सर्व व्यवस्था आम्ही केली होती. याना बाकीची तयारी करायला सांगितलं होतं. तेही केलं नाही. धड पाणी नाही की ब्रेकफ़ास्ट नाही. सोबत १५ माणसाचे युइन्ट. वर जे गावकरी interview साठी आणले होते, त्याना काय बोलायचे वगैरे काहीच कल्प्ना दिली नव्हती. ते सर्व मला करावं लागलं कारण सोनल कॅमेरा युनिट सांभाळत होती. आम्हाला जितकं अपेक्षित होतं त्याच्या निम्मंसुद्धा शूटिंग झालं नव्हतं. तरीही आज साडेसहा वाजले आता पॅक अप करा असं सांगितलं. दुसऋया दिवशी परत शूट करायचं तर तित्काच परत खर्च. आम्ही शूटिंग आज कंप्लीट करायचेच असं ठरवलं.
रात्रीचे तीन वाजता पॅक अप केला. अर्थात तोपर्यंत या दोघानाही थांबावे लागले.

"राजश्री लेडी है, उसको इतनी दर कैसे रुकाये. कुछ हो जाता तो..." इति देवांशु.. आम्हाला दोघीना. :-)

त्यनंतर त्याना जाणवलं की या प्रोजेक्टचे ओनर आपण आहोत. आणि आम्ही विनाकारण नाक खुपसतोय. (गाढव काम सगळं संपलं होतं.) यानंतर एडिटिंगला आम्ही येणारच असं सांगितलं. सकाळी आठ वाजता बोलावल्यावर दुपारि एक वाजता अख्खी टीमची वरात घेऊन आले. जो voice over मी लिहिला होता तो ठीक नही है हे कारण देऊन नवीन लिहिला. (माझ्यकडे दोन्ही कॉपीज आहेत. para and sentences इकडचे तिकडे केले आहेत.

त्यानंतर आम्ही एका प्रोफ़ेशनल डबिंग आर्टिस्टला बोलावलं होतं. पण याचा हट्ट. हमारे XYZ साब को करने दो... आता हा xyz स्वत्:ला साहित्यिक आणि गझलकार म्हणवतो. त्याचं हिंदि ऐकल्यावर घेरी यायची शिल्लक होती. आगाऊ संकटाची मला आणि सोनलला कल्प्ना आलीच. नको असं आम्ही सांगून उपयोग काहीच नाही... त्याच्या आवाजात रेकॉर्डिंग झाले. उच्चारात असंख्य चुका. आवाज एकदम नाटकी. कोण बोलणार??

यानंतर ऍदीटरला तुम्ही शॉट अलाईन करा आम्ही निघतो असं सांगितलं.. कारण साडेसहा वाजुन गेले होते. (मी आणि सोनल रात्रभर एडिटिंग करायच्या तयारीने आलो होतो.)

त्यानंतर हे लोक स्टुडिओकडे फ़िरकले पण नाहीत. शनिवर रविवार आम्ही खपून काम केलं.

आज फ़िल्म दाखवल्यावर मात्र लगेच...
"देखो हमने कितन अच्छा बनाया है. .."

सर्व क्रेडिट स्वत्:कडे खेचून मोकळे. का तर फ़िल्म याच्या activities ची आहे म्हणून. दुर्दैवाने माझा बॉस आणि सोनल दोघंही आज इथे नव्हते. मला एकटीला काही उलट बोलताही येईना..

जर त्यानी आम्हाला व्यवस्थित सहकार्य दिलं असतं तर आम्हीही त्याना क्रेडिट दिलं असतं.. पण असा पोरकटपणा करून काय साध्य होणार आहे?
मी ज्युनिअर आहे. मुलगी आहे म्हणून हे असं होतं का?

गाढव काम करायला आम्ही. आणि मलिदा खायला दुसरंच कुणीतरी???
यापुढे तरी असलं काम करताना मी शंभरदा विचार करेन. (सोनलने तर असली असाईम्नमेंट घेणार नाही हेच सांगितलय आमच्या बॉसला.)




Itgirl
Tuesday, September 04, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.."राजश्री लेडी है, उसको इतनी दर कैसे रुकाये. कुछ हो जाता तो..." इति देवांशु.. आम्हाला दोघीना. ...

डोळ्यांच्या Dr. कडे घेऊन जा त्याला.. तू गप्प का राहिलीस? तुझे क्रेडिट असे सजासहजी का ओरबाडायला दिलेस त्यांना? बॉस ला तरी सांगितले आहेस का??


Zakki
Tuesday, September 04, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, फार वाईट झाले. पण अनायासे 'कर्मण्ये वाऽधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' असे घडले. अनुभव वाया जात नाही. त्याचा कसा उपयोग पुढे करता येईल, ते महत्वाचे.


Dineshvs
Tuesday, September 04, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याचे श्रेय त्याला देण्याइतके कुणीच सज्जन नाही आता, नंदिनी.
तुझ्या पुढच्या स्वतंत्र कामात, तो पायंडा तु पाडु शकतेस.


Ajjuka
Tuesday, September 04, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी,
माफ कर नको तिथे नाक खुपसतेय पण या क्षेत्रात मरणारे कुणीतरी आणि मलिदा खाणारे कुणीतरी हे नवीन नाहीये. तू पण पाह्यलं असशीलच की आधी. वाचून वाईट वाटलं पण आश्चर्य मुळीच वाटलं नाही. कदाचित tunned in झाले असेन मी म्हणून असेल. असे अनुभव प्रत्येकाच्याच गाठीला पाह्यलेयत गं.
कुणासाठी तरी करून द्यायच्या Docu/ corporate/ ads यात client च्या मनमानी मधे creative element चं काय वांगं होतं हेही नेहमीचच नाही का?
पण तरी तुम्ही end result चांगला देऊ शकलात हे महत्वाचं नाही का? अनेकदा असंही होतं की तेही शक्य होत नाही.
निदान ती माणसं नंतर निघून गेली आणि तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे न करता तुमच्या पद्धतीने केलंत ते त्यांना कळलंही नाही.. बघकी त्यांना तेवढंही डोकं नाहीये. आणि घेऊन घेऊन ते कुठे credit घेणार? त्यांच्या त्यांच्या वर्तुळातच ना. तुमच्या बॉसला तर कळतंय ना तुम्ही काय नी किती केलंत ते. मग झालं तर.
घडलं ते दुर्दैवीच पण असं होतंच. पर्याय नाही. आणि काही वेळांना आपलं कितीही योग्य असलं तरी आपण ज्युनिअर असतो त्यामुळे मूग गिळून बसावं लागतं. यातनं जायलाच लागतं प्रत्येकाला.
now you can takeup a whole project on your own! ह्या गोष्टीकडे बघ आणि शक्य झालं तर बाकीचं विसरून जा. सोडून दे.

एकच उपाय यावर...
'खुदीको कर बुलंद इतना क
ए खुदा भी बंदेसे पुछे
बता तेरी रज़ा क्या है!'

(फुकाचं उपदेशामृत वाटलं तरी याच क्षेत्रात अगदी अश्याच नाही तरी आपलं श्रेय दुसरा घेऊन जाणं, किंवा ऊर फुटेतो काम केल्यावरही शिव्याशापच नशीबाला येणं अश्या स्वरूपाच्या अनेक अनुभवांच्यातून गेलेय त्यामुळे तुझी चिडचिड समजू शकते म्हणूनच केवळ इथे तोंड घालतेय. )



Ajjuka
Tuesday, September 04, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी 'वो लेडी है' प्रकाराबद्दल म्हणशील तर धडक मारण्याची धमक अंगात असलेली कुणीही मुलगी या उत्तरेतून आलेल्या मालाला(उत्तरेतून हे भाशेवरून काढलेले माझे अनुमान) 'लेडी' वाटत नाही. कारण अश्या मुलींमुळे या पोरांचा अहं दुखावतो. अशी मुलगी त्यांना intimidating वाटते.
अबला, dependent , बिचारी, नाजूक इत्यादी म्हणजे 'लेडी'... यात तुला बसायला आवडेल का?
मरूदेत ना.. या असल्या लोकांच्या अकला तेवढ्याच. दुर्दैवाने अश्यांचाच भरणा सध्या मेडिया मधे जास्त आहे.


Nandini2911
Tuesday, September 04, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, धन्यवाद. क्रेडिटचा लोचा अशासाठी कारण याच गोष्टीचा उपयोग प्रमोशनसाठी होईल ना. आणि हे क्रेडिट ओरबाडण्याचे प्रकरण झाले आहे ते माझ्या बॉसच्या आणी त्याच्याही बॉसच्या पुढ्यात. त्यामुळे माजा इतका संताप झाला. मरू देत ना म्हणणं खूप सोपं आहे. मी आणि सोनल एकमेकीन तेच सांगतोय. :-) पण वाईट अशाचं वाटतं की एक एक शॉत आम्ही लाव्ला आणि हे वर.. "परफ़ेक्ट बनाकेही दिखाया हमने."

आयटे, हे वाक्य तो पनवेलच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमधेच रात्री नऊ वाजता बोलला होता. तुझी कमेंट वाचून त्यामुळे खूप हसले.

त्या लेडी कमेंटबद्दल आमच्या बॉसला सांगितलं तर ते म्हणे. "बरोबर आहे. माझ्या टीममधे कुणी लेडी नाहीच. दोघी झाशीच्या राण्या. त्यापण असल्या झाशी पण देणार नाही आणि मरणार पण नाही. " :-)

त्रास कामाचा होत नाही. त्रास या असल्या राजकारणाचा होतो. पण इथे रहायचं तर याना तोंड द्यायला शिकलंच पाहिजे. नाही का?


Zakasrao
Wednesday, September 05, 2007 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु त्याला हाकलुन लाव ना सरळ.
दे धडक बेढडक :-)
तुझ्या बॉस ला माहीत आहे ना मग त्याच्या ही बॉस ला सांगुन ठेवा हे सगळ.
आणि सगळ्यात शेवटी बॉस ला बोलुन ठेव हे अस होणार असेल तर असली लफ़डी नका गळ्यात घालु. जे श्रेय लाटत आहेत एक अत्र त्याना द्या किंवा फ़क्त आम्हालाच. :-)
प्रमोशनच म्हणत असशील ते झालच नाही तर बाहेर जॉब शोधलास तर नक्कि मोठी उडी मारु शकतेस खुप स्कोप आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators