|
राम गोपाल वर्मा हा माझ्यादृष्टीने खूप चांगला दिग्दर्शक होता, रात कौन सत्या कंपनी असे कित्येक चांगले चित्रपट त्याने दिलेले आहेत. त्याच्या दुर्दैवाने त्याने तितकेच भिकार चित्रपटही दिले आहेत. (जेम्स, दौड, मस्त वगैरे वगैरे.) पण तरीही रामु एक चांगला डिरेक्टर होता... हो भूतकाळ.. कारण त्याने नुकताच बनवलेला आग. ज्यावेळेला त्याने आग अनाऊन्स केला तेव्हा तो शोलेचा रीमेक आहे हे स्वत्: सांगितलं. नंतर कायदेशीर भानगड झाल्यावर तो एक स्वतंत्र चित्रपट आहे असं सांगितलं. आणि रीलीज व्हायच्या आधी तो शोलेला श्रद्धांजली आहे हे सांगितलं. (रीलीज झाल्यावर कुठे तोंड काळे केले कुणास ठाऊक.....) शोले ग्रेट पिक्चर आहे. (रीलीज झाल्यावर त्यालाही समीक्षकानी फ़ाडला होता.. ते जाऊ दे. त्याना अक्कल कुठे असते कारण बरेचसे समीक्षक हे फ़्लॉप स्क्रीनप्ले लिहिणारे वगैरे असतात.) मात्र आगला शोलेच्या नखाची सुद्धा सर नाही. आग हा ओरिजिनल भिकार XXXXXXX पिक्चर आहे. सलीम खान.. जे शोलेच एक राईटर होते, त्यानी सांगितलेली आठवण आहे. (ते आम्हाला creative writing चे गेस्ट लेक्चरर होते) त्याचे वडील MP मधे पोलीस होते. त्यावेळेला एक डाकू पकडला होता. त्याचे नाव होते गब्बरसिंग. डाकू आणि गब्बर हे त्याच्या डोक्यात इतकं बसलं होतं की या पात्राला त्याना दुसरं नाव सुचेचना. अर्थात गब्बर नावातच दहशत आहे. बब्बन म्हणजे मला चहावाल्या पोर्याचं नाव वाटत. ठाकूरच्या खांद्यावरची शाल पडते आणि त्याला दोन्ही हात नाही हे समजतं. आगमधे नरसिंहाची बोटे कापली आहेत. बघा असं होतं.... अगं मुली..... नाय करायची या दोन पिक्चरची तुलना. परत एकदा आग हा ओरिजिनल भिकार पिक्चर आहे. कितीही साम्य असलंतरीही. मेहबूबाला उर्मिला बरी नाचते. निशा कोठारीला कपडे कमी असल्यामुळे नक्की कशी नाचू? हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे गाण्यात ती फ़क्त काहीतरी (त्याला अश्लील पण म्हणवत नाही) हावभाव करते. तो राज कोण आहे? च्यायला दगड घेतला असता तर बरा दिसला असता. सुश संक्रांत असल्यासारखी काळ्या साडीत फ़िरते. नर्स आणि विधवा वर काळी साडी.... रामूचा ना बेसिकमधेच राडा झाला आहे. मोहन्लालला हिंदी डबिंग द्या नारे. नाहीतर सरळ तमिळ संवाद द्या. कंपनीमधे कसातरी सहन केला होता. इथे घेऊन बडवावासा वाटतो. अजय देवगण्बद्दल मी बोलू नये. आणि तुम्ही ऐकू नये. टाकीवाल्या सीनमधे "याच टाकीत त्याला बुडवावा" असे वाटते. (बाय द वे.. मला घुंगरू तिच्या लैलाला... चल लैला आज घुंगरू के इज्जत का सवाल है. असं म्हणेल असं वाटत होतं. घोर निराशा केली. हो लैलाने (ती रिक्शा आहे.) रामु, अरे किती ते क्लोज अप्स. जो माणुस स्टेडी कॅम वापरूउन जबरदस्त पाठलाग शूट करू शकतो. तो असलं काही करतो???? अमिताभ चक्क किळसवाणा वाटतो. बूम कभी अल्विदा मधे बरा होता... मधेच जीभ काय काढतो, लंगडतो काय. खोकतो काय... सॉरी अमितजी. याला अभिनय म्हणत नाहीत हे आम्ही तुम्हाला सांगावं यासारखं दुर्दैव नाही. आगने याबाबतीत अपेक्षाची राख केली. स्वत्:ची आणि शोलेची.
|
Maitreyee
| |
| Saturday, September 01, 2007 - 2:40 pm: |
| 
|
मी ती आग न बघताच हे असेच सगळे अंदाज केले होते! ते बरोबर आल्याचं एक विचित्र समाधान वाटले ती निशा कोठारी.. काय आहे तिच्यत स्पेशल? का तिला घेतलय?? अजय देवगन हा एक ओव्हर रेटेड एक्टर वाटत आला आहे मला कायम. काही मुळातच भावखाऊ रोल त्याला नशिबाने मिळाले आणि लोकांनी त्याला डोक्यावर चढवलेय. बच्चन ला म्हणे शोलेच्या वेळपासूनच गब्बर च्या रोल चे आकर्षण होते. पण एक अर शोले चा रिमेक डॉन को पकडनेसेभी मुष्किल, आणि गब्बर का रिमेक तर नामुमकिन हे त्याला कळायला हवं होतं उगीच कशाला ते हसं करून घ्यायचं!! रागोव बर्याच वेळा झोपेत असंबद्ध स्वप्न पडते ना तसले शीन घालतो त्याच्या फ़्याक्टरीमधल्या पिच्चर मधे दौड, नाच वगैरे उदाहरणे. त्यातच आग ची भर पडली म्हणायची!
|
Zakki
| |
| Saturday, September 01, 2007 - 4:14 pm: |
| 
|
श्रीकांत बोजेवार यांनी लोकसत्तेत लिहीले आहे: ' स्वतंत्र चित्रपट म्हणून हा सिनेमा भिकार, टाकाऊ, आणि फालतू आहे. तर 'शोले' चा रिमेक म्हणून तो रद्दी, सुमार, आणि तापदायक आहे.' एकदा पु. लं च्या कुठल्यातरी लेखात 'त्रिकाराचे वजन' नावाचा शब्दप्रयोग वाचला होता. म्हणजे एक किंवा दोन ऐवजी तीन शब्द वापरायचे म्हणजे वाक्याला 'वजन' येते! त्याचे वरील अभिप्राय हे उदाहरण आहे.
|
Maanus
| |
| Sunday, September 02, 2007 - 12:37 pm: |
| 
|
ह्या समीक्षकाने मुलाखत घेणार्याच्या कमेर्यावर अंड फोडुन निषेध व्यक्त केलाय... http://www.ibnlive.com/videos/47834/review-rgv-ki-aag-turns-out-to-be-rgv-ka-daag.html
|
ह्या भिकारड्या चित्रपटाला चित्रपट कसा वाटला वगैरे सदरात न घालता डायरेक्ट अचाट व अतर्क्य मधे "प्रमोट" केला हे कळल्यावर बरे वाटले! शोलेचा नवा अवतार बनवणे हे शिवधनुष्याला हात घालण्याइतके दुर्घट आहे. त्या प्रयत्नात रामूचा रावण झाला आहे. जाता जाता.. अजय देवगण ह्या प्राण्याचा मला कायम तिटकारा वाटतो. कायम त्याचा तो एरंडाचे तेल प्यायल्यासारखा रडतोंड्या चेहरा. तो बघून डोके उठते. चला सगळ्यांना त्वेषाने झोडपायला एक हक्काचे गिर्हायक मिळाले!
|
Maanus
| |
| Sunday, September 02, 2007 - 9:56 pm: |
| 
|
हा पाच मिनंटाचा शोले बघा http://www.thakurkainteqam.com/
|
वा वा ... मी पण बरोब्बर ओळखला आग न पहाताच ! ट्रेलर वरून अमिताभ इच्छाधारी लांडगा वगैरे वाटतो ! निशा कोठारी ला main stream actress कोणी बनवले ..? अत्यंत cheap अशी pxxx star वाटते ती ! उर्मिलाचं मेहेबूबा बर्यापैकी जमलं आहे पण उगीच रामूने तिच्या सुटलेल्या पोटाचा closeup घेतला नसता तर बरं झालं असतं ! अजय हगवण देवगण ला ज्या माणसानी ब्रेक दिला त्यालाही वीरु देवगण च्या भाडोत्रू गुंडां कडून बडवले पाहिजे ! दिसायला त्याच्या इतका कुरुप माणुस hindi film industry मधे नाही ..... किशन कुमार सुध्दा त्याच्या पेक्षा उजवाच म्हणायचा !! आणि acting च्या नावानी भयंकर बोंब आहे त्याची ! असो ... खूप भडास निघाली !! 
|
महाभारत एकच, पण अनेक प्रतिभावन्त लेखक आपापले इन्टर्प्रिटेशन करतात त्याप्रमाणे राम गोपाल ने शोले या क्लासिकचे इम्प्रूवायझेशन केले आहे. पाश्च्यात्य चित्रपटस्रुष्टीत रुळलेला हा प्रकार हिन्दिला तसा नवीनच. त्यामुळे प्युरिस्ट मन्डळीन्चा थोडासा गोन्धळ उडणे सहजिकच. मर्ढेकरान्च्या कवितेवर तुटून पडणार्या समीक्षकान्ची आठवण व्हावी. असो, अमिताभने बब्बन सिन्ग ची भुमिका आणी कन्गोरे समर्थपणे दाखविले आहेत. त्याच्या कारकिर्दीतला हा मानाचा तुराच. आपला मराठी माणूस राज रानडे पदार्पणातच शतक ठोकतो. अजय देवगणच्या अभिनय क्षमतेला आव्हान देणारी भुमिक बरेच दिवसानी मिळाली आणी त्यानेही सोने केले. विशेषत्: पाण्याच्या टाकीवरचा सीन तर अप्रतीम. मोहनलाल च्या एकट्याच्या परफॉर्मन्स मुळे तिकिटाचे पैसे वसूल. निशा कोठारी नवखेपणामुळे थोडिशी बावरल्यासारखी वाटते. आपली मराठी मुलगी उर्मिला एकाच गाण्यात दिल जिन्कून जाते. एखादा कसलेला गवई ओळखीचा राग सुद्धा वेगळ्याच पद्धातीने सादर करतो आणी मी मी म्हणनारे दर्दी ही राग ओळखण्यात चुकतात तसेच हे. जर हटके चित्रपट आवडणार्या लोकानी अवश्य पहावा.
|
Jadhavad
| |
| Monday, September 03, 2007 - 3:36 am: |
| 
|
एक स्व-अनुभव, आशा आहे, सगळे चुक करणारे नाहीत. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=644&post=993312#POST993312
|
Dhumketu
| |
| Monday, September 03, 2007 - 5:19 am: |
| 
|
हा पिक्चर पहायचे महापातक घडले... ह्याचे नाव "राम गोपाल वर्मा की खा*" असे का नाही ठेवले असा प्रश्न पडला आहे.
|
Farend
| |
| Monday, September 03, 2007 - 5:54 am: |
| 
|
(मी अजून पाहिला नाही 'आग'). (पण ऐकीव माहितीवरून, ) विजय, तुम्ही म्हणता त्याचे काही उदाहरण (या चित्रपटातील) देऊ शकाल का? मला वाटते की China Gate हे एक वेगळे interpretation म्हणता येईल, इथे रामू ला शोलेच काढायचा होता, पण रमेश सिप्पींनी आक्षेप घेतल्याने गब्बर चे बब्बन वगैरे करावे लागले असे मी वाचले. मग त्याच्या म्हणण्यानुसार 'शोले update केला' म्हणजे नक्की काय केले? फक्त रामगढ वगैरे बदलून शहरी वातावरण केले? आणि ते रानडे आडनाव त्या व्यक्तिरेखेचे आहे ना? त्या कलाकाराचे नाही (मला वाटते). या पंटरने म्हणे शोले पूर्ण आधी पाहिलाच नव्हता (तुकड्यात पाहिला होता म्हणे, पण तरीही असेही लोक जगात आहेत हे माहीत नव्हते ), जय च्या रोल साठी निवड झाल्यावर पाहिला. आता एखादा जबरदस्त अभिनेता असा पटकन एखाद्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून रोल करेल, पण हा जस्ट मॉडेल वाटतो. अर्थात ती सुद्धा रामूची चूक आहे.
|
विजयजी, प्रशांत राज असे त्याचे नाव आहे. तो पंजाबी आहे. आणि ग्रासिम इंडीयाचा तो विजेता होता. तो मराठी नाही. निशा कोठारी चांगली चार पिक्चर जुनी आहे. त्यामुळे तिच्या नवखेपणाचा मुद्दा बाद. मुळात हे शोलेचे interpritation असं तुम्ही म्हणताय. रामुअच्या मते तो शोलेला श्रद्धांजली वाहतोय. शोले मुळात "द सेव्हन समुराई"वरून घेतला होता. पण तो घेताना असा काही घेतला की ओरिजिनलने म्हणावे "वाह चेले..." शोले टेक्निकली ग्रेट होता. रामु तिथे सुद्धा घोळ घालतो. extreme long shot नंतर लगेच डोळ्याचा closeup ????? याम्धून नक्की काय साध्य होते? तुमचंच गवयाचं उदाहरण देऊन सांगते... राग ओळखण्यात चूक झाली तर वाईट वाटत नाही. कानाला ऐकायला बरं वाटत असेल तर ठीक आहे. उद्या उगाच मी क्लासिकल ऐकवतो म्हणून कुणी हवं तसं ओरडायला लागेल तर कसं वटेल....
|
Zakasrao
| |
| Monday, September 03, 2007 - 7:02 am: |
| 
|
धुम्स हि हि हि हि........ नन्दिनी मी फ़िल्म पहायला जात नाही हेच बर म्हणायच. मी जुना शोले ज्यावेळी दुर्दर्शन वर लागला होता त्यावेळी पाहिला. खुप आवडला होता. अजुनही कधी लागला असेल तर नक्की पाहतो कारण तो खुप पर्फ़ेक्ट आहे. नवीन शोलेचे प्रोमोज पाहुन मी माझ्या काही मित्राना बोल्लो पण होतो की हा एकदमच बकवास असणार तरीहि त्यातला एक जण शुक्रवारी रात्री हलाल व्हायला गेलाच. दुसर्या दिवशी येवुन शिव्या देत होता रामु ला निशा कोठारी ही त्याची जेम्स पासुन आवडती झाली आहे. मी जेम्स पाहिला होता ते फ़क्त रामुचा आहे म्हणुन. पण तुकार होता त्यावेली पासुन ठरवल की जुण कर्तुत्व बघुन फ़िल्म पहायला जायचे नाही. रामुच्या फ़ॅक्टरीत वेगळा म्हणून उल्लेख केला जाउ शकतो असा रोड आणि डरना मना है. हे दोन्ही मला तरी आवडले होते. अगदीच नाही पण वेगळा आणि चांगला प्रयत्न होता. विजय तुम्ही विरोधासाठी विरोध तर करत नाहीये ना?? राग मानु नका. पण तुमचे पॉइंट बघुन अस वाटत.
|
Aashu29
| |
| Monday, September 03, 2007 - 8:38 am: |
| 
|
मला वाटत,विजयनी उपहासात्मक लिहिले आहे, मलाहि रोड आवडला होता, एकदा बघायला म्हणुन!!
|
Aashu29
| |
| Monday, September 03, 2007 - 1:08 pm: |
| 
|
निशा कोठारि म्हणजे सरकार मधे actress च्या रोल मधे दिसली होती तिच का?
