|
Dineshvs
| |
| Monday, September 03, 2007 - 12:01 pm: |
|
|
ashbaby माझ्याकडे भूईचाफ्याचा नाही, रानहळदीचा टाकतो लवकरच. बी मागे मूडि आणि विनयने लिहिले होते त्या प्रसादाबद्दल.
|
Cool
| |
| Tuesday, September 04, 2007 - 4:29 am: |
|
|
तुळशीवरुन आठवले. काही दिवसांपुर्वी हिमालयातील ट्रेक च्या निमित्ताने भारत्-तिबेट यांच्या सिमेवर असलेल्या 'माना' या गावात गेलो होतो. या ठिकाणी सरस्वती नदीचा उगम होतो. याच ठिकाणी व्यासांनी गणपतीकरवी महाभारत लिहिले आणि येथुनच पांडवांनी स्वर्गारोहणाला सुरुवात केली. हे ठिकाण सिमेवर असल्याने एका चहाच्या दुकानदाराने कल्पकता वापरुन आपल्या दुकानाला 'भारत की आखरी चाय की दुकान' असे नाव दिले आहे. या दुकानात वन तुलसिचा अप्रतीम असा चहा प्यायला मिळाला. संध्याकाळची वेळ, सरस्वती आणि अलकनंदा यांचा संगम, दुरवर दिसणारा नयनरम्य वसुधारा धबधबा, देशाच्या शेवटच्या टोकावर बसल्याची भावना आणि हातात मस्त सुगंधी वन तुलसिचा चहा.....
|
Dhumketu
| |
| Tuesday, September 04, 2007 - 5:16 am: |
|
|
व्ह्यॅलीचे फ़ोटो टाक की रे...
|
Zakasrao
| |
| Tuesday, September 04, 2007 - 5:24 am: |
|
|
व्ह्यॅलीचे फ़ोटो टाक की रे... >>>>>>>> वृतांतासहित फ़ोटु हवेत किती दिवस वाट बघायची रे. फ़दीने लिहिल आणि फ़ोटो टाकलेत पण ते कमी आहेत. तो बोल्ला की बाकीच्या लोकांकडे जास्त फ़ोटो आहेत.
|
Jo_s
| |
| Tuesday, September 04, 2007 - 5:38 am: |
|
|
दिनेश, बांबू आणि तुळशीची माहीती छानच, त्यांचे इतके प्रकार असतात हे माहीत नव्हतं. नुकतच या फुलांनी लक्षवेधून घेतल, एकाचा आकार वेगळा आहे पण ओळखीच वाटलं कसलंते आठवेना. आणि दुसरेतर तंतूंचेच आहे, ते निळे बारीक तंतू आहेत आणि त्यात मधे एक पिवळी पाकळी आहे, याचा आकार साधारण ८ मीलीमिटर आणि पिवळी पाकळी तर दिड दोन मी.मी. आहे. पण हिरव्या गवतात संख्येमूळे छान दिसतात.
|
Cool
| |
| Tuesday, September 04, 2007 - 6:06 am: |
|
|
झकास, धुमकेतु मी हिमालयातील फोटो upload केले आहेत, मेल करा म्हणजे लिंक देता येईल
|
Dhumketu
| |
| Tuesday, September 04, 2007 - 8:24 am: |
|
|
फ़दी चे वर्णन वाचले...मस्त लिहीले आहे.. vally आणी पाऊस ह्यांचे काय नाते आहे कळत नाही..पण पावसामुळे पुर्ण मजा घेता येत नाही.. मी गेलो होतो तेव्हाही पाउस होता. हेमकुंडावरचा तो गुळाचा चहा आणी खिचडी तर अप्रतीमच... मी तर हावयासारखी २ वेळा खिचडी आणी ४ वेळेला चहा प्यायला होता.. फ़क्त पाठीमागच्या कुंडात पाय धुवायचे धाडस झाले नव्हते.. तुम्ही धुतलेत का पाय? दरड कोसळण्याचा अनुभव बहुतेक प्रत्येकाला येतोच... फ़क्त जास्ती वेळ लागू नये एव्हढिच आशा करायची.. बद्रीनाथच्या मंदीरात चंदन मिळते. भावीक लोक जे चंदन अर्पण करतात ते पाठीमागच्या बाजूच्या खिडकीत मिळते. नक्कि आठवत नाही पण बहुतेक १५०रु प्रती फ़ूट आहे. गोविंदघाटात तुम्हाला तलवारी वैगरे सहज विकत मिळते...फ़क्त आणायची जबाबदारी तुमची
|
Bee
| |
| Tuesday, September 04, 2007 - 9:35 am: |
|
|
कूल मस्त आहे माहिती... विनोदीही तितकीच
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 04, 2007 - 1:44 pm: |
|
|
सुभाष, आता वाचतो ते आधी. फोटोची लिंक पाठवच. सुधीर पहिले फुल रानचवळीचे आहे. दुसरे माझ्या बघण्यातले आहे. मग सांगतो नाव. अशीच निळी फ़ुले आम्हाला तुंग गडावर दिसली होती. निळ्या फुलांचे जरा कौतुक, कारण कमीच असतात ती फुले.
|
Saee
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:56 am: |
|
|
दिनेश, खुप दिवसांनी इकडे चक्कर टाकली आणि राहिलेले सगळे वाचून आता लाईनीवर आले आहे दमले एकदम पण दमवल्याबद्दल धन्यवाद. 'देणार्याचे हात घ्यावे' असं कितीही ठरवलं तरी ते सोपं मुळीच नाही. बुचाच्या झाडाचे जगाच्या पाठीवर सर्वचजण वेडे आहेत बहुतेक. त्याला 'आकाशनिंब' असेही म्हणतात. आकाशावेरी जाणारा उभा पसारा म्हणुन आकाशाचा उल्लेख ठीक आहे पण निंब का माहित नाही. गजरे आम्हीही करून घालायचो, घालतो. आणि फुलांचा रंग माझ्या मते मोतिया म्हणता येईल, तुम्ही आणि गोळेकाका म्हणताय तसा तो शुभ्र पांढरा असत नाही. मी लावलंय आणि तुफान वेगाने उंच जातंय. बहुदा येत्या वसंतात फुलेल. आता गौरी आणायला आम्ही घरी नसतो त्यामुळे गौरीच्या फुलांचा तसा संपर्कच उरला नाही. एकेक दरवाजा आपल्याच हाताने बंद करुन टाकल्यासारखं आहे हे. सुवर्णपत्रावरुन मला 'भुर्जपत्र' आठवलं दिनेश. डेहराडूनला FRI मध्ये पाहिलेलं झाड आणि खाली पडलेल्या पानांवर लिहून पाहिलेले मजकूर. FRI हाही खजिनाच आहे आणि कपिलाषष्ठी म्हणजे महाजनसर होते आमच्याबरोबर. पण किती आणि काय काय घेणार? 'भुर्जपत्र' पुर्वीपासुनच दुर्मिळ आहे की अलिकडे झालंय? ताम्हिणी घाटात जेव्हापासून नियमीत वाहतूक सुरू झाली तेव्हापासून स्थानिक लोकांनी रस्त्यांवर ऑर्किड्सची विक्री करायला सुरूवात केली. पर्यटकांना त्याची महती माहिती नसते, मातीमोल किंमतींन्ना विकत घेतलेली ही ऑर्किड्स ते पुढे अशीच कुठेही रस्त्यावर फेकून देतात. त्यासाठी दर वर्षी पावसाळाभर प्रत्येक सुट्टीदिवशी 'ओईकॉस' संस्था चालवणार्या माझ्या दोन मैत्रिणी काही मुलामुलींना सोबत घेऊन ताम्हिणीत गस्त घालतात आणि विकणार्यांना आणि विकत घेणार्यांना त्याचं महत्व पटवून सांगतात. खुप जिकिरीचे आणि वेळखाऊ आहे हे काम, पण नेटाने करतात कारण 'ऑर्किड्स'. केवड्याची बने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या प्रत्येक किनार्याच्या गावी हटकून आहेतच. ४ - ५ वेळा असं झालं की तिन्हिसांजेला समुद्रावरून परतताना नेहमीपेक्षा नव्या वाटा शोधण्याच्या नादात बनांमागे सहा लोखंडी खांब, मधे भरपुर राख आणि उदास वातावरण अशा जागांमधून यावं लागलं! आठवलं की दचका भरतो मनात. पहिल्यांदा असं घडलं तेव्हा ज्या घरी उतरलो त्यांना सांगितलं तर ते एकदम अवघडले कारण आम्ही तसेच वावरत होतो घरात आणि कोकणात काय अजुन देशावरही हे चालवून घेतलं जात नाही. त्यानंतर मग पुन्हा कधी कुणाला काही सांगायच्या भानगडीत पडलो नाही आणि काही वेळा असं झाल्यावर केवड्याला धरून नव्या वाटा धुंडाळणेच बंद करून टाकले. केवडा म्हटलं की श्रावण, पूजा, असं आठवण्यापेक्षा आता हेच आठवतं मला. उगीचच.
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 10:39 am: |
|
|
'देणार्याचे हात घ्यावे' असं कितीही ठरवलं तरी ते सोपं मुळीच नाही. अगदी सहमत आहे..
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:57 pm: |
|
|
तरी म्हंटलं सई कुठे हरवली. बुचाच्या झाडाला आकाशजाई असेही म्हणतात. म्हणजे झाडांच्या नामःकरणात, आपण जरा हेच आहोत म्हणायचे. हि फुले उत्तरररात्री फ़ुलतात. त्यावेळी ती खुप शुभ्र असतात. आपण बघतो ती झाडाखाली पडलेलीच, म्हणुन रंग जरा फिकुटतो. भुर्जपत्र खुप टिकाऊ असते. म्हणुन लेखनासाठी ते वापरत. शिवाय ते बाईंड करुनही ठेवता येते ना. ताम्हणी घाटातच काय आता सर्वच घाटात, पर्यटन जोरात सुरु झालेय. दारु पिऊन गाडी चालवणे केवळ अशक्य म्हणुन, तिलारी घाट अजुन वाचला आहे म्हणायचा. आपल्याकडे फुले दिसली कि ओरबाडायचीच अशी वृत्ती. मग गणपतीसाठी उपटली जाणारी रानहळद का असेना ? पाचगणीचे पठार, हे नवनविन फ़ुलांच्या प्रजाती निर्माण करणारे केंद्र होते. पण तिथे पर्यटकांच्या गजबजाटामुळे, ती प्रक्रियाच थांबलीय. कशी दिसणार ऑर्किड्स. ऑर्किड्स कशी रानावनात शोध घेता घेता अवचित दिसावीत. तुमच्या घरात ती आली, कि तिचे अप्रुप संपलेच म्हणायचे.
|
Zakasrao
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:34 am: |
|
|
दिनेशदा आता गौरी गणपती जवळ आले आहेत. कोल्हापुरात मी गौरी म्हणुन एक प्रकारच छोट गवत टाइप वनस्पती पाहिली आहेत. त्याना गुलाबी रंगाच्या कळ्या,फ़ुले असायची. आणि त्याचा छोटा भारा घेवुन घरात प्रवेश करायचा त्याला गौरी आली अस म्हणतात. त्या झाडाचे फ़ोटो आणि माहिती द्याल का? हे पाहिलय का तुम्ही? मी हे सर्व खुप लहान असताना गावी पाहिलय.आता तर नीट आठवत पण नाहि.
|
Bee
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:06 am: |
|
|
कवयित्री पद्मा गोळेंनी त्यांच्या एका कवितेत 'बुचप्याल्यात' असा एक शब्दप्रयोग केला आहे आहे तो मला खूप आवडला. खरच बुचाचे फ़ुल एखाद्या लांब प्याल्यासारखेच वाटते. दिनेश, मला नाही वाटतं ही फ़ुले शुभ्र असतात तर ती फ़िक्कट पिवळसर असतात. जसा हिरवा चाफ़ा अगदी कमालीचा फ़िकट हिरवा असतो तसा बुच कमालीचा फ़िकट पिवळा असतो. दुध घोटले की असा रंग येतो.
|
Runi
| |
| Thursday, September 06, 2007 - 8:29 pm: |
|
|
दिनेशदा मला तुळशीचे औषधी गुण वाचल्यावर आठवले, उन्हाळ्यात उष्णतेने तोंड आले असेल तर माझी आज्जी सब्जाच्या बिया पाण्यात भिजवुन त्या बिया आणि पाणी प्यायला द्यायची. तसेच कधी गांधिलमाशी किंवा काही चावले तर तुलशीच्या कुंडीतली ओली माती लावायला सांगायची ती.
|
Dineshvs
| |
| Friday, September 07, 2007 - 4:52 am: |
|
|
झकास, मला बघावे लागेल. तु घरी गेलास तर फोटो काढ. बी, असेलही. अगदी रात्री हि फुले शुभ्रच दिसतात.
|
Hems
| |
| Friday, September 07, 2007 - 6:01 am: |
|
|
दिनेशदा, तुळस मला फार प्रिय आहे. बरेच दिवस शोधत होते मी सॅन होजेमध्ये तुळशीचं रोप. मिळालं तेव्हा खूपच आनंद झाला मला.. आणि ते वाढतयही छान. आपल्याकडे कृष्णतुळस खास मानतात ना? तुम्हाला माहित असेलच त्याचं कारण . तर सांगा की का ते.
|
Nvgole
| |
| Friday, September 07, 2007 - 6:40 am: |
|
|
दिनेश, बूच फुलांचे बी ने केलेले वर्णन यथार्थ आहे. कोजागिरीच्या दुधासारख्या रंगाचे आणि गर्भरेशमी पोताचे कांतीमान फुल असते ते. अंधार कमी करतांना माझ्या प्रकाशचित्रात मूळ नजाकतही नाहिशी झालेली आहे. शेपच काय तो त्यावरून समजू शकेल, साईझही नाही.
|
Nalini
| |
| Friday, September 07, 2007 - 10:30 am: |
|
|
हेम्स, इथे बघ. तुळशीबद्दल खुप छान माहीती आहे शिवाय कृष्ण तुळशीचे खास उपयोगपण सांगितलेत.
|
Bhagya
| |
| Friday, September 07, 2007 - 11:35 pm: |
|
|
अहा! इथे आल्यानंतर गौरी-गणपतीच्या दिवसांत फ़ुलणार्या वनस्पतींच्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यासारखे वाटले. तेरड्याची दुहेरी-तिहेरी जात, जी मुद्दाम बागांमधून लावतात त्यात खूप वेगवेगळे आणि सुंदर रंग असतात. (ती फ़ुले इथेही फ़ुलतात.) आता सध्या इथे तर वॉटल आणि बाकीचे-जसे चेरी, crab apple, mock plums फ़ुलू लागले आहेत. पण आपल्याकडची फ़ुले ती आपल्याकडची शेवटी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|