|
Music
| |
| Friday, April 20, 2007 - 3:02 pm: |
| 
|
मैत्री म्हणजे तरल मुलायम मोरपीस हळुवार.... मैत्री म्हणजे दोन मनांचे पंख दिशांच्या पार ..!
|
aayla he sagla faaka tumha lokanach kasa suchat yar.... amhi kay paap kele ahe ... 
|
मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं काय चिज असते नाही ही मैत्री?? ASHish..... (he kavita mazi nahi ahe )
|
Aktta
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:57 pm: |
| 
|
कधी शान्त कधी अवखळ कधी धुंद कधी नीखळ कधी बोथट कधी थंड कधी मस्ती कधी बंड कधी तु कधी मी कधी कधी कोनीच नाही कधी तरी उगाच त्रागा कधी रात्री उघाच जागा कधी विषयाचे उघाच लांबवन कधी एका शब्दा वरून भांडन कधि झुरके कधी फ़ुरके कधी....... बस आत मला झोप येते आहे....... एकटा....
|
Deshi
| |
| Friday, June 29, 2007 - 6:48 pm: |
| 
|
अरे ऐकट्या हा यमक टेस्टींगचा बीबी नाहीये रे बाबा. 
|
Zakasrao
| |
| Saturday, June 30, 2007 - 5:46 am: |
| 
|
देशी .. .. .. .. ..
|
Aktta
| |
| Saturday, June 30, 2007 - 12:46 pm: |
| 
|
अहो थंड पडला आहे बीबी..... म्हंतल..... अस काही लीहील तर लोक शीव्या द्यायला तरी इकडे येतील.... आन्ही पुन्हा वर्दळ चालू होइल.... एकटा....
|
Disha013
| |
| Monday, July 02, 2007 - 2:24 pm: |
| 
|
देशी, अहो एकटा,आता लवकरच 'एकट्याच्या कविता' असा BB सुरु करावा लागणार mods ना असं द्सितयं! दिवे घ्या...
|
Aktta
| |
| Monday, July 02, 2007 - 7:31 pm: |
| 
|
कल्पना चांगली आहे.... फ़क्त नाव जर बदलतो "एकट्याच्या फ़ाटक्या कवीता" एकटा.... दीवे पोचले बरका..
|
Yashwant
| |
| Tuesday, July 03, 2007 - 2:13 pm: |
| 
|
माझ्या दोन खुप छान मैत्रीणी आहेत. मी जरा इगो वाला माणुस आहे. त्या माझा इगो साम्भाळुन घेतात. मला स्वतामध्ये बदल कर असे सान्गतात. मला त्यान्चे म्हणणे पटते पण ...... बहुतेक त्यान्ना माझ्या स्वभावाचा त्रास होत असावा. मला चान्गले माहित आहे कि त्यान्च्या सारख्या मैत्रीणी मिळणे अवघड आहे. माझे चुकतेय तरी पण कधी कधी मी त्यान्च्यावर रागवतो. नन्तर सॉरी म्हणतो पण तोपर्यन्त उशीर झालेला असतो. कदाचित मी त्यान्च्याबाबतीत खुप पझेसीव्ह झालोय जे मैत्रीसाठी खुप घातक आहे. काय करु ते कळत नाही.
|
Anamikaa
| |
| Sunday, July 15, 2007 - 5:54 pm: |
| 
|
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा.. समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे.. विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस. (कविता माझी नाही) "अनामिका"
|
Yashwant
| |
| Monday, July 16, 2007 - 8:47 am: |
| 
|
धन्यवाद अनामिका, हे सगळ पटतय. ही नाती मी कोनताच हेतु ठेवुन जपली नहीत. मी सिनिअर असल्यामुळे दोघीन्ना ऑफ़ीस जॉइन केल्यावर खुप कम्फ़र्टेबल वातावरण निर्माण करुन एक आश्वासकता तयार केली होती. पण ते मि सगळ्यान्नाच करुन देतो. पण यान्च्या बरोबर मैत्रिचे एक छान विश्वासपुर्ण नात अजाणतेपनी फ़ुलत गेल. आता त्यान्ना ग्रुप वाढवायचा आहे आणी माझा त्याला विरोध आहे. कदाचित माझा एगो / अहम असेल पन मी नवीन लोकान्शी जुळवुन घ्यायला वेळ लावतो. आणि दिलखुलास पणे बोलु शकत नाही. म्हनुन मी त्यान्च्याशी वाद घालतोय / भान्डतोय कि उगाच ग्रुप वाढवु नका. कारण मग वैयक्तिक काहिच बोलता येत नाही. या वादावरुन कुठे तरि आत तुटतेय अशी जाणीव होतीये. तुटेल म्हनुन तानायचे नाही म्हनुन मी सध्या शान्त आहे. तटस्थ होवुन त्यान्च्या बरोबर राह्तोय पन आधिचा ओपननेस सम्पलाय. एक औपचारीकता आलिये त्या नात्यात.
|
Hkumar
| |
| Wednesday, March 26, 2008 - 11:19 am: |
| 
|
ही मैत्री, प्रीती ही तर खोटी नाणी बाजार भरविती गाऊन त्यांची गाणी. - राॅय किणीकर
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|