|
Dineshvs
| |
| Monday, September 03, 2007 - 5:12 pm: |
| 
|
मला वाटतं तूमची पिढी हि शोले नंतरची पिढी आहे. त्यावेळची जादु काय सांगु ? मी दहावीत असताना तो रिलीज झाला आणि बी कॉम होईपर्यंत टिकला. इतर कुठेही पाहिला तरी 70 mm बघायला म्हणुन आम्ही मिनर्व्हा ला गेलो होतो. पहिल्या दिवशी त्याचा रिपोर्ट तेवढा चांगला नव्हता. पण लगेच्च तो पब्लिकने उचलुन धरला. अरे ओ सांभा, कितने आदमी थे. तेरा क्या होगा कालिया, असले संवाद आम्ही येता जाता म्हणत असु. मेहबुबा गाणे खुपच गाजले होते. आर्डीचा वेगळा आवाज लोकाना खुप आवडला होता. नंतर त्याने किताब मधे, धन्नो कि आँखोमे प्यार का सुरमा, हे गाणे गायले. गब्बर पण भलताच लोकप्रोय झाला होता. पुढे त्याला ते यश कधीच मिळाले नाही. शोले ज्यावेळी निर्माण करायला घेतला, त्यावेळी धर्मेंद्र टॉपला होता, पण पुढे अमिताभ जास्त लोकप्रिय झाला. ( तशी शोले मधे अभिषेकचीही छोटीशी भुमिका होती ) शोलेची टायटल्स दाखवताना, आर्डीने एक खास धुन दिली होती, ती धुन त्यावेळी सर्व ऑर्केश्ट्रा मधे वाजवत असत. ठाकुरच्या कुटुंबियाना मारण्याच्या प्रसंगात रक्ताचा एकही थेंब न दाखवता, तो प्रसंग खुपच परिणामकारक झाला होता. शोलेच्या पोस्टरवर सर्व कलाकारांचे क्लोजप्स होते. आमच्या घरासमोरच मोठे होर्डिंग होते त्याचे. ये दोस्ती, पण खुप लोकप्रिय झाले होते. असरानी आणि जगदीप, हंगल आणि सचिन हेच नव्हे तर जलाल आगाही लक्षात राहिला होता. शोलेच्या वेळी हेलनची कारकिर्द जरा उताराला लागली होती. ते गाणे आणि नंतरचे मुंगळा, ( इन्कारमधले ) मूळे ती परत चर्चेत आली. सिनेमाभर पांढर्या साडीत असली तरी, होळीच्या आणि नंतरच्या एका प्रसंगात, जयाचे खेळकर रुप दिसले होते. लताचे, जबतक है जान, तितकेसे गाजले नाही. शोले चे कथानक पुढे अनेक सिनेमात दिसले पण ती लोकप्रियता कुठल्याच सिनेमाला मिळाली नाही. सिप्पीनेही मोठा गाजावाजा करुन शान काढला, तोही विशेष चालला नाही.
|
ह्या वेळचा लोकप्रभेत शोले (अस्सल व बनावट) विषयी बरेच लेख आहेत. हा शिरिष कणेकरांचा बावन्नकशी शोलेबद्दल http://www.loksatta.com/lokprabha/20070907/23.htm खालिद मोहंमदने केलेले टुकार शोलेचे परीक्षण http://www.hindustantimes.com/StoryPage/StoryPage.aspx?id=0f6e8e66-1dfc-4f84-ba7b-55138ebc8620&&Headline=Review:+EMRam+Gopal+Varma+Ki+Aag/EM
|
Mandard
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:00 am: |
| 
|
( तशी शोले मधे अभिषेकचीही छोटीशी भुमिका होती ) ----दिनेशजी हे कसे शक्य आहे. त्यावेळी तर त्याचा जन्म पण झाला नसेल. शोलेचे चित्रीकरण साधारण १९७४ मधे झाले होते असे वाचले.
|
Farend
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:00 am: |
| 
|
हो आणि अमिताभ जया चे लग्न ही त्याच सुमारास झाले ना? म्हणजे तो असला तरी अगदी बाळ असेल. शेंडेनक्षत्र आभार, मी गेली ४-५ वर्षे खालिद मोहम्मद चे रिव्यू शोधत होतो Times वर, कारण पूर्वी तो रविवारी TOI मधे लिहायचा. त्याची मला सर्वात आवडलेली कॉमेंट म्हणजे 'हम आप के है कौन' बद्दल ...the role of the baby (of Mohnish Bahal) is played by a bunch of towels! शोले ची ती सर्व कलाकारांचे क्लोजप्स देण्याची स्टाईल मस्त होती, पुढे बर्याच चित्रपटांच्या जाहिरातीत ती कॉपी झाली, त्रिशूल आणि बहुधा सरफ़रोश ही काही उदाहरणे. आणि अमिताभ ला 'मारला' की चित्रपट सुपरहिट होतो हे समीकरण रूढ करण्यात शोले चा ही वाटा होता (दीवार, शोले, मुकद्दर का सिकंदर, अदालत, कस्मे वादे आणि डॉन मधे प्रत्येकी एक ई.) पुण्यात शोले आधी अपोलो आणि नंतर नटराज ला बहुतेक १२९ आठवडे होइपर्यंत सलग होता. आता अपोलो एव्हढे खास राहिले नाही, पण तेव्हा बरे असावे.
|
Athak
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:25 am: |
| 
|
अरे वा इतक्या छान छान प्रतिक्रिया बघावाच लागेल हा सिनेमा आता
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|