|
R_joshi
| |
| Saturday, January 13, 2007 - 10:55 am: |
| 
|
"मैत्रि" आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. मी आजवर हा विषय माझ्यापरिने अनुभवण्याचा प्रय्तन केला आहे. आता तुम्हि म्हणाल 'मैत्री हा विषय थोडिच आहे.' हे एका अर्थाने खर हि आहे. आपण कधि,का, कुणाशी आणि कशासाठी मैत्री करतो हा संशोधनाचा भाग ठरु शकेल. असे कित्येकजण असतिल ज्यांना कधी हे कळतच नाहि कि, एखादया अमुक व्यक्तिशी आपण मैत्री का करतो. मी हि त्यामधलिच. माझ्या मैत्रिच्या भाषा नाहित कि वय नाहि,त्यामुळे हे असु शकेल.
|
Chaffa
| |
| Saturday, January 13, 2007 - 3:21 pm: |
| 
|
R_joshi विषय का नाही मैत्री हा खरचं फ़ार सुंदर विषय आहे आणी लिहिण्यासारखा तर नक्कीच आहे.
|
मैत्रि खरच खुप सुन्दर विशय आहे आणि आज ह्या विशया वर आवर्जुन बोल्ले पहिजे करन आज नेमक कलत नहि मित्र कुनाला म्हनाव आनि कुनाशि मैत्रि करावि आज मनसाने सगळ्याच गोश्टिन च्या सन्कल्पना बदलुन टाकल्या आहेत म्हनुन आपन सगळे बोलुयात आपल्याला काय वतते ते
|
R_joshi
| |
| Monday, January 15, 2007 - 8:39 am: |
| 
|
चाफा, नितिन धन्यवाद खरच या विषयावर बोलायचि, मत जाणुन घेण्याचि गरज आहे.
|
R_joshi
| |
| Monday, January 15, 2007 - 9:10 am: |
| 
|
मैत्रिचा सर्वात पहिला धडा आपण शिकतो ते शाळेत. याआधि आपलि मैत्री कुणाशी नसते असे नाहि.पण अजाण वय आणि त्या वयातिल काहि आठवत नाहि म्हणुन पहिला धडा शिकतो तो शाळेत. माझा शाळेचा पहिला दिवस. अनोळखि चेहरे. आणि त्यात मैत्रिचा आपलासा वाटणारा पहिला चेहरा "प्रिति". प्रितिशी ओळख का झाली, कशी झाली हे माहित नाहि, पण ती माझी मैत्रिण झालि. त्या वयात मैत्रिचि व्याख्या करणे हेच माहित नसत.त्यामुळे आपल्याशी जी मुलगी न ओरडता बोलते ती आपलि मैत्रिण असते. आणि ह्याच सिद्धांताने माझ्या अनेक मैत्रिणि होत्या. बालपणिची मैत्री म्हणजे सर्वात गोड अनुभव. माणसांच्या हेव्यादाव्यापासुन अलिप्त असे परीलोक. आणि त्यात रमणारे मन. या मैत्रितील सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे : "कट्टि- बट्टी". आपल्या एखाद्या मैत्रिणिचा राग आला कि तिच्याशी "कट्टी" घ्यावि. रागाचि कारण हि किती भलीमोठी, तिने तिचा खाऊ मला दिला नाहि, मला न आवडणा-या मुलीशी ती बोलत होती, अशी अनेक कारणे मैत्रिणिवर राग धरण्यासाठी पुरत असत. आणि यामुळेच कारण नसतानाहि अनेक मैत्रिणिशि माझी कट्टि होत असे. आता बालपणिचि ती कारणे खरच बालिश वाटतात. मग आपल्या मैत्रिणिशी "बट्टी" घेण्यासाठि करावे लागणारे यत्न म्हणजे तेव्हा अग्निदिव्यच वाटायचे.
|
Chaffa
| |
| Monday, January 15, 2007 - 2:02 pm: |
| 
|
लहानपणाची मैत्री असते खरी गमतीदार, त्या मैत्रीची कधिच कुणाला सर येणार नाही. पण एक बाकी खरं काही मैत्रीचे धागे ईतके छान जुळतात की जणु ते आधी वर स्वर्गातच जुळत असावे. हे असे अनुभव मला फ़ार वेळा आलेले आहेत. वर्षानुवर्ष एकत्र काम करताना जेवढी घट्ट होत नाही तेवढी अशी चुकत माकत झालेली मैत्री घट्ट होते. बहुतेकवेळा मित्रजनांचे वयानुसार भाग पडलेले पाहीलेत. म्हणजे बालपणाची निरागस मैत्री, तरुणाईतली खोडसाळ, आणी गाडी मार्गाला लागली ( म्हणजे नोकरी संसार वगैरे ) की चक्क लादलेली मैत्री. अशातुन एखादा सुंदर ( चांगला या अर्थी.!! ) मित्र गवसला की त्याची अपुर्वाई काय वर्णावी.????
