Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 02, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through November 02, 2007 « Previous Next »

Zakasrao
Saturday, October 20, 2007 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा शुभ दसरा :-)
लेख माला छान सुरु आहे.
मी वाचतोय बर.
तोरण अतिशय सुंदर झाले आहे. :-)

BTW माझा कॅमेरा आलाय्/ SONY H7 घेतला. :-)


Dineshvs
Saturday, October 20, 2007 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्या, लिहायचे राहिलेच की. माझ्या बोटात नाही इतकी कला ! हे पंखे मला वसईला, मिळाले. खरे तर मीपण पहिल्यांदाच बघितले हे.
चिमण्या, सगळ्या दूरदेशी उडुन गेल्या, अलिकडे दिसतच नाहीत. पुर्वी आई तांदुळ निवडायला बसली कि बिनदिक्कत जवळ येत त्या.
झकास, बाळोबा घरी आले का ? एकदा यायचे आहे.


Satyajit_m
Friday, October 26, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh tu apratim sundar lihitos ani tya baddal kahi bolane mhanaje suryala prakashachi olakh karun denya sarakha ahe ani jagala suryachi. Ekhadya vishayacha yevadha kholvar abhyas asane ani te dyan itaranna dene mhanaje sakshat sarasvatichi krupa lagate ani ti tumachya thai ahe.

katha, pak shastra, deshattan, durgabhrama, bhatakanti, vanspati shastra ani kay kay karu shakatos yaar tu?

adhun madhun katha pan lihit ja.. Tujhi mohach zad katha! chirantar smaranat ahe.

Simply great.. tu lavakr he sagal pustak rupane prakashit karavas asa mala far vatat.

Mujaraa...

Satyajit_m
Friday, October 26, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

feedback sadarat pan yevadhi upayuk mahiti ahe... ti pan sandhatit karavis.

ek Request

Prajaktad
Friday, October 26, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे एका लोकल मार्केट मधे केळफ़ुल मिळते.. एकदा भाजिचा खटाटोप करायला पाहिजे...केळ्याचा घडाचा फ़ोटो सुंदर! आम्ही केळिच्याच गावचे.. रावेर(जि.जळगाव).. माझ सासर रावेरच...लांबच लांब केळिच्या बागा बघायला मजा वाटली होती.केळिच्या पानावर जेवल्यावर एकदम त्रुप्त वाटते..मग ते पंचपक्वान असो,नाहितर गरम मेतकुट भात.

Swa_26
Friday, October 26, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वॉव... मस्तच आहे कि हे तोरण!!

Swa_26
Friday, October 26, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, तुमची ही लेखमाला म्हणजे आमच्यासाठी एक encyclopedia च झालाय!!
ठाण्यात ती सप्तपर्णीची खूप झाडे आहेत, पण गम्मत अशी कि इतके दिवस त्यांची कधी नोंद घेतलीच नव्हती!! पण आता त्या झाडांना मोहोर आलाय आणि आपल्या विशिष्ट गंधाने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतोय.
मी या झाडाचे फोटो काढुन ठेवलेले, तुम्हाला विचारण्यासाठी, पण नंतर एकदम आठवले की याबद्दल तुम्ही लिहीलेले आहे, म्हणुन आज परत archives चेक केले आणि त्या झाडाचे नाव कळले.. सप्तपर्णी!!


Vishee
Friday, October 26, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे लेख छानच असतात, खुप माहितीपुर्ण आणि लिहिण्याची पद्धतही मस्त.
गावाला कृष्ण्कमळाची फुलं खुप पाहिलि आहेत, त्यांची आठवण झाली, आई करते ती केळफुलाची भाजी, गावाला केळं म्हणुन झाडावरुन काढुन घेतलं आणि सोललं तर आत खुप बिया (रानकेळं) अश्या सगळ्याचीच आठवण झाली.


Dineshvs
Friday, October 26, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सत्यजित, खुप दिवसानी !! या विषयाच्या प्रेमात पडलोय हे खरे. पण अजुनही खुप काहि हातातुन निसटलेय, असेच वाटत राहते.
आणि मी लिहिल्यावर बाकिच्या मायबोलिकरानी अत्यंत मोलाची भर घातलीय इथे. असा हातभार इतर कुठे मिळायला ?
प्राजक्ता, हि भाजी नीट करण्यात एक मजा आहे.
स्वाती, तो वास काहि जणाना त्रासदायक होतो, म्हणुन जरा जपुन.
आणि त्या फ़ोर्टमधल्या सुवर्णपत्रांच्या झाडाना फ़ुले आली होती. छोटीछोटी फळेही धरली होती. पण आता दिसत नाहीत ती फळे. तोडली वाटतं कुणीतरी.


Swa_26
Saturday, October 27, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

surprising !!!!!!!!! मी कशी नाही पाहिली ती फुले??? :-(

Panipuri
Monday, October 29, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुस्तक कधी प्रकाशित करणार? :-)

Ashbaby
Tuesday, October 30, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमाल झाली, दिवसभर झाडे पहात असते पण अजून शिसवीचे पाहिले नाही मुंबैत. अर्जुनाचे पाहिलेय. आंबोलीला भरपुर झाडे आहेत त्याची. म्हणजे त्याची फ़ळे पाहिलेली पण ते अर्जुनाचे हे माहित नव्हते. आता कळाले.

अर्जुनाची फ़ळे पाहुन अजुन एक झाड आठवले. त्याची फ़ळे पण अशीच, ह्याच रंगाची पण त्रिधारी नाही तर चपटी गोलाकारी, मध्ये गोलाकार बी असते आणि बाजुला गोल लेस सारखा हिरवा भाग. माझ्या शेजारणीने ती बी मुले भाजून किंवा अशीच खातात म्हणुन सांगीतले होते. बेलापुर रेल्वे स्टेशनच्या बाजुला एक भले मोठे झाड आहे त्याचे. खाली त्याची ती फ़ळे पडलेली असतात. सुकल्यावर खुप छान दिसतात ती गोल फ़ळे. त्याचे नाव कळेल काय?

sadhana

Dineshvs
Tuesday, October 30, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधना, मुंबईत के ई एम चं टेनिस कोर्ट आहे ना, त्याच्या कोपर्‍यात शिसवीची झाडे आहेत. पण शेंगावर आल्याशिवाय ओळख पटत नाहीत.

आणि तो चपट्या फळांचा तो पडॉक. मराठी नाव बिवळा. ह्यांचे कुळ टेराकार्पस. टेरॉस म्हणजे पंख आणि कार्पस म्हणजे आवरण. बियाना पंखासारखे आवरण म्हणुन ते नाव.
किंग्ज सर्कलच्या फ़्लायओव्हरच्या बाजुला आहेत हे वृक्ष.


Zakasrao
Thursday, November 01, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा पिकलेली भोकर खातात का???
मला नक्कि आठवत नाहिये. पण लहान असताना असलच एक फ़ळ खाल्ल होत.
एकदा घरात डिंक नसल्याने ह्याचा वापर करुन चिकटवाचिकटवी केली होती हे नक्की आठवतय.
आता मावशीच्या गावी जावच कॅमेरा घेवुन. खुप से फ़ोटो मिळतील तुमच्या लेखमालेसाठी. :-)


Dineshvs
Thursday, November 01, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास गोडसर असली तरी खुप बुळबुळीत लागतात ती. खाऊन बघितले पण नाही आवडले. झाडावर एक कावळा, आपल्या चोचीला चिकटलेली बी काढायचा खुप प्रयत्न करत होता.

झाडांचे फोटो अवश्य पाठव. खरे तर मला सवड असती, तर मीच आलो असतो.


Dineshvs
Thursday, November 01, 2007 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधना, या अर्जुनाच्या फळासंबंधी एक मजेदार किस्सा ऐकला. हे फळ म्हणे आधी गोड आणि गोल होते. राम ते आवडीने खात असे. आणि ते आणायची कामिगिरी लक्ष्मणावर होती. एकदा लक्ष्मणाला रहावले नाही, म्हणुन त्याने ते खाऊन बघितले, त्यावेळेपासुन ते कडु झाले आणि त्याच्या बोटाच्या खुणा, फ़ळावर उमटल्या.

Ashbaby
Thursday, November 01, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे किस्सा. अगदी खारूताईच्या पाठीवरील बोटांसारखा. हिरवी आंबट फ़ळे शाळेत असताना खाल्लेली ती सुध्दा अशीच दिसतात. (बिचारा लक्ष्मण, त्याचे वनवासातले सगळे दिवस राम सितेसाठी धावपळ करण्यातच गेले बहुतेक)

Dineshvs
Thursday, November 01, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधना, घोळ इतकाच कि रामायणात, अर्जुन कुठुन आला ?
ती आंबट फळे म्हणजे करमळं. त्याबद्दल लिहिले होते पुर्वी.


Nalini
Thursday, November 01, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, ही फळे आम्ही लहानपणी खाल्लीत हेच सांगायला आले होते बघ. वर्गात तक्ते चिकटवायला एक मुलगा भोकरं घेऊन यायचा. त्यातले कही घेऊन आम्ही खायचो.
दिनेशदादा, नेहमीप्रमाणेच छान सुरु आहे ही लेखमाला.


Zakasrao
Friday, November 02, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म.
दिनेशदा तुम्हाला आणि मला एकावेळी सवड मिळण म्हणजे तो मणिकांचन योग होइल बघा.:-)
नलनी :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators