|
Jo_s
| |
| Saturday, September 08, 2007 - 4:54 am: |
|
|
धन्यवाद, दिनेश मला ते रानचवळीचे फुल घेवडा प्रकारातलं वाटलं होतं. आता पाऊस संपत आलाकीतर् फुलांचाच सिझन सुरू होईल. आत्ताच बरेच प्रकार दिसू लागले आहेत.
|
Maanus
| |
| Sunday, September 09, 2007 - 3:39 pm: |
|
|
दिनेशराव तुमची पुढची पोस्ट ही १०,००० रावी असनार आहे. अत्तापर्यंतच्या ९९९९ माहीतीपुर्ण पोस्टबद्दल मीच पहीले अभिनंदन करतो.
|
Nalini
| |
| Monday, September 10, 2007 - 4:07 pm: |
|
|
सहाच पाकळ्या, पण त्याची नजाकतीच्या>>दिनेशदादा, ह्याला गणेशवेल म्हणतात ना?
|
Runi
| |
| Monday, September 10, 2007 - 6:57 pm: |
|
|
अय्या नलिनी मी अगदी हेच म्हणायला आले होते आणि तु तो प्रश्न आधीच विचारला आहेस दिनेशदाला. आम्हीपण या लाल पुंगळीला गणेशवेल म्हणतो. कोकणात हा शब्द वापरत नाहीत का दिनेशदा?
|
Bhagya
| |
| Tuesday, September 11, 2007 - 2:09 am: |
|
|
हो, आम्ही पण गणेशवेलच म्हणतो. याच्या पानांची नक्षी फ़ारच नाजूक असते.
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 11, 2007 - 4:09 am: |
|
|
दिनेशदा दहाहजारी मन्सबदार अभिनंदन! अशीच वाटचाल सुरु राहुदे.
|
Jo_s
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:09 am: |
|
|
मस्त, दिनेश ते पांढरं फुल अगदी रांगोळी काढावी तस दिसतय. रानतिळाची फुलं सध्या भरपूर दिसताहेत, तेरडाच जरा दुर्मीळ झालाय. ते सुगंधी अशोकाच्या खालचे जांभळट गोंडे कशाचे आहेत, असेच मला मोठ्या झाडांनाही दिसलेत. त्यांचा व्यास १५ मिलिमिटर असेल. पिंगुळीची फुल मस्तच, फारच छान दि्सतात ती फुलली की. चित्तरंजनाची मात्र प्रथमच पाहीली. मी, लाजाळूचा एक प्रकार पाहीला आहे. ती ५,६ इंचच उंच झाडं असतात, पसरत नाहीत मधल्या खोडा भोवती बारीक आडव्या फांद्या असतात आणि त्याना गुंजेच्या पाना सारखी पानं असतात. त्या झाडाच्या वरच्या टोकाला पिवळी फुल व् मग बारीक फळं येतात. पावसाळ्या नंतर गायब होतात.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 11, 2007 - 12:58 pm: |
|
|
नलिनी, भाग्य, गणेशवेल आणि संक्रांतवेल हे खास पुण्याचे शब्द वाटताहेत मला. माहित होते पण कोकणात अजिबात वापरत नाहीत ते. ( पुण्यात अर्थात सणांवरुन नावे आहेत ही ) पुस्तकातही ही नावे नाहीत. झकास, सगळी तुम्हा दोस्तांची कृपा रे. सुधीर कुठलं झाड ते ? पाने लाजतात का ? लाजाळुच्या झाडाला केसाळ शेंगा येतात.
|
Jo_s
| |
| Wednesday, September 12, 2007 - 4:17 am: |
|
|
हो, त्याची पानं लाजतात. म्हणूनच मी त्याला लाजाळूचा प्रकार म्हणालो, पण ते, आपण ज्याला लाजाळू म्हणून ओळखतो तस दिसत नाही. आणि आकारही इतका लहान आहे की पटकन कोणाच्या लक्षात येत नाही. इतर पावसाळी झाडांसारखच हेही एक वाटतं. त्याचा फोटो मिळण कठीण आहे पण तश्या दिसणाऱ्या झाडाचा फोटो मिळाला तर टाकतो इथे. मला त्या सुगंधी अशोकाच्या खाली टाकलेल्या जांभळट गोंड्यांच्या फोटोचही कुतूहल आहे. बभळी सारख्या दुसऱ्या कुठल्या झाडालाही असे येतात का? मी अश्या झाडाला पाहीले आहेत, पण खुपच लहान होते ते. का तेही लाजाळू होते? झाड मोठे असल्या मुळे मला तशी शंका आली नसेल.
|
"पण त्यावेळच्या जखमांपेक्षा आता ते झाड तिथे नसल्याची जखम मोठी आहे." फारच सुरेख आणि मनाला भिडणारे वाक्य. बाकी दिनेशदादा तुमच्या गुणांना दाद द्यावि तितकी थोडीच. वृक्षवल्लींची इतकी छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:15 am: |
|
|
सुधीर मी पण फोटोच मिळाला तर हवा, असे म्हणणार होतो. ते गुलबट जांभळे तुरे लाजुळेच. अगदी छोटे असतात. सकाळी छान टपोरे असतात. शेंडेनक्षत्र, आभार. माझ्या वेळचे म्हणजे १९७७ ते १९८२ मधले रुईयाचे कुणी इथे असेल तर सांगेल. त्या कॉलेजच्या परिसरात, शिरिष, वाकेरी, मुचकुंद, कनकचंपा, कुंती अशी सगळीच झाडे होती. आता फक्त सुवर्णपत्र उरलय.
|
Bhagya
| |
| Friday, September 14, 2007 - 12:19 am: |
|
|
दिनेशदा, चेंबूरला श्रीरंग बखले नावाचे एक डॉक्टर आहेत. त्यांना पक्ष्यांची सखोल माहिती आहे आणि ते शाळांमधून, संस्थांमधून माहितिपट दाखवतात. मुंबईत पण कुठले पक्षी कुठे दिसतील हे ते सांगतात. ते स्वत्: जखमी पशुपक्षी घरी सांभाळून बरे करून योग्य ठीकाणी पाठवतात. मुंबईसारख्या ठीकाणी कुठली झाडे (अगदी बाल्कनीत) लावली तर फ़ुलपाखरे येतात हे त्यांच्याकडे मी स्वत: बघितलेय.. तर तशीच ही तुझी लेखमाला होतेय. कुठे दुर्मिळ झाडे आहेत, त्यांचा उपयोग कुठे होतो, फ़ुले कशी असतात, केव्हा येतात ही सचित्र माहिती इतकी छान देतोयस की तू पण असे कार्यक्रम करायला हवेस... हे ज्ञान फ़क्त मायबोलीपुरतेच राहिल नाहितर.
|
Dineshvs
| |
| Friday, September 14, 2007 - 4:35 am: |
|
|
भाग्य त्यांचा पत्ता आहे का ? माझी शाळा चेंबूरलाच होती. या वनस्पतिसृष्टीबद्दल जितके वाचतो अनुभवतो तितके थोडेच वाटु लागलेय आता. झाडाना प्रवास करता येतो, स्पर्धा करता येते, पाहता येते, मोजता येते. पुढे त्याबद्दलही लिहायचे आहे. सध्या मात्र गणेशोत्सवानिमित्त रजा घेतोय.
|
Jo_s
| |
| Friday, September 14, 2007 - 8:21 am: |
|
|
दिनेश, मला वाटलं नव्हतं पण काल मी म्हणालो होतो तोच लाजाळूचा प्रकार पहायला मिळाला. वेताळ टेकडीवर ते पहील्यांदीच दिसलं. नाहीतर मी ते दुसऱ्याच ठिकाणी पाहीलं होतं. हे त्याचे फोटो. वरती बारीक पिवळे ठिपके दिसताहेत ती त्याची फुलं आहेत. सोबत आकाराची कल्पना यावी म्ह्णून रुपयाचं नाणं ठेवलं आहे.
|
Jo_s
| |
| Friday, September 14, 2007 - 8:32 am: |
|
|
स्पर्शाने पानं मिटल्या नंतर ती लाजाळूसारखी फुलं आलेली झाडं मुद्दाम पाहीली. चांगली १०, १२ फुटी आहेत. अशी बरीच आहेत. पण याची पानं लाजली नाहीत. उलट मलाच काटे टोचले. माणसासारखी निगरगट्ट् होतात् की काय? पण याची फुलं मात्र लाजाळू सारखीच आहेत.
|
Bhagya
| |
| Friday, September 14, 2007 - 11:05 pm: |
|
|
दिनेशदा, पत्ता माझ्याकडे इथे नाहिये... ते सन्दीपचे नातेवाइक आहेत. पण मी सहज google केले तर पहिल्या दोन searches मध्ये त्यांची माहिति आहे- http://www.google.com.au/search?hl=en&q=shrirang+bakhale+india&meta=
|
Dineshvs
| |
| Saturday, September 15, 2007 - 4:48 am: |
|
|
सुधीर, ते आहे गोखरु. गोखरु हा गोक्षुर चा अपभ्रंश. गायीच्या कठीण खुराना ते टोचतात, तिथे आपली काय कथा. अगदी मस्तकात कळ जाते ती. पण म्हणुन काहि हे झाड वाईट नाही. मूतखड्यावरचे औषध, गोक्षुरादी गुग्गुळ यापासुनच करतात. भाग्य, आता भेटलच पाहिजे त्याना.
|
Zakasrao
| |
| Sunday, September 16, 2007 - 3:45 am: |
|
|
सुधीर यानी जो फ़ोटो टाकला आहे तेच झाड की झुडुप मी लाजाळुच म्हणुन पाहिल आहे. मावसभावाने मी सुट्टीमधे गावी गेल्यानंतर दाखवले होते. त्याला स्पर्श करुन ती पाने मिटण्याचा आणि उघडण्याचा अनुभव घेतलाय मी.खुप वर्ष झाले आता ह्या गोष्टीला. परत लाजाळुच झाड पाहण्याचा योग नाही आला. धन्यवाद सुधीर दिनेशदा पावसाळा संपत आलाय. अशा वेळी सगळिआकडे एक हिरवाइ आणि निसर्ग एक नवाच दिसतो.पाउस पुर्ण संपल्यानंतर जर एखादी सहल काढली तर भरपुर वृक्ष वल्ली पहहायला मिळतील. क्या खयाल है.
|
Jo_s
| |
| Sunday, September 16, 2007 - 3:53 am: |
|
|
दिनेश, हात्या गोखरुचा फोटो. आणि ही त्याची फुलं तो लाजाळूचा छोटा प्रकार ओळखीचा आहे का? त्याची फुलंही अगदी छोटी आहेत. सध्या इतक्याप्रकारची गवत फुलं आली आहेत. सगळीच कॅमेरात पकडता येत नाहीत. काही काही फारच छोटी आहेत. मोठा कॅमेरा हवा त्यासाठी.
|
Jo_s
| |
| Sunday, September 16, 2007 - 4:13 am: |
|
|
हे, मशरूम आहे का फ़ंगस, काहीही असलं तरी पण असे प्रकार दिसतात छान. त्यावर वारीक नक्षीही असते. फोटोतला हा प्रकार खुप खोल होता. जमेल तेवढा झुम केला आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|