|
मला जेहि सहवासात येतात ते नेहमि चन्ग्लेच वातात आणि मज़्या ह्या स्वभावा मुले मि नेहमिच दुखावला जतो आस का होत ह्याच कारन लोक आपल्या जवल येतात काहि कारनासाथि आणि काम झाल का निघुन जातात. पन कुनावर अविश्वास तरि कसा दखवनार............... खुप आवघड आहे एक मित्र मिळन.
|
Sakhi_d
| |
| Tuesday, January 16, 2007 - 6:06 am: |
| 
|
खरच मैत्री हे नातच खुप छान असत. पण का कोणास टआवुक मला चांगली मैत्रीण मिळतच नाही पण चांगले मित्र मात्र खुप आहेत. आणि तो माझा एक अमुल्य खजिना आहे....
|
sakhi, can't say aasach hota .pan ek sangu mitra kiwa maitrin kunihi aaso mag tyat mulga aani mulgi asa bhed bhaw rahat nahi jar kharach aapn mitra aasu tar tya mile mala nahi watat ki as frnd mulgich nahije or mulgach pahije
|
mala saglyannaa vicharawasa watta aapn matri ka karto ................ vichar karun aapn boluyat
|
Sakhi_d
| |
| Tuesday, January 16, 2007 - 8:26 am: |
| 
|
नितीन अरे आता तर मलाच मैत्रीणी करता येत नाहीत. पण माझे सगळे मित्र खुप छान आहेत...
|
Himscool
| |
| Tuesday, January 16, 2007 - 9:04 am: |
| 
|
मैत्री.. फारच वेगळा विषय आहे.... असे म्हणले जाते "Don't count your age by number of years But count your age by the number of frined you have मी कायम नविन मित्र जोडत आसतो.. 'संकटकाळि मदत करतो तोच खरा मित्र' ह्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे आणि माझ्या मित्रांनही दिलेला आहे..
|
सखि सन्गु मत्रि कधिच होत नहि मैत्रि करवि लग्ते आपन म्हनतो कि व्हेव लाएन जुळलि कि सगळ जुळत ना पन तस नस्त मग मित्रान मध्ये भन्डन का झालि आस्ति............... खुप नजुक आणि तितकाच घट्ट रिलेशन आहे......
|
R_joshi
| |
| Tuesday, January 16, 2007 - 11:24 am: |
| 
|
खरी मैत्रि म्हणजे काय हे अजुन मला न उलगडलेले कोडे! ' तु माझि खरी मैत्रिण असशिल तर माझ्या म्हणण्यानुसार वागशिल.' हा त्या ख-या मैत्रिचा खरा संवाद असे. अनेकदा वागलेहि त्याच्या म्हणण्यानुसार, पण पदरी पडायची ती निराशाच. खरा मित्र किंवा खरी मैत्रिण मिळण हि खरीच कस्तुरीमृगाप्रमाणे असते. ज्याच्याकडे असते त्याला माहित नसते आणि म्हणुन तो त्याकडे आकर्षित असतो. ज्याला सापडते त्याच जीवन धन्य धन्य होते. हा कस्तुरीमृग माझ्या वाट्याला आलाच नाहि किंवा आला असेल पण मी त्याला ओळखले नसेन. अस होत अनेकदा.
|
Chaffa
| |
| Tuesday, January 16, 2007 - 1:25 pm: |
| 
|
R_Joshi , खरं सांगायचं तर माझा अनुभव याच्या एकदम उलट आहे. मला मित्र,मैत्रीणी ईतक्या जिवाभावाचे मिळालेत ना, की नाव ठेवायला जागाच नाही रहात. मी तर एकच म्हणेन मुळातच चांगले मित्र,मैत्रीणी सगळीकडेच आहेत फ़क्त जाणीव जागृत असायला हवी. आणी खरा मित्र म्हणजे तरी काय.? आपण ज्याच्याशी बिनधास्त मनमोकळेपणे आपले मन मोकळे करु शकतो. शक्य असेल तर तोती मदतही करेल पण नसेल तर आपल्या प्रॉब्लेमसचे भांडवल तरी करणार नाही. माझी व्याख्या ही अशी सुटसुटीत आहे. आणी हो.! याच सगळ्या कसोट्या आपणही पास केल्याच पाहिजेत. खरं ना.?? यात तुला दुखावायचा मुळी सुद्धा हेतु नाहीये बरं.!!
|
u r lucky chaffa but kitpat mahit nahi, bagha na aapya shalet le frnd te suttat aani mag collage che frnd, te suttat mag officeche frnd, train madhle frnd, vegveglya thikanche veg vegle frnd, hech baghanaa aapn mayboli varche frnd, R_joshi cha pan kahi chukat nahiye ,aani chaffa tuza hi, pan he mitra kiti diwas aaaplya baro bar rahatat aashe khup aanubhaw yetat aaplyala li aaplyaa la aapekhyshya nastat pan aapla mitra te karto aani mag aaplyala wait waatta, ka ? karan aapn aaplyaa mitra kade aapekha thewato........ aani mag man dukhawt na R_ joshi... even i have good frnds jasta nahit pan botawar mojnyaa etke , kharatar mi jasta mitra banwat ch nahi karan je aahet te khupp aahe pan aasahi nahi ki kunala talto, aani jitkya mazya maitrini ahet titke changle mitra hi aahet i m happy with all kadachit chang luck lagta pan hyachayt nashibala dosh kuni deu naka, w8 n watch kadachi khup changal kuni miLnar aasel
|
Chaffa
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:47 pm: |
| 
|
नितीन, तु लिहितोस तसे खरेच होते का.?? कारण माझे शाळेतले, कॉलेजातले असे कुठलेच मित्र कधी दुरावले नाहीत आता संख्या कमी झालीय हे खरं पण नोकरी,उद्योग असल्या कारणामुळे दुर गेलेल्यांचीच संख्या जास्त. उलट आम्ही जुने मित्र (आणी मैत्रिणीही ) वर्षातुन एक दोन वेळा आगदी ठरवुन एकत्र येतो आणी एखादा दिवस फ़ुल्ल एन्जॉय करतो यातुन आमची संख्या वाढतेही अनेकदा ( म्हणजे एखादीचा "आहो",किंवा एखाद्याची "अगं " अशी ) पण दुरावत मात्र कुणी नाही आर्थात ईतक्या वर्षात खुप सामंजस्य आलय आमच्यात. रुसवे फ़ुगवे नसताच बहुदा. कदाचीत हे ही असेल की तु म्हणतोस तसल्या मित्रांची मी दखलही घेत नसेन. पण जाणुन बुजुन कुणालाही टाळत मात्र नाही हे खरं.
|
R_joshi
| |
| Wednesday, January 17, 2007 - 7:45 am: |
| 
|
चाफा तु म्हणतेस ते खरे ही असेल. आणि असे असले तर तु भाग्यावान म्हणायला हविस. पण प्रत्येकाचे जीवन सारखे नसते हे तु नक्किच मानशिल. तुझ्या सुदैवाने तुला चांगले मित्र मैत्रिणी भेटल्या. शाळेत कॉलेजात मित्र-मैत्रिणिची संख्या कमी नव्हती. अगदि शाळेतल्या मैत्रिणि मला आज हि भेटतात. पण प्रत्येकाकडेच आपण आपले मन हलके करु शकत नाहि. त्यातल्या त्यात जो आपला 'जिवश्चकंठश्च' मित्र किंवा मैत्रिण असते,त्याच्यासमोर आपण मन मोकळ करतो हे खर आहे. तो आपला प्रॉब्लेम समजुन घेतो, मदत करायला जमलि नाहि तर त्या विषयाचे भांडवल करत नाहि हेहि मानल. अजाणतेपणी का होइना आपण त्याला संर्पुण सत्य सांगतो का? माझि अपेक्षा जर अवास्तव असेल, आणि अशा गोष्टिना तो मला सपोट करत असेल तर आपण त्याला खरे मैत्रि म्हणु शकतो का? मी कधिच मैत्रिची संकल्पना, त्याच्या चौकटि या प्रश्नात अडकले नाहि.
|
मैत्रि.......... या विषयावर बोलण्यासारखे खुप आहे. जोशी प्रत्येकाचे जीवन सारखे नसते हे अगदि बरोबर, पण मित्रान्मधे चान्गले आणि वाइट अस काही नसतच मुळी मला वाटत की हे आपण ज्यान्च्या सहवासात राहतो अथवा आपला जसा स्वभाव असतो तसेच मित्र आपणास मिळ्त्तात. अगदिच परस्पर विरोधि विचारान्च्या वा स्वभावच्या दोन व्यक्ति बराच काळ एकत्र मित्र म्हणून राहु शकत नाही. जर तुमच्या जिवलग मित्राला तुम्हि अगदिच खाजगी सान्गु शकत नाही तर मग ती मैत्रि काय कामाची जी अविश्वासाच्या तकलादु बन्धनात जखडलेली आहे. एकीकडे आपण ज़िवलग मित्र म्हणून जगासमोर मीरवायचे आणि दुसरीकडे हे असे......... पण हो सगळेच ज़ीवलग नसतात हे हि खरे! सपोट करणारा प्रत्येक व्यक्ति मित्र असतोच असे नाही त्याला मित्र म्हणावे कि नाही हे आपल्यावर अवलम्बुन असते. त्यासाठि पारखीच लागतो.
|
Chaffa
| |
| Wednesday, January 17, 2007 - 12:00 pm: |
| 
|
R_Joshi , तुझी थोऽऽडीशी चुक होतेय बघ मी अगं नसुन अरे आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|