|
Jo_s
| |
| Friday, October 12, 2007 - 10:32 am: |
|
|
दिनेश, केळीची माहीती छानच आहे. लहानपणीची आठवण झाली. केळ फुलाची भाजी खाऊनतर वर्ष लोटली. आता चवही फारशी लक्षात नाही. फक्त आवडायची एवढच आठवतय. फणसाचीही भाजीही आजकाल दुर्मीळच. पण पापडासाठी केळीच्या खोडाच्या गाभ्याचा रस काढणे वगैरे आठवतय आजून. सुकेळीची किंमत पाहून घायच धाडस होतं नाही.
|
Itgirl
| |
| Friday, October 12, 2007 - 12:29 pm: |
|
|
दिनेशदा, केळींचा घड काढताना, आधी झाडावर का घाव घालायचा?
|
Asami
| |
| Friday, October 12, 2007 - 5:46 pm: |
|
|
पिवळ्या वेलचीच्या केळ्याच्या चवीची सर कशालाच नाही
|
Karadkar
| |
| Friday, October 12, 2007 - 10:54 pm: |
|
|
जळगाव-भुसावळकडे कच्च्या केळीच्या पिठाची थालीपिठे करतात. घड काढायच्या आधि केळ तोडतात कारण माझ्यामते त्या झाडाला परत फळ धरत नसावे म्हणुन असेल. खरे खोटे देव जाणे. आमच्या घरी वेलची केळीचि झाडे होती जवळ्पास दर महीन्याला साधारण ६-७ दझनचे घड निघायचे. त्यामुळे मोठी केळी अजुनही मी आवडीने खाउ शकत नाही. इथे US मधे मोदळ्यासारखी मोठी केळी पाहीली की भितीच वाटते खायची.
|
Dineshvs
| |
| Saturday, October 13, 2007 - 4:26 am: |
|
|
घड आल्यानंतर त्या झाडाला परत घड लागत नाही हे कारण आहेच. शिवाय ते झाड उंच असुन चढण्यासाठी अशक्य असते, हेही कारण आहेच. दृष्टांताचे कारण म्हणजे, आधी आईवर घाव घालायचा आणि मग बाळावर. घरगुति केळ्याला १० ते १२ फ़ण्या लागल्या तर खुप म्हणायच्या. जागतिक रेकॉर्ड ४७३ केळ्यांचा आहे असे वाचले होते. तो फोटोतला घड, गोव्यातल्या सहकारी स्पाईस गार्डन मधला आहे, तिथे तो जेवणाच्या जागी असा टांगुन ठेवतात, हवी तेवढी खा. गोव्यात कच्च्या केळ्याची कापं, श्रावणात माश्याना पर्याय म्हणुन करतात. केळफुलाची भाजी पण तशीच मासाहाराची आठवण करुन देणारी. माझ्याकडच्या फ़्रुट एनसायक्लोपिडीया मधे केळ्याला एक्झोटिक फ़्रुट म्हंटलय. युरपमधे ते लोकप्रिय असले तरी तिथे ते पिकत नाही ना. नदीकाठच्या केळ्यांच्या घडाची वाहतुक करण्यासाठी, खास पसरट होड्या असतात, त्याना बनाना बोट असा खास शब्द आहे. याच शब्दाला काहि वेगळे अर्थही चिकटले आहेत. शैलजा, पुढच्या पुणे भेटीत, पिवळ्या सोनटक्क्याचा फोटो काढणार का ?
|
Itgirl
| |
| Saturday, October 13, 2007 - 1:49 pm: |
|
|
जरूर दिनेशदा पण सोनटक्क्याची फ़ुल फ़ुलण्याचाही सीझन असतो ना? मी गेलेल्या वेळी असली तर जरूर काढेन
|
Itgirl
| |
| Sunday, October 14, 2007 - 5:20 pm: |
|
|
पिवळ्या सोनटक्क्याचे प्रकाशचित्र, जास्वंदी पण आहेत झाडावरचे नाही, पण घरी एकदा पूजेचे ताट तयार केले होते, त्याचा आहे तात्पुरता फ़ोटो चालेल ना दिनेश दा?
|
Dineshvs
| |
| Monday, October 15, 2007 - 4:47 am: |
|
|
वा छानच आहे की चित्र.
|
P_r_a
| |
| Monday, October 15, 2007 - 7:49 am: |
|
|
माझ्याकडच्या फ़्रुट एनसायक्लोपिडीया मधे ...म्हणजे मला हा एनसायक्लोपिडीया विकत कुठे मिळु शकेल ? मला विकत घ्यायचा आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, October 15, 2007 - 8:40 am: |
|
|
The World Encyclopedia of Fruit, by Kate Whiteman & Maggie Mayhew, published by Lorenz Books, London, हे ते पुस्तक आहे. मी गोव्याला घेतले होते. मुंबईत फ़ोर्ट ला वैगरे मिळु शकेल. पण यात फक्त युरपमधल्या फ़ळांचीच माहिती आहे.
|
P_r_a
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:40 am: |
|
|
दिनेश दा ताजा कलम म्हणजे मी केमेरा घेतला आहे. सोनी चा आहे डी एस सी च ३. १०X ची ओपटिकल झूम आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 17, 2007 - 11:45 am: |
|
|
अभिनंदन प्रा, प्लीज इमेल करणार का ?
|
Malavika
| |
| Wednesday, October 17, 2007 - 6:10 pm: |
|
|
दिनेशदा, सब्जाचा अजुन एक उपयोग म्हणजे, तोंड आले असेल तर सब्जाचे बी पाण्यात भिजवून गार दुधातून घ्यावे. दिवसातून २-३ वेळेला घेतले तर हमखास आराम पडतो.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 18, 2007 - 9:07 am: |
|
|
हो मालविका, एकंदर सबजा थंडावा देतोच.
|
Supermom
| |
| Thursday, October 18, 2007 - 1:28 pm: |
|
|
दिनेश, खूप दिवसांनी इकडे आले. अप्रतिम माहिती व फोटो. खास करून केळफ़ुलांचे फ़ोटो फ़ार आवडले. जांभळ्या, हिरव्या, गुलाबी अशा अनेक विविधरंगांनी नटलेले ते फ़ूल बघून का कोण जाणे या रंगांचे भरजरी शालू नेसलेल्या ललनांचीच आठवण झाली. अन या फ़ुलांची भाजी... एकदम रुचकर. फ़क्त ती आईच्याच हातची खायला आवडते मला. हो, सोलत कोण बसणार इतका वेळ?
|
Dineshvs
| |
| Friday, October 19, 2007 - 4:26 am: |
|
|
सुपरमॉम, रात्री जेवणं झाली कि सगळ्यानी मिळुन केळफुल निवडायचे, अशी आमच्या घरातली रित आहे. पटकन निवडुन होते. लहानपणी त्या सालाचे आम्ही बुट करत असु. फ़िलिपिनो लोक पण याची भाजी करतात. मला त्यांच्या दुकानात सुकवलेले केळफुल, बनाना ब्लॉसम म्हणुन मिळाले होते.
|
Jo_s
| |
| Friday, October 19, 2007 - 7:14 am: |
|
|
दिनेश, सब्जाची काहीच माहीती नव्हती, फालूदामात्र आवडायचा लहानपणी, त्याची फुलं जरा तेरड्या सारखी वाटताहेत. तुळशीच्या बी वरअही भिजल्यावर एक थर येतो आणि आळीवावरही तसाच थर येतो, तो थर नेमका कसा येतो? बिच्या आतकाही रसायन असत का? ब्राम्हीचेही इतके उपयोग माहीत नव्हते, मज्जा संस्थेवर आणि डोक्याला लावायला एवढेच माहीत होते. लहानपणी आंगणात भरपुर वाढायची ब्राम्ही. पुण्याकडे मात्र दिसत नाही कधी.
|
P_r_a
| |
| Friday, October 19, 2007 - 11:23 am: |
|
|
ब्राम्हि ची महिती छान दिलीत. तुम्ही हे सग्ळे एका पुस्तकात का लिहित नाही ? आपल्या कडे अशी महितीची पुस्तके जरा कमीच दिसतात.
|
Dineshvs
| |
| Saturday, October 20, 2007 - 10:27 am: |
|
|
सुधीर या सगळ्या बियांवर पाण्यामूळे असा एक थर तयार होतो खरा. एक रानटी निळ्या फुलांची पण अशीच वनस्पति असते, तिच्या बियांवरही असा थर जमतो. सबज्याची फुले अगदीच छोटी असतात. सबजा तुळस एकाच कुळातले, पण अळिव वेगळे. अळिवाची पाने कोथिंबीरीसारखीच दिसतात. ती खातातही. ती तिखटही असतात, त्यामूळे मिरची आणि कोथिंबीर, दोन्हीचे काम भागते. प्रा, हे पुस्तकच आहे कि. असो, अजुन पुर्ण लिहुन झाले नाही. मग पुस्तकाचा विचार करावाच लागेल.
|
Ashbaby
| |
| Saturday, October 20, 2007 - 10:56 am: |
|
|
दिनेश, दस-याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तोरण ही खुप आवडले. मधले पन्खे बनवुन मग त्याला लोम्ब्या खोचल्या काय? पहिले तर अगदि गळ्यात घालायच्या दागिन्यासारखे वाटतेय. (दरवाजे लकी आहेत तुमचे, आणि नंतर ह्या लोम्ब्या खाणा-या चिमण्याही. - माझ्या लहानपणी दस-यानंतर दुपारच्या वेळेस दरवाज्यावर चिमण्यांची अगदी मस्ती चालायची. आठ दिवसात अगदी फ़न्ना उडवून टाकायच्या त्या सगळ्या लोम्ब्यांचा.)
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|