|
Ashbaby
| |
| Saturday, September 29, 2007 - 8:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
http://gardentia.net/Lecythid_002.htm इथे फ़ोटो आहे निवराचा. अगदी बघत बसावे असे झाड दिसते बहर आल्यावर.
|
Jo_s
| |
| Sunday, September 30, 2007 - 10:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे निवडूंगाच फळ हल्ली दिसतं दुकानात. पण त्यावर इंग्लीश नाव असल्यामुळे ते निवडूंगाच आहे हे कळलं नव्हतं. आता नक्की खाऊन पहातो.
|
Dineshvs
| |
| Sunday, September 30, 2007 - 12:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
साधना, मुंबईत बरिच आहेत तिवराची झाडे, माटुंगा सायन ला पण आहेत. याला लाल फ़ुले येतात, शिवाय पोपटी फळेही येतात. झाडाखाली फुलांचा सडा बघितला कि मान वर करावी लागते, मग या नाजुक माळा दिसतात. त्या जास्मिन कुळात, बरिच झाडे आणि वेली आहेत. पांढरीच असली तरी प्रत्येकाचे रुप आणि गंध वेगळा असतो. सुधीर, आपल्याकडे अजुनही ते फळ बरेच महाग आहे. आता निदान आपले मायबोलीकर तरी चाखुन बघतील.
|
Zelam
| |
| Tuesday, October 02, 2007 - 11:59 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आॅवाकाडोपासून बनवलेली चटणी ( guacamole ) फारच मस्त लागते. दिनेशदा तुम्ही म्हणता तसे या फळात स्निग्ध पदार्थ असतात. हे फळ खल्ल्यावर भरपूर calories मिळतात.
|
Runi
| |
| Tuesday, October 02, 2007 - 5:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा ब्रेकनंतर लेख्माला परत सुरु केलीत हे बाकी छान, तुम्ही नेवाळी म्हणुन जो फोटो टाकलाय तो अगदी कुंदा सारखाच दिसतोय, नेवाळीलाच कुंदा म्हणतात का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नेवाळीचे झुडुप असते आणि कुंदाचा वेल असतो. नेवाळीला एक हिरवा गुच्छ येतो आणि त्यात फुले फुलत राहतात. कुंदा मात्र वेलभर फ़ुलत राहतो. पण मी म्हणालो तसे, एकाच फ़ुलाला अनेकजण वेगळ्या नावानी ओळखत असतात. मी दोन नावांची खात्री करुन घेतलीय.
|
Runi
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:47 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा तुम्ही तर माझ्या घरी असलेल्या झाडाची माहिती दिलीत की. बॉटल ब्रश्चे झाड आहे आम्च्या इथे पण मला माहीत नव्हते की सगळेच जण या नावाने ओळखतात या झाडाला, आम्ही आपले लहान मुलांच्या दुधाच्या बाटल्या साफ करायचा ब्रश सारखी ताची फुले दिसतात म्हणुन याला बॉटल ब्रश म्हणायचो.
|
P_r_a
| |
| Friday, October 05, 2007 - 8:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Dinesh, tumche lekh khoop chaan astaat....
|
P_r_a
| |
| Friday, October 05, 2007 - 8:33 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
mala tuche anikhin kahi ase lekh with snaps pahayla miltil ka? it was very informative and I liked it..similarly I need similar stuff for wildlife/animals...kahi help karu shakaal? tucha Email Id ?
|
Ashbaby
| |
| Friday, October 05, 2007 - 8:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, बॉटलब्रशची झाडे खरच छान दिसतात, तशीच पावडर पफ़ची पण. ह्या दोन्ही झाडांचे कुळ एकच आहे काय? सुरंगीच्या झाडाबद्दल लिहाल काय? त्याची फ़ुले गोळा करायची काही विशिष्ट पद्धत आहे असे ऐकले होते. पण नक्की माहीत नाही. गणपतीपुळ्याला एकदा एप्रिल महिन्यात डोंगराची प्रदक्शिणा करताना अचानक सुरंगीचा सुवास आला. वासाचा वेध घेतल्यावर थोड्याच वेळात झाड सापडले. त्याच्या खोडापासुन फ़ुले लागली होती. नंतर एकदा नोव्हेंबर मध्ध्ये गेल्यावर झाड शोधायचा प्रयत्न केला पण सापडले नाही. बहुतेक मला ओळखू आले नसणार. साधना
|
Dineshvs
| |
| Friday, October 05, 2007 - 10:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
P_r_a नमस्कार, माझे या मालिकेतले सगळे लेख इथेच आहेत. वाईल्डलाईफ़ बाबात मात्र मला खुप उत्सुकता असली तरी लिहिता येण्याइतके ज्ञान नाही. शिवाय झाडं बिचारी एकाच जागी उभी असतात ना. नीट न्याहाळता येतात. इमेल करतोच आहे. साधना, हि दोन्ही झाडे वेगळी आहेत. सुरंगीचे घोस खोडानाच लागतात. कळ्या असतानाच खुडावी लागतात. नाहीतर दुसर्या दिवशी झाडाखाली सडा पडतो. न उमललेली फुलेही पडलेली असतात. त्यातलीच ताजी गजर्यासाठी वेचुन घेतात. पण सुरंगीचे दिवस अगदी थोडके. उन्हाळ्यातच फ़ुलते ती. एरवी झाड ओळखणे कठिणच.
|
Dineshvs
| |
| Monday, October 08, 2007 - 2:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
साधना, सुरंगीची फ़ुले झाडाला अशी लागतात.
![surangee](/hitguj/messages/58489/132829.jpg)
|
P_r_a
| |
| Tuesday, October 09, 2007 - 6:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, आफ़्रिकेत सिकोया नावाचे एक झाड असते...... आपल्या इथे भरतात तसे झाड आहे का? ते खूप उन्च वाढते असे ऐकले आहे. ह्या झाडाची उन्चि २५० फ़ूट असते.
|
Jo_s
| |
| Tuesday, October 09, 2007 - 10:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सोनटक्का मस्त, किती वर्षांनी पाहीला. ही बाकीची फुलं मात्र पहील्यांदीच पाहीली. छानच आहेत एक एक. निळी फुलं फारशी दिसत नाहीत, हे एक गवत फुल दिसलं मध्यंतरी, आणि हे एक पांढरंही किती छान दिसतय. या दोघांचा व्यास साधारण ५,६ मी.मी. असेल.
![](/hitguj/messages/58489/132893.jpg)
|
Malavika
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सोनटक्क्याचे फूल बघून छान वाटले. आमच्याकडे नागपूरला सोनटक्का फार दिसत नाही. पण माझ्या आईला आणि तिच्या भावंडांना वेगवेगळ्या झाडांची आवड फार. माझ्या मामाने एक सोनटक्क्याचे रोप आसाम मधून आणले होते. मग त्या एकाची अनेक झाल्यावर, त्यातले एक आईने आणले. आम्हाला बहिणींना त्या सोनटक्क्याचे खूप कौतूक होते. बहुतेक सगळ्या लोकांना ते आल्याचे झाड वाटे. मग आम्ही कौतुकाने ते आले नाही सोनटक्का आहे हे सांगत असू. पावसाळा सुरू झाला की त्याचे कणीस कधी धरतेय ह्याची आम्ही खूप उत्सुकतेने वात बघत असू. मग त्याला फुले आलीत की शाळेत जाण्याआधी ती फुले बघणे, शाळेतून आल्यावर त्यांना निरखणे वगैरे प्रकार चालत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 09, 2007 - 4:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रा, आपण आफ़्रिका म्हणजे एकसंध खंड धरतो, पण त्यात अनेक भौगोलिक प्रदेश आहेत, अगदी बर्फ़ाच्छादित डोंगरापासुन वैराण वाळवंटापर्यंत. माझ्या तिथल्या वास्तव्यात खुप झाडे बघितली, पण त्यापैकी खुपच कमी झाडांबद्दल मला माहिती मिळु शकली. पण त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता, म्हणुन फोटोही काढायचे राहिले. जमिनीची सुपीकता इतकी कि साधे पपईचे झाडही भरपुर वाढते. सुधीर छान आहेत फुले, आम्हाला तुंगच्या पठारावर भरपुर निळी फुले दिसली होती. मालविका, मुंबईला सोनटक्का अजुनही टिकुन आहे. फ़क्त पिवळा मात्र दुर्मिळ झालाय.
|
Itgirl
| |
| Wednesday, October 10, 2007 - 2:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नमस्कार दिनेशदा, मला तुमचे हे लेख खूप आवडतात. खूप छान, माहितीपर आणि वेधक लिहीले आहे तुम्ही. वाचताना खूप छान वाटते, खूप माहिती ही मिळत आहे. पिवळा सोनटक्का आहे आमच्या कडे पुण्याला
|
Ashbaby
| |
| Wednesday, October 10, 2007 - 5:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद दिनेश फ़ोटोसाठी. लवंगांची आठवण आली कळ्या पाहून. माझ्याकडे सोनटक्क्याच्या कुळातील एक झाड होतं. पावसाळ्यात त्याला फ़क्त पुष्पकोष यायचे हिरवे. फ़ुले कधी आलीच नाहीत. आणि वाढ इतकी की दोन तीन कुंड्या भरल्या. शेवटी कंटाळून काढुन टाकली सगळी झाडे. साधना.
|
P_r_a
| |
| Wednesday, October 10, 2007 - 8:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, मला एक छानसा केमेरा घ्यायचा आहे. काही सुचवाल का? १० X ओप्टिकल झूम किमान हवी आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 11, 2007 - 3:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
साधना, ते वेगळे काहितरी असेल सोनटक्का कधी असा दगा देत नाही. प्र, मी स्वतः कोडाकचा DX 6490 वापरतो. ( माझ्या मते तरी ) अप्रतिम रीझल्ट्स येतात. त्याला 10x Optical zoom आहे. अलिकडच्या स्लीक मॉडेल्सच्यापुढे तो बोजड वाटतो. पण मला एका हाताने ऑपरेट करता येतो. मला dineshvs30@yahoo.com वर ईमेल करणार का ? कालिनालाच त्यांची शोरूम आहे. तिथे आणखी मॉडेल्स असतील.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|