|
Tanya
| |
| Wednesday, December 21, 2005 - 5:54 am: |
|
|
दिनेश... अभिनंदन! तुमच्या हक्काच्या जागेत प्रथमदर्शनी श्रीगणरायाचा फोटो आणि त्याखालील श्रीगणरायाची स्तुतीसुमन... वा! तुमच्या लिखाणातील वैविध्य इथे मनमुरादपणे वाचायला मिळेल त्याबद्दल आभारी!
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 21, 2005 - 4:50 pm: |
|
|
तेच तर म्हणतोय मी. आपली सगळ्यांची हि ओसरी. कुणीहि या. ओसरी, घर आणि मन सगळेच सदैव ऊघडे आहे.
|
Chinnu
| |
| Thursday, December 22, 2005 - 7:10 pm: |
|
|
दिनेश, मला नाही वाटत कि सांधा खिळखिळा झाला आहे ते. मी काही वर्षे मुंबईत कढली. तेव्हा जी आसपासची गुज्जु नाती जोडली ती आजतागायत कायम आहेत. गुजराथी जेवणाची तर आठवण काढुन मला जळवु नका हो! मायेने वाढली जणारी सॉरी, परोसली जाणारी गुजराथि कढी त्यांनिच करावी. घरी कित्यांदा प्रयत्न केला तरी, तो स्वाद आलाच नाही! आजपण आम्ही अपरात्री दार ठोठाविले तरी, आवो बेन म्हणुन हसतमुखाने आजही स्वागत होणार त्यांच्याकडे, हे निश्चीत.
|
Dines bhay....Su che ?? Majaama ??
|
Lalitas
| |
| Friday, December 23, 2005 - 10:41 am: |
|
|
दिनेश, माझे देखिल तुमच्यासारखे अनुभव आहेत. मी दक्षिण मुम्बईत गुजराथ्यांच्या शेजारांतच वाढले.... जसा गरबा तुम्ही वर्णन केला आहे अगदी तस्साच गरबा मी अनुभवला आहे. आमचे गुजराथी शेजारी ग़णपतीच्या दिवसांत भक्तिभावाने सर्व मराठी घरांघरांतील आरत्यांना हजर व्हायचे, खिरापत बनवून आणायचे. विसर्जनाला चौपाटीला भजन म्हणत यायचे. गुजराथी जेवण तेव्हा चौपाटीला आराम मध्ये मिळत असे, शिवाय ठक्कर आणि पुरोहित बर्यापैकी गुजराथी थाळी पुरवत असत. रंगोली मध्ये छान उंधियो मिळायचा. गिरगाव बॅक रोडवर, माधवबागेजवळ, भुलेश्वरला मस्त गुजराथी पदार्थ मिळायचे.... जाऊ दे, गेले ते दिवस... आता सर्व बदललंय!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|