|
Dineshvs
| |
| Sunday, September 16, 2007 - 11:38 am: |
|
|
सुधीर, काहितरी गोंधळ होतोय. गोखरुचे झाड नसते ते शक्यतो जमिनीवरच पसरते. लाजुळुची पाने लाजायलाच पाहिजेत. जर लाजत नसतील तर तो बाभळीचा एक प्रकार आहे. बाभळीमधे पिवळी, लाल, पांढरी, गुलाबी, दुरंगी असे अनेक प्रकार आहेत. एकदा वेताळ टेकडीवर यायला पाहिजे. माझे पुण्यातले मित्र, मला गप्पांमधेच गुंतवुन ठेवतात. दिवस कसा सरतो तेच कळत नाही. झकास एकदा ठरवुन यायला पाहिजे. ते खालच्या फोटोतले आहे ते मश्रुमच आहे. सेल्युलोज पचवण्याची अजब शक्ती असते मश्रुम्स मधे. आपण काय प्राणीही ते पचवु शकत नाहीत.
|
Jo_s
| |
| Friday, September 21, 2007 - 6:37 am: |
|
|
धन्यवाद दिनेश म्हणजे तो बाभळीचाच प्रकार असेल. त्या वेगळ्या लाजाळूची माहीती मिळालीका?
|
दिनेशदादा हे फूल कसले आहे? कृष्णकमळ की ब्रह्मकमळ? -आजानुकर्ण
|
Saee
| |
| Friday, September 21, 2007 - 12:09 pm: |
|
|
हे ब्रह्मकमळ आहे.. ..
|
Dineshvs
| |
| Friday, September 21, 2007 - 1:05 pm: |
|
|
आपण याला ब्रम्हकमळ म्हणतो खरे, पण खरे ब्रम्हकमळ हिमालयाच्या परिसरातच दिसु शकते. कदाचित, कूल कडे त्याचा फोटो असेल.
|
Nalini
| |
| Friday, September 21, 2007 - 1:47 pm: |
|
|
हे खरे ब्रम्हकमळ. आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो त्याला जेरुसलेम लीली तसेच बेथलहॅम लीली म्हणतात.
|
Dineshvs
| |
| Saturday, September 22, 2007 - 6:02 am: |
|
|
हो नलिनी, हेच ते. आपला कूल गेला होता ना, व्हॅली ऑफ़ फ़्लॉवर्स ला.
|
Zakasrao
| |
| Saturday, September 22, 2007 - 8:01 am: |
|
|
कूल ने असाच एक फ़ोटो काढला आहे. तो हाच का?
|
Nalini
| |
| Saturday, September 22, 2007 - 2:56 pm: |
|
|
दिनेशदादा, बरे झाले तु आठवण केलीस. सुभाष आपल्याला फोटोंची लिंक पाठवणार होता ना? झकास, अरे त्याने अजुन फोटो पाठवलेच नाहीत.
|
Zakasrao
| |
| Sunday, September 23, 2007 - 3:41 am: |
|
|
झकास, अरे त्याने अजुन फोटो पाठवलेच नाहीत.>>>>> तुम्ही मेल पाठवा त्याला तो लिन्क देइल. मला दिली त्याने. माझे पाहुन पण झाले. जवळपास २०० पेक्षा अधिक फ़ोटो आहेत. आता लोकसत्ताच्या पुरवणीत पण रोज कोणीना कोणी valley of flowers चा ट्रेक केलेले फ़ोटो टाकत आहेत. सगळॅ फ़ुलांचे फ़ोटो. online एडिशन वर शोधुन ठेवा दिनेशदा.
|
वा वा धन्यवाद मंडळी. तुम्हाला विचारल्यावर गूगलत होतो तेव्हा इथे http://www.marathiworld.com/muktangan/lekh/lekh94.htm थोडी माहिती मिळाली.
|
Karadkar
| |
| Thursday, September 27, 2007 - 12:39 am: |
|
|
जाई, जुई, चमेली, मोगरा, बटमोगरा, मदणबाण, सायली ह्या सगळ्या फुलान्चे फोटो कोणी टाकु शकेल का? माझ्याकडे कुंदाचा आहे.
|
Bee
| |
| Thursday, September 27, 2007 - 4:40 am: |
|
|
दिनेश, नागचाफ़्याची आणि चंदनवेलीची ओळख उत्तम करून दिली आहे. नागकेशर माहिती होते पण ते नागचाफ़्यापासून मिळते हे अज्ञात होते. फोटो सुंदर आले आहेत. त्यामागची, अर्थात फ़ुलझाड शोधून काढण्यामागची तुमची मेहनत चिकाटी थोर आहे. असेच लिहित रहा.. आम्ही त्यातून खूप आनंद उपभोगतो आणि नविन गोष्टी शिकतोही..
|
Ajanukarna
| |
| Thursday, September 27, 2007 - 5:45 am: |
|
|
खरे आहे. असेच लिहित रहा.. आम्हाला यातून खूप आनंद मिळतो.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 27, 2007 - 4:00 pm: |
|
|
मिनोति, माझ्याकडे आहेत ते मी पोस्ट करतो. नावांच्या बाबतीत मात्र कदाचित मतभेद होतील. बी, अजानुकर्ण तुम्ही सगळे आहात, म्हणुन जास्तच हुरुप येतो.
|
Ksmita
| |
| Thursday, September 27, 2007 - 6:00 pm: |
|
|
http://www.flowersofindia.net इथेही फ़ुलांची छान माहिती व फ़ोटो आहेत. आणि त्या फ़ोरमवर पण दिनेश यांचीच खुप पोस्ट आहेत. अजुन एक आहे http://www.bhatia-nurseries.com/index2.htm
|
Jo_s
| |
| Friday, September 28, 2007 - 5:07 am: |
|
|
व्वा, दिनेश, सुंदर माहीती. नागकेशर पहील्यांदीच पाहीलं त्या जाई, जुई सारख्या (मला दोन्ही ओळखता येत नाहीत) पांढऱ्या फुलांचे काही वेल आहेत. त्याला भरपुर फुलं येतात. खुपच नाजूक असतात ती. कसली आहेत ते कळलं तर बर होईल. मी फोटो टाकतो. गणपतीचा फोटोही मस्त. केवढी भव्य मुर्ती आहे. आणि प्रसन्नही
|
Ksmita
| |
| Friday, September 28, 2007 - 5:59 pm: |
|
|
बाप रे!! कसलं दिसतेय हे ड्रगन फ़्रुट!! अगदी नावाप्रमाणेच आहे. त्यात किती बिया आहेत, मग बियांसकट खातात कि काय? मला फ़ोटो बघितल्यावर बाउलमधे खीर भरुन ठेवल्यासारखे वाटले. पण खरच नाही इच्छा होणार एकदम खायची कमाल आहे निसर्गाची!!
|
Dineshvs
| |
| Saturday, September 29, 2007 - 4:46 am: |
|
|
स्मिता, अगदी वाईट नाही लागत. बियासकटच खातात. किवीच्या बियांप्रमाणेच लागतात या बिया.
|
Ashbaby
| |
| Saturday, September 29, 2007 - 8:37 am: |
|
|
दिनेश, खुप छान माहिती देत आहात तुम्ही. मी सुध्धा ब-याच वेळा राणी बागेची सफ़र करून येते ती तिथली झाडे पाहण्यासाठीच. तुम्ही फ़ुलांबद्दल लिहीताहात तसेच पानांबद्दलही लिहा ना प्लिज, राणीबागेतच कितीतरी सापडतील. तिवर किंवा निवर नावाच्या एका झाडाबद्द्ल मी "आसमंत" मध्ध्ये वाचले. तशीच दोन झाडे मी सायन ला टिळक इस्पितळासमोर पाहिली आहेत. एक इस्पितलासमोर आणि एक थोडे पुढे. त्याला एक फ़ुट लाम्ब दो-या लागतात आणि मग त्या दो-याना अगदी छोटी लाल फ़ुले. मी ओफ़िसातुन घरी जायला दादर बेलापुर एस्टीमध्द्ये बसल्यावर नेहेमी मान वाकडी करुन ही दोन झाडे पहायचे आणि बाकिचे लोक ही बाई वर मान करुन काय एवढी पाहतेय ते पाहात बसायचे. पुढे चेंबूर ला अंताक्षरी हाटेलच्या समोर याचे एक छोटे झाड आहे. पण बहर गेल्यावर बिच्या-या त्या झाडाला अगदी भुंडे करून टाकतात. फ़क्त खोड शिल्लक राहते. तुम्ही ज्याला चित्तरंजन वेल म्हटले आहे तेच गणेश वेल नावाने एका फ़िरत्या झाडवाल्याकडून मी घेतले. गेली दोन वर्षे वेल आहे. म्हणजे, एक मरतो पण बियांपासुन दुसरे १० उगवतात. अतिशय सुन्दर फ़ुले आहेत. माझ्याकडे जाइ-जुइ सारखा अजुन एक वेल आहे, त्याची पाने, संयुक्त नाहित, थोडी गडद हिरवी आणि तेलकट दिसणारी, कळे लांबट, आणि फ़ुल फ़ुलल्यावर त्याच्या पाकळ्या थोड्या जास्त लाम्ब आणि टोकेरी आहेत. मी जमल्यास फ़ोटो टाकेन. सध्या त्याला फ़ुले येताहेत. माहित असल्यास त्याचे नाव सांगा. साधना
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|