|
Swa_26
| |
| Friday, August 24, 2007 - 6:11 am: |
|
|
दिनेशदा... आज मी ते सुवर्णपत्राचे झाड पाहिले ज्याचा फोटो तुम्ही टाकलाय ना ते!! हुतात्मा स्मारकाच्या जवळचे. सहीच आहे ते झाड!! मग मैत्रिणींना पण त्याची माहिती देउन जरा भाव खाला.. तुमच्यामुळे
|
Avv
| |
| Friday, August 24, 2007 - 8:51 am: |
|
|
हे झाड बहुदा मणिमोहोराचे असावे. पुण्यात श्री. द. महाजन नावाचे वनस्पतितज्ञ आहेत. त्यांच्या एक लेख होता या झाडाबद्दल. एम्प्रेस बागेतही हे झाड दिसते. फोटो, लिखाण सुंदर.
|
Dineshvs
| |
| Friday, August 24, 2007 - 11:15 am: |
|
|
स्मिता, आम्हीही लहानपणी त्या शेंगानी खेळलो होतो. पण आता गुलमोहोर नीट फ़ुलतच नाही. स्वाती, रोज त्या झाडावर नजर ठेव, त्याला फळे लागलेली मी अजुन बघितली नाहीत. आणि त्याचे पान घरी आणुन ठेवलेस तरी त्याची झळाळी टिकुन राहिल, गणपतिच्या सजावटीसाठी वापरता येईल. Avv असेलही, पण मणिमोहोर हे आपण दिलेले नाव असावे. खरे नाव शोधायला हवे. माहित आहे का ? मुम्बईत आणखी कुठेच दिसले नाही ते झाड मला.
|
Jo_s
| |
| Saturday, August 25, 2007 - 6:52 am: |
|
|
व्वा, दिनेश ते चक्री फुल पाहीलं आणि माझ्या या वेताळ टेकडीवर काढलेल्या फोटोची आठवण झाली. केवड्याची माहीतीही मस्तच,ते केवड्यात कात बांधून ठेवणे वगैरे आठवलं. रुईचा चिक डोळ्यात गेला तर अंधत्व येतं अस ऐकलं होत लहानपणी, ते खरं आहे का? मशरूमस् तर काय छानच दिसतात काहींवर नक्षीही अप्रतीम असते. काही दिवसांपुर्वीच एका मोठ्या वारूळावर शेकडो छत्र्या उगवलेल्या पाहील्या. त्या डार्क चॉकलेटी बॅकग्राउंडवर पांढऱ्या छत्र्या थर्माकॉलचे गोळे पडलेले दिसावे तश्या दिसत होत्या. पण दुसऱ्याच दिवशी कोमेजल्या सगळ्या. पाऊस पडला की टाकळाही सगळी कडे उगवायचा.
|
Bee
| |
| Monday, August 27, 2007 - 9:28 am: |
|
|
दिनेशदा, मला २ पिकलेली बेलफ़ळं मिळालीत. ती कशी खायची असतात माहिती असेल तर सांगाल का प्लीज, धन्यवाद.
|
Chioo
| |
| Monday, August 27, 2007 - 11:28 am: |
|
|
बी, तू दिनेशदाना विचारलं आहेस पण मी सांगतीय. चालेल ना दिनेशदा? बेलफळ फोडून नुसतंही खाता येतं. त्यात काही धागे असतात ते तोंडात राहतात आणि बी खायची नाही. याला थोडी तुरट चव असते. त्याचा गर पाण्यात थोडा वेळ भिजवायचा. मग चाळणीवर रगडून त्याचा रस काढायचा. त्यात थोडं साखर, मीठ घालून सरबत करता येतं. बघ तुला कसं आवडतं ते.
|
Dineshvs
| |
| Monday, August 27, 2007 - 4:10 pm: |
|
|
बघ बी, माझे शिष्यगण कसे तयार झाले आहेत ते. बेलफळाचे सरबतच कर. पण सरबतासाठी आवश्यक असलेला आंबटपणा त्यात नसतो. म्हणुन त्याचे सरबत चिंच घालुन करतात. Avv तो मणिमोहोरच आहे. मी खात्री करुन घेतली आभार. Jo_s फोटो छान आहे. वेगळे फुल ठेवले होते कि त्या खोडातच उगवले होते ? ते अशक्य नाही. आणि रुईचा चिक डोळ्यात कुठे त्वचेवर पडला तरी दाह होतो.
|
Bee
| |
| Tuesday, August 28, 2007 - 1:57 am: |
|
|
चिऊ, खूप छान माहिती दिलीस. असेच करीन. दिनेश, तुमच्या सारखे गुरुजी ज्यांना लाभले त्यांचे शिष्य कसे बरे मागे असतील..
|
Jo_s
| |
| Tuesday, August 28, 2007 - 5:31 am: |
|
|
धन्यवाद दिनेश, ते खाली पडलेलं फुल उचलून ठेवलं होतं. मला वाटतं बेलाच्या फळाचेच बिल्वावलेह आणि बेलमुरब्बा ही औषध बनवतात. ती पचनसंस्थेवर उपाय करतात. बरोबर आहेका हे?
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 28, 2007 - 12:50 pm: |
|
|
हो सुधीर, तीच औषधे आहेत. बेलफळाचा खोकल्यावर छान उपयोग होतो. कडवट गोड चव असते त्याची. अगदी सुकलेल्या झाडाला अशी पिवळी फुले आलेली, वाळवंटात खुपदा दिसतात.
|
Bee
| |
| Wednesday, August 29, 2007 - 6:20 am: |
|
|
वा दिनेश, सर्व अमरी प्रकार 'अमिर' आहेत खरचं. इथे सिंगापोरमधे ह्यात अजून वेगवेगळे प्रकार आढळतात आणि ते कुठेही दिसतात म्हणून आता त्याचे अप्रूप वाटत नाही. मला सितेची वेणी हा काय प्रकार आहे माहिती नव्हतं पण आता कळलं. हे वर्णन वाचून त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलेल आता कारण मला ती शोभेची कृतिम झाडेच वाटायची. इतकी छान नावे आणि तिही मराठी भाषेत आहेत हे वाचून धन्य झालो खरचं.
|
Deepa_s
| |
| Wednesday, August 29, 2007 - 6:55 am: |
|
|
दिनेशदादा, तुमच्यासाठी राखी.
|
Dineshvs
| |
| Friday, August 31, 2007 - 2:46 am: |
|
|
बी, सीतेची आसवं म्हणुनही फुले असतात. सीतेचा अशोक तर आपण बघितलाच. आभार दीपा, या बंधनातच रहायला आवडेल.
|
Bhagya
| |
| Friday, August 31, 2007 - 6:14 am: |
|
|
wow! किती सुंदर ऑर्किड्स आहेत.... महाराष्ट्रात असे प्रकार असतील असे माहित पण नव्हते. आसाम्- मेघालया कडे असे अनेक प्रकार आहेत हे वाचनात होते. मणिमोहोर हे नाव आणि फ़ुलोरा पण तसाच छान. दिनेशदा, ऑर्किड्स यायचे आपल्याकडे काही खास दिवस आहेत का? जसे की पावसाळा?
|
Bee
| |
| Friday, August 31, 2007 - 8:23 am: |
|
|
दिनेश, भुईचाफ़ा अमरी प्रकारात मोडतो का? कारण त्याची फ़ुले तशीच असतात..
|
Dineshvs
| |
| Saturday, September 01, 2007 - 6:07 am: |
|
|
भाग्य साधारण पावसाळा हा ऑर्किड्सचा मौसम, पण हिवाळ्यातही काहि ऑर्किड्स फ़ुलतात. फक्त हि फुले बघण्यासाठी नजर वरखाली फ़िरवावी लागते. बी भुईचाफा, आले हळदीच्या कुळातला.
|
Giriraj
| |
| Saturday, September 01, 2007 - 7:05 am: |
|
|
मामा,तुमच्या एक फ़ॅन आज तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठीच मायबोलीवर रजिस्टर झाल्या आहेत..
|
Dineshvs
| |
| Saturday, September 01, 2007 - 7:53 am: |
|
|
गिर्या, माझ्यातर्फे त्यांचे स्वागत कर. आणि जर तु असा मधेच सोडुन गेला नसतास, तर आणखी बर्याच झाडांची माहिती देता आली असती, हेही सांग.
|
Ashbaby
| |
| Saturday, September 01, 2007 - 8:46 am: |
|
|
दिनेश, किती माहिती आहे हो तुम्हाला. भुइचाफ़्याचा फ़ोटो आहे का कुठे? मी लहानपणी सावंतवाडीला असताना पाहिले होते पण त्याचा सुगंध अजुनही आठवणीत आहे. साधना.
|
Bee
| |
| Monday, September 03, 2007 - 2:38 am: |
|
|
दिनेश, कृष्ण जन्माष्टमीला पोह्यांचा प्रसाद असतो तो कसा करतात हे सांगाल का? त्यात मला वाटतं भिजवलेली चना डाळ, लोणचे, गुळ, पोहे हे सर्व घालतात ना?
